‘नरेंद्र मोदी राजधर्म पाळत नाही आहेत’ असे अटल बिहारी वाजपेयी म्हणाले

सत्य – तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ४ एप्रिल २००२ ला गुजरात भेटीवर आले, तेव्हाची ही घटना आहे. पंतप्रधान वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत वाजपेयींना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, ‘गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आपण काय संदेश द्याल?’ ते म्हणाले, ‘‘शासकांनी राजधर्म पाळला पाहिजे. जात, धर्म, जन्म यांच्या आधारावर प्रजेमध्ये कोणताही भेदभाव करु नये. मी नेहमी असेच करीत आलो, करायचा प्रयत्न करतो. आणि मला विश्वास आहे की नरेंद्रभाईसुद्धा हेच करीत आहेत.’’

 

   या विधानातील शेवटचे वाक्य ‘मला विश्वास आहे ही नरेंद्रभाई राजधर्मच पाळत आहेत’ माध्यमांनी संपूर्णपणे दुर्लक्षित केले आणि प्रसिद्धच केले नाही आणि ‘नरेंद्र मोदींनी राजधर्म पाळावा’ असे वाजपेयी यांचे वाक्य प्रसिद्ध केले. (जसेकी ते म्हणालेत की मोदी तो सध्या पाळत नाही आहेत!) सुदैवाने या संपूर्ण प्रसंगाचा विडियो आजही यूट्यूबवर उपलब्ध आहे आणि तो कोणीही पाहू शकतो.   http://www.youtube.com/watch?v=x5W3RCpOGbQ  

   ‘वाजपेयींचा मोदींना सल्ला’ या शीर्षकाखाली ‘हिंदू’ने दुसरया दिवशी म्हणजे ५ एप्रिल २००२ ला दिलेल्या वृत्तात म्हटले: ‘‘पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘माझा विश्वास आहे की ते आपला राजधर्म योग्य रीतीने पाळत आहेत’.” (संदर्भ :   http://www.hindu.com/thehindu/2002/04/05/stories/2002040509161100.htm )

   माध्यमांनी खोटारडेपणा सुरू केला, तेव्हा काही दिवसातच २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीच खरे काय आहे, त्याचे स्पष्टीकरण दिले. ६ मे २००२ ला वाजपेयी म्हणाले, की माध्यमांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळावा असे मी व्यक्त केलेले मतच प्रामुख्याने प्रसिद्ध केले. पण ‘आपण नेमके तेच करीत आहोत’ या नरेंद्र मोदींच्या उत्तराकडे मात्र फारसे लक्ष दिले नाही. ‘राजधर्म पाळण्यासाठी मोदींचा राजीनामा एवढा एकच उपाय आहे का?’ असेही वाजपेींनी विचारले.

(संदर्भ: http://www.rediff.com/news/2002/may/06train3.htm )

 

   तेव्हा सोशल मिडिया नसल्यामुळे वृत्तपत्रे आणि टी.व्ही. वाहिन्यांचाच प्रभाव होता आणि गुजरात व केंद्र सरकारचे जनसंपर्क (पब्लिक रिलेशंस) काम अत्यंत दुबळे होते. त्यामुळे १० वर्षापर्यंत हा खोटारडेपणा चालूच राहिला. आता सोशल िमडिया आणि यूट्यूबमुळे टी.व्ही. वाहिनंची मक्तेदारी संपुष्टात आली आहे आणि सत्य बाहेर येत आहे. ‘नरेंद्र मोदीही राजधर्म पाळत आहेत, याचा मला विश्वास आहे’ हे वाजपेयी यांचे वाक्य १० वर्षे दाबून ठेवणारया माध्यमांतील काही पूर्वग्रहदूषित लोकांनी सत्य बाहेर आल्यावर त्यासाठी काहीतरी बहाणे बनविली. कोणी म्हणतं, ‘मोदींची देहबोली (body language) योग्य नव्हती’, तर कोणी म्हणतं, ‘मोदींनीच वाजपेयींना हे म्हणयला लावले’. असे म्हणत ही मंडळी आजही असेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत की ‘मोदी राजधर्म पाळत आहेत’ असे वाजपेयींनी म्हटले असले, तरी प्रत्यक्षात मोदी तो पाळत नाहीत, हेच त्यांना सांगायचे होते!

 

   तद्दन खोटारडे, अप्रामाणिक आणि सत्य दडवून ठेवणारे निवडक वार्तांकन करणारे लोकच वाचकांची क्रूर पद्धतीने फसवणूक करण्यासाठी या प्रसंगाचे असे विश्लेषण करू शकतात. वाजपेयींना तो प्रश्न प्रिया सहगल यांनी विचारला होता. इतर अनेक पत्रकार त्या पत्रकार-परिषदेत उपस्थित होते. सत्य बाहेर पडले, तेव्हा प्रिया सहगल यांनी ‘मोदींची देहबोलीची अस्वस्थ होती, ते अस्वस्थ दिसत होते’ असे काही बहाणे पुढे उभे केले. ‘मोदी राजधर्म पाळत आहेत, असा मला विश्वास आहे’ हे तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींचे स्पष्ट वाक्य गाळून बातमीला आणि वाजपेयींच्या शब्दांना फिरवणारया प्रिया किंवा त्या पत्रकार परिषदेतील इतर पत्रकारांपैकी कोणीही त्यासाठी आजवर माफी मागितली नाही.

 

   खोटारडेपणा आणि कल्पित कथांची ही कहाणी न संपणारी आहे. ही अशीच पुढे चालू राहत जाऊ शकते. पण आपल्याला आता इथे हे प्रकरण संपवावे लागेल. एखाद्या उद्यमशील लेखकाने या संपूर्ण गुजरात प्रकरणामधील माध्यमांचा खोटारडेपणाचा एक विश्‍वकोष संकलित केला, तर ते काम उत्कृष्ट होईल. गोधराबद्दलच्या खोटारडेपणापासून सुरुवात केली, तर ‘चिथावणी’च्या कल्पित कथा आणि नंतरच्या दंगलींसंबंधीच्या विविध खोट्या कथा सांगता येतील. दंगलीची व्याप्ती, मृतांचा आकडा, संपूर्ण कल्पित कथा, अनािमक पीडितांच्या काल्पनिक कथा, अशा कितीतरी गोष्टी त्यात घेता येतील. गुजरातमधील डिसेंबर २००२ च्या विधानसभा निवडणूक काळात माध्यमांनी केलेले चुकीचे वार्तांकन याने त्या विश्वकोशाची समाप्ती करता येईल. 

कल्पित कथा