chapter-3

प्रकरण ३ रे हिंसाचार रोखण्यात सरकारची भूमिका

गोधरानंतरच्या गुजरातमधील दंगली भाजपा राज्य सरकारने ‘प्रायोजित केल्या होत्या’ किंवा निदान राज्य सरकारने दंगलींकडे ‘काणाडोळा केला’, असे आरोप देशी आणि विदेशी माध्यमांनी पुन्हा पुन्हा केले आहेत. पण हे आरोप, वीर संघवी कबूल करतात त्याप्रमाणे, माध्यमांच्या पूर्वग्रहातून आणि कल्पनेतून केले गेले आहेत. तपशिलात जाण्यापूर्वी एका सर्वेक्षणाची माहिती घेऊया. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘इंडिया टुडे’ साप्ताहिकासाठी ‘ओआरजी मार्ग’ या संस्थेने आणि ‘आज तक’ या टीव्ही वाहिनीने केलेले सर्वेक्षण ‘इंडिया टुडे’च्या २५ नोव्हेंबर २००२ च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. या सर्वेक्षणात भाजपाला गुजरात विधानसभेतील १८२ पैकी १२०-१३० जागा मिळतील तर कॉंग्रेसला ४५-५५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. याच सर्वेक्षणात ‘‘मोदी सरकारने दंगली कशा हाताळल्या?’’ असा प्रश्न विचारला होता. त्याला लोकांनी दिलेली उत्तरे अशी- १) निष्पक्ष आणि परिणामकारक- ६१ टक्के २) पक्षपाती पद्धतीने- २१ टक्के ३) अक्षमपणे – १५ टक्के याच साप्ताहिकाने डिसेंबर २००२ मध्ये आणखी एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात भाजपाला १०० ते ११० जागा तर कॉंग्रेसला ७०-८० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त झाला होता. १६ डिसेंबर २००२ च्या अंकात हे सर्वेक्षण प्रसिद्ध झाले होते. या सर्वेक्षणात पुन्हा दंगली हाताळण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याची उत्तरे अशी- १) निष्पक्ष आणि परिणामकारक- ६२ टक्के २) पक्षपाती पद्धतीने- २० टक्के ३) अक्षमपणे – १५ टक्के दोन्ही सर्वेक्षणांमध्ये “मार्चच्या दंगलीचे कारण काय?’’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. नोव्हेंबरच्या सर्वेक्षणात मिळालेली उत्तरे अशी- अ) गोधरा अग्निकांड – ५६ टक्के ब) मुस्लिम धर्मांध – २० टक्के क) सरकार प्रायोजित – १० टक्के ड) दोन्ही समाजातील गुंड- ९ टक्के इ) हिंदू धर्मांध गट – ३ टक्के डिसेंबरच्या सर्वेक्षणात मिळालेली उत्तरे अशी- अ) गोधरा अग्निकांड – ६४ टक्के 22 ब) मुस्लिम धर्मांध – १८ टक्के क) सरकार प्रायोजित – ७ टक्के ड) दोन्ही समाजातील गुंड- ७ टक्के इ) हिंदू धर्मांध गट – ३ टक्के (संदर्भ: http://www.india-today.com/itoday/20021216/poll.shtml) हे सर्वेक्षण गुजरातमध्ये करण्यात आले होते. तेच लोक दोन्ही घटनांचे (गोधरा व नंतरच्या दंगली) प्रत्यक्ष साक्षीदार होते. दोन्ही सर्वेक्षणात प्रश्नांची उत्तरे जवळजवळ सारखीच आहेत. कॉंग्रेसचे मतदार असलेल्या अनेकांनी सर्वेक्षणात मोदी सरकारने दंगल निष्पक्षपणे आणि प्रभावीपणे हाताळली, असे म्हटले. गुजरातच्या जनतेला असे वाटले. प्रत्यक्ष घटनेपासून दूर नवी दिल्लीत वातानुकूलित कार्यालयात बसून संपादकांनी मांडलेल्या विचारांपेक्षा जनतेचे म्हणणे पूर्णपणे वेगळे होते. दुसर्‍या प्रश्नाच्या उत्तराचे विश्लेषण केले असता, असे दिसते की, दंगली सरकार प्रायोजित होत्या असे म्हणणारे फक्त १० टक्के आहेत (यापैकी बहसुंख्य मुस्लिम होते). हिंदू धर्मांध गटांनी दंगली घडविल्या, असे म्हणणारे केवळ ३ टक्के होते. गोधरातील हत्याकांडामुळेच नंतरच्या दंगली उसळल्या, असे बहुतेकांचे एकमत होते. या दंगलींसाठी मुस्लिम धर्मांधांना जबबादार धरणारे जवळपास २० टक्के होते. ‘इंडिया टुडे’ने ऑगस्ट २००२ मध्ये ‘मूड ऑफ द नेशन’ असे सर्वेक्षण केले होते. ते २६ ऑगस्ट २००२ च्या अंकात प्रसिद्ध झाले. या सर्वेक्षणात ‘‘गुजरातच्या दंगलींना जबाबदार कोण?’’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला मिळालेली उत्तरे अशी- अ) मुस्लिम धर्मांध – २६ टक्के ब) गोधरातील हल्लेखोर – १९ टक्के क) राज्य सरकार – १४ टक्के ड) स्थानिक गुंड – १३ टक्के इ) हिंदू धर्मांध – ५ टक्के ङ्ग) माहीत नाही/सांगता येत नाही – २३ टक्के (संदर्भ: http://www.indiatoday.com/itoday/20020826/cover.shtml) हे सर्वेक्षण राष्ट्रव्यापी होते. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी केले होते. त्या निवडणूकींमुळे दंगलींकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात बदलला. त्याआधीसुद्धा गुजरात दंगलींना मुस्लिम धर्मांध आणि गोधरा अग्निकांड जबाबदार आहे, असेच बहुतेकांचे मत होते. सरकारसमोरची आव्हाने गोधरानंतरच्या दंगलींवर नियंत्रण आणताना गुजरात सरकारला अत्यंत कठीण स्थितीला सामोरे जावे लागले. गुजरात हे वर्षानुवर्षे अत्यंत धार्मिक संवेदनशील (communally very sensitive) राज्य होते आणि पंतग उडविणे किंवा क्रिकेटचा सामना, अशा किरकोळ घटनासुद्धा दंगली भडकविण्यास पुरेशा होत्या. हा विषय नीट समजून घेण्यासाठी आपण २७ फेब्रुवारीला झालेल्या गोधरा अग्निकांडाची माहिती घेतली आहेच. गुजरातचा १७१४ पासूनचा हिंसक इतिहास आहे आणि स्वातंत्र्यापूर्वी १९४० च्या दशकातही गुजरातमध्ये भीषण दंगली झाल्यात व स्वातंत्र्यानंतरही. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ ने १३ एप्रिल २००२ ला एक वृत्तकथा दिली आहे, तिचे शीर्षक आहे: ‘क्षुल्लक घटनांनी घडविल्या पूर्वीच्या दंगली.’ त्या लेखाच्या प्रारंभीचे वाक्य आहे: ‘‘एकविसाव्या शतकात व्यापक सांप्रदायिक दंगली गुजरातमध्ये होण्यासाठी गोधरा सारखे धक्कादायक हत्याकांड कारण ठरले असले, तर इतिहास असे सांगतो की विसाव्या शतकातील बहुतेक दंगली क्षुल्लक कारणांनीच झाल्यात…’’ 24 ‘द टेलिग्राफ’ सारख्या कोलकात्याहून प्रसिद्ध होणार्‍या (हा मार्क्सवादी सत्तेचा गड होता) आणि संघविरोधी म्हणून ओळखल्या जाणार्‍या वृत्तपत्रालाही एका महिलेचे म्हणणे प्रसिद्ध करावे लागले, ‘‘आमचे रक्त उकळते आहे.’’ गुजरात हे असे राज्य आहे की सचिन तेंडुलकर पाकिस्तानविरुद्ध खेळताना ९० वर बाद झाला, तरी दंगली होऊ शकतात. यावेळी तर स्वतंत्र भारतातील सर्वात भयंकर हत्याकांड झाले. पतंग उडविणे किंवा क्रिकेट सामन्यावरून दंगली उसळणार्‍या राज्यात ‘गोधरा’ घडले होते. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या १ मार्च २००२ च्या अंकात म्हटले आहे- ‘‘काल सकाळी गोधरा अग्निकांड घडल्यापासूनच गुजरातसारख्या धार्मिक ध्रुवीकरण झालेल्या राज्यात अशी प्रतिकाराची लाट उसळणार (दि. २८ फेब्रुवारी २००२ ला झालेली), हे अपेक्षित होते…’’ आपण आधी पाहिल्याप्रमाणे ‘इंडिया टुडे’ व ‘आऊटलुक’ने ११ मार्च २००२ च्या अंकात दि. २८ फेब्रुवारी लाच गुजरातमध्ये काही आठवडे दंगली चालू राहतील असे म्हटले होतेच. स्थिती खरोखरच भयंकर होती. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश डी.एस.तेवाटिया यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ‘गोधरा आणि नंतर’ असा अहवाल प्रकाशित केला आहे, एप्रिल २००२ मध्ये तेथे जाऊन फिल्ड स्टडी केल्यानंतर. (“कौन्सिल फॉर इंटननॅशनल अफेयर्स अँड ह्युमन राइट्स” यांनी तो प्रसिद्ध केला आहे.) हा अहवाल म्हणतो की: ‘अनेक प्रसंगांमध्ये हल्लेखोरांजवळ पोलिसांपेक्षा प्रभावी शस्त्रे होती.’ सरकारने उचललेली पावले दंगली आटोक्यात आणण्यासाठी गुजरात सरकारने कोणती पावली उचलली, हे पाहण्यापूर्वी त्यावेळी राजकीय पार्श्वभूमी काय होती, हे पाहणे आवश्यक आहे. केंद्रामध्ये त्यावेळी २२ पक्षांचे संयुक्त सरकार भाजपाच्या नेतृत्वाखाली सत्तेवर होते आणि हे सरकार राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जाहीरनाम्याप्रमाणे चालत होते. (आघाडातील अनेक पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवत होते.) ‘इंडिया टुडे’ आपल्या १८ मार्च २००२ च्या अंकात म्हणतो- ‘‘एका पक्ष कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआचे सरकार अडचणीत येऊ नये, म्हणून मोदी १५ दिवस आधीपर्यंत हिंदुत्वाशी संबंधित विषयांवर निर्णय घेत नव्हते. ‘सत्तेवर आल्यापासून मोदी वाजपेयी होण्याचा प्रयत्न करत होते. लोकांनी मात्र त्यांना सरादर पटेलांच्या दिशेने ढकलले.’’ (संदर्भ: http://www.indiatoday.com/itoday/20020318/cover2.shtml) भाजपाच्याच एका कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार वाजपेयी होऊ इच्छिणार्‍या मोदींनी दंगलखोरांविरुद्ध कठोर पावले उचलली आणि दंगल लवकरात लवकर आटोक्यात आणली. केंद्र सरकार, रालोआ सरकारमधील मित्रपक्ष हे सर्व पणाला लागले असल्यामुळे आणि माध्यमे विरोधात असल्यामुळे गुजरातमध्ये दंगली न होऊ देणे किंवा त्यांना तातडीने काबूत आणणे भाजपा सरकारला आवश्यक होते. २७ फेब्रुवारीला उचललेली पावले आता गुजरात सरकारने दंगल हाताळण्यासाठी कोणती पावले उचलली, ते पाहू. २७ फेब्रुवारीला सकाळी साधारण आठ वाजता गोधरा अग्निकांड घडले. अहमदाबाद/गांधीनगरमध्ये असलेले मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ८.३० ते ९.०० या काळात ही बातमी कळविण्यात आली. मोदी त्यादिवशी संध्याकाळी गोधरा भेटीवर गेले असले, तरी त्यांनी अहमदाबाद/गांधीनगरमधूनच सकाळी ९.४५ वाजता गोधरामध्ये संचारबंदी लागू केली. 25 १९४७ मध्ये मुस्लिम राष्ट्र पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर उरलेल्या हिंदू देशात, त्यातही भाजपाशासित गुजरातमध्ये मुस्लिमांनी ५९ हिंदूंना गोधरात जाळून मारले आणि मुख्यमंत्र्यांनी गोधरात दिसताक्षणी गोळ्या घाला असे आदेश दिले. गोधरातील घटनेनंतर तिचा प्रतिकार करण्यास बाहेर पडणार्‍या हिंदूंविरुद्ध प्रामुख्याने हा ‘दिसताक्षणी गोळ्या घाला’ चा आदेश होता. दक्षिणेतील प्रसिद्ध इंग्रजी दैनिक ‘हिंदू’ने २८ फेब्रुवारी २००२ च्या अंकात म्हटले होते: “(२७ फेब्रुवारीला) गोधरामध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिलेत.’’ ‘द टाइम्स ऑफ इंडिया’नेही २७ फेब्रुवारीचला ऑनलाईन असेच शीर्षक दिले आहे, ‘‘गोधरामध्ये संचारबंदी, दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश” व त्यात म्हटले आहे: ‘‘एका जमावाने साबरमती एक्स्प्रेस पेटवून ५७ लोकांना जाळून मारल्यानंतर व अनेकांना जखमी केल्यानंतर गुजरात सरकारने गोधरामध्ये अनिश्चित काळापर्यंत संचारबंदी आणि दिसताक्षणी गोळ्या घाला, असे आदेश दिले आहेत. गोधरा स्टेशनवर हल्लेखोरांनी ४ बोगी पेटवून दिल्या होत्या…” (संदर्भ: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/2256789.cms) टाइम्सच्या साईटने ही बातमी दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी प्रकाशित (post) केली होती. याचा अर्थ मोदींनी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी संचारबंदी लागू केली, हे पूर्णपणे खरे होते. चंदीगडहून प्रकाशित होणार्‍या ‘द ट्रिब्यून’ने २८ फेब्रुवारीला प्रकाशित केलेल्या बातमीचे शीर्षक होते, ‘‘साबरमती एक्स्प्रेस पेटवली, ५७ मृतांत रामसेवक, गोधरात दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश.’’ ही बातमी पुढे म्हणते -‘‘गोधरा हत्याकांड घडल्यानंतर लगेचच गोधरा शहरात अनिश्चित काळापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आणि दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले…’’ (‘घडल्यानंतर लगेचच’ हे शब्द बघा.) (संदर्भ: http://www.tribuneindia.com/2002/20020228/main1.htm) ही वृत्तपत्रेच नव्हे तर सर्व देशी विदेशी वृत्तपत्रांनी आणि रेडिफ.कॉम सारख्या वेबसाईट्सनीही दुसर्‍या दिवशी अशीच बातमी दिली. अमेरिकेतील ‘सॅनफ्रॅन्सिस्को क्रोनिकल’ या वृत्तपत्राने २७ फेब्रुवारीला ऑनलाइन दिलेली बातमी अशी (अ‍सोसियेटेड प्रेस ची बातमी होती) – ‘‘या हत्याकांडानंतर (गोधरा) सांप्रदायिक दंगली भडकतील, या भीतीने भारतीय अधिकार्‍यांनी धार्मिक विभागणी असलेल्या या मोठ्या देशात तातडीने सर्वदूर सुरक्षा वाढविली. पंतप्रधानांनी ‘प्रतिकार करू नका’ असे हिंदूंना आवाहन केले… गुजरातचे गृहराज्यमंत्री झडाफिया यांनी सांगितले की, ‘‘अग्निकांडातून वाचलेल्या साक्षीदारांच्या वाक्यांवरून हा हल्ला स्थानिक मुस्लिम समाजाच्या लोकांनी केला असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे हिंसक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन मुस्लिम वस्त्यांना विशेष सुरक्षा पुरविण्याचे आदेश आमच्या पोलिस अधिकारयांना आम्ही आधीच दिले आहेत.’’ ‘ज्या शहरात हिंदू आणि मुस्लिम वस्त्या शेजारी शेजारी आहेत, तेथे अधिक पोलीस दले तैनात करण्यात आली आहेत. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीच्या जुन्या दिल्ली या मुस्लिम वस्तीच्या तटबंदीच्या भागात मोठी सुरक्षा अधिक कडक केल्या गेली आहे.” (http://www.sfgate.com/news/article/Train-firebombing-kills-58-Hindu-activists- 2868703.php) ‘झिन्हुआ न्यूज एजन्सी’नेही २७ फेब्रुवारी २००२ लाच ऑन लाईन प्रकशित केलेल्या वृत्तात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी शांततेचे आवाहन केल्याचे म्हटले. रेडिफ डोट कॉमने त्याच दिवशी म्हटले की ‘‘राज्य सरकारने दंगली होऊ नयेत म्हणून पावले उचलली असून सुरक्षा वाढविली आहे.’’ रेडीफ.कॉमची ही संपूर्ण बातमी सातव्या प्रकरणात दंतकथा १५ मध्ये दिली आहे. तिचे शीर्षक आहे, ‘‘नरेंद्र मोदींनी ३ दिवस मोकळीक दिली.’’ नरेंद्र मोदी त्या दिवशी संध्याकाळी गोधराहून गांधीनगर/अहमदाबादला परतले. अहमदाबादला पोचल्यावर त्यांच्या आदेशानुसार सुरक्षेचा उपाय म्हणून ८२७ लोकांना अटक करण्यात आली. ‘ंइंडिया टुडे’ ला दिलेल्या मुलाखतीत (१८ मार्च २००२चा अंक) नरेंद्र मोदींनी ही माहिती दिली आहे. ‘इंडिया 26 टुडे’ने या अंकात हे मान्य केले आहे की सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात अटके झाली (Preventive arrests), पण अटक झालेल्यांची संख्या दिली नाही. सुप्रीम कोर्टाने गठित केलेल्या एस.आय.टी.नेही म्हटले की ८२७ प्रतिबंधनात्मक अटका २७ फेब्रुवारीला झल्यात. २७ फेब्रुवारीलाच गुजरात सरकारने त्यांच्याकडचे सर्व ७० हजार पोलीस तैनात केले, असे वृत्त ‘द हिंदुस्तान टाइम्स’ने २८ फेब्रुवारी २००२ च्या अंकात दिले. ब्रिटनमधून प्रसिद्ध होेणार्‍या ‘द टेलिग्राफ’ या दैनिकाने २८ फेब्रुवारीच्या अंकात असेच वृत्त प्रसिद्ध केले की २७ फेब्रुवारीलाच गुजरात मध्ये ७० हजारांवर पोलीस तैनात केले होते. या विदेशी दैनिकांच्या वृत्तानुसार केवळ गुजरातमध्येच सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती असे नव्हे, तर २७ फेब्रुवारीलाच देशभरात मुस्लिम मोठ्या संख्येत असलेल्या सर्व वस्त्यांनाही सुरक्षा वाढविण्यात आली. (संदर्भ: http://www.telegraph.co.uk/news/worldnews/asia/india/1386341/Hindus- massacred-on-blazing-train.html ) गुजरात सरकारने २७ फेब्रुवारीलाच अहमदाबादमध्ये आणि इतर संवेदनशील भागात जलद कृती दल (Rapid Action Force) तैनात केले आणि केंद्र सरकारने केंद्रीय राखीव दलाच्या (CRPF) तुकड्याही पाठविल्या. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘मिड डे’या दोन्ही दैनिकांनी २८ फेब्रुवारी २००२च्या आपल्या अंकात हे वृत्त दिले. (संदर्भ: http://www.mid-day.com/news/2002/feb/21232.htm) गुजरात सरकारने केंद्र सरकारकडे केंद्रीय राखीव दलाच्या (CRPF) १० कंपन्या पाठविण्याची विनंती केली आहे, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने २७ फेब्रुवारीलाच ऑनलाईन दिले आहे. गुजरातमधील मोठ्या दंगली सुरू होण्याआधीच या सर्व वृत्तपत्रांनी दिलेल्या या बातम्या आहेत. ‘द हिंदू’ हे दैनिक २८ फेब्रुवारीच्या अंकात म्हणते, ‘‘लोकांनी शांतता राखावी असे आवाहन राज्य सरकारने आज (२७ फेब्रुवारी) केले आहे…उद्याच्या बंदमध्ये कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.’’ (संदर्भ: http://www.thehindu.com/thehindu/2002/02/28/stories/2002022803070100.htm) विश्‍व हिंदू परिषदेनेही शांततेचे आवाहन केले होते. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने २८ फेब्रुवारीला दिलेल्या बातमीत म्हटले आहे: ‘‘विहिंपचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष आचार्य गिरिराज किशोर यांनी (अहमदबादमधील) सोला शासकीय रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना म्हटले की ‘हिंदूंनी शांतता राखावी आणि संयम ठेवावा. मुस्लिम बांधवांनाही मी अपील करतो की त्यांनी गोधरा हत्याकांडाचा निषेध करावा व तसेच हिंदूंच्या संयमाचा अंत पाहू नये. हिंदूंनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले असले, तरी अशा घटना थांबल्या नाहीत, तर मात्र त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते व ती पूर्णपणे हाताबाहेर जाऊ शकेल.’ याच शासकीय रुग्णालयात ५८ मृतांपैकी ५४ लोकांचे मृतदेह आणण्यात आले आहेत.’’ (संदर्भ: http://timesofindia.indiatimes.com/india/VHP-chief-appeals-to-Muslims-to- condemn-attack/articleshow/2379226.cms) केंद्र सरकारने २७ फेब्रुवारीलाच देशभर दक्षतेचे आदेश दिले होते, असे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने २८ फेब्रुवारी २००२ च्या अंकात दिले. गोधराला भेट दिल्यानंतर २७ फेब्रुवारीच्या संध्याकाळीच पत्रकारांशी बोलताना नरेंद्र मोदी यांनीही लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मोदींनी स्वत: दूरदर्शनवरून लोकांना असेच आवाहन केले होते. ते २८ फेब्रुवारीला दाखविण्यात आले होते वा आधी चित्रित केले गेले होते. नरेंद्र मोदींचे हे व्हिडिओ आवाहन २८ फेब्रुवारीपासून रोज दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांवर दाखवण्यात येत होते. सुदैवाने ते आजही ‘यू ट्यूब’ वर उपलब्ध आहे. (संदर्भ: http://www.youtube.com/watch?v=BIRMR8zW0iI) थोडक्यात २७ फेब्रुवारीला उचलण्यात आलेली पावले अशी- 27 १) गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकाळीच ‘दिसता क्षणी गोळ्या घाला’ असे आदेश गोधरा मध्ये दिले आणि ते घाईघाईने गोधरा घटनास्थळी धावले. २) गुजरातमधील संपूर्ण पोलीस दल तैनात करण्यात आले. ३) अहमदाबाद, गोधरा आणि इतर संवेदनशील ठिकणी राज्य सरकारने जलद कृती दलाच्या (RAF) सर्व उपलब्ध युनिट्स पाठविल्या. ४) केंद्र सरकारने केंद्रीय राखीव दलाच्या (CRPF) तुकड्या तातडीने गुजरातला पाठविल्या. ५) गोधरा आणि इतर संवेदनशील ठिकाणी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली. ६) ८२७ लोकांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली. ७) पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि गुजरात सरकारने हिंदूंना शांत राहण्याचे व प्रतिकार न करण्याचे आवाहन केले. ८) रा.स्व.संघ आणि विहिंपनेही हिंदूंना शांतता राखण्याचे व प्रतिकार न करण्याचे आवाहन केले. ९) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलेही (Central Industrial Security Force i.e. CISF) गुजरातमध्ये तैनात करण्यात आली. १०) केंद्र सरकारने संध्याकाळीच देशव्यापी दक्षतेची चेतावणी दिली. गोधरा हत्याकांडात मृत झालेल्या कारसेवकांचे मृतदेह अहमदाबादला आणण्यात आले. हे करणे अत्यावश्यक होते, कारण बहुसंख्य कारसेवक अहमदाबाद परिसरातील होते. गोधरात सकाळीच संचारबंदी लागू करण्यात आली होती आणि कारसेवकांचे मृतदेह गोधरातच ठेवले असते, तर तेथे स्थिती स्फोटक बनण्याची शक्यता होती. म्हणून त्यांना लवकरात लवकर गोधराबाहेर नेणे आवश्यक होते. पश्चिम अहमदाबादमधल्या, लोकवस्तीपासून लांब असलेल्या आणि नगण्य मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भागातील सोला शासकीय रुग्णालयात हे मृतदेह आणण्यात आले. राज्य सरकारला हिंदूंना दंगलीसाठी प्रक्षुब्ध करायचे असते, तर हे मृतदेह सरकारने पूर्व अहमदाबादमधील मुख्य शासकीय रुग्णालयात आणले असते. बहुसंख्य मृत कारसेवक पूर्व अ‍हमदाबादला राहणारे होते व येथे मुस्लिम लोकसंख्या होती. मृतदेह तेथे आणून हिंदूंना मुस्लिमांविरुद्ध भडकाविणे सहज सोपे असाते. हे मृतदेह आणण्याची वेळसुद्धा महत्त्वाची आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या २८ फेब्रुवारीच्या ओनलाईन अंकात आणि ‘इंडिया टुडे’च्या १८ मार्च २००२ च्या अंकात, हे मृतदेह २८ फेब्रुवारीला पहाटे ३.३० वाजता अतिशय उदास वातावरणात आणले गेले, असे म्हटले आहे. मध्यरात्रीनंतर बहुसंख्य लोक झोपेत असताना पहाटे हे मृतदेह आणण्यात आले. मृतांच्या नातेवाईकांना हे ठिकाण दूर तर होतेच व वेळही फार गैरसोयीची होती, पण पहाटेच्या वेळेमुळे जमाव जमून तो भडकण्याची शक्यता नव्हती. सरकारला दंगली घडवायच्याच असत्या, तर हे मृतदेह दिवसाउजेडी १२ वाजता किंवा दुपारी २ वाजता आणता आले असते. त्यामुळे ते नातेवाईकांच्याही सोयीचे झाले असते आणि गर्दी जमू देऊन भडकावणे सोपे होते. त्यामुळे सरकारने ४ महत्त्वाच्या योग्य गोष्टी केलेल्या दिसतात- १) कारसेवकांचे मृतदेह गोधरात न ठेवता, नातेवाईकांच्या सोयीसाठी अहमदाबादला आणले,याने गोधरातही शांती ठेवता आली. २) हे मृतदेह अहमदाबादला दिवसा न आणता पहाटे ३.३० ला आणले. त्यामुळे प्रतिक्रियेची शक्यता कमी किंवा नगण्य झाली. ३) मृतदेह आणतानाचे वातावरण शोकांतिकेला शोभेल असे उदास आणि खिन्न होते. मृतदेह मिरवणुकीने आणले नाहीत. ४) पूर्व अहमदाबादऐवजी मुस्लिम लोकसंख्या नगण्य असलेल्या पश्चिम अहमदाबादमधील रुग्णालयात हे मृतदेह आणले. 29 नाही. हा अभूतपूर्व आणि थांबविता न येणारा उद्रेक होता. एक वेळ अशी आली की हजारोंच्या संख्येने बाहेर पडणार्‍या जमावांना पोलिसांना थांबविणे अशक्य झाले.’’ गुजरात राज्यभर इतरत्र परिस्थिती साधारण सारखीच होती. राज्य पोलीस दलात ४३ हजार जवान आहेत. त्यापैकी १२ हजार जवानांकडे शस्त्रे आहेत. राज्य राखीव पोलिसांची संख्या १४ हजार आहे. ग्रामीण भागात सुद्धा मुस्लिमांवर हल्ला करणारे जमाव किमान ५०० ते १० हजार लोकांचे होते. सदरपुरा भागात २९ लोकांना जाळून मारण्यात आले, तेव्हा हल्लेखोरांचा जमाव पाचशेंचा होता. पंडरवाडा भागात जवळपासच्या गावांतून जमलेल्या ५ हजारांच्या जमावाने हल्ला करून ५० लोकांना जाळून मारले. गुजरातचे गृहराज्यमंत्री गोर्धन झडाफिया म्हणतात- ‘दंगली थांबविण्यासाठी पोलिसांनी परिणामकारक गोळीबार केल्याचे भक्कम पुरावे आहेत.’ केंद्रीय कायदामंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत माहिती देताना सांगितले की पोलिसांनी २ हजार फैरी (Rounds) झाडल्या आणि ९८ दंगेखोरांना ठार मारले. त्याशिवाय ४ हजार लोकांना दंगलींच्या आरोपात गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे… …लष्कराची मदत मागविण्यातही दिरंगाई झाली, या आरोपावरुन टिका केली जात आहे. मोदींच्या म्हणण्यानुसार २८ फेब्रुवारीलाच दुपारी ४ वाजता लष्कराची मागणी करणारी अधिकृत विनंती देण्यात आली होती. ही औपचारिक मागणी दिल्लीत संध्याकाळी ६.३० वाजता पोचली. त्याच रात्री मोदींच्या विनंतीवरून संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस मध्यरात्रीनंतर १ वाजता अहमदाबादला पोचले. दुसर्‍या दिवशी सकाळी हिंसाचार थांबविण्यासाठी जॉर्ज फर्नांडिस स्वतःला अत्यंत धोका पत्करून शूरपणे रस्त्यावर उतरले. अहमदाबादमध्ये सकाळी ११.३० वाजता लष्कराने ध्वज संचलन (Flag march) केले. २८ फेब्रुवारीच्या पहाटे ३.३० वाजता गोधराहून आणलेल्या कारसेवकांच्या मृतदेहांवर रुग्णालयाजवळच अंत्यसंस्कार (दहन) केले जावेत, असा आग्रह मोदींनी धरला. सोला नागरी रुग्णालय पश्चिम अहमदाबादच्या टोकाला आहे आणि मुस्लिम लोकसंख्या नगण्य आहे. मृतदेहांवर असे अंत्यसंस्कार केल्याने लोकांच्या संतापाला थोडा आवर घालता येईल, असा मोदींचा विचार होता. मृतदेहांवर तेथेच अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना मान्य करवण्याची जबाबदारी रुग्णालयात हजर असलेल्या विहिंप नेत्यांवर सोपविली होती. पण ज्या क्षणी प्रत्यक्षात हा प्रस्ताव पुढे आला, तेव्हा मृतांचे नातेवाईक भडकले आणि भाजपा कॉंग्रेसपेक्षाही वाईट पद्धतीने वागत आहे, असे आरोप केले. विहिंपचे एक कार्यकर्ते विष्णु साठवारा ओरडले: ‘सत्तेवर पोचण्यासाठी आमचा शिडीसारखा वापर करणारे भाजपा नेते आता आम्हाला लांडग्यांच्या कृपेवर सोडत आहेत’… …राजकीय विश्‍लेषक अरविंद बोस्मिया लिहितात- ‘‘एवढ्या मोठ्या उठावाचे नेतृत्व करणे संघपरिवाराच्या शक्तीबाहेरचे होते. हा उठाव, गोधरा हत्याकांडाची उत्स्फूर्त (spontaneous) प्रतिक्रिया होती. मोदीच नव्हे, तर संपूर्ण संघ परिवाराला त्याने कठीण मार्गावर आणून पोचवले तर या लढाऊ संघर्षात मोदी वाहून गेलेत.” (संदर्भ: http://www.indiatoday.com/itoday/20020318/cover.shtml ) ‘इंडिया टुडे’ मधील हा लेख स्पष्टपणे काय सुचवितो? परिस्थिती हाताळणे गुजरात पोलिसांसाठी सोपे होते का? या लेखातील महत्त्वाचे मुद्दे पाहूया- १) अहमदाबादमध्ये असलेले सर्व पोलीस म्हणजे ६ हजार जवान, त्यापैकी १५०० हजार सशस्त्र, शहरात तैनात करण्यात आले होते. २८ फेब्रुवारीला जागोजागी जमा झालेले जमाव अभूतपूर्व होते. त्यामुळे पोलिसांची ताकद फार कमी पडली. २) जलद कृती दल (RAF) तैनात असूनही तिलाही हिंसाचार थांबविता आला नाही. ३) अहमदाबाद पोलिसांकडे रोज मदतीसाठी २०० फोन येत. २८ फेब्रुवारीला किमान ३,५०० फोन आले. ४) अहमदाबादच्या अग्निशमन दलाची क्षमता १०० घटना हाताळण्याची होती. त्यादिवशी त्यांना ४०० फोन आले. ५) अहमदाबादचे पोलिस आयुक्त पी.सी.पांडे यांचे म्हणणे हेच दाखवते की परिस्थिती हाताबाहेर गेली होती. ६) २८ फेब्रुवारी २००२ ला जमावाचा उद्रेक इतक्या टोकाला पोचला होता की परिस्थिती हाताबाहेर गेली, असे वृत्त ‘द हिंदू’ने दुसरया दिवशी दिले. दक्षिण भारतातील सर्वात मोठे इंग्रजी दैनिक ‘द हिंदू’ने २८ फेब्रुवारीच्या घटनांचे वार्तांकन करताना १ मार्च २००२ च्या अंकात म्हटले, ‘‘परिस्थिती वेगाने हाताबाहेर जात आहे, हे पाहून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत घाईने (frantically) लष्कराला बोलाविले. लष्कर अहमदाबादमध्ये पोचायला लागले असून उद्या (शुक्रवारी) शहरात तैनात केले जाईल.” (ंसंदर्भ: http://www.hinduonnet.com/2002/03/01/stories/2002030103030100.htm ) 30 ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने २ मार्च २००२ च्या अंकात म्हटले- ‘‘’दिसताक्षणी गोळ्या घाला’ असे गुजरात पोलिसांना दिलेले आदेश किंवा तैनात केलेले लष्कर देखील शुक्रवारी (१ मार्च २००२) अहमदाबादमधील जनतेचा प्रक्षोभ थांबवू शकले नाही. सलग दुसर्‍या दिवशी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कोसळून पडली होती आणि मृतांची संख्या वाढत होती…’’ आणि हे चित्र १ मार्चचे आहे, ज्या दिवशी २८ फेब्रुवारीपेक्षा हिंसाचार खूप कमी होता. १ मार्चला हिंसाचार फार कमी असताना लष्कर किंवा ‘दिसताक्षणी गोळ्या घाला’ हे आदेश हिंसाचार थांबवू शकले नसतील, तर २८ फेब्रुवारीला लष्कर तैनात नसताना आणि हिंसाचार सर्वोच्च पातळीवर असताना परिस्थिती काय असेल? ‘‘प्रत्येक क्रियेवर तेवढीच आणि विरुद्ध प्रतिक्रिया उमटते’’ असे उद्गार मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढल्याचे धादांत खोटं सांगणार्‍या लेखात सुद्धा ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ ने २ मार्च २००२ ला म्हटले, ‘‘जमाव प्रचंड संख्येने जमत होते, ज्यामुळे तैनात पोलिस हिंसाचाराच्या सागरातील एका थेंबाप्रमाणे भासत होते.’’ संपूर्ण पोलीस दल, राज्य राखीव दल, जलद कृती दल आणि केंद्रीय राखीव दल तैनात असताना ही परिस्थिती होती. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने १ मार्च २००२ च्या अंकातच म्हटले की राजकोटमध्येही परिस्थिती हाताबाहेर गेली होती, फायर ब्रिगेडला १७५ फोन आले आणि त्यांच्याजवळचा पाणीसाठाच संपला होता. या बातमीनुसार पोलिसांनी गोळीबाराच्या २ फैरी झाडल्या आणि अर्ध्या शहरात संचारबंदी लागू केली. ‘इंडिया टुडे’ने आपल्या वृत्तलेखात पोलिसांच्या ताकदीचे आकडे दिले आहेत. राज्याचे पोलिस ४३ हजार, राज्य राखीव पोलिस दल १४ हजार, म्हणजे एकूण ५७ हजार, अहमदाबादमधील ६ हजार पोलीस धरून एकूण ६३ हजार, केंद्रीय राखीव दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) इत्यादी जोडुन तैनात केलेल्या एकूण जवानांची संख्या ७० हजारांवर होती. ‘द टेलिग्राफ’ (ब्रिटन) आणि ‘हिंदुस्तान टाइम्स’ यांनीही ७० हजार जवान तैनात केल्याचे वृत्त दिले होते. त्यामुळे हे सिद्ध होते की जे ७०,००० सुरक्षकर्मी तैनात केले होते ते संपूर्ण बळ होते व उपलब्ध सर्व प्रकारचे शक्य अतिरिक्त गट जसे RAF, CRPF, CISF इत्यादी तैनात करण्यात आले होते. कायदा व सुरक्षा व्यवस्था हाताबाहेर गेल्यामुळे मोदींच्या विनंतीनुसार वाजपेयी सरकारने लष्कर तैनात करण्याचे आदेश दिले, असे वृत्त ‘द टेलिग्राफ’ ने १ मार्च २००२च्या अंकात दिले. यावरून लक्षात येते की अहमदाबादमधील स्थिती संपूर्णपणे हाताबाहेर गेली होती आणि नरेंद्र मोदी असोत की सोनिया गांधी, कोणालाही ती नियंत्रणात ठेवता आली नसती. हिंदूंचा संताप अनावर होऊ शकतो, अशी चेतावणी आचार्य गिरीराज किशोर यांनी दिल्याचे वृत्त ‘द टाइम्स ओफ इंडिया’ने दिले होते, ती चेतवणी खरी ठरली. पण राज्य सरकारने परिस्थिती कठोरपणे आणि परिणामकारक पद्धतीने हाताळली. ‘इंडिया टुडे’च्या ११ मार्च २००२ च्या अंकात (२८ फेब्रुवारी पर्यंतच्या घटना देताना) म्हटले आहे- ‘‘संघ प्रचारक ते भाजपा मुख्यमंत्री बनलेल्या नरेंद्र मोदी यांनी म्हटले – ‘काहीही झाले तरी हत्याकांडातील गुन्हेगारांना पकडून न्यायाला आणूच.’ ते अवघड स्थितीत सापडले आहेत. जरी मोदींनी अहमदाबादमध्ये लष्कराला बोलाविले तरी ते म्हणालेत- ‘पाच कोटी गुजराती लोकांचा उद्रेक आमच्या मर्यादित पोलीस ताकदीने आम्ही थांबवू शकत नाही. हिंसाचार पसरू नये यासाठी आम्ही आमचे सर्वस्व केलेले आहे’.” (http://www.indiatoday.com/itoday/20020311/cover2.shtml ) ‘गुजरातमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे आणि मुख्यमंत्री अवघड परिस्थितीत अडकले आहेत’ असे इंडिया टुडे’ ने २८ फेब्रुवारीलाच म्हटले होते. अहमदाबादमध्ये २८ फेब्रुवारी २००२ला सकाळी ११ च्या सुमारास दंगली सुरू झाल्या. दुपारी १२ वाजताच मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारशी संपर्क साधून लष्कर पाठविण्याची अनौपचारिक विनंती केली. ‘इंडिया टुडे’च्या १८ मार्च २००२ च्या अंकात ‘क्रोनोलॉजी ऑफ अ क्रायसीस’ या लेखात याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावेळी भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असल्यामुळे युद्धजन्य 31 स्थिती लक्षात येऊन जवळपास पूर्ण लष्कर सीमेवर तैनात करण्यात आले होते. त्यापैकी काही तुकड्या तातडीने अहमदबादला पाठविण्यात आल्या. सीमेवरून निघण्यासाठी या तुकड्यांनी १-२ दिवससुद्धा घेतले नाहीत. काही तुकड्या तर अहमदाबादमध्ये १ मार्चच्या पहाटे दीड वाजताच पोचल्या. २ मार्चला लष्कराने अहमदाबादचा संपूर्ण ताबा घेतला होता. हा एक विक्रम होता. यापूर्वी गुजरातमधील दंगलीत लष्कर पोचण्यास ३ ते ५ दिवस लागले होते. नरेंद्र मोदी यांनी घाईघाईने (Frantically) अहमदाबादमध्ये लष्कराला बोलाविले, असे वृत्त ‘द हिंदू’ने दिल्याचे आपण पाहिलेच आहे. पण तरीही प्रसारमाध्यमांमधील संघविरोधी, भाजपविरोधी लोकांनी ‘मोदींनी तीन दिवस लष्कराला बोलाविले नाही’ असे बेछूट आरोप केले आहेत. अहमदबादमध्ये उसळलेल्या संतप्त जनसागरामुळे गुजरात पोलिसांची संख्या फार कमी पडत असतानाही पोलिसांनी त्या दिवशी गोळीबाराच्या १४९६ फैरी झाडल्या. त्यात ११ हिंदू मारले गेले आणि १६ जखमी झाले. हा सरकारचा अधिकृत आकडा आहे. हे आकडे १ मार्च २००२ च्या ‘द हिंदू’ मधुनही कळतात. ‘द हिंदू’ ने त्या अंकात म्हटले- ‘‘गुरुवारी २८ फेब्रुवारीला अहमदाबाद शहरात पोलीस गोळीबार, भोसकाभोसकी आणि इतर कारणांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात ३० लोकांचा मृत्यू झाला, तर राज्यातील इतर शहरांतील मृतांची संख्या ५० वर पोचली…संध्याकाळपर्यंत अहमदाबादमध्ये पोलिसांनी ४६ फैरी झाडल्या, त्यात १० लोक मारले गेल्याचे समजते.’’ वृत्तातील पहिल्या वाक्यात ‘पोलीस गोळीबार, भोसकणे आणि इतर घटनांत अहमदाबादमध्ये ३० लोक मरण पावले’ असे म्हटले आहे, पण पोलिस गोळीबारातील मृतांची संख्या दिलेली नाही. पुढे एकट्या अहमदाबादमध्ये पोलीस गोळीबारात १० लोक ठार झाल्याचे समजते, असे म्हटले आहे. यावरून हे स्पष्ट आहे की ‘पोलिस गोळीबारात ११ हिंदूंचा मृत्यू आणि १६ जखमी’ हे अधिकृत आकडे पूर्णपणे खरे आहेत. २८ फेब्रुवारीला पोलीस गोळीबारात मृत झालेल्यांची एकूण संख्या १७ होती- ११ हिंदू व ६ मुसलमान. ‘द पोर्ट्समाऊथ हेराल्ड’ या दैनिकाने २८ फेब्रुवारी २००२ ला प्रकाशित केलेल्या ऑनलाईन बातमीत म्हटले- ‘‘राज्याचे व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या अहमदाबादमध्ये मुस्लिम वस्त्यांवर चालून जाणार्‍या हिंदू जमावावर पोलिसांनी प्रथम अश्रुधुराचा मारा केला. जमावाने तरिही न थांबल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. त्यात ६ जण जखमी झाले असून त्यापैकी ३ जण गंभीर जखमी असल्याचे नागरी रुग्णालयाच्या अधिकार्‍यांनी ‘द असोसिएटेड प्रेस’ला सांगितले.” (संदर्भ: http://seacoastauction.com/2002news/2_28_w2.htm) बीबीसीने २८ फेब्रुवारीला ऑनलाइन बातमी प्रकाशित केली, तेव्हा राज्यातील एकूण मृतांची संख्या तिने फक्त ४० दिली, म्हणजेच हिंसाचार तेव्हा सुरू हाता. त्या बातमीत बीबीसी म्हणाली, “हिंदू युवकांना थांबविण्यासाठी तेथे (अहमदाबादमध्ये) लष्कर तैनात करण्यात आले आहे… परिस्थितीवर नियंत्रण आणायचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ६ लोकांचा मृत्यू झाला.” (पूर्ण राज्यातील पोलिस गोळीबारातील मृतांची संख्या दिवसाखेर १७ वर पोचली.) (लिंक: http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/1845996.stm ) कुठेही ‘पोलीस सक्रिय नव्हते’ किंवा ‘ते दंगेखोरांना सामील होते’, असा आरोप केलेला नाही. उलट ‘पोलीस शांतता आणण्याचे प्रयत्न करत होते’, असेच म्हटले आहे. ‘द टेलिग्राफ’ ने १ मार्च २००२ ला म्हटले-‘‘२८ फेब्रुवारीच्या विश्‍व हिंदू परिषदेच्या बंदच्या काळात निदर्शक हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांना जागोजागी अश्रुधुराचा मारा करावा लागला आणि गोळीबार करावा लागला, असे प्रशासनाने म्हटले आहे. नदियाड आणि गोधरा येथे पोलीस गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला.” अहमदाबादमध्ये लष्कराला तातडीने बोलावण्यात आले. १ मार्च २००२ च्या अंकात ‘द हिंदू’ ने म्हटले आहे- ‘‘लष्कराच्या तुकड्या अहमदाबादमध्ये येण्यास सुरुवात झाली असून, त्या उद्या सकाळी, शुक्रवारी (१ मार्च) तैनात केल्या 32 जातील.” याचा अर्थ लष्कराच्या तुकड्या इतक्या लवकर २८ फेब्रुवारीला मध्यरात्री अहमदाबादमध्ये दाखल झाल्या, की लष्कर पोचल्याची बातमी दुसर्‍या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध करायला ‘द हिंदू’च्या बातमीदारांना पुरेसा वेळ मिळाला! त्याच दिवशी ‘द इंडियन एक्स्प्रेस’चा वृत्तांत म्हणाला: ‘‘यामुळे रात्री १.३० वाजेपर्यंत मृतांचा आकडा एकूण ७० झाला, ज्यातील ६० लोक एकट्या अहमदाबादमधील होते. या वेळेपर्यंत संरक्षणमंत्री जॉर्ज फ़र्नांडिस अहमदाबादला पोचून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करत होते आणि लष्कराच्या गांधीनगर शिबिरातून ११ व्या डिव्हिजनचे सैन्य पेट्रोलिंगसाठी पाठवण्यास सुरुवात झाली होती. शहरात लष्कर पोचल्याच्या बातमीमुळे शहरातील नागरिकांना आशेचा किरण दिसला…’’ या बातमीवरून ‘द इंडियन एक्स्प्रेस’लाही लष्कर पोचल्याचे आणि संरक्षणमंत्री फर्नांडिस पोचल्याचे वार्तांकन करण्यास व १ मार्च च्या अंकात छापायला पुरेसा वेळ मिळाला हे कळते. ‘द टेलिग्राफ’ ला ही ते करायला वेळ मिळाल, व त्याने (कोलकाता आवृत्ती) दिलेल्या बातमीत म्हटले- ‘‘लष्कराने प्रत्यक्ष तैनात होण्यापूर्वीच्या कवायती सुरू केल्या आहेत आणि ते उशिरात उशिरा उद्या सकाळी (शुक्रवार, १ मार्च) शहरात बाहेर पडेल.’’ ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या २८ फेब्रुवारीच्या ऑनलाईन आवृत्तीत बातमी अशी आहे:– ‘‘१ हजार निमलष्करी जवान गुजरातकडे रवाना प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ऑनलाइन वृत्त: गुरुवार, २८ फेब्रुवारी २००२, १६-२९ पीएम नवी दिल्ली, २८ फेब्रुवारी : मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विनंतीवरून केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी दंगलग्रस्त गुजरातमध्ये १ हजार निमलष्करी जवान पाठविण्याचे आदेेश दिले आहेत. केंद्रीय गृहखात्याच्या अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार ‘‘निमलष्करी दलाच्या ११ कंपन्या गुजरातला पाठविण्यात आल्या आहेत आणि त्या आज रात्रीपर्यंत तेथे पोचतील.’’ बुधवारच्या साबरमती एक्सप्रेसवरील हल्ल्यानंतर मोदी यांनी गुजरातमधील परिस्थितीची माहिती देण्यासाठी अडवाणी यांना दूरध्वनी केला आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निमलष्करी दले पाठविण्याची विनंती केली.’’ http://www.expressindia.com/news/fullstory.php?newsid=7922 या सर्व वृत्तांतांवरून हे स्पष्ट होते की नरेंद्र मोदी यांनी अत्यंत तातडीने अहमदाबादमध्ये लष्कराला पाचारण केले. ही बातमी ओनलाईन छापायची वेळ दुपारी ४ वाजून २९ मिनिटे अशी नोंदली आहे. बातमी तयार करणे, संपादन, मुद्रितशोधन आणि प्रकाशित करण्याचा वेळ, याचा विचार करता प्रत्यक्ष निर्णय यापूर्वी बराच आधी झाला होता. हा निर्णय इतक्या जलद गतीने घेतला गेला की २८ फेब्रुवारीला दुपारी ४.३० वाजताच बातमी ऑनलाइन प्रकाशित करता आली. उचललेले आणखीन एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना तातडीने अहमदाबादला येण्याची केलेली विनंती. ते १ मार्चला पहाटे १ वाजता अहमदाबादमध्ये दाखल झाले होते. ‘द ट्रिब्यून’ने (या वृत्तपत्राने जानेवारी २००५ मध्ये लालू यादव-नियुक्त बॅनर्जी समितीने गोधरा हत्याकांडावर म्हटलेली थाप की ‘हे हत्याकांड एक अपघात होते’ हिचे संपादकीयातून संपूर्ण समर्थन केले आणि मुसलमान हल्लेखोरांचे भीषण पाप धुवून काढायचा प्रयत्न केला) १ मार्च २००२च्या अंकात म्हटले- ‘‘पोलिसांची तक्रार अशी होती, की (२८ फेब्रुवारीला) प्रक्षुब्ध जमावांची संख्या प्रचंड मोठी होती, पोलिसांच्या संख्येपेक्षा फार जास्त होती, आणि जमावांनी जागोजागी रस्त्यात अडथळे उभे केल्याने त्यांना तातडीने हालचाल करता येत नव्हती. एका भरगच्च पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले की राज्यभरातून एकूण ७०० लोकांना अटक आली आहे. (बीबीसीनेसुद्धा आपल्या बातमीत ७०० लोकांना अटक झाल्याचे म्हटले होते- आपण जी बातमी पाहिली होती.) यापैकी ५८ लोक ठार करणारे रेलवे अग्निकांड झालेल्या गोधरामधून ८० लोकांना अटक करण्यात आली…… साबरमती एक्स्प्रेसवरील हल्ल्याच्या कालच्या घटनेनंतर मोदींनी दूरध्वनीवरून गुजरातमधील परिस्थितीची कल्पना अडवाणी यांना दिली आणि तातडीने 33 अधिक सैन्यदले पाठविण्याची विनंती केली. केंद्र सरकारने आजच एक नवा आदेश काढून सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना दिली आहे की त्यांनी संवेदनशील जागी पोलीस आणि राखीव दले तैनात करावीत व अचानक येऊ शकणाऱ्या स्थितींसाठी वहातुकीची व्यवस्था केली…कलोल शहरात अनावर झालेल्या जमावांना पांगण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला…’’ (संदर्भ : http://www.tribuneindia.com/2002/20020301/main7.htm ) कट्टर संघविरोधी, भाजपाविरोधी असणार्‍या ‘द हिंदू’नेही आपल्या वृत्तात म्हटले आहे – ‘२८ फेब्रुवारीला पोलिसांपेक्षा जमाव फार जास्त मोठे होते आणि टायर जाळून रस्त्यात अडथळे तयार केले गेले होते.’ इथे कुठेही असे म्हटलेले नाही की पोलीस हेतुत: दंगेखोरांकडे काणाडोळा करीत होते. हिंसाचारात पोलीस सहभागी असल्याचे किंवा त्यांनी दंगेखोरांना मोकळीक दिल्याचेही म्हटलेले नाही. लष्कराला बोलाविण्यास उशीर झाला, असाही सूर नाही. ‘‘पोलिसांनी काणाडोळा केला, दंगेखोरांना ३ दिवस मोकळीक दिली, ३ दिवस उलटल्यानंतरही लष्कराला बोलाविले नाही…’’ असे सर्व आरोप दंगली संपल्यानंतर सुरू झाले. हे आरोप खरे असते, तर वृत्तपत्रांनी त्याच दिवशी टीकेची झोड उठविली असती. पण असे काहीच घडले नाही आणि अर्थातच, दंगली राज्य सरकारने प्रायोजित केल्या होत्या, असा आरोपही त्यावेळी झाला नाही. ‘द हिंदू’ने १ मार्चच्या अंकात २८ फेब्रुवारीच्या घटनांबद्दल म्हटले आहे – ‘‘राज्यातील अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट, नदियाड, आणंद आणि कैरा शहरांचे काही भाग यांच्यासह २६ शहरात आणि नगरांत अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या शिवाय २७ फेब्रुवारीला (बुधवारी) घडलेल्या गोधरा हत्याकांडानंतर त्याच दिवशीपासून या शहरांत अनिश्‍चितकालीन संचारबंदी लागू आहेच.’’ केवळ ‘हिंदू’च नव्हे, तर जवळजवळ प्रत्येक वर्तमानपत्राने दुसर्‍या दिवशी ही बातमी दिली- की २६ ठिकाणी संचारबंदी आहे. ‘इंडिया टुडे’ आणि ‘आऊटलुक’ या साप्ताहिकांनीही २८ फेब्रुवारीपर्यंतचे वृत्त देताना ११ मार्च २००२ च्या अंकात अशीच माहिती दिली. कदाचित ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या एकमेव दैनिकाने १ मार्चच्या अंकात वृत्त देताना ‘पोलिसांनी दंगेखोरांकडे काणाडोळा केला’ असा आरोप केला. त्यानंतर दंगली सुरू असेपर्यंत ‘इंडियन एक्स्प्रेस’सह कोणत्याही वृत्तपत्राने कोणताही आरोप केला नव्हता. ‘इंडियन एक्स्प्रेस’चे आरोपसुद्धा वैचारिक आकसातून केले गेले होते. ‘द हिंदू’ने मात्र पोलिसांवर असा कोणताही आरोप केला नाही. हे कोणीही नाकारु शकत नाही की एवढ्या सगळ्या घटनाक्रमात एखाद्या पोलिसाने (stray policeman) दिरंगाई करणे किंवा दंगेखोरांना सहानुभूती दाखविणे, असे घडू शकते. पण याचा अर्थ, सरकारने पोलिसांना ‘दंगेखोरांकडे काणाडोळा करा’ असे सांगितले असा कसा होतो? संतप्त जमावाच्या प्रचंड संख्येपुढे पोलीस तोकडे पडत असताना, दंगल थांबविता येत नसेल, तर अशा वेळेस पोलीस मधे पडले तर ते स्वतःचा जीव गमावतील व कुठलाही फायदा होणार नाही. असे असूनही गुजरातमध्ये काही घटनांमध्ये पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून मुस्लिमांना वाचविले. उदाहरणार्थ, विरमगाम, बोडेली. ‘द इंडियन एक्स्प्रेस’चा पूर्वग्रह एका गोष्टीतून स्पष्ट होतो. त्यांनी आपल्या बातमीत एकट्या अहमबादमध्ये पोलीस गोळीबारात संध्याकाळपर्यंत १० ठार झाले, हे वृत्त दिले नाही, जे ‘हिंदू’ने प्रसिद्ध केले, किंवा नरेंद्र मोदींनी तातडीने लष्कराला अहमदाबादमध्ये पाचारण केले आणि जॉर्ज फर्नांडिस यांना बोलविले, हे सुद्धा ‘इंडियन एक्सप्रेसने’ दिले नाही. ‘लष्कर आणि जोर्ज फर्नांडिस पोचले आहेत’, ही बातमी मात्र त्यांनी दिली. पोलिसांनी राज्यभरात गोळीबाराच्या १ हजारपेक्षा जास्त फैरी झाडल्या आणि त्यापैकी ६०० फैरी फक्त अहमदाबादमध्ये झाडल्या, हे वृत्तही ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले नाही. अधिकृत आकडेवारीनुसार २८ फेब्रुवारीला गोळीबाराच्या १४९६ म्हणजे जवळजवळ दीड हजार फैरी झाडण्यात आल्या. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने १ मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीचे शीर्षक आहे, ‘गोधराजवळ ६ जणांना जिवंत जाळले.’ त्यात म्हटले आहे: 35 पिसाळल्या गेले व त्यांनी सोसायटीतील एक-एकाला ठार मारण्याचा निश्चय केला. तरीही १८० मुस्लिमांना पोलिसांनी वाचवले. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने २८ फेब्रुवारीच्या आपल्या ऑनलाइन आवृत्तीत म्हटले आहे: ‘‘…मधल्या काळात अहमदाबाद अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी (चमनपुराला) धावले. पण प्रक्षुब्ध जमावाने बंब आणि पोलिसांना आत घुसूच दिले नाही, अहमदबाद फायर ब्रिगेड वाल्यांना आणि जिल्हा पोलिस अधिकारी लोकांना रोखून ठेवले व मदतीसाठी पोचू दिले नाही. …कॉंग्रेस पक्षातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार माजी खासदारांनी (एहसान जाफरी) अधिकृत मदत येण्याची दुपारी १२.३० पर्यंत वाट पाहिली आणि ही मदत न पोचल्याने त्यांनी स्वसंरक्षणासाठी जमावावर गोळीबार केला. त्यात ४ जण जखमी झाले. (एस.आय.टी.च्या म्हणण्यानुसार या गोळीबारात १ मृत आणि १५ जखमी झाले.) त्यानंतर गोंधळ वाढतच गेला…महापौर हिंमतसिंग पटेल यांनी सोसायटीतील रहिवाशांना शांतता राखण्याचे आवाहन केले…परिस्थिती तशीच भडकत राहिली आणि रात्री ८ वाजेपर्यंत रोष भडकत राहिला. तोपर्यंत जमावाने पोलिसांना कॉलनीत घुसूच दिले नाही.’’ (संदर्भ: http://timesofindia.indiatimes.com/india/Over-25-burnt-alive-in- Ahmedabad/articleshow/2390347.cms?referral=PM) ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने २८ फेब्रुवारी २००२ च्या ऑनलाईन आवृत्तीत दुपारी २ वाजून ३४ मिनिटांनी ओनलाईन प्रकाशित केलेली बातमी अशी आहे – ‘‘अहमदाबाद: शहरातील मेघानीनगर परिसरात (चमनपुरा, एहसान जाफरी प्रकरण) गुरुवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान ६ जण जखमी झाले. जखमींना नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी किमान तिघांची प्रकृती गंभीर आहे. …मेघानीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चमनपुरा या भागात ही घटना घडली. दरम्यानच्या काळात कालुपूर भागात भोसकल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही घटना घडियाली-ना-खन्चो भागात दुपारी घडली. या घटनेबरोबरच गोधरानंतरच्या दंगलीतील मृतांची संख्या ८ वर पोचली आहे. त्यापैकी अहमदाबादमध्ये ४ जणांचा भोसकून मृत्यू झाला. हिंसाचाराच्या बातम्या सर्व ठिकाणांहून येत असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.’’ (संदर्भ : http://timesofindia.indiatimes.com/india/Police-open-fire-in-Ahmedabad-6- hurt/articleshow/2360713.cms ) याचा अर्थ दुपारी २.३४ च्या बरच आधी पोलिसांनी जाफरींच्या घराबाहेरील जमावावर गोळ्या मारल्या ज्यात किमान ६ लोक जखमी झालेत व नंतर त्यापैकी ५ लोक ठार झलेत. २:३४ ला प्रकाशित झालेल्या या बातमीला प्रक्रियेसाठी लागणारा वेळ [बातमी मिळणे, वृत्त बनवणे, संपादित करणे, प्रूफरिड करणे, पोस्ट करणे] लक्षात घेता पोलिसांनी केलेले हे काम २:३४ च्या बरेच आधी झाले होते हे स्पष्ट होते. ‘टाइम्स’च्याच बातमीनुसार त्यावेळची परिस्थिती इतकी गंभीर होती, की प्रक्षुब्ध जमावाने आगीचे बंब आणि पोलिसांनाही आत घुसू दिले नाही. सोसायटीतील प्रक्षुब्ध जमावावर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना रात्री ८ नंतर यश आले असले, तरी त्यांनी दुपारी २ वाजायच्या आधीच गोळीबार करून १८० मुस्लिमांना वाचविले होते. कालुपूर भागात दुपारी २.३४ पूर्वीच संचारबंदी लागू झाली होती. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या ऑनलाइन बातम्या वाचल्यानंतर असे लक्षात येते की जेथे जेथे दंगली भडकल्या, तेथे हिंसाचार झाल्यावर लगेच संचारबंदी लागू करण्यात येत होती आणि अनेक ठिकाणी आधीपासूनच संचारबंदी होती. २८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजून ३१ मिनिटांनी ओनलाईन छपलेल्या बातमीचे शीर्षक होते – ‘विहिंपच्या बंदला हिंसक वळण, ८ जण ठार.’ या बातमीतच अनेक ठिकाणी संचारबंदी लागू झाल्याचे म्हटले होते. २८ फेब्रुवारीलाच ओनलाईन छापलेल्या दुसर्‍या एका बातमीचे शीर्षक होते – ‘अहमदाबाद-बडोद्यात अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी.’ या बातमीत पुढे म्हटले आहे – ‘‘गांधीनगर: शहरात अभूतपूर्व हिंसाचार आणि जाळपोळ सुरू झाल्यामुळे अहमदाबादच्या अनेक भागात गुरुवारी (२८ फेब्रुवारी) दुपारीच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अहमदाबादच्या ग्रामीण भागात हिंसाचार आणि लूटमारीच्या घटना पसरण्याची शक्यता असल्यामुळे अहमदाबादच्या जिल्हाधिकार्‍यांनी (डिस्ट्रिक्ट कलेक्टर) आणखी पोलिस दले आणण्याची विनंती केली आहे. एकट्या अहमदाबाद शहरात ८० हून अधिक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. संचारबंदी लागू करण्याइतके पोलिस हाताशी नसल्यामुळे अहमदाबादच्या ग्रामीण भागातील परिस्थिती चिघळू शकते, असे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे. पोलिस आयुक्त पी.सी.पांडे यांनी शहापूर, दरियापूर, करंज, कालुपूर, बापूनगर, गोतमीपूर आणि रखियाल या पोलीस ठाण्यांच्या परिसरात व सारसपूर आणि इसानपूर या पोलिस चौक्यांच्या परिसरात संचारबंदी लागू केल्याची घोषणा दुपारी १२.३० वाजताच केली. सी.जी.रोडवर एका विशिष्ट जमातीच्या दुकानांना आगी लावणार्‍या संतप्त जमावाला 36 पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे शेल्स फोडले. २८ फेब्रुवारीला सकळी झालेल्या जाळपोळीच्या घटना घडल्यामुळे भारुच आणि अंकलेश्‍वर या शहरातही संचारबंदी लागू करण्यात आली. बडोदा शहराच्या काही भागात २ लोकांचा भोसकून मृत्यू झाल्यामुळे या आधीच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बडोद्यात संचारबंदी: महामार्गावर बुधवारी रात्री (२७ फेब्रुवारी) आणि सलतवाडा विभागात गुरुवारी पहाटेच भोसकून मारण्याच्या २ घटना घडल्यामुळे बडोदा शहरात गुरुवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजल्यापासूनच अनिश्‍चित काळपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिली. तटबंदीच्या भागातील (walled city) ६ पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात आली असून संवेदनशील भागात आरएएफ (RAF-Rapid Action Force) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त दीनदयाळ टुटेजा यांनी दिली. पंचमहल जिल्ह्यातील लुनावडा शहरात बुधवारी, २७ फेब्रुवारीपासूनच जाळपोळ आणि लुटालुटीचे प्रकार घडल्यामुळे तेथे अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.’’ (संदर्भ: http://timesofindia.indiatimes.com/india/Indefinite-curfew-in-Ahmedabad- Vadodara/articleshow/2340805.cms ) निष्क्रियतेचे कुठलेही आरोप पोलिस किंवा सरकारवर नाहीत! ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या १ मार्चच्या ऑनलाइन आवृत्तीतील बातमीचे शीर्षक आहे- ‘गुजरात हिंसाचाराची उद्योगांना झळ.’ या बातमीत म्हटले आहे की हलोल शहरातही पोलिसांची संख्या प्रक्षुब्ध जमावांसमोर फार कमी पडल्याने, त्यांना जमावांना आवरता आले नाही. अशीच परिस्थिती शापार, वेरावळ आणि लाटीप्लॉट सारख्या इतर औद्योगिक शहरातही होती, असे हे वृत्त म्हणते. (संदर्भ: http://timesofindia.indiatimes.com/india/Gujarat- violence-hits-industries/articleshow/2483562.cms ) ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ ने १ मार्चच्या ऑनलोइन आवृत्तीमध्ये म्हटले आहे की कारमधून वावरणारे श्रीमंत लोक सुद्धा लुटारू झाले होते. ‘इंडिया टुडे’नेही आपल्या १८ मार्च २००२ च्या अंकात अशीच माहिती दिली आहे. http://www.indianembassy.org/ (ही अमेरिकेतील भारतीय दूतावासाची अधिकृत वेबसाइट आहे) या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार गुजरात सरकारने पोलिस दले पाठविण्याची विनंती मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांना २८ फेब्रुवारीलाच केली होती. महाराष्ट्रातून आलेल्या राखीय पोलीस दलाच्या २ तुकड्या सुरतला पाठवण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या एस. आय. टी. ने ही हे म्हटले आहे. एसआयटीने आपल्या अहवालात पृष्ठ क्र. २१० वर असे म्हटले आहे की चौकशी केल्यानंतर कळते की अहमदाबादमध्ये २८ फेब्रुवारीला १५१ मुस्लिम आणि ३१ हिंदू मारले गेले. पोलिसांच्या गोळीबारात १७ ठार झाले. (हा आकडा अहमदाबादमधील आहे की राज्यातील याचा खुलासा नाही. पण बहुधा राज्याचा असावा) त्यापैकी ११ हिंदू आणि ६ मुस्लिम होते. २८ फेब्रुवारीला ३१ हिंदू ठार झाले. (११ पोलीस गोळीबारात आणि २० दंगलीत) यावरून स्पष्ट आहे की हिंदूंवरही हल्ले झाले. ‘हिंदूवरील हल्ले’ या प्रकरणात याची माहिती पुढे आपण सविस्तर घेणारच आहोत, की अहमदाबादमधील बापूनगर आणि जमालपूर भागात २८ फेब्रुवारीला हिंदूंवर हल्ले झाले होते, म्हणून पोलिसांच्या गोळीबारात ६ मुस्लिमही ठार झाले. शिवाय बहुतेक वेळा पोलीस गोळीबार करतात तेव्हा दंगेखोरांचा धर्म त्यांना माहीत नसतो. थोडक्यात २८ फेब्रुवारीला उचलण्यात आलेली पावले- १) अहमदाबादमध्ये दंगलींना सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुपारी १२ वाजता, म्हणजे अवघ्या तासाभरात केंद्र सरकारशी संपर्क साधून लष्कर पाठविण्याची अनौपचारिक विनंती केली. अहमदाबादमधील सर्व भागात दुपारी १२ वाजून २० मिनिटांपूर्वी संचारबंदी लागू करण्यात आली होती. काही ठिकाणी तर ती त्यापूर्वीच लागू झाली. २) ‘द हिंदू’ च्या बातमीनुसार नरेंद्र मोदींनी तातडीने (frantically) लष्कराला बोलाविले. ३) नरेंद्र मोदींनी केंद्रीय संरक्षणमंत्री जॉर्ज फ़र्नांडिस यांना लगेच गुजरातला येण्याची विनंती केली. ४) गुजरातमधील २६ शहरात व नगरात संचारबंद लागू करण्यात आली. 37 ५) एहसान जाफरी यांच्या स्थानी १८० मुस्लिमांना वाचविण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी जाफरींच्या घराबाहेर गोळीबाराच्या १२४ फैरी झाडून ५ दंगेखोरांना ठार केले व ११ दंगेखोर जखमी केले. पोलिसांनी या ठिकणी १३४ अश्रुगोळ्यांचे शेल्स फयर केले, व जमवाला लाठी-चार्ज केला. ६) राज्यभरात मिळून पोलिसांनी गोळीबाराच्या १४९६ फैरी झाडल्या. त्यापैकी किमान ६०० फैरी अहमदाबादमधील होत्या. ७) पोलिसांच्या गोळीबारात ११ हिंदूंचा मृत्यू झाला तर १६ जखमी झाले. किमान २ जण अहमदाबादबाहेर नदियाड आणि गोधरा येथे मारले गेले. पोलीस गोळीबारात एकूण १७ लोक ठार झाले. (२८ फेब्रुवारी ला). ८) गुजरात सरकारने तासाभरातच लष्कर बोलाविण्याची मागणी केली. दुपारी ४ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत त्याची घोषणा करण्यात आली. त्यासाठी आवश्यक असलेली प्रकिया तातडीने पूर्ण करण्यात आली. केंद्र सरकारच्या सुरक्षा विषयक मंत्री समितीची (Cabinet Committee on Security) बैठक पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी ६.४५ वाजता झाली. यामध्ये लष्कर तातडीने पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि लष्कराच्या तुकड्या त्याच दिवशी मध्यरात्रीपर्यंत अहमदाबाद येथे पोचल्या. ९) लष्कराच्या तुकड्या अहमदाबादला इतक्या लवकर येऊन पोचल्या की ‘द हिंदू’, ‘द इंडियन एक्स्प्रेस’ सारख्या दैनिकांना २८ फेब्रुवारीलाच तुकड्या पोचल्याचे वृत्त देता आले आणि ते १ मार्च २००२ च्या अंकात प्रसिद्ध झाले. १०) संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिसही अहमदाबादला इतक्या घाईने पोचले की ‘द इंडियन एक्स्प्रेस’सह अनेक वृत्तपत्रांना तीही बातमी दुसर्‍या दिवशी देता आली. ११) नरोडा पाटियामधील प्रक्षुब्ध जमावाला पांगविल्यानंतर पोलिासांनी ४०० मुस्लिमांना सुरक्षित स्थळी हलविले. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या बातमीनुसार हल्ला झालेल्या नरोडा पाटिया विभागात १ हजार मुस्लिम राहत होते. त्यापैकी ९५ जण हिंसाचारात मारले गेले. पण ९०० मुस्लिमांना वाचविण्यात आले. १२) गुजरात सरकारने ‘मदतीला पोलीस तुकड्या पाठवा’ अशी विनंती महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश या शेजारी राज्यांना केली. या सर्व राज्यात कॉंग्रेसची सरकारे होती. फक्त महाराष्ट्र सरकारने पोलिसांच्या २ तुकड्या पाठविल्या (५०० पेक्षाही कमी पोलीस), तर मध्य प्रदेश व राजस्थान सरकारांनी कोणतीही मदत पाठवली नाही. १३) हिंसाचाराची स्थिती हाताबाहेर असूनही सरकारने पहिल्याच दिवशी राज्यभरातून ७०० लोकांना अटक केली. त्यापैकी ८० लोक गोधरातील होते. अधिकृत आकड्यांनुसार पोलिसांनी अश्रुधुराची ४२९७ नळकांडीही २८ फेब्रुवारीला राज्यभर फोडली (tear gas shells burst). राज्यात पहिल्या ३ दिवसातच अश्रुधुराची ६५०० नळकांडी फोडण्यात आली, तर नंतरच्या दंगलीतही फोडलेली नळकांडी धरून एकूण १५,०००+ नळकांडी फोडण्यात आली. १ मार्च (शुक्रवार) दुसर्‍या दिवशी म्हणजे १ मार्च २००२ ला अहमदाबादमध्ये लष्कराने सकाळी ११.३० वाजता ध्वजसंचलन केले. ‘द हिंदू’ने २ मार्च २००२ च्या अंकात दिलेल्या बातमीत म्हटले आहे- ‘‘(१ मार्चला) अहमदाबाद, बडोदा, राजकोट, गोधरा शहरांच्या सर्वाधिक दंगलग्रस्त भागात लष्कराने ध्वजसंचलन सुरु केले. ‘दिसताक्षणी गोळ्या घाल्या’ हे आदेश गुजरातमध्ये संचारबंदी लागू असलेल्या सर्व ३४ शहरांत व नगरात लागू केले गेले आहेत.’’ या बातमीचे शीर्षकच ‘गुजरातच्या अनेक शहरात गोळ्या घालण्याचे आदेश, मृतांची संख्या २०० वर’ असे होते. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या म्हणण्यानुसार शुक्रवारी लष्कर दाखल झाल्यानंतर लष्करालाही आणि ‘दिसताक्षणी गोळ्या’ घाला असे आदेश असतानाही दंगली थांबविता आल्या नाहीत. या आधी म्हटल्याप्रमाणे दंगलींमध्ये पोलिस सहभागी आहे, असा आरोप या दिवसापासून कोणत्याही वृत्तपत्राने केलेला नाही. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने २ मार्चच्या अंकात बातमी देताना म्हटले आहे- ‘‘(१ मार्चला) आपली विश्‍वासार्हता नीचांक पातळीवर पोचली असताना आपली प्रतिष्ठा परत मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. काही ठिकाणी 38 सुरु असलेल्या संघर्षांत हस्तक्षेप करुन पोलिसांनी जमावांवर गोळीबार केला. पोलीस गोळीबारात राज्यात एकूण २० लोक ठार झाले. त्यातील १२ अहमदाबादमधील होते.’’ या महत्त्वाच्या बातमीवरून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली, हिंसाचार थांबविण्याचा प्रयत्न पोलीस कसोशीने करत होते आणि दंगलींच्या दुसर्‍या दिवशी ‘इंडियन एक्स्प्रेस’लाही पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप करता आला नाही. दुसरी महत्त्वाची गोेष्ट म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्यात ‘संघर्ष’ सुरू होते (बातमीत ‘संघर्षात हस्तक्षेप’ असा उल्लेख आहे), मुस्लिमांचे ते एकतर्फी हत्याकांड नव्हते. दंगलीमध्ये मुस्लिमही आक्रमक होते, याचा थेट पुरावा ‘द हिंदू’सारख्या अत्यंत संघ-भाजपा विरोधी वृत्त्पत्राच्या २ मार्च २००२ च्या अंकात नोंदवला गेला आहे. “दंगलीच्या पहिल्या दिवशी, २८ फेब्रुवारीला, एक समाज पूर्णपणे प्रक्षुब्ध जमावाचे आक्रमण झेलत होता. पण दुसर्‍या दिवशी (१ मार्चला) अल्पसंख्यकांनी आक्रमक प्रतिकार केल्याने परिस्थिती जास्तच बिघडत गेली. बापूनगर, गोमतीपूर, दरियापूर, शाहपूर, नरोडा (मोठी मुस्लिम वस्ती असलेले भाग) या भागात एकमेकांवर दगडफेक करणार्‍या दोन्ही समाजांवर पोलिसांच्या उपस्थितीचा नगण्य परिणाम झाला. दोन्ही समाजातील संघर्ष संध्याकाळी उशिरापर्यंत चालूच होते. जमालपूर भागातील एका प्रसिद्ध मंदिरात घुसण्याचा बदल्याचा प्रयत्न पोलीस कुमक वेळेवर पोचल्यामुळे रोखता आला, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले”. (संदर्भ: http://www.hindu.com/thehindu/2002/03/02/stories/2002030203050100.htm) ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने २ मार्च २००२ च्या अंकात प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटले आहे- ‘‘(१ मार्चला) शुक्रवारच्या प्रार्थनेच्या अगदी थोड आधी अहमदाबादच्या तटबंदीच्या शहरात (walled city) तणाव वाढायला लागला होता. जमालपूर, बापूनगर, रखियाल (अहमदाबादमधील मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या वस्त्या) भागात २ गटात हिंसक संघर्ष सुरू झाला.’’ मुस्लिम आक्रमक बनले होते, हे इथे स्पष्ट होते. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने त्याच दिवशी दिलेल्या बातमीत म्हटले आहे- ‘‘१ मार्चला जूहापुरा, कालुपूर, दरियापूर, शाहपूर (मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या वस्त्या) भागातून प्रतिकार (retaliation) झाल्याचे दिसले.’’ याने सर्व संभाव्य शंका दूर होतील. ‘द इंडियन एक्स्प्रेस’चा पूर्वग्रह आणखी एका गोष्टीतून स्पष्ट होतो. जॉर्ज फर्नांडिस यांनी अहमदाबादमधे नागरिकांना शांततेचे आवाहन केले आणि ते बडोद्याकडे रवाना झाले, अशी बातमी तर या वृत्तपत्राने दिली, पण फर्नांडिस स्वतःच्या जीवाला धोका पत्करून दंगली थांबवायला रस्त्यावर उतरले, हे मात्र त्यांनी म्हटले नाही! ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने २ मार्च २००२ च्या ऑनलाइन आवृत्तीत याचा उल्लेख केला आणि त्यांनी फर्नांडिस यांचे कौतुकही केले. ‘इंडिया टुडे’नेही म्हटले की फर्नांडिस स्वतःच्या जीवाला धोका पत्करून दंगली थांबवायला रस्त्यावर उतरले. ‘द हिंदू’ने २ मार्च २००२ च्या बातमीत दंगलीच्या पहिल्या दोन दिवसात एकट्या अहमदाबादमध्ये पोलीस गोळीबारात किमान १७ लोक ठार झाल्याचे म्हटले. त्याच दिवशीच्या बातमीत ‘द टेलिग्राफ’ (कोलकाता) म्हणते- ‘‘(१ मार्चला) राज्यात लष्कराची उपस्थिती असूनही- अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट शहरात ३५०० सैनिक पोचले आहेत- दंगली थांबलेल्या नाहीत.’’ दुसर्‍या दिवशी म्हणजे १ मार्चला आणखी २४ हिंदू पोलिस गोळीबारात ठार झाले आणि ४० जखमी झाले. माजी पोलीस महासंाचलक बी.पी. सिंघल यांना अधिकृत सरकारी सूत्रांकडून दिलेले हे आकडे आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने १ मार्चला पोलीस गोळीबारात २० लोक ठार झाल्याचे म्हटले आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने ही बातमी पाठविल्यानंतर जखमी असलेल्यांपैकी काहींचा मृत्यू झाला असावा, अशी एक शक्यता आहे, म्हणून शेवटी ठार झालेल्यांची संख्या २० हून अधिक होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’ भाजपाविरोधी असल्यामुळे त्यांनी पोलीस गोळीबारातील मृतांची संख्या जाणीवपूर्वक कमी दिली असण्याचीही शक्यता आहे, पण लेखकाला मात्र असे या बाबतीत असायची शक्यता कमी वाटते. राज्यभरात झालेल्या पोलिस गोळीबारात त्या दिवशी २७ मुस्लिमही मारले गेले. त्या दिवशी मुस्लिमांनी प्रतिकार करण्यास सुरुवात केली होती आणि दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश होते. 41 दुपारी १२.३० – आर्मी स्टाफचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन. सी. विज यांनी नारायण यांना कळविले की लष्कर सीमेवर तैनात असल्यामुळे फक्त २ तुकड्या उपलब्ध आहेत. दुपारी १२.३५ – प्रसाद यांची नारायण यांना सुचना की आर्मी स्टाफ प्रमुख जनरल पद्मनाभन यांच्याशी नारायण यांनी चर्चा करून पद्मनाभन यांना लष्कर तातडीने अहमदाबादला पाठविण्यासाठी तयार ठेवायला सांगावे, अहमदाबादमधील बिघडती स्थिती बघून. दुपारी १२.४५ – गुजरातला तातडीने लष्कर पाठविण्याचे नारायण यांचे जनरल एन. सी. विज यांना आदेश. दुपारी ४.०० – अडवाणी (तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री) यांच्याशी चर्चा केल्यानंतर लष्कर पाठविण्याची मोंदीची औपचारिक विनंती. संध्या. ६.४५ – पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक (Cabinet Committee on Security). अहमदाबादसह गुजरातच्या विविध भागात लगेच लष्कर पाठविण्यास मान्यता. वाजपेयी (तत्कालीन पंतप्रधान) यांनी जोर्ज फर्नांडिस (तत्कालीन संरक्षणमंत्री) यांच्यावर लष्कर पाठविण्याच्या कामावर नजर ठेवायची जबाबदारी सोपविली. संध्या. ७.०० – लष्कर पाठविण्याबाबतची गुजरात सरकारची औपचारिक विनंती दिल्लीत पोचली. रात्री ११.३० – विमानाने लष्कर पाठविण्यास सुरुवात. १ मार्च २००२ पहाटे २.३० – लष्कराची ब्रिगेड अहमदाबादमध्ये पोचली. लष्कराच्या ५४व्या डिव्हिजनच्या प्रमुखांचा गुजरातच्या कार्यकारी मुख्य सचिवांशी संपर्क. सकाळी ९.०० – राज्याचे प्रतिनिधी आणि लष्कराचे प्रतिनिधी यांची चर्चा, ज्यानंतर अहमदाबादमध्ये लष्कराच्या ध्वज संचलनाला सुरुवात. (संदर्भ: http://www.indiatoday.com/itoday/20020318/cover2.shtml) इथे काही खुलासे आवश्यक आहेत. २७ फेब्रुवारीला नरेंद्र मोदींनी गोधराला भेट दिल्यानंतर दुपारी ४.३० वाजता संचारबंदी लागू करण्यात आली नव्हती. ती सकाळी ९:४५ वाजताच लागू झाली. दुसरे, लष्कराच्या तुकड्या अहमदाबादमध्ये १ मार्चच्या पहाटे १.३० वाजताच पोचल्या, जसे ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या बातमीत म्हटले होते. वर दिल्याप्रमाणे पहाटे २.३० वाजता नव्हे. बहुतेक भारतीय इंग्रजी माध्यमे भाजपाविरोधी असतानाही, त्यांनी दिलेल्या बातम्या असेच सिद्ध करतात की खर्‍या दंगली पहिल्या ३ दिवसातच थांबविल्या गेल्या. ‘द हिंदू’ने ४ मार्च २००२ ला प्रसिद्ध केलेली ही बातमी वरील मुद्दा पुरेसा स्पष्ट करते: ‘‘अहमदाबाद, ३ मार्च – गुजरातमधील हिंसाचाराचा हैदोस संपलेला वाटतो आहे. आज दिवसभरात फक्त २ जण मृत झाल्याच्या बातम्या आल्या. त्यापैकी एक गोधराहून होती. राज्यातील मृतांचा अधिकृत आकडा ४३१ वर पोचला असून त्यातील निम्म्याहून अधिक अहमदाबादमधील आहेत. मुस्लिम मालकी असलेल्या पेट्रोल पंपावर आणि गोदामावर हल्ला झाल्याच्या दोन घटना वगळता अहमदाबाद आज शांत होते. हिंसाचाराच्या घटना घडलेल्या ४० शहरातील व गावातील बहुतेक भागातून संचारबंदी उठविण्यात आली आहे. यामध्ये अहमदाबादच्या नरोडा आणि मेघानीनगर (गुलबर्ग सोसायटी,एहसान जाफरींचे प्रकरण झालेला चमनपुरा भाग) यांचा समावेश आहे. अहमदाबादमधील या घटनांमध्ये शेकडो लोक मारले गेले होते. राज्य प्रशासनाच्या म्हणण्यानुसार उद्या आणखी काही भागातील संचारबंदी उठविण्यात येईल. परिस्थिती सामान्यतेवर आल्याची भावना आज राज्यात होती. पण हिंसाचार सुरु होऊन ५ दिवसांनंतर जळलेल्या इमारती, रस्त्यावर अर्धवट जळलेले रबरी टायर पाहून हे स्पष्ट होते आहे की अहमदाबादमध्ये ‘सामान्यता’ यायला बराच वेळ लागेल.’’ (संदर्भ: http://www.thehindu.com/2002/03/04/stories/2002030403090100.htm ) गुजरातमधील दंगली ७२ तासातच नियंत्रणात आणण्यात आल्या, हा राज्य सरकारचा दावा पूर्णपणे खरा असल्याचे या बातमीवरून स्पष्ट होते. ३ मार्च २००२ नंतर काय घडले हे समजून घेण्यासाठी आणखी काही बातम्या पाहणे आवश्यक आहे. ‘द हिंदू’च्या मार्च आणि एप्रिल २००२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून हिंसाचाराचे स्वरूप काय होते, याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. ‘द हिंदू’मधील ६ मार्च २००२ ची बातमी अशी – “गुजरातमध्ये शांतता यात्रा आणि प्रार्थनासभा आमच्या विशेष प्रतिनिधीकडून 42 अहमदाबाद, ५ मार्च – राज्यातील परिस्थिती आता पूर्वपदावर येत असल्याचे दिसते. राज्य सरकार, स्वयंसेवी संस्था आणि मान्यवर नागरिकांनी आज शांतता यात्रेचे आयोजन केले. महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या कोचरब आश्रमापासून निघालेली शांतता यात्रा साबरमती आश्रमात पोचली. या यात्रेत सर्वोदय नेत्यांसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि इतर लोक सहभागी झाले होते. यात्रा साबरमती आश्रमात पोचल्यानंतर तेथे सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. महात्मा गांधींचे जन्मगाव असलेल्या पोरबंदरमध्ये आणि सुरतसह इतर अनेक शहरांत तसेच गावांत अशाच शांतता यात्रा निघाल्या आणि प्रार्थना सभाही झाल्या. राज्य सरकारची बसवाहतूक हळूहळू सुरू झाली आहे. अहमदाबाद महापालिकेची बससेवा किमान काही भागात तरी उद्या सुरू होईल. राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष कमलेश पटेल यांच्या अंदाजानुसार हिंसाचारामुळे महामंडळाचे किमान १५ कोटींचे नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक भागात आज शाळा पुन्हा सुरू झाल्या. शिक्षणमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या म्हणण्यानुसार उर्वरित शाळा उद्या पुन्हा सुरू होतील. शिक्षण मंडळाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा १ आठवड्याने पुढे ढकलण्यात आल्या असून त्या १८ मार्चला सुरू होतील. गोधरा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिंसाचारात पोलिसांनी १ हजारांहून अधिक लोकांना अटक केली असली तरी पोलिसांकडे दाखल झालेल्या सुओ मोटो तक्रारीत नाव असलेल्या विहिंप, बजरंग दल आणि भाजपा नेत्यांना मात्र सरकार अटक करत नाही, अशी तक्रार विरोधी पक्षांनी केली आहे. या भयंकर गुन्ह्यात दोषी असणार्‍यांवर कोणताही भेदभाव न करता कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणत असले, तरी अद्याप विहिंप आणि बजरंग दलाच्या एकाही महत्त्वाच्या नेत्याला अटक झालेली नाही.” (संदर्भ: http://www.hinduonnet.com/thehindu/2002/03/06/stories/2002030603221100.htm) ‘द हिंदू’ मधील ७ मार्च २००२ चा पुढील वृत्तांत सर्व गोष्टी स्पष्ट करणारा आहे. “गुजरात पूर्वपदावर येतो आहे विशेष प्रतिनिधींकडून अहमदाबाद, ६ मार्च: आज सलग दुसर्‍या दिवशी गुजरातच्या कोणत्याही भागातून अनुचित घटना घडल्याचे वृत्त आलेले नाही. गृहसचिव के.नित्यानंदन यांनी म्हटले की बहुसंख्य ठिकाणची संचारबंदी उठविण्यात आली आहे. २७ फेब्रुवारीच्या साबरमती एक्स्प्रेसच्या जळीत कांडानंतर आज पहिल्यांदाच गोधरामध्ये ६ तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. परिस्थिती तणावपूर्ण असली, तरी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. गोधरानंतर उसळलेल्या दंगलींची न्यायालयीन चौकशी करण्याची घोेषणा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे… …केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या मते गोधरातील हत्याकांड पूर्वनियोजित दहशतवादी घटना होती, तर नंतरच्या दंगली त्या घटनेच्या स्वाभाविक प्रतिक्रिया आणि सांप्रदायिक हिंसा होत्या. हेच मत राज्य सरकारनेही व्यक्त केले आहे. …अल्पसंख्यकांना ठेवलेल्या शरणार्थी शिबिरांना आज मोदींनी भेट दिली आणि दंगलग्रस्तांची विचारपूस करून त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. हिंसाचार सुरू झाल्यानंतर प्रथमच जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्टर या शिबिरात आले…एकूण १८ शिबिरांत मिळून ३० हजार लोकांनी आसरा घेतला आहे.” (संदर्भ: http://www.hinduonnet.com/thehindu/2002/03/07/stories/2002030702801300.htm) ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने १० मार्च २००२ ला अशाच स्वरूपाची बातमी प्रसिद्ध केली आहे, ज्यावरून वास्तविक दंगली ७२ तासातच थांबल्या, हे पूर्णपणे सिद्ध होते. पहिल्या ३ दिवसानंतर मुस्लिमांनी बदल्याच्या आक्रमक दंगली सुरू केल्या आणि छोट्या दंगलींच्या घटना (stray riots) चालू राहिल्या. दंगली थांबविण्यासाठी प्रशासनाने केवळ वर दिलेली पावलेच उचलली, असे नाही. गुजरात पोलिसांनी दंगलखोरांकडे कानाडोळा तर केला नाहीच किंवा हत्याकांडात सहभागही घेतला नाही, उलट संजेली या एकाच ठिकाणी एकाच वेळी २५०० मुस्लिमांना वाचविले. ही संख्या सुमारे दोन अडीच महिने चाललेल्या या दंगलीत मारल्या गेलेल्या एकूण मुस्लिमांच्या संख्येच्या तिप्पट आहे. एकाच वेळी एकाच ठिकाणी पोलिसांनी २५०० मुस्लिमांना वाचवले असेल, तर दंगलीच्या पहिल्या ३ दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी वाचविलेल्या मुस्लिमांची संख्या निश्चितच आणखी काही हजारात जाईल. 43 नोंद झालेली ही संजेलीची एकमेव घटना नाही. संजेलीप्रमाणेच बडोदा जिल्ह्यातील बोडेली गावातून ५ हजार मुस्लिमांना पोलिसांनी वाचवले. त्यांच्यावर ७ हजार लोकांचा प्रक्षुब्ध जमाव चालून येत होता. ‘इंडिया टुडे’ च्या ८ एप्रिलच्या २००२ च्या अंकात असेच आणखी एक वृत्त आहे- ‘‘(अहमदाबादजवळच्या विरमगाम मध्ये) हिंदू धर्मांधांनी एका मुस्लिम महिलेला जिवंत जाळल्यानंतर ७० हजार लोकसंख्येच्या ३० टक्के असणार्‍या अल्पसंख्यकांनी हिंसाचार सुरू केला. लवकरच जवळच्या खेडेगावातील १५ हजारहून अधिक हिंदूंनी विरमगामला चहुबाजूंनी घेरले आणि मुस्लिम वस्त्यांना लक्ष्य केले. मुस्लिम वस्ती वाचविण्यासाठी त्या दिवशी पोलीस आणि लष्कराला कठोर हाताळणी करावी लागली.’’ ‘इंडिया टुडे’ने आपल्या २२ एप्रिल २००२ च्या अंकात म्हटले आहे- ‘‘संजेलीचे उदाहरण घेऊ. दाहोड या मोठी आदिवासी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील या ८ हजारांच्या गावावर ८ हजार सशस्त्र आदिवासी चालून आले. २७ फेब्रुवारीच्या हत्याकांडानंतर लगेचच ही घटना घडली (१ मार्च २००२ ला). आदिवासींच्या हातात धनुष्यबाण, दगड आणि गावठी शस्त्रे होती. पळून जाणार्‍या मुस्लिमांवर ती शस्त्र पडत होती. त्यात १५ मुसलमान ठार झाले. पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे आणखीन २५०० मुस्लिमांना वाचविता आले… बडोदा जिल्ह्यातील छोटा उदेपूर या आदिवासी भागातील बोडेली गावात अशाच प्रकारची घटना घडली. सुमारे ७ हजार आदिवासी, मुस्लिमांची हत्या करण्याच्या उद्देशाने, बोडेलीमध्ये पोचले. हे मुस्लिम जवळच्या गावातून हाकलून दिल्यामुळे आसरा घेण्यासाठी बोडेलीत आले होते. शेकडोंना पोलिसांनी वाचविले. बोडेलीत मुस्लिमांना वाचवीत असताना बडोद्याचे जिल्हाधिकारी भाग्येश झा आणि इतर वरीष्ठ अधिकार्‍यांना आदिवासींच्या गोळीबाराला आणि बाणांच्या वर्षावाला सामोरे जावे लागले. (या घटनेत ५ हजार मुस्लिमांना वाचविण्यात आले.) अहमदाबाद जवळच्या विरमगाम या गावातील अशीच शोकांतिका टाळण्यात पोलिसांना आणि लष्कराला यश आले. तेथे १५ हजारहून अधिक हिंदूंनी, ज्यातले बहुतेक सशस्त्र ओबीसी ठाकूर होते, मुस्लिमांची २५० घरे जाळली…” (संदर्भ: http://www.india-today.com/itoday/20020422/states.shtml) याचा अर्थ असा की गुजरात दंगलींमध्ये पोलीस आणि लष्कराने एकत्रितपणे हजारो मुस्लिमांचे प्राण वाचवले. विरमगामधे २१ हजार मुस्लिम होते. पोलीस आणि लष्कर विरमगाममध्ये वेळेवर पोचले नसते, तर किमान १० हजार मुस्लिम मारले गेले असते. लेखकाला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार गुजरात पोलिसांनी किमान १७,५०० मुस्लिमांना वाचविले हे आपण संजेली (२५००), बोडेली (५०००) आणि विरमगाम (१०,०००) यातूनच पाहू शकतो. इतर अनेक ठिकाणांहून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या ३ दिवसात पोलिसांनी वाचविलेल्या मुस्लिमांची संख्या २४ हजारांवर जाते. अमेरिकेतील भारतीय दूतावासाचे अधिकृत संकेतस्थळ www.indianembassy.org होते. यावर दिलेली माहिती अशी होती- “पंचमहल जिल्ह्यातील मोरा गावात प्रक्षुब्ध जमाव एकत्र येत असल्याचे समजल्यावर S.D.M., मामलतदार आणि पोलीस तातडीने तेथे दाखल झाले अणि त्यांनी जमावाला पांगविले. या हल्ल्यातून ४०० लोकांचा जीव वाचवून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. बडोदा जिल्ह्यातील वागोडिया भागातील असोज गावातील मदरशावर हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती ३ मार्च २००२ ला मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करून (मदरशातील) २२ मुलांसह ४० लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. २-३ मार्चच्या रात्री दाहोडमध्ये आजूबाजूच्या २८ गावातून आलेला प्रक्षुब्ध जमाव अल्पसंख्यकांवर तुटून पडण्यापूर्वी पोलिसांनी २ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले. सुरत शहरातील नानावरचा भागातील मशिदीला आणि ६० जणांना संरक्षण देण्यात आले. एका मशिदीमध्ये काही महिला आणि मुले अडकून पडल्याचे समजल्यावरून सुरत पोलिसांनी त्यांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले. यतीमखाना जैन मंदिरासमोरच्या रीटा सोसायटीत १०० लोक अडकून पडल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस तातडीने तेथे धावले आणि त्यांनी प्रक्षुब्ध जमाव पांगविला. पण त्यांना सोसायटीत कोणी अडकल्याचे मात्र दिसले नाही. खोजा मशिदीजवळच्या १२-१५ मुस्लिम घरांना, त्यांच्या विनंतीकरून पोलिसांनी संरक्षण पुरविले.” (संदर्भ: https://web.archive.org/web/20100306135245/http://www.indianembassy.org:80/new/gujarat_02 /index.htm ) 44 नरोडा पाटियामध्ये ९०० लोकांना, तर चमनपुरा भागातील १८० मुस्लिमांना पोलिसांनी वाचविल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तावरुन निघणारा निष्कर्ष आपण याआधीच पाहिला आहे. मुस्लिमांना वाचविल्याच्या अशा अनेक घटना घडल्या. त्यापैकी काही अशा- १) अहमदाबाद पोलिसांनी नुरानी मशीद भागातून ५ हजार लोकांना वाचविले. २) मेहसाणा जिल्ह्यातील सरदारपुरा भागातून २४० लोकांना वाचवून सुरक्षित ठिकाणी पोचविण्यात आले. ३) गांधीनगर जिल्ह्यातील पोरे आणि नारदीपूर गावातून ४५० लोकांना वाचवून सुरक्षित जागी हलविले होते. ४) भावनगरमधील मदरशातून ४०० लोकांना वाचविले गेले. ५) बडोदा जिल्ह्यातील फतेहपुरा गावातून १५०० लोकांना वाचविले. ६) बडोदा जिल्ह्यातील क्वांत गावातून ३ हजार लोकांना वाचवून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेली माहिती तसेच ‘इंडिया टुडे’ १८ मार्च २००२च्या अंकात आणि ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या ७ मार्च २००२ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून हे कळते की पहिल्या ३ दिवसात पोलीस गोळीबारात ९८ लोक ठार झाले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘द हिंदू’ या वृत्तपत्रांनी या संदर्भात दिलेल्या बातम्या आपण या आधी पाहिल्याच आहेत, त्या वाचूनही हे कळते की पहिल्या ३ दिवसात पोलिस गोळिबारात मृतांचा आकडा हा ९८ असा आहे. हा आकडा एक उच्चांक (Record) आहे. गुजरातमध्ये झालेल्या १९६९ आणि १९८५ च्या दंगली असोत किंवा भारतातील इतर ठिकाणी झालेल्या दंगली असोत, इतक्या कमी कालावधीत पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्यांची संख्या इतकी मोठी कधीच नव्हती. पोलीस गोेळीबारात ठार झालेल्या ९८ लोकांपैकी सर्वाधिक म्हणजे ६० हिंदू होते. या ९८ मृतांत एकट्या अहमदाबादमधील ४० लोक होते आणि अहमदाबादमधील या मृतांत १७ हिंदू आणि २३ मुस्लिम होते. पोलिसांच्या गोळीबारात मुस्लिमही ठार झाले, याचे कारण १ आणि २ मार्चला मुस्लिम आक्रमक झाले होते. (इंडियन एक्स्प्रेससारख्या सर्वोच्च टीकाकारासह कोणीही, पोलिसांनी मुस्लिमांना गोळीबारात निष्ठुरपणे मारले, असे म्हटले नाही.) याचे कारण ‘द इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘द हिंदू’ यांच्या बातम्यांनुसार दोन्ही जमातींच्या संघर्षात हस्तक्षेप करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात संघर्ष सुरू असल्यामुळे पोलीस गोळीबारात मुस्लिमही मारले जाणे स्वाभाविक होते. ‘द हिंदू’ने म्हटल्याप्रमाणे जमालपुरामधील प्रसिद्ध मंदिरावर मुस्लिमांनी १ मार्चला हल्ला केला. अहमदाबाद शहराच्या बाहेर पोलीस गोळीबारात ठार झालेल्या ५८ लोकांपैकी ४३ हिंदू होते. अहमदाबादप्रमाणेच मुस्लिम आक्रमक असलेल्या बडोद्याचाही यात समावेश आहे. असे असूनही पोलीस गोळीबारात ठार झालेल्यात हिंदूंचे प्रमाण फार जास्त आहे-५८ पैकी ४३. बडोद्याचे माजी पोलीस आयुक्त डी.डी. टुटेजा यांनी दिलेली माहिती एस.आय.टी.ने आपल्या अहवालात पृष्ठ क्र. ३६४ वर दिली आहे. त्यानुसार बडोद्यात पोलीस गोळीबारात ४ हिंदू आणि ७ मुस्लिम ठार झाले- पण हे बडोद्यातील पूर्ण अडीच महिन्याचे आकडे आहेत, पहिल्या तीन दिवसांचे नाही. पोलिसांनी निष्क्रियता दाखवली किंवा दंगेखोरांकडे दुर्लक्ष केले असे म्हणणे किती खोटे आहे, हे यावरून स्पष्ट होते. मर्यादित भागातच दंगली झाल्यात,पूर्ण राज्यात नाही संपूर्ण गुजरात जळत होता, असे माध्यमांनी रंगविलेले चित्र पूर्वग्रहदूषित लोकांच्या कल्पनाशक्तीतून आलेले आहे. प्रत्यक्षात सौराष्ट्र आणि कच्छ या सीमावर्ती भागात दंगली पसरल्या नव्हत्या. गुजरात विधानसभेच्या १८२ मतदारसंघांपैकी सौराष्ट्र (५२) आणि कच्छ (६) मिळून ५८ मतदारसंघ तेव्हा होते. याचा अर्थ हा गुजरातचा एक तृतीयांश भाग आहे. गुजरातच्या पश्चिम आणि दक्षिण पश्चिम (सौराष्ट्र आणि 45 कच्छ) भागात दंगली झाल्या नाहीत. यावरून दंगली पेटविण्यात राज्य सरकारचा हात नव्हता आणि दंगली पसराव्यात अशीही सरकारची इच्छा नव्हती, हे स्पष्ट होते. दंगली झालेल्या भागात त्याचा फायदा भाजपाला नक्कीच झाला. गोधरानंतर झालेल्या हिंदू उद्रेकाचाही फायदा भाजपाला झाला. पण याचा अर्थ राज्य सरकार दंगलींना फूस लावत होते, असा होत नाही. सौराष्ट्र आणि कच्छ भागात पहिल्या ३ दिवसातही हिंदूंनी प्रतिकार केला नाही. जर राज्य सरकारला दंगली घडवायच्या असत्या, तर या भागातही दंगलींना फूस लावणे सोपे होते. केशुभाई पटेल यांच्याऐवजी मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांना आणल्यामुळे पटेल समाजातील एक गट असंतुष्ट होता आणि मोदींवर नाराज होता. सौराष्ट्र ही केशुभाई पटेलांची कर्मभूमी व पटेल समाजाची मोठी संख्या असलेला भाग असल्यामुळे तेथे दंगली पेटवून हिंदूंचे ध्रुवीकरण घडवून आणणे सोपे होते आणि भाजपाच्या व मोदींच्या फायद्याचेही होते. पण सौराष्ट्र शांत होता! गुजतराच्या उरलेल्या भागातही खरया दंगली पहिल्या ३ दिवसांनंतरच थांबल्या. उत्तर आणि दक्षिण गुजरात २ मार्च २००२ नंतर शांत झाला आणि मध्य गुजरातमधील काही भागात दंगली झाल्या. २ मार्च २००२ नंतर झालेल्या दंगली अहमदाबाद, बडोदा आणि पंचमहल जिल्ह्यातील गोधराजवळच्या काही भागापुरत्या मयादित होत्या, मुख्यतः (by and large). गुजरातमधील दोन-अडीच महिन्यांच्या दंगलकाळात सौराष्ट्र आणि कच्छ पूर्णपणे शांत राहिले, हे सर्व टिव्ही वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी मान्य केले. पण ही कबुली माध्यमांनी गुजरात दंगली चालू असताना ठळकपणे दिली नव्हती, तर डिसेंबर २००२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीचे वार्तांकन करताना दिली. ‘स्टार न्यूज/एनडीटीव्ही’च्या ‘हॉटलाइन’ कार्यक्रमात ६ डिसेंबर २००२ च्या सुमारास नरेंद्र मोदींना बोलविण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पंकज पचौरी यांनी मोदींना विचारले, ‘‘तुमच्या पक्षाला दंगलींचा नेहमीच फायदा मिळत आला आहे. पण सौराष्ट्र आणि कच्छमध्ये दंगली न झाल्यामुळे तुमचा पराभव होण्याची (धुव्वा उडायची) शक्यता आहे. यावर तुमचे उत्तर काय?’’ त्यावर नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘जेव्हा फक्त २ टक्के गुजरात जळत होता, तेव्हा तुम्ही म्हणत होता, ‘संंपूर्ण गुजरात जळतोय.’ आता तुम्ही म्हणताय सौराष्ट्र आणि कच्छमध्ये दंगली झाल्याच नाहीत. तेव्हा २ टक्के राज्य जळत असताना सर्व राज्य जळतंय, असे खोटे सांगितल्याबद्दल तुम्ही प्रथम माफी मागा.’’ गुजरात राज्यामध्ये १८,६०० गावे, २४० नगरपालिका, २५ जिल्हा मुख्यालये आहेत. यापैकी फक्त ९० ठिकाणी दंगली झाल्या. आपण अहमदाबाद आणि बडोदा या दोन्ही मोठ्या शहरांचा त्यात समावेश केला, तरी दंगली झालेला भाग २ टक्क्यांच्या वर जात नाही. या संदर्भात आर. श्रीकुमार या पोलीस अधिकार्‍याच्या अहवालाचा काहीजण हवाला देतात. ऑगस्ट २००२ मधील या अहवालात म्हटले आहे की १५४ विधानसभा मतदारसंघ, १५१ शहरे आणि ९९३ गावे दंगलींनी प्रभावित होती. याचा अर्थ या सर्व ठिकाणी दंगली झाल्या, असा होत नाही. श्रीकुमार यांनी दिलेल्या या आकडेवारीत दंगली झालेल्या भागांबरोबरच, जेथे शरणार्थी शिबिरे उघडली होती किंवा दंगलग्रस्तांना धान्य व इतर सरकारी मदत पोचविली होती, त्या सर्व ठिकाणांचाही समावेश करण्यात आला आहे, असा खुलासा उप कॅबिनेट सचिव (गृह) अशोक नारायण यांनी केल्याचे एसआयटीच्या अहवालात पृष्ठ क्र. १५३ वर नमूद करण्यात आले आहे. अशोक नारायण यांनी सांगितले की प्रत्यक्ष हिंसाचार झालेली ठिकाणे यापेक्षा फार कमी होती. साहजिकच प्रत्यक्ष दंगलीची ठिकाणे आणि दंगलग्रस्तांना अन्नधान्य वाटप झाले, ती ठिकाणे यांच्या आकड्यात मोठे अंतर आहे. कट्टर संघपरिवारविरोधी म्हणून ओळखल्या जाणार्‍या व कम्युनिस्ट विचारधारेच्या ‘फ्रंटलाईन’ पाक्षिकाने डिसेंबरा २००२ च्या निवडणुकीनंतर म्हटले आहे, ‘‘दंगलग्रस्त भागामध्ये भाजपाला मोठा फायदा 46 मिळाला. दंगलींने प्रभावित भागातील ६५ पैकी ५० जागा भाजपाने जिंकल्या… जेथे दंगली झाल्या नाहीत, तेथे भाजपाला धक्का बसला. कच्छ भागात ६ पैकी २ जागा त्यांना मिळविता आल्या. गेल्या निवडणुकीत पक्षाने ४ जागांवर विजय मिळविला होता. सौराष्ट्रात, जेथी भीषण पाणीटंचाई आहे, भाजपाच्या जागा कमी होऊन ४८ वरून ३७ वर आल्या (५२ पैकी).” (संदर्भ: http://www.frontline.in/static/html/fl1926/stories/20030103005900400.htm) जर ‘फ्रंटलाईन’ संघ-भाजपविरोधी पाक्षिकाने एकूण १८२ जागांपैकी दंगलग्रस्त भागातील जागांचा आकडा ६५ दिला (यामध्ये अहमदाबाद जिल्हा आणि बडोदा जिल्ह्याचाही समावेश आहे. जेथे त्यावेळी अनुक्रमे १९ आणि १३ जागा होत्या. शिवाय राजकोट आणि सुरत या दोन शहरांचाही यात समावेश होता), तर ९९३ गावांमध्ये हिंसाचार झाला असण्याची शक्यताच नाही. हा आकडा जास्तीत जास्त ९० असू शकतो. कारण अहमदाबाद आणि बडोदा, या दोन्ही जिल्ह्यातील विधानसभा जागांचीच संख्या ३२ आहे. याच बातमीत ‘फ्रंटलाईन’ने कबूल केले आहे की सौराष्ट्र आणि कच्छ दंगलींपासून दूर राहिले. बहुतेक सर्व वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांप्रमाणे दंगलींच्या पहिल्या दिवशी २६ ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली. ‘द हिंदू’च्या म्हणण्यानुसार दुसर्‍या दिवशी ३४ ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली. (आधीच संचारबंदी लागू असलेल्या २६ ठिकाणांचा यात समावेश होता.) तिसर्‍या दिवशी संचारबंदी लागू केलेल्या ठिकाणांचा आकडा ४० वर पोचला. (यापैकी बहतुेक किंवा सर्व ठिकाणं पहिल्या वा दुसर्‍या दिवशीपासून संचारबंदी खाली होती.) पहिल्या ३ दिवसातच दंगली आटोक्यात आल्या. ३ दिवसांनंतर झालेल्या दंगली अहमदाबाद, बडोदा आणि गोधराजवळच्या काही ठिकाणी मर्यादित होत्या. ‘द हिंदू’ने ४ मार्च २००२ ला लिहिले की “(पहिल्या तीन दिवसात) हिंसाचाराच्या घटना ४० शहरात व गावात घडल्या”. यावरून ९९३ गावात दंगली झाल्या असण्याची कोणतीही शक्यता नाही. दंगली झालेल्या गावांचा जास्तीत जास्त आकडा ५० आणि ठिकाणांचा जास्तीत जास्त ९० इतकाच सीमित होता, हे अगदी स्पष्ट होते. भाजपाचे तत्कालीन राज्यसभेतील खासदार, वरिष्ठ नेते आणि त्या काळी प्रवक्ते असलेले बलबीर पुंज यांनी ‘द पायोनिअर’ या दैनिकाच्या २५ एप्रिल २००२ च्या अंकात एक लेख लिहिला आहे. त्यात ते म्हणतात ‘‘राज्यभरात दंगलीच्या संदर्भात अटक झालेल्या ३१ हजार लोकांपैकी ८० टक्के हिंदू होते. गुजरातमध्ये मारल्या गेलेल्या एकूण ८०० लोकांपैकी २५ टक्के हिंदू होते. पोलीस गोळीबारात मृत झालेल्या १४० लोकांपैकी ८० हिंदू होते…’’ ‘द टाईम्स ऑफ इंडिया’च्या ७ मार्च २००२ च्या अंकातील बातमीत म्हटले आहे: ‘‘अधिकृत आकडेवारीनुसार पोलीस गोळीबारात ९९ लोक ठार झाले. सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत अश्रुधुराच्या ७२७६ नळकांडी फोडण्यात आल्या, तर बंदुकीच्या ५१७६ फैरी झाडण्यात आल्या.” (संदर्भ: http://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/Toll-now-677-due-to-recovery- of-more-bodies/articleshow/3055362.cms ) वास्तविक दंगली २ मार्चला थांबल्या होत्या. त्यामुळे या ‘द टाईम्स ऑफ इंडिया’च्या बातमीवरून पोलिसांनी पहिल्या ३ दिवसात बंदुकीच्या ३९०० हून अधिक फैरी झाडल्या आणि अश्रुधुराची ६५०० नळकांडी फोडली, हे सिद्ध होते. २८ फेब्रुवारीनंतर दोन्ही समाजातील लोक या रक्तरंजित दंगलीत सहभागी होते. ‘इंडिया टुडे’ आपल्या २० मे २००२ च्या अंकात पहिल्या ३ दिवसांनंतरच्या हिंसाचाराचे कोष्टकच दिले आहे. ते असे – “१ ला आठवडा मार्च ३-९ १७ मृत २ रा आठवडा मार्च १०-१६ ३२ मृत ३ रा आठवडा मार्च १७-२३ ४३ मृत ४ था आठवडा मार्च २४-३० ५४ मृत ५ वा आठवडा मार्च ३१ ते एप्रिल ६ १४९ मृत 47 ६ वा आठवडा एप्रिल ६-१२ ५१ मृत ७ वा आठवडा एप्रिल १३-१९ ६ मृत ८ वा आठवडा एप्रिल २०-२६ १७ मृत ९ वा आठवडा एप्रिल २७ ते मे ३ ३५ मृत १० वा आठवडा मे ४-१० ३० मृत एकूण मृतांची संख्या ९७२” या कोष्टकावरून एक गोष्ट लक्षात येते की व्यापक दंगलींच्या पहिल्या ३ दिवसात ५५० लोक ठार झाले. पुढे ७० दिवसात ४०० लोक. म्हणजे दररोज साधारणपणे ६ लोक मारले गेले. याचा अर्थ स्पष्ट आहे की दंगली एकतर्फी नव्हत्या तर हिंदू मुस्लिमांचा सर्वंकष संघर्ष होता. पोलिसांच्या नोंदीनुसार ३ मार्च २००२ नंतर मुस्लिमांनी १५७ दंगलींना सुरुवात केली. ११ मेे २००२ ते २० मे २००२ या काळात गुजरातमध्ये कुठेही नाव घेण्याजोगा हिंसाचार झाला नाही, आणि २१ मे २००२ पासून लष्कराने अहमदाबादमधून परतण्यास सुरुवात केली. ‘इंडिया टुडे’ १८ मार्च २००२ च्या अंकात नरेंद्र मोदी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. ती अशी- ‘‘वरिष्ठ संपादक व्ही. शंकर अय्यर आणि विशेष प्रतिनिधी उदय माहुरकर यांच्याशी अत्यंत संयम मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेला वार्तालाप असा- प्रश्‍न – गुजरातमधील दंगलीत जवळ जवळ ६०० लोक ठार झाले. संपूर्ण प्रशासन कोलमडून पडले होते का? तुम्ही जबाबदार आहात का? उत्तर – हे खोटे आणि निराधार आरोप आहेत. अधिकृत नोंदींप्रमाणे (official records) जाऊ. मी गोधराला २७ मार्चलाच (ही तारीख २७ फेब्रुवारी हवी) संध्याकाळी पोचलो होतो आणि अहमदाबादला परतल्यानंतर लगेचच ८२७ जणांच्या प्रतिबंधात्मक अटकेचे आदेश दिले. गोधरात तातडीने दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश मी दिले. २८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता दंगलींना सुरुवात झाली आणि मी दुपारी ४ पर्यंत लष्कर पाठविण्याची विनंती केली. माझ्याच विनंतीवरून संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस १ मार्चच्या पहाटे २ वाजता च्या आधी अहमदाबादला येऊन पोचले. प्रश्‍न – पण हे सर्व उपाय निरुपयोगी ठरले. उत्तर – ज्यांना राज्यातील दंगलींचा इतिहास माहीत नाही, त्यांनाच असे वाटेल. १९८० च्या सुरुवातीच्या काळात गोधराचा काही भाग पूर्ण वर्षभर संचारबंदीमध्ये होता. १९८५ मध्ये अहमदाबादच्या कालुपूर-दरियापूर भागातील संचारबंदी ६ महिने लागू होती. या पूर्वीच्या सरकारांपेक्षा मी फार कमी वेळात दंगली नियंत्रणात आणल्या. प्रश्‍न – मुस्लिमांचा आरोप असा आहे की २८ फेब्रुवारीला पोलीस केवळ निष्क्रियच नव्हते, तर त्यांचा हत्या, जाळपोळ आणि लुटालुटीत सहभाग होता, आणि नंतरही. उत्तर – मला हे मान्य नाही. दंगलीच्या पहिल्याच दिवशी (२८ फेब्रुवारीला) पोलिसांनी बंदुकीच्या १ हजार फैरी झाडल्या. पण इथे एक विसरता कामा नये, की जे झाले ते (गोधरातील) क्रूर हत्याकांडाची प्रतिक्रिया होती. गुरुवारी (२८ फेब्रुवारी) एकत्र आलेले प्रक्षुब्ध जमाव संख्येच्या दृष्टीने अभूतपूर्व होते. त्यामुळे काही ठिकाणी पोलिस दडपले गेले असतील. तरीही त्यांनी आपल्या परीनी पूर्ण प्रयत्न केलेत. एहसान जाफरी यांची हत्या झाली, त्या ठिकाणी पोलीस गोळीबारात ५ लोक ठार झाले आणि पोलिसांनी या प्रकरणात २०० मुस्लिमांना वाचविले. प्रश्‍न – दंगलींना एवढे कौर्याचे रूप का आले, असे तुम्हाला वाटते? उत्तर – या सांप्रदायिक दंगली नव्हत्या, तर हे जन आंदोलनासारखे काहीतरी हाते. दहशतवाद, देशविरोधी कृत्ये याबाबत लोकांच्या मनात आधीपासूनच भयंकर संताप होता. गोधरा हत्याकांड त्याचे प्रतीक ठरले (दहशतवाद व राष्ट्रविरोधी कृत्यांचे). प्रश्‍न – या हिंसेच्या प्रतिक्रियेची (मुस्लिम प्रतिक्रियेची) आपल्याला चिंता वाटते का? उत्तर – माझी समज अशी आहे की ते काहीतरी करायचा प्रयत्न करतील. त्यामुळे येणार्‍या काही महिन्यात गुजरातला अतिशय सावध रहावे लागेल. प्रश्‍न – शबाना आझमी यांनी तुम्हाला ‘मास किलर’ असे संबोधले आहे त्यवर तुमची प्रतिक्रिया काय? 48 उत्तर – हिंसाचाराचे दोन प्रकार आहेत. एक धर्मांध आणि दुसरा धर्मनिरपेक्षतावादी. अन्य संघटनांकडून पसरविला जात असलेला धर्मनिरपेक्षतावादी हिंसाचारही समाजाला तेवढाच घातक आहे. तरीही काही लोक तो पसरवीतच असतात. खरे तर माझ्या विरुद्ध डाव्यांचे एक कारस्थान आहे.” (संदर्भ: http://www.indiatoday.com/itoday/20020318/cover-box.shtml) ‘आऊटलूक’ १८ मार्च २००२ च्या अंकातही नरेंद्र मोदी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली. ती अशी- “प्रश्‍न – गुजरात जळत असताना तुम्ही फीडल (वाद्य) वाजवत बसला होता का? उत्तर – नाही. आता जे दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे, नेमके त्या विरुद्ध घडत होते. मी अवघ्या ७२ तासात हिंसाचार आटोक्यात आणला आणि शांतता प्रस्थापित केली. पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारच्या काळात झालेल्या जातीय दंगली नियंत्रणात यायला व राज्य पूर्वपदावर यायला अनेक महिने लागायचे. असे आता प्रथमच घडतेय की सांप्रदायिक दंगली इतक्या कमी वेळात नियंत्रणात आल्यात. प्रश्‍न – विहिंप आणि बजरंग दलाला तुमचे सरकार मदत करीत होते, असा आरोप आहे. या संघटनांचे अनुयायी सलग ४८ तास राज्यभर हैदोस घालत असताना पोलीस फक्त पाहत बसले होते आणि काही ठिकाणी ते हिंसाचारात सामीलही झाले होते. उत्तर- असं कसं असू शकतं? आपल्या लक्षात एक गोष्ट येतेय का की एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा हिंसाचार उसळतो, तेव्हा पोलीस अत्यंत तणावाखाली असतात. साधनेही सीमित असतात. पोलीस गोळीबारात ७० च्या वर लोक ठार झाले, मग प्रशासनाने या किंवा त्या समाजाची बाजू घेण्याचा प्रश्‍न येतोच कुठे? प्रश्‍न – पोलिसांना आपली निष्क्रिय भूमिका बजावता यावी, म्हणून लष्कराला मुद्दाम विलंबाने पाचारण केले का? उत्तर – गोधरातील हत्याकांड २७ फेब्रुवारीला झाले. दुसर्‍याच दिवशी मी घोषणा केली की लष्कराची मदत मागवण्यात आली आहे. ती पाठविण्यासाठी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक पंतप्रधानांनी २८ फेब्रुवारीलाच बोलविली. पण ते इतकं सोप नव्हतं. त्यावेळी लष्कर सीमेवर तैनात असल्यामुळे अहमदाबादमध्ये लष्कर नव्हतं. दुसर्‍याच दिवशी १ मार्चला ‘दिसताक्षणी गोळ्या घाला’ असा आदेश देण्यात आला. मी जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी बोललो आणि (दंगली सुरु झाल्याच्या) अवघ्या १६ तासात लष्कर पोचले (अहमदाबादला). मग उशीर झाल्याचा विषय येतोच कुठे? प्रश्‍न – विहिंप आणि बजरंग दलाबरोबरचे सरकारचे संबंध नेमके काय आहेत? उत्तर – राज्यात भाजपा वाढविण्यासाठी मी प्रचंड कष्ट घेतले आहेत. पक्षाच्या विजयाच्या शक्यता वाढल्याबद्दल मला दोषी धरणार का? प्रश्‍न – याचा अर्थ असा लावायचा का की वर्षभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या बुडत्या पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी तुम्ही हिंदू कार्ड खेळलात? उत्तर – कोणतेच कार्ड खेळायचे नाहीत. सरकारचा प्रमुख म्हणून मी निष्पक्ष आहे. मी कुणाचे लांगूलचालनही करणार नाही. दंगल आणि हिंसाचारात सहभागी असलेले दंगेखोर कोणत्याही समाजाचे असोत, त्यांच्यावर कारवाई होईलच. न्यायालयीन अयोग या घटनांचा तपास करतो आहे आणि त्याच्या निर्णयाचा निश्चितच सन्मान केला जाईल. प्रश्‍न – गेल्या काही दिवसात आपण निष्पक्ष आहात, असे कुठे दिसले? उत्तर – लोकशाहीमध्ये कोणीही काहीही बोलू शकतं. गुजरातमध्ये सांप्रदायिक तणाव अत्यंत टोकाचा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पाकिस्तान विरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकर ९० वर बाद झाला, तरी इथे दंगली हातात. अगदी लहानशी गोष्ट सुद्धा इथे हिंसाचाराला कारणीभूत ठरू शकते आणि गोधराची घटना तर खूपच मोठी होती. १९६९ च्या दंगलीत कॉंग्रेसचे सरकार असताना संचारबंदी सलग ६५ दिवस होती. प्रश्‍न – तुम्ही पूर्वीच्या कॉंग्रेेस सरकारांबद्दल बोलता आहात. पण (कॉंग्रेसपेक्षा) चांगला कारभार देण्याच्या तुमच्या पक्षाच्या दाव्याचे काय? उत्तर – आम्ही चांगलाच कारभार देत आहोत. पण सत्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? (गोधरासाठी) आतापर्यंत अटक झालेल्या ८० लोकांपैकी ६५ लोक कॉंग्रेसची पार्श्‍वभूमी असलेले आहेत. कॉंग्रेेस भावनांचा गैरफायदा घेत आहे. गोधरा प्रकरणात सहभागी असलेल्या अपक्ष नगरसेवकांना भाजपाने पाठिंबा दिला होता, असा आरोप केला जात आहे. आतापर्यंत माध्यमे असे म्हणत होती, की एकही मुस्लिम भाजपाच्या बाजूने नाही. पण आता ही घटना घडल्यानंतर मुस्लिम नगरसेवकांना भाजपाचा पाठिंबा असल्याचा आरोप होतो आहे. दुटप्पीपणालाही काही मर्यादा असतात. तसेही अपक्ष नगरसेवक कोणत्याही पक्षाचे सदस्य नाहीत. प्रश्‍न – काही माध्यमांवर तुम्ही बंदी घातली. माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचाच हा तुमचा हुकूमशाही प्रकार आहे असे लोकांना वाटते… 49 उत्तर – माध्यमांवर कोणतीही बंदी नव्हती. केवळ एक वाहिनी अत्यंत प्रक्षोभक पद्धतीने वार्तांकन करत असल्यामुळे तिचे प्रक्षेपण थांबवण्यात आले. बहुसंख्य वृत्तपत्रे परंपरेनं स्वत:वरच नियंत्रण ठेवतात. दंगलींचे वार्तांकन करताना कधीही ते धर्माचा उल्लेख करीत नाहीत. दर अर्ध्या तासाने अशाप्रकारे धर्माचा उल्लेख कोणताही आधार नसताना सतत केला गेला, तर परिस्थिती शांत होण्याऐवजी भडकण्याचीच शक्यता असते. या सर्वाचा परिणाम काय होईल, हे समजणे अवघड नाही. आणखी एक गोष्ट मी सांगितली पाहिजे की त्यानंतर (म्हणजे प्रक्षेपण बंद केल्यानंतर) त्या वाहिनीने माफी मागितली आणि आपल्या वार्तांकनात सुधारणा केली आहे.” (संदर्भ: http://www.outlookindia.com/article.aspx?214916 ). पोलीस किती तास निष्क्रिय होते, याचा आकडा ‘आऊटलुक’ने सहजपणे ४८ तासांवर कसा नेऊन ठेवला, हे आपण लक्षात घ्यावे. ‘४८ तास पोलीस निष्क्रिय होते’ असे ‘आऊटलुक’ने म्हटले असले, तरी ‘इंडियन एक्स्प्रेस’सारख्या कट्टर विरोधी वृत्तपत्रानेही ‘पोलीसांनी दंगलीच्या दुसर्‍या दिवशी आपला सर्वात चांगला प्रयत्न केला’ असे म्हटले होते! म्हणजे फक्त २४ तासातच! अर्थातच पहिल्या २४ तासातही पोलीस निष्क्रिय नव्हतेच आणि त्यांनी दंगेखोरांना मोकळे रान दिले नव्हते. याच पहिल्या २४ तासात पोलिसांनी बंदुकीच्या १ हजारपेक्षा जास्त फैरी झाडल्या आणि नरोडा-पाटिया, चमनपुरा भागातून हजारोंना (मुस्लिमांना) वाचविले. नरेंद्र मोदींचे हे वाक्यही महत्त्वाचे आहे, ‘‘नाही. आता जे दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे, नेमके त्याविरुद्ध घडत होते. मी ७२ तासांत हिंसाचार आटोक्यात आणला…’’ दुसर्‍या शब्दात सांगायचे तर चित्र मोदी विरोधात दाखविण्याचे प्रयत्न दंगली संपल्यानंतर सुरू झाले. ‘द हिंदू’, ‘द टेलिग्राफ’ यासारख्या कट्टर भाजपा-विरोधी दैनिकांनी दंगलीचे केलेले वार्तांकन आपण आधी पाहिलेच आहे. त्यामध्ये नरेंद्र मोदींवर किंवा गुजरात सरकारवर त्यांनी दंगलकाळात कोणताही आरोप केलेला नव्हता. हे सर्व उद्योग बरेच नंतर सुरू झाले. दूरदर्शनने ३ मार्च २००२ ला (रविवारी) रात्री आपल्या इंग्रजी वार्तापत्रात म्हटले होते – ‘‘अहमदाबादमधील हिंसाचार उच्चांकी वेळात (record time) थांबविण्यात आला आहे…फक्त ३ दिवसात… आधी त्यासाठी अनेक आठवडे लागायचे…आज (रविवारी) संचारबंदी शिथिल करण्यात आली. लोकांनी बाजारात जाऊन आवश्यक ती खरेदी केली.’’ राज्य सरकारविरुद्ध कोणताही आरोप नाही, उलट केवळ ३ दिवसात दंगली थांबल्याबद्दल कौतुक! नरेंद्र मोदींवरचे आरोप, त्यांच्या राजीनाम्याची मागणी किंवा सरकार बरखास्त करण्याची मागणी दंगलींनंतर सुरू झाली. कारण या दंगलीबद्दल माध्यमांना कोणाला तरी बळीचा बकरा बनवायचे होते. त्यांची इच्छा अशी होती की मोदींनी काही पोलीस आधिकार्‍यांना निलंबित करावे, एक-दोन मंत्र्यांना डच्चू द्यावा. पण मोदी असे काहीच करायला तयार नव्हते. त्यांनी कोणालाही दोष दिला नाही किंवा कोणाला बळीचा बकराही बनविले नाही. एन.डी.टी.व्ही.च्या ‘वॉक द टॉक’ कार्यक्रमात शेखर गुप्ता (संपादक, इंडियन एक्स्प्रेस) यांना नरेंद्र मोदींनी दिलेली मुलाखत मार्च/एप्रिल २००४ मध्ये प्रसारित झाली. त्यात मोदी म्हणतात – ‘‘आपल्या सगळ्यांची इच्छा होती की मी कोणालातरी बळीचा बकरा बनवावे. मी तसे केले नाही. सर्व माठ माझ्याच डोक्यावर फोडू दिले. तुम्ही सर्वांनी ठरवलं आहे की ‘नरेंद्र मोदींच्या राज्यात दंगली झाल्या. या माणसाला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.’ तुमच्या या मिशनमध्ये माझ्या तुम्हाला शुभेच्छा.’’ माध्यमांच्या इच्छेप्रमाणे काहीच घडले नाही. ना नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला, ना भाजपाने त्यांना बरखास्त केले, म्हणून प्रसारमाध्यमे भडकली. ‘द हिंदुस्तान टाइम्स’ला नरेंद्र मोदींनी दिलेली मुलाखत १० मार्च २००२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. ती अशी – “प्रश्‍न – विहिंप आयोजित बंदच्या वेळी २८ फेब्रुवारीनंतर उसळलेल्या भीषण दंगलीत आपले सरकार ४८ ते ७२ तास केवळ मूक साक्षीदार बनले होते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे, तर आपण त्वरित कृती केल्याचे दावे करीत आहात. यामधली तफावत खूप मोठी आहे. यावर तुमचा बचाव काय? 50 उत्तर – केवळ ७२ तासातच परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. आम्ही लष्कराला बोलविण्यास उशीर केला, हे म्हणणेही खरे नाही. गोधरातील घटना सकाळी ८ वाजता घडली. मी सकाळी ९.४५ वाजता तेथे संचारबंदी लागू केली. रेल्वे स्टेशनवरच आमच्या सरकारने गोळीबार केला. एखाद्या समाजाला लक्ष्य करणं हा आमचा हेतू असता, तर गोधरात अम्हाला मोठी संधी होती. पण आम्ही तसे केले नाही. आमच्या समोरचे पहिले आव्हान होते, वाचलेल्या प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवणे. हिंसाचार पसरणार नाही यासाठी मी गोधरा सोडण्यापूर्वीच तेथे दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले. २७ फेब्रुवारीच्या रात्रीच प्रतिबंधक उपाय म्हणन सुमारे ८०० लोकांना (नेमका आकडा आहे ८२७) राज्यभरातून ताब्यात घेण्यात आले. २८ फेब्रुवारीचा बंद उत्स्फूर्त होता. बंद पाळण्यासाठी जबरदस्ती केल्याचे एकही वृत्त नाही. सकाळी ११ वाजता तणाव वाढायला लागल्यानंतर दुपारी १२.२० वाजता अहमदाबादमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. प्रश्‍न – याचा अर्थ विहिंपच्या बंद काळातच आपण संचारबंदी लागू केली? उत्तर – हो. पहिल्याच दिवशी. दंगली पसरू नयेत, यासाठी पोलिसांनी तयार केलेली रणनीती पूर्वीच्या अनुभवांवर आधारित होती. त्यामुळे अतिसंवेदनशील भागांवर आम्ही लक्ष केंद्रित केले. पण यावेळी हे भाग शांत राहिले आणि हिंसाचार साबरमती नदीच्या पश्‍चिम किनार्‍यावरील भागात उसळला. (‘इंडिया टुडे’प्रमाणेच ‘टाइम्स ऑफ इंडिया’नेही हेच म्हटले आहे.) २८ फेब्रुवारीलाच अहमदाबादमध्ये पोलिसांनी गोळीबाराच्या ६०० फैरी झाडल्या. त्यात ५ जण ठार झाले. (प्रत्यक्षात १० ठार झाले. जाफरींच्या घराजवळ ५ लोक.) दुपारी २ वाजता मी पंतप्रधानांशी बोललो. त्यांना सांगितलं की ‘मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय भागातून लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना थोपवण्यासाठी मला लष्कर आणि निम लष्करी दलांची तातडीनं गरज आहे.’ त्या दिवशी दुपारी ४.३० वाजताच माध्यमांशी बोलताना मी लष्कराची मदत मागितल्याचे म्हटले होते. सीमेवर तैनात असलेले लष्कर तेथून काढून १६ तासात (प्रत्यक्षात १४ तासात) गुजरातमध्ये तैनात करण्यात आले. पूर्वीच्या अशाच प्रसंगांत लष्कराला पोचायला ३ ते ५ दिवस लागले होते. (कॉंग्रेसच्या काळत) प्रश्‍न – पण आतापर्यंत (५ मार्चची सकाळ) आपण किंवा आपल्या मंत्र्यांनी उद्ध्वस्त झालेल्या भागांना भेट दिली नाही. फक्त संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस काही ठिकाणी गेले, जी ठिकाणे ३ मार्चच्या अहमदाबाद भेटीत अडवाणींनीही वगळली होती. उत्तर – हे खरे नाही. शहरातील सर्व संवेदनशील जागांना अडवाणींनी भेट दिली (३ मार्चला). मीही त्यांच्याबरोबरच गेलो होतो. इथले विरोधी पक्ष नेते (कॉंग्रेेसचे नरेश रावळ) त्यांच्या सरदारपूर मतदारसंघात ७२ तासांनंतर काल पोचले. पण माझे एक मंत्री ६ तासातच तेथे पोचले होते. आता सरकारी यंत्रणा दंगलग्रस्तांना मदत करण्यावर आपले लक्ष केंद्रित करीत आहे. पूर्वी दंगलग्रस्तांना रोज प्रत्येकी ५ रु. दिले जायचे. पहिल्यांदा ते वाढवून आम्ही १५ रु. देत आहोत… प्रश्‍न – साहित्याच्या मदतीपेक्षा मुस्लिमांना सुरक्षिततेची हमी हवी आहे. ती तुम्ही देऊ शकता का? उत्तर – हे काम सरकारला आणि लोकांना मिळून पूर्ण करावं लागेल. दोन्ही समाजांमध्ये विश्‍वास निर्माण होण्यासाठी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील. प्रश्‍न – असे म्हटले जाते की गोधरा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीला योग्य ठरवणारे वाक्य आपण १ मार्चला उच्चारले. त्यामुळे विहिंप-बजरंग दल कार्यकर्त्यांना अहमदाबाद आणि इतरत्र हिंसाचार करायला बळ मिळाले. याबद्दल आपले म्हणणे काय? उत्तर – मी असे कुठलेही विधान केलेले नव्हते. ‘प्रत्येक क्रियेला तेवढीच प्रतिक्रिया असते’ (‘Every action has equal and opposite reaction’), असा न्यूटनचा सिद्धांत असल्याचे मी म्हणालो, असे एका मोठ्या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले. शाळा सोडल्यानंतर मी कधीही न्यूटनचे नाव घेतले नाही. काही लोक स्वत:च्याच कल्पनांच्या मागे धावत असतील, तर मी त्याला काही करू शकत नाही. समाजाचा फायदा होत असेल, तर मी नुकसान सोसायला तयार आहे. माझ्या विरोधकांना मी एवढीच विनंती करेन की गुजरात पूर्वपदावर येईपर्यंत थांबा. प्रश्‍न – आपण व्यक्तिगतरित्या मुस्लिम समाजाला कोणता भरवसा देऊ शकता? उत्तर – सुरक्षा आणि सामाजिक सामंजस्य हाच माझा त्यांना भरवसा आहे. हे सरकार जितके इतरांचे आहे, तितकेच ते त्यांचेही आहे… प्रश्‍न – विरोध पक्षांचा तुमच्यावर विश्‍वास नाही. तुमचे सरकार बरखास्त करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. उत्तर – …वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या बॉंबहल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश यांचा राजीनामा कोणी मागितला नाही. भारतात मात्र कोणत्याही संकटाबरोबर राजीनाम्याचीही मागणी होते. मग तो भूकंप असो, की संसदेवरचा हल्ला…गुजरात हे सीमेवरचे राज्य आहे. इथले अंतर्गत सुरक्षेचे प्रश्‍न बाह्य सुरक्षेच्या समस्यांचे रूप घेऊ शकतात. आमची सर्वात मोठी काळजी मदरसे ही आहे. गोधरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अशा संस्था सुरू आहेत. भावनगरमधला एक मदरसा असाच तणावाचे कारण बनला, जेव्हा आफताब अन्सारीचा सहकारी या मदरशाचा विद्यार्थी होता, अशी बातमी एका वाहिनीने दिली. निर्माण झालेला प्रचंड तणाव कमी करण्यासाठी आम्हाला मदरशातील ४०० विद्यार्थी आणि काही मौलवी, यांना सुरक्षित जागी हलवावे लागले.’’ ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ 51 आता, सरकार दंगलींचे मूक साक्षीदार बनल्याच्या आरोपात वेळ किती सफाईने ४८ चे ७२ तास केले गेले हे लक्षात घ्या. प्रत्यक्ष दंगल चालू असताना कोणत्याही वृत्तपत्राने असे वार्तांकन केले होते का? २५ एप्रिल २००२ पर्यंत पोलिसांच्या गोळीबारात ७७ ते ८० हिंदू मारले गेले आणि २०७ जखमी झाले. राज्यसभेचे माजी खासदार आणि माजी पोलिस महासंचालक बी. पी. सिंघल (१९३२-२०१२) यांनी ‘ऑर्गनायझर’च्या ९ ऑक्टोबर २००५ च्या अंकात लिहिले आहे – ‘‘…गुजरातच्या दंगलीमध्ये पोलिसांनी अश्रुधुराची १५ हजारहून अधिक नळकांडी फोडली आणि गोळीबाराच्या १०,५०० पेक्षा अधिक फैरी झाडल्या…१९८४ च्या दंगली माध्यमांमध्ये फारशा गाजल्या नाहीत. कारण टी.व्ही. हे माध्यमच तेव्हा बाल्यावस्थेत होते. या उलट आता (२००२ मध्ये) इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अनेक गोंधळ घातले. दंगलीच्या काही घटना वारंवार दाखविण्याचे सत्र त्यांनी सुरू केले. एका वाहिनीने तर एकच घटना तशीच २१ वेळा दाखवली. यामधून अद्यापही गुजरातमध्ये मुस्लिमांचे हत्याकांड चालूच आहे, असे चित्र निर्माण झाले. सत्य मात्र असे आहे की संपूर्ण गुजरातमधून दंगलीशी संबंधित २५४८६ लोकांवर आरोप ठेवले गेले. त्यापैकी १७४८९ लोक हिंदू आहेत, तर ७९९७ मुस्लिम आहेत. यातील २५,२०४ आरोपींना अटक करण्यात आली- १७३४८ हिंदू आणि ७८५६ मुस्लिम. अत्यल्प वेळात पोलिसांनी ज्या मोठ्या संख्येने संशयितांना अटक केली, हा पोलिसांच्या कार्यक्षमतेचाच पुरावा आहे. यावरुन कळते की गुजरात पोलीस कधीही झोपा काढत नव्हते. दंगलग्रस्तांच्या व्यवस्थेसाठी दंगलकाळातच उभारलेल्या शिबिरांची सर्वाधिक संख्या १५९ होती. आवश्यकतेप्रमाणे नवी शिबिरे उघडली जात होती आणि गरज संपल्यावर बंद केली जात होती, त्यामुळे एखाद्या विशिष्ट दिवशी सुरू असलेल्या शिबिरांचा आकडा वेगवेगळा होता. ५ मार्च २००२ ला उभारलेल्या ९८ शिबिरांपैकी ८५ शिबिरे मुस्लिमांसाठी, तर १३ हिंदूंसाठी होती… दंगलीसंबंधी इंग्रजी माध्यमे देत असलेल्या बातम्या आणि स्थानिक गुजराती वृत्तपत्रांतून येणार्‍या बातम्या, यात दिवस आणि रात्री एवढे मोठे अंतर होते…’’ या लेखातून एक गोष्ट स्पष्ट होते की ५ मार्च २००२ लाच हिंदूंसाठी १३ शिबिरे उघडण्यात आली होती (९८ पैकी). ३ मार्च २००२ ला कोणत्याही दंगली झाल्या नाहीत. त्यामुळे ५ मार्चला उघडलेली ही १३ शिबिरे पहिल्या ३ दिवसात, दंगलग्रस्त झालेल्या हिंदूंसाठी होती. याचा अर्थ, पहिल्या ३ दिवसातही किमान १३ टक्के घटना अशा होत्या, ज्यामध्ये हिंदू हिंसाचाराला तेवढेच बळी पडले, जेवढे मुस्लिम राज्यात इतर ठिकाणी पडले. ‘रेडिफ डॉट कॉम’ने ७ नोव्हेंबर २००३ला दिलेली बातमी अशी आहे – ‘‘एहसान जाफरी यांनी जमावावर गोळीबार केला : साक्षीदार कॉंग्रेस नेते आणि माजी खासदार एहसान जाफरी यांनी अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटी येथे २८ फेब्रुवारी २००२ ला जमावावर गोळीबार केला, व तो करताना त्यांनी पाहिले, अशी साक्ष किमान ५ हिंदूंनी नानावटी आयोगासमोर दिली आहे. हा आयोग गुजरात दंगलींची चौकशी करीत आहे. …जाफरी यांनीच जमावावर गोळीबार केला आणि त्यात ३ लोक ठार झाले, असे या ५ हिंदू साक्षीदारांचे म्हणणे आहे. चमनपुराचे रहिवासी वसु पटेल यांनी तेथील हत्याकांडाला जाफरी, माध्यमे आणि पोलीस यांना जबाबदार धरले…पूर्वग्रहदूषित पद्धतीने बातम्या देणार्‍या माध्यमांवर कारवाई व्हायला हवी, असेही त्याने म्हटले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार जाफरींना आवरण्याऐवजी पोलिसांनी स्थानिकांनाच मारहाण केली आणि त्यांच्यावरच गोळीबार केला. मदनसिंग राजपूत या दुसर्‍या साक्षीदाराने आयोगाला सांगितले, की दंगलीपूर्वी त्या भागातील मुस्लिम हिंदूंबरोबर वाईट पद्धतीने वागत होते. इंग्रजी वृत्तपत्रांच्या बातम्या हिंदूविरोधी होत्या, असे सांगून त्यांनी या वृत्तपत्रांचा निषेध केला…” (संदर्भ : http://www.rediff.com/news/2003/nov/06godhra.htm ) एहसान जाफरी प्रकरणात काय घडले असेल, त्याचा या बातमीवरुन एक संकेत मिळतो. नरोडा-पाटिया प्रकरण 52 नरोडा-पाटिया ही घटना खर्‍या अर्थाने मुस्लिमविरोधी हिंसाचाराची होती. २८ फेब्रुवारी २००२ ला म्हणजे दंगलीच्या पहिल्याच दिवशी प्रक्षुब्ध हिंदू जमावाने ९५ मुस्लिमांचे बळी घेतले. मुळात हा आकडा ८४ होता, पण ७ वर्षांनंतरही हरवलेले लोक न सापडल्याने त्यांना मृत जाहीर करण्यात आले. त्यामुळे हा आकडा ८४ वरून ९५ वर गेला. या घटनेत हल्लेखोरांमध्ये चारा या आदिवासी जमातीचाही समावेश होता आणि पोलीस उपस्थिती अपुरी होती. खरे तर ‘इंडिया टुडे’च्या वृत्तांतानुसार तिथे पोलीस जवळजवळ नव्हतेच. एकूण अहमदाबादमध्ये ज्या अभूतपूर्व संख्येने जमाव रस्त्यावर उतरले, त्याच्यापुढे पोलीस खूपच अपुरे होते. २ वर्षांनंतर ‘द हिंदू’ने २० ऑगस्ट २००४ ला दिलेले वृत्त असे आहे – ‘‘अहमदाबाद, १९ ऑगस्ट : … श्री. मैसोरवाला (नरोडाचे माजी पोलीस निरीक्षक) यांनी नरोडा-पाटियातील भीषण हत्याकांडाला २ घटना जबाबदार असल्याचे सांगितले. एका घटनेत एका मशिदीच्या मागे रणजीत वंजारा या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसर्‍या घटनेत एका मुस्लिम ट्रक ड्रायव्हरने निष्काळजीपणे ट्रक चालवून एका हिंदूचा बळी घेतला आणि दोघांना जखमी केले. (कोलकात्याच्या ‘द टेलिग्राफ’ने २ मार्च २००२ ला हीच बातमी दिली.) या दोन घटनांसंबंधी पसरलेल्या अफवांमुळे जातीय तणावाच्या परिस्थितीत तेलच ओतले गेले. जवळच्या मशिदीवर आणि नंतर मुस्लिम वस्तीवर हिंदूंनी हल्ला चढविला. अपुरे पोलीसदल श्री मैसोरवाला यांच्या म्हणण्यानुसार नरोडा पोलीस ठाण्यात ८० पोलीस होते आणि ते परिस्थिती सामान्य असताना पुरेसे होते, पण २८ फेब्रुवारीला निर्माण झालेली परिस्थिती मात्र अभूतपूर्व होती आणि वेगाने हाताबाहेर जात होती. ‘मी जास्तीची पोलीस कुमक मागवली आणि राज्य राखीव दलाची २४ जवानांची तुकडी मदतीला पाठविण्यात आली. पण आक्रमण करून आलेला जमाव १७ हजारांपेक्षा जास्त असल्याने, ही कुमकही अपुरी पडली’, असे ते म्हणाले.” (संदर्भ : http://www.hindu.com/2004/08/20/stories/2004082012831200.htm) जमाव आणि पोलीस यांचे प्रमाण १७,०००:१०० असे असतानाही पोलिसांनी या नरोडा पाटिया प्रकरणात १००० पैकी ९०० मुस्लिमांना वाचवले. आपण पाहिले की सरकारने लवकरात लवकर लष्कर तैनात केले. त्यावेळी भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावामुळे जवळ-जवळ संपूर्ण लष्कर सीमेवर तैनात करण्यात आले होते, तरी देखील. पण अहमदाबादमध्ये लष्कर पोचल्यानंतरही धार्मिक तणाव कमी झाला नाही आणि हत्या चालूच राहिल्या. वास्तविक पाहता पहिल्या तीन दिवसातील दंगलींनंतर जेथे लष्कर तैनात होते, अशा भागातच, म्हणजे अहमदाबाद आणि बडोद्यात दंगली चालू राहिल्या. हत्या करण्याची (हिंदूंच्या?) मोकळीक दिल्याचा आरोप भाजपावर व गुजरात सरकारवर करणे, म्हणजे ‘त्यात लष्कराचा सहभाग होता’ असे म्हटल्यासारखे झाले. पण काही लोकांना हे समजून घेण्याची आणि मान्य करण्याची इच्छाच नाही. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने २८ एप्रिल २००२ ला दिलेल्या बातमीत असे म्हटले की ‘‘दंगलींसंबंधी अटक झालेल्यांमध्ये हिंदूंची संख्या ९९५४ आहे, तर मुस्लिमांची ४,०३५ आहे. पण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अटक झालेल्या हिंदूंची संख्या फार अधिक म्हणजे १७९४७ आहे, तर मुस्लिमांची ३,६१६ आहे.’’ हिंसाचार चिरडण्यासाठी: १. गुजरात सरकारने लवकरात लवकर लष्कराला केवळ पाचारणच केले नाही, तर २८ फेब्रुवारीच्या संध्याकाळीच हा निर्णय जाहीर केला. २. ऑक्टोबर २००५ पर्यंत २५,४८६ लोकांवर आरोप ठेवण्यात आले. त्यापैकी २५,२०४ लोकांना गुजरात पोलिसांनी अटक केली. [अधिकृत आकडे] ३. या २५ हजार अटक झालेल्यांपैकी १७ हजारांपेक्षा जास्त हिंदू होते. 53 ४. पोलिसांनी एकूण १०,५०० गोळीबाराच्या फैरी झाडल्या (नेमका आकडा १०,५५९). त्यापैकी ५,४५० फैरी पहिल्या ३ दिवसातल्या होत्या. दंगलीच्या एकूण ७४ दिवसांपैकी ७३ दिवस लष्कर तैनात होते. तरीही पोलिसांनी ही कारवाई केली. ५. पोलिसांनी अश्रुधुराची एकूण १५ हजार नळकांडी फोडली (नेमका आकडा १५,३६९). त्यापैकी ६,५०० पहिल्या तीन दिवसातली होती. ६. दंगलीच्या एकूण कालखंडात पोलीस गोळीबारात १९९ लोक मारले गेले. त्यापैकी १०१ पहिल्या आठवड्यातील होते. ७. पोलिसांनी २८ एप्रिल २००२ पर्यंत ३५,५५२ लोकांना अटक केली. त्यापैकी २७,९०१ हिंदू होते. त्यापैकी २० हजार लोकांना झालेली अटक प्रतिबंधात्मक होती. थोडक्यात सांगायचे तर असे स्पष्ट दिसते, की गुजरात सरकारने दंगलींची परिस्थिती अत्यंत परिणामकारकरित्या हाताळली. त्याचा आढावा – १. ‘इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘मिड-डे’ने २८ फेब्रुवारी २००२ ला दिलेल्या बातम्यांनुसार राज्य सरकारने अहमदाबादसह संवेदनशील शहरांमध्ये जलद कृती दल (RAF) तैनात केले आणि केंद्र सरकारने २७ फेब्रुवारीलाच केंद्रीय राखीव दल (CRPF) कोणत्याही दंगली सुरू होण्यापूर्वीच पाठवले होते. २. ‘द हिंदू’ने २८ फेब्रुवारी २००२ च्या बातमीत म्हटले आहे – ‘‘(२७ फेब्रुवरीला) गोधरामध्ये दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले असून २७ फेब्रुवारीलाच जलद कृती दलही तैनात करण्यात आले आहे.’’ अशीच बातमी टाइम्स ऑफ इंडिया, टेलिग्राफ, इंडियन एक्स्प्रेस, द ट्रिब्यूनसह अनेक वृत्तपत्रांनी दिली होती. ३. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने २८ फेब्रुवारी २००२च्या अंकात म्हटले होते की गोधरा जळीतकांडानंतर दंगली उसळण्याची भीती लक्षात घेऊन २७ फेब्रुवारीलाच संपूर्ण पोलीस दल, म्हणजे ७० हजार जवान, राज्यभर तैनात करण्यात आले. द टेलिग्राफ (UK) ने ही असेच वृत्त दिले. ४. गोधराहून अहमदाबादला परतल्यानंतर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार २७ फेब्रुवारीला संध्याकाळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ८२७ लोकांना अटक करण्यात आली. ५. ‘द हिंदू’ने १ मार्च २००२ ला दिलेल्या बातमीनुसार २८ फेब्रुवारीला संपूर्ण पोलीस दल, जलद कृती दल, केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात असूनही परिस्थिती हाताबाहेर गेली. ६. परिस्थिती हाताबाहेर गेली त्याचे मुख्य कारण प्रक्षुब्ध जमावांची अभूतपूर्व संख्या आणि त्या मानाने फारच अपुरे पोलीस, हे होते. तरीही पोलिसांनी आपले सर्वोत्तम प्रयत्न केले. दंगलीच्या पहिल्याच दिवशी, २८ फेब्रुवारीला, पोलिसांनी गोळीबाराच्या १ हजारांवर फैरी झाडल्या, त्यापैकी ६००+ अहमदाबादमध्ये झाडल्या. ७. ‘द हिंदू’ने १ मार्च २००२ च्या अंकात दिलेल्या बातमीत म्हटले की २८ फेब्रुवारीला संध्याकाळपर्यंत एकट्या अहमदाबादमध्ये पोलिसांच्या गोळीबारात १० लोक ठार झाले, असे समजते. ‘इंडिया टुडे’ साप्ताहिकाच्या १८ मार्च २००२ च्या अंकात दिलेल्या आकडेवारीनुसार एहसान जाफरींच्या घराबाहेर पोलीस गोळीबारात ५ लोक ठार झाले. दोघेजण नदियाड आणि गोधरा येथे मारले गेले. ८. ‘द हिंदू’च्या २८ फेब्रुवारी २००२ च्या अंकात दिलेल्या बातमीप्रमाणे गोधरामध्ये २७ फेब्रुवारीलाच संचारबंदी लागू करण्यात आली. ९. ‘द हिंदू’ने १ मार्च २००२ च्या अंकात दिलेल्या बातमीनुसार गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट, नदियाड, आणंद आणि कैरासह २६ शहरांत व नगरात अनिश्‍चित काळासाठीची संचारबंदी २८ फेब्रुवारीला लागू करण्यात आली. १०. ‘द हिंदू’ने १ मार्च २००२ ला दिलेल्या बातमीनुसार मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी २८ फेब्रुवारीलाच अहमदाबादमध्ये तातडीने (“frantically”) लष्कराला पाचारण केले. 57 सावरकर (१८८३-१९६६) यांनी ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात लिहिले आहे की इ.स. ७१२ ते १००१, या सुमारे ३०० वर्षांत वायव्य आणि पश्‍चिम सीमेवरील हिंदू राजांनी मुस्लिम आक्रमकांचा सातत्याने पराभव केला, गजनीचा महंमद इ.स.१००१ मध्ये आक्रमण करून आला तोपर्यंत. सावरकरांनी आपल्या ग्रंथात इ.स. ६३६ मध्ये ठाणे बंदरावर झालेल्या आक्रमणाचाही उल्लेख केला आहे. सांप्रदायिक दंगली भारताला नव्या नाहीत. इ.स १८८० पासून गेल्या सव्वाशे वर्षात देशात कुठे ना कुठे पुन्हा पुन्हा दंगली होतच होत्या. पण देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा गुजरात सांप्रदायिक तणावाच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील राज्य होते. गुजरात विश्‍व संवाद केंद्राने म्हटले: “अहमदाबाद शहराचा ५०० वर्षांचा इतिहास पाहिला, तर त्यातील ३४० वर्षे या शहरावर मुस्लिम आणि मोगलांचे राज्य होते. उरलेला काळ, मराठा आणि ब्रिटिशांचे राज्य होते. या ५०० वर्षांतील सांप्रदायिक दंगलींचाच विचार करायचा, तर काही मोठ्या घटना अशा- १) १७१४ : होळीच्या दंगली हरिराम नावाचा एक हिंदू आपल्या मित्रांसमवेत आपल्या घरात होळी खेळत असताना, त्याने उडविलेला गुलाल एका मुस्लिमाच्या अंगावर चुकुन पडला. याला काही मुस्लिमांनी विरोध केला. पाठोपाठ सुन्नी बोहरा मुल्ला अब्दुल अझीझ याच्या नेतृत्वाखाली जुम्मा मशिदीजवळ संतप्त जमाव एकत्र झाला. मुस्लिम राज्यकर्त्याचे अफगाण सैनिकही या जमावात सामील झालेत. या संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न एका काझीने केला, तेव्हा जमावाने या काझीचे घर जाळले वा नंतर हिंदू वस्तीतील दुकाने, घरेदारे लुटली आणि नंतर जाळली. एक हिंदू कपूरचंद भन्साळी याच्या जवळ असणार्‍या सशस्त्र सैनिकांमुळे या दंगली आटोक्यात आल्या. २) इ.स. १७१५ च्या दंगली मुस्लिम सैनिकांनी हिंदूंची दुकाने लुटल्याच्या कारणामुळे या दंगली सुरू झाल्यात. मुस्लिम शासकांचा प्रतिनिधी दाऊद खान याला हटविल्यानंतर या दंगली थांबल्यात. ३) इ.स. १७१६: ईदच्या दंगली सलग तिसर्‍या वर्षी इ.स. १७१६ मध्ये ईदच्या निमित्ताने दंगली उसळल्या. ईद साजरी करण्याच्या निमित्ताने बोहरा समाजाने गायी आणि म्हशी कत्तलीसाठी आणल्या होत्या. एक मुस्लिम हवालदाराला दया येऊन त्याने त्यापैकी एक गाय सोडून दिली. काही मुस्लिमांनी याबद्दल काझी खैरूल्ला खान याच्याकडे तक्रार केली. पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काझीने काही कारवाई केली नाही. त्यामुळे जमावाने हिंदू वस्त्यांवर हल्ला चढवला. हिंदूंची दुकाने, घरे यांची लुटालूट केली आणि नंतर त्यांना आगी लावल्या. हिंदू सरदार अजितसिंग याच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती पूर्वपदावर आली. ४) इ.स. १७५० : मंदिर पाडले ‘जवळच्या मंदिरातील घंटानादामुळे आमच्या नमाजात अडथळा येतो’ असे सांगून मुस्लिमांनी ही दंगल सुरू केली आणि नमाज पढून परतताना ते मंदिर उद्ध्वस्त केले. ५) सप्टेंबर १९२७ : अहमदाबाद दंगली मशिदीत सुरू असलेली मुस्लिम प्रार्थना आणि हिंदू मंदिरात त्याचवेळी सुरू सलेले भजन, हे या दंगलीचे कारण सांगितले जाते. ६) इ.स. १९४१ च्या दंगली १८ एप्रिल १९४१ला दंगली सुरू झाल्यात. दंगलींनंतर मुसलमान मुस्लिम लीगच्या कार्यक्रमांना लागू करु लागले. ७) इ.स. १९४६ : रथयात्रा दंगली १ जुलै १९४६ ला शहर कोटडा पोलीस ठाण्यावरून रथयात्रा जात होती. ही रथयात्रा पाहणारा एक मुस्लिम आणि हिंदू आखाड्याची एक व्यक्ती, यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यातून दंगल उसळली. दगडफेक, भोसकाभोसकी, जाळपोळ यांचे सत्र सुरू झाले. ते थांबविण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. स्थिती आटोक्यात आणायला अखेर संचारबंदी लागू झाली. ८) इ.स. १९५३ : अहमदाबाद दंगली 58 गणपती उत्सव आणि मोहर्रम या प्रसंगांच्या वेळी अहमदाबादमध्ये दंगली उसळल्या. ९) इ.स. १९६५ : शीख दंगली काही मुस्लिमांनी दोन शीख रिक्षा चालकांचा खून केल्यावरून या दंगली सुरू झाल्या. शीख समाजाने दोन्ही रिक्षा चालकांचे मृतदेह घेऊन मोठी अंत्ययात्रा काढली. पण दिल्ली दरवाजाजवळ स्थिती बिघडली व त्यातून मोठ्या दंगली सुरू झाल्यात. १०) इ.स. १९६९ : ऐतिहासिक दंगली १८ सप्टेंबर १९६९ ला उरुसाचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळच्या वेळी अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात पाळलेल्या गायी चरून परत मंदिरातील गोठ्यात जात होत्या. वर्षानुवर्षांचा हा नित्यक्रम होता. पण गायींच्या जाण्यामुळे उरुसात विघ्न आले, असे सांगून बाचाबाची सुरू झाली. त्यातून भोसकाभोसकी, हत्या यांची अहमदाबादच्या अनेक भागात साखळीच तयार झाली. कित्येक दिवस चाललेल्या या दंगलींत हजारो लोकांना प्राण गमवावे लागले. स्वतंत्र भारतातील या सर्वांत मोठ्या दंगली म्हणाव्या लागतील. इतर गाजलेल्या दंगलींमध्ये १९८५ ची राज्यभर पसरलेल्या दंगली, अहमदाबाद आणि गोधरामधील १९८० आणि १९८२ च्या दंगली, राज्यातील १९९०, १९९२ मधील दंगली यांचा समावेश आहे.” ‘हिमल’ साऊथ एशियन मासिकात मे २००२ मध्ये हेमंत बाबू यांचा एक लेख प्रकाशित झाला आहे. तो आपण पाहू (पुनः प्रकाशित केला www.countercurrents.org यांनी): ‘‘सामान्य स्थिती चे मूल्यमापन राज्यात हिंसक दंगलीच्या घटनांची अधिकृतपणे झालेल्या नोंदेची आकडेवारी यावरून करता येईल. १९६९ आणि १९८५ च्या दंगलींनंतर न्या. रेड्डी आयोग आणि न्या.व्ही.एस. दवे आयोग न्यायिक चौकशीसाठी नेमण्यात आले होते. या दोन्ही आयोगांनी गुजरातच्या जातीय दंगलीच्या इतिहासाची दखल घेतली आहे. न्या. दवे आयोगाने तर इ.स. १७१४ मधील होळीदरम्यान झालेल्या दंगलीचाही इतिहास लक्षात घेतला आहे. त्यावेळी अहमदाबाद शहर मोगलांच्या नियंत्रणाखाली होते. त्यानंतर १७१५, १७१६ आणि १७५० मध्ये दंगली झाल्या…पुढल्या शतकांमध्येही हिंदू मुस्लिम दंगली होतच राहिल्या आणि विसाव्या शतकाच्या मध्यानंतर त्यांना जोर आला. १९४१ मध्ये दंगली भडकल्या तेव्हा दोन अडीच महिने संचारबंदी लागू करावी लागली होती. १९६० ते १९६९ या वर्षांत २,९३८ जातीय संघर्षाच्या घटना घडल्याची नोंद न्या. रेड्डी आयोगाने केली आहे. म्हणजे या १० वर्षांत प्रत्येक चार दिवसात ३ दंगली झाल्या, अशी सरासरी आहे… या काळात झालेल्या दंगली राज्यातील विविध भागांत पसरल्या. त्यामध्ये वेरावळ, जुनागड, पाटण, गोधरा, पालनपूर, अंजार, दालखनिया, कोडिनार आणि दिसा या शहरांमध्येही दंगलींची मोठी झळ बसली. ही सर्व शहरे या २००२ च्या हिंसेतही प्रभावित आहेत. …१९६९ मधील दंगल मात्र वेगळी होती. ती पद्धतीशीरपणे पेटविण्यात आली दीर्घकाळ सुरू राहिली. हिंदू मुस्लिम दंगलींतील तोपर्यंतचा पॅटर्न इथे पूर्णपणे बदलला… …या दंगली सर्वच अर्थाने प्रचंड व अभूतपूर्व होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि प्रदीर्घ काळ कुठ्ल्याच दंगली झाल्या नव्हत्या…१९६९ च्या दंगलींनी मात्र सामाजिक तणावाला कधीही, कोणत्याही क्षणी पद्धतशीरपणे भडकविता येते, याचे उदाहरण घालून दिले. १९६९ दंगलींना राज्यात आणि देशभरातही भरपूर प्रसिद्धी मिळाली. गुजरातमध्येच नव्हे, तर इतरत्र कोठेही आपल्या इच्छेप्रमाणे हवा तेव्हा धार्मिक तणाव निर्माण करता येऊ शकतो, हे या दंगलींने दाखवून दिले… …१९८५ मधील दंगल १९ मार्चला सुरू झाली. नव्याने निवडून आलेल्या कॉंग्रेस सरकारने सत्ता स्वीकारताच दुसर्‍या दिवशी ही दंगल झाली आणि तिचे कारण दोन महिने आधी जाहीर केलल्या धोरणामध्ये होते. आधीच्या कॉंग्रेस सरकारने मागास जातींसाठी असलेल्या जागांच्या कोट्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय जानेवारीमध्ये जाहीर केला होता. त्यामुळे सरकारी नोकर्‍यात आणि सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मागास कोट्यात वाढ होणार होती. यामधून उद्भवलेल्या दंगली ६ महिने सुरू हात्या. सरकारला आपले धोरण मागे घ्यावे लागले, त्यानंतरही पुष्कळ काळ दंगली चालल्यात… या दंगलींमध्ये इतर घटकांबरोबरच गुंडांच्या टोळ्या, लुटारू आणि व्यावसायिक खुनी सहभागी झाले होते… अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद कारसेवकांनी उद्ध्वस्त केली, तेव्हा १९९२ मध्ये गुजरातमध्ये पुन्हा दंगली उसळल्या. सुरत शहरात तर सहा महिने सतत काही ना काही उपद्रव चालूच होता. १९९३ मध्ये मुंबईतील बॉंबस्फोटानंतर पुन्हा दंगली उसळल्या. हे बॉंबस्फोट दाऊद इब्राहिमने घडवून आणल्याचा आरोप आहे. कदाचित या उसळलेल्या दंगली हिंदूंमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी होत्या, जे ऐक्य होणे बाहेरुन शक्य वाटत नव्हते…१९९५ मध्ये गुजरातमध्ये भाजपा सत्तेवर आल्यानंतर पुढे सतत ३ वर्षे राज्य दंगलींपासून मुक्त होते…’’ हा लेख भाजपाविरोधी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लेखकाने लिहिला आहे आणि ज्या वेबसाइटने तो पुन्हा प्रसारित केला, ती वेबसाइट संपूर्ण इंटरनेटवरील सर्वाधिक भाजपाविरोधी असलेल्यांपैकी समजली 59 जाते. संघ परिवारावर हल्ला चढविण्याच्या हेतूनचे लिहिलेल्या या लेखात काही महत्त्वाच्या गोष्टी मात्र स्पष्टपणे समोर आल्या. त्यापैकी एक म्हणजे गुजरातमधील हिंसाचाराचा रक्तरंजित इतिहास. गोधरा शहरात १९२७-२८ पासून होत असलेल्या दंगलीचा इतिहास आपण पाहिला आहे. विश्व संवाद केंद्राने १९६९, १९८५ आणि २००२ च्या दंगलींचे विश्‍लेषण करणारा एक अहवाल तयार केला आहे. २००२ च्या दंगलींमध्ये ३ मार्च २००२ पर्यंतच्या घडलेल्या घटनांचे वर्णन आहे. तो अहवाल पुढे देत आहे- “१९६९, १९८५ आणि २००२ च्या सांप्रदायिक दंगलींत सरकारच्या भूमिकेचा तुलनात्मक अभ्यास सांप्रदायिक तणाव ही गोष्ट गुजरात राज्यासाठी नवीन नाही. सध्याच्या ‘गोधरा’ नंतर उद्भवलेल्या दंगलींआधी १९६९ आणि १९८५ मध्ये मोठ्या सांप्रदायिक दंगली झाल्या होत्या. या दोन्ही दंगलींची कारणे शोधण्यासाठी आणि प्रशासनाने बजावलेल्या भूमिकेचा तपास करण्यासाठी सरकारने दोन वेगवेगळे न्यायालयीन आयोग नेमले होते… १८ सप्टेंबर १९६९ ला अहमदाबादमध्ये मोठी दंगल सुरू झाली आणि नंतर ती राज्यातील इतर जिल्ह्यांतही पसरली…या दंगलींबाबतची चौकशी न्या. जगमोहन रेड्डी यांच्या आयोगाने केली. १९६९ नंतर मोठी चळवळ आणि दंगली उसळल्या, त्या १९८५ मध्ये. मुळात आरक्षणाविरोधी आंदोलन फेब्रुवारी १९८५ मध्ये सुरू झाले आणि त्याला सांप्रदायिक दंगलींचे स्वरूप येऊन जुलै १९८५ पर्यंत त्या चालू राहिल्या. या दंगलींची चौकशी न्या. दवे आयोगाने केली. या आधीच्या दोन्ही दंगलींत आणि आताच्या (२००२ च्या) दंगलींत सरकारची भूमिका काय होती, याबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत, ते असे- १९६९ मधील दंगल १८ सप्टेंबरला दुपारी ३.४५ वाजता सुरू झाली. २१ सप्टेंबर १९६९ ला दुपारी ४.३० वाजता लष्कराला (केवळ ३ पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात) तैनात करण्यात आले, तर संपूर्ण शहरात लष्कराला २२ सप्टेंबरला संध्याकाळी ६ वाजता तैनात करण्यात आले. १९८५ मध्ये १५ एप्रिलला दंगल सुरू झाली आणि लष्कराला १६ एप्रिलला पाचारण करण्यात आले. त्यापूर्वीच १७७ लोक मृत्यूमुखी पडले होते. त्याच्या तुलनेत आताच्या (गोधरा) घटनेत २८ फेब्रुवारीलाच लष्कराला पाचारण करण्यात आले. यावेळी संपूर्ण लष्कर सीमेवर तैनात असतानाही ते अहमदाबादमध्ये तातडीने पोचले, हे लक्षात घेतले पाहिजे. १९६९ व १९८५ मध्ये पूर्ण लष्कर सीमेवर नव्हते. लष्कर सीमेवर असल्याने अल्पावधीत गुजरातमध्ये पोचणे अवघड होते. पण गुजरातमधील दंगलींची सद्य:स्थिती मुख्यमंत्र्यांनी (नरेंद्र मोदी) पंतप्रधानांच्या (अटलबिहारी वाजपेयी) आणि संरक्षण मंत्र्यांच्या (जॉर्ज फर्नांडिस) कानावर घातली आणि तातडीने लष्कर पाठविण्याची मागणी केली. केंद्र सरकारनेही वेगाने निर्णय घेऊन त्याच रात्री (२८ फेब्रुवारीच्या) लष्कराला विमानाने अहमदाबादला पोचविले. लष्करी कारवाईला आवश्यक असणार्‍या तांत्रिक बाबी म्हणजे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट नेमणे, लष्करासाठी वाहने देणे, इत्यादी गोष्टी रात्रीच (२८ फेब्रुवारीच्या) पूर्ण झाल्यामुळे लष्कर सकाळीच तैनात होऊ शकले. १९६९ मध्ये घटना १८ सप्टेंबरला घडली. पण पाचव्या सहाव्या दिवसापर्यंत दंगली नियंत्रणात आल्या नव्हत्या. सहाव्या दिवसानंतरही हिंसाचाराच्या घटना घडतच होत्या. १९८५ मध्ये दंगली फेब्रुुवारी ते जुलै अशा ५-६ महिने चालू होत्या. याउलट २००२ च्या प्रकरणात परिस्थिती तिसर्‍या-चौथ्या दिवशीच नियंत्रणात आली. सध्याच्या प्रकरणात गोधरातील हत्याकांड घडल्यापासून केवळ ४ तासात त्याच दिवशी संचारबंदी लागू झाली. (खरे तर दोनच तासात, सकाळी ९:४५ ला!) या पार्श्‍वभूमीवर पूर्वीच्या २ दंगलींकडे पाहिले, तर संचारबंदी लागू करण्यास खूप उशीर झाला. हा उशीर का झाला, याची तक्रारही चौकशी समितीसमोर करण्यात आली. पोलीस आणि स्थानिक प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय राहिल्याच्या तक्रारी चौकशी आयोगासमोर करण्यात आल्या. सध्याच्या प्रकरणात मात्र गुजरातमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने प्रो-ऍक्टीव्ह भूमिका बजावली. ३ मार्च २००२ पर्यंत पोलिसांनी गोळीबाराच्या ३९०० फैरी झाडल्या (वास्तवात ५४५०‌), अश्रुधुराची ६५०० नळकांडी फोडली आणि २८०० पेक्षा जास्त लोकांना अटक केली. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पोलीस गोळीबारात ९० लोक ठार झाले. (खरा आकडा ९८) याचा अर्थ पोलिसांनी दंगलखोरांबद्दल कोणतीही नरमाईची भूमिका घेतली नव्हती… या सर्व मुद्द्यांचा स्पष्ट अर्थ असा, की या वेळच्या दंगलीत हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी सरकार त्वरेने आणि परिणामकारकपणे हलले आणि त्यासाठी उच्च दर्जाची इच्छाशक्ती सरकारने दाखवली.’’ (संदर्भ: VSK, Gujarat www.vskgujarat.com) गुजरात विधानसभेची निवडणूक १२ डिसेंबरला होणार होती. त्याच्या एक आठवडा आधी एनडीटीव्ही- स्टार न्यूज वाहिनीने ‘द बिग फाइट’ नावाचा कार्यक्रम अहमदाबादमधून लाईव्ह प्रसारित केला. या कार्यक्रमात भाजपाच्या वतीने हरीन पाठक (अहमदाबादचे खासदार) कॉंग्रेसचे शंकरसिंह वाघेला आणि एक दंगलग्रस्त प्रा. बंदूकवाला हे सहभागी झाले होते. या चर्चेत बोलताना हरीन पाठक यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ मध्ये १९६९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखाचा दाखला दिला. या लेखानुसार १९६९ मधील दंगलीत 60 ठार झालेल्यांचा अधिकृत आकडा ५ हजार होता, तर वास्तवात तो यापेक्षा ३ ते ५ पट होता. त्यावेळी गुजरातमध्ये कॉंग्रेस पक्ष सत्तेवर होता आणि मुख्यमंत्री म्हणून नामवंत गांधीवादी हितेंद्र देसाई काम करीत होते. पाठक यांनी दिलेल्या लेखाचा हवाला पाहता, १९६९ मधील दंगलीतील मृतांचा आकडा १५ ते २५ हजारांवर जाऊन पोचतो. २००२ च्या दंगलीत, कॉंग्रेसच्या केंद्रीय मंत्र्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, ७९० मुस्लिम आणिा २५४ हिंदू मारले गेले, तर एकूण २२३ लोक बेपत्ता होते,ज्यातील अनेक नंतर जीवंत सापडले, व शेवटी १२७ लोक बेपत्ता होते. देवेंद्र स्वरूप यांनी ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकाच्या १६ ते २००४ च्या अंकात लिहिले- ‘‘महात्मा गांधींचे नाव आणि विचार आपल्याला भावूक बनवीत असले, तरी ते इतिहासाशी मेळ खात नाहीत. गुजरातच्या सांप्रदायिक दंगलीच्या इतिहासापुढे सन्माननीय न्यायमूर्तींनी दुर्लक्ष केले आहे. गांधी हयात असतानाच गुजरातने भयंकर सांप्रदायिक दंगली अनुभवल्या आहेत. १९२४ मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या दंगलींमुळे त्यांना किती वेदना झाल्या होत्या, याचे दर्शन त्यांच्या संपूर्ण लेखनात (Complete Works) होते. स्वातंत्र्यानंतर गोधरा आणि अहमदाबादच्या मुस्लिमबहुल भागात दंगली पसरल्याचे पाहण्यास मिळाले. सोमनाथ मंदिराचे पुनरुज्जीवन थांबविण्यासाठी गझनीच्या महंमदाला पाठविलेल्या निमंत्रणामुळे गांधीजी अत्यंत घायाळ झाल्याचे दिसते. गांधीजी हयात असताना आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा वारसा सांगणार्‍या कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीतच गुजरातमध्ये सर्वाधिक सांप्रदायिक दंगली झाल्या. १९६९ मध्ये गांधीवादी नेते हितेंद्र देसाई मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर असतानाच सांप्रदायिक दंगलीत ३ हजारांहून अधिक लोक मारले गेले. २००२ च्या दंगलीतील मृतांपेक्षा कितीतरी अधिक. म्हणूनच विचारधारांच्या वादात अडकून न बसता, गुजरातमध्ये सांप्रदायिक दंगलींची न थांबणारी साखळी का सुरू आहे, याचा शोध घ्यायला हवा…’’ (संदर्भ:http://organiser.org/archives/historic/dynamic/modules9c44.html?name=Content&p a=showpage&pid=23&page=6) देवेंद्र स्वरूप यांनी आपल्या लेखात १९६९ च्या दंगलीत अहमदाबादमध्ये केवळ ३ हजार लोक मृत्युमुखी पडले, असे म्हटले आहे. त्यांनी दिलेला आकडा फक्त अहमदाबादचा आहे आणि सावधपणे दिला आहे. जर १९६९ च्या ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या बातमीत दिलेला आकडा खरा असेल, तर प्रत्यक्षात अधिकृत सरकारी आकडा ५ हजार, व वास्तवात १५ ते २५ हजार आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिन पाठक यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या या लेखाचा संदर्भ दिला होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने १२ एप्रिल २००२ ला आपल्या ऑनलाइन आवृत्तीत दिलेल्या बातमीत म्हटले- “क्षुल्लक कारणानेच पेटल्या आधीच्या दंगली अहमदाबाद: एकविसाव्या शतकात व्यापक सांप्रदायिक दंगली गुजरातमध्ये होण्यासाठी गोधरासारखे धक्कादायक हत्याकांड कारण लागले असले, तर इतिहास असे सांगतो की विसाव्या शतकातील बहुतेक दंगली क्षुल्लक कारणांनीच झाल्यात. १९८५ मधील आरक्षणविरोधी आंदोलन आणि नंतरच्या जातीय दंगली, यांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. दवे आयोगाने आपल्या अहवालातील एक संपूर्ण प्रकरणच ‘गुजरातमधील आंदोलने आणि दंगलींचा इतिहास’ यासाठी खर्ची घातले आहे. १७१४ पासूनच्या दंगलींचा शोध घेताना त्यांची कारणे, सण, धार्मिक उत्सव, आक्रमण आणि वस्त्यांचे बदलते हिंदू-मुस्लिम प्रमाण (अधिक सुरक्षेच्या ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे)…१८ एप्रिल १९४१ ला अहमदाबादमध्ये सांप्रदायिक दंगली भडकल्या, तेव्हा बहुसंख्य भागात संचारबंदी लागू करण्यात आली आणि ती अडीच महिने कायम होती. या दंगलींमुळे कॉंग्रेसने सुरू केलेली असहकाराची चळवळ अहमदाबादमध्ये ऑक्टोबर १९४१ पर्यंत विलंबित ठेवावी लागली. या दंगलींमुळे अहमदाबादमध्ये आणि राज्यातील इतर भागातही दोन्ही समाजांना मोठे नुकसान सोसावे लागले. या दंगलींचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम झाल्याचे आयोगाने नोंदवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘‘या घटनांनंतर, १९४१ च्या दंगलीनंतर, अहमदाबादमधील मुस्लिामांनी आपला मोर्चा मुस्लिम लीगकडे वळविला.’’ यानंतर पाठोपाठ १ जुलै १९४६ ला रथयात्रेच्या दरम्यान झालेल्या पोलीस गोळीबारानंतर दंगली उसळल्या आणि सचारबंदी लागू करण्यात आली. अधिकृत माहितीनुसार शेर कोटडा पोलीस ठाण्याजवळ दुपारी १२.३० वाजता दंगल सुरू झाली. रथयात्रेनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत हिंदू आखाड्यातील पहिलवान विविध कसरती करून दाखवत होते. एका मुस्लिम आखाड्यातील नामवंत कसरतपटू सिकंदर आणि त्याचे आखाड्यातील तीन- चार सहकारी मिरवणुकीतील कसरती पाहत होते. त्या कसरतींदरम्यान चित्तरंजन चिंतामणी ज्या पद्धतीने वजन उचलत होता, त्यावर सिकंदरने टीका केली. त्या दोघांच्यात झालेाल्या बाचाबाचीत सिकंदर आणि चिंतामणी हे दोघेही जखमी झाले. या प्रकरणी सिकंदर आणि काही साधूंना अटक करून पोलीस लॉक अपमध्ये ठेवण्यात आले. यामुळे दंगली सुरू झाल्या. त्यानंतर १९५८ मध्ये (अहमदाबादमधील) खाडिया मध्ये दंगल झाली आणि पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यावेळच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने १२ ऑगस्टला झालेल्या या गोळीबाराबद्दल बोलताना सांगितले की, ‘‘खाडिया हा अहमदाबादमधील वॉर्ड दंगलींमध्ये सर्वाधिक प्रभावीत झाला आहे. यापूवीच्या प्रत्येक दंगलीत हाच सर्वाधिक प्रभावीत होता.’’ 62 संपादकीय पानांवर संपादक आणि मुक्त पत्रकारांनी जे धादांत खोटे आरोप केले, ते घृणास्पद आहेत. ‘‘स्वतंत्र भारतातील सर्वात मोठ्या मुस्लिम हत्याकांडाला नरेंद्र मोदीच जबाबदार’’ किंवा “गुजरातमध्ये मोंदीनी २००० मुस्लिमांना ठार मारले,’’ अशा शीर्षकांतून धादांत असत्य सांगितले गेले. या लेखकांना गुजरातमधील दंगलींचा इतिहास माहीत होता. या पुस्तकात आतापर्यंत दिलेले सर्व संदर्भ याच लोकांच्या लेखनातील आहेत आणि तरीही हे लोक आता धादांत असत्य लिहितात. काही वृत्तपत्रांचे संपादक ऐतिहासिक सत्याकडे डोळेझाक करतात. मध्ययुगीन काळात परकीय मुस्लिम राज्यकर्त्यांकडून हिंदूंवर झालेल्या अत्याचारांकडे विशेषत: इ.स. १२९८ पासून गुजरातमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारांकडे ते डोळेझाक करीत आहेत. एवढेच नव्हे, तर १९४० च्या दशकातील गुजरातच्या सांप्रदायिक हिंसाचाराकडे व त्यातील हिंदूंच्या यातनांकडे ते लक्ष देण्यास तयार नाहीत. तिमूर या मुस्लिम आक्रमकाने १३९९ मध्ये एका दिवसात १ लाख हिंदूंची हत्या केली. प्रा. के. एस. लाल यांचे मत की इ.स. १००० ते १५२५ या काळात हिंदूंची लोकसंख्या ८ कोटींनी कमी झाली आपण पहिल्या प्रकरणात पाहिले. सर्वाधिक धर्मांध असलेला मोगल सम्राट औरंगजेब (१६१७-१७०७, १६५८ ते १७०७ या काळात सत्तेवर होता) याचे जन्मस्थान म्हणून गोधरा आणि त्याचे जुळे शहर दाहोड ओळखले जाते. त्याबरोबरच हे शहर नेहमी हिंसाचारासाठी ओळखले जाते. गोधरातील खूप लोकांचा संपर्क पाकिस्तानमधील हिंसाचारग्रस्त कराची या शहराशी असल्याचे Rediff.com ने २ मार्च २००५ च्या लेखात म्हटले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नेही हेच ३० मे २००२ ला म्हटले. ‘फ्रंटलाइन’ सारख्या कट्टर भाजपाविरोधी पाक्षिकानेही म्हटले आहे – ‘‘अहमदाबादमधील रथयात्रा नेहमीच सांप्रदायिक हिंसाचाराचे निमित्त ठरली आहे. १९६९ मधील सर्वात भयंकर हत्याकांडही त्यातूनच सुरू झाले.’’ (फ्रंटलाइन १३ ते २६ मार्च २००४) याच पाक्षिकाने ‘द हिंदुत्व एक्स्पेरिमेंट’ (लेखिका- डोनी बुन्शा) या लेखात म्हटले आहे- ‘‘सर्वांत पहिली दंगल १७१४ मध्ये मोगल सत्तेत असताना अहमदाबादमध्ये झाली. एका क्षुल्लक घटनेतून ती सुरू झाली. घटना होती चुकुन गुलाल उडविण्याची. १९८५ च्या दंगलीची चौकशी करणार्‍या व्ही.एस.दवे आयोगाने या घटनेचा उल्लेख केला आहे. त्यानंतरच्या मराठा सत्ताकाळातही अनेक दंगली झाल्यात. मराठा सत्ता १८१७ पर्यंत चालू राहिली. ब्रिटिश कालखंडात १९४१ मध्ये झालेल्या दंगलींमुळे असहकाराची चळवळ स्थगित करावी लागली. त्याचा परिणाम म्हणून अहमदाबदामधील मुस्लिम ‘मुस्लिम लीग’कडे वळण्यास सुरुवात झाली. १९४६ मध्ये शहरात पुन्हा दंगल झाली. स्वातंत्र्यानंतर अहमदाबादमध्ये १९५८, १९६५, १९६९ मध्ये दंगली झाल्या. १९६९ मधील दंगलीही क्षुल्लक कारणावरून सुरू झाल्या. पण त्या गुजरातमधील सर्वाधिक रक्तरंजित दंगलींपैकी ठरल्या.’’ (फ्रंटलाइन ११-२४ मे २००२) कट्टर भाजपाविरोधी, कम्युनिस्ट असलेल्या ‘फ्रंटलाइन’ पाक्षिकानेही हे मान्य केले की, कॉंग्रेसच्या सत्ताकाळातील १९६९ च्या दंगली सर्वांत भयानक होत्या, आणि तेवढ्या नरेंद्र मोदी काळातील २००२ च्या दंगली नव्हत्या. ‘द पायोनियर’ या दैनिकात २० एप्रिल २००२ ला प्रसिद्ध झालेला राकेश सिन्हा यांचा लेख असा होता- ‘‘श्‍वानाला दोषी ठरवा आणि फाशी द्या ‘‘गुजरात पहिल्यांदाच धार्मिक दंगलींना सामोरा जात आहे असे नाही. गुजरातचा संपूर्ण इतिहासच धार्मिक तणाव आणि संघर्षाने भरलेला आहे. स्वातंत्र्यानंतर गुजरातमध्ये सप्टेंबर १९६९ मध्ये सर्वांत भयंकर दंगल झाली. दंगलीचे कारण, जगन्नाथ मंदिराच्या दोन साधूंवर १००० मुस्लिमांच्या जमावाने केलेला हल्ला, हे होते. १८ सप्टेंबर १९६९ ला उरुस साजरा करण्यासाठी हे मुस्लिम जमले होते. यातून अहमदाबादमध्ये आणि बडोद्यासह इतर भागात संघटित हिंसाचार सुरू झाला. या दंगलीत ६००० कुटुंबे बेघर झाली व आपली घरे,संपत्ती व सामान गमावून बसली. यावरून ही दंगल किती मोठी असेल याचा अंदाज येऊ शकतो. सांप्रदायिकताविरोधी समितीने या दंगलीबाबत दिलेल्या ‘गुजरातस रॉयट एक्सरेड’ या अहवालात मृतांची संख्या ३ हजार दिली. 63 दंगलकाळात ‘धार्मिक भूकंप’ पाहण्यास मिळाला…१९६९ मध्ये संपूर्ण दंगल काळात (१ महिना) माध्यमांनी संयम दाखविला. त्यामुळे त्या दंगलींचे रूपांतर राजकीय लढाईत किंवा सत्ताधारी कॉंेग्रेस विरोधात किंवा मुख्यमंत्री हितेंद्र देसाई यांच्या विरोधात झाले नाही. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ सप्टेंबरला अल्पकालीन भेट दिली. त्याच्या आधी आणि नंतरही हिंसाचार सुरूच राहिला. त्याच दिवशी अहमदाबादजवळ जनता एक्स्प्रेसमध्ये १७ प्रवाशांची हत्या करण्यात आली. पण या भयानक घटनेनंतर पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेला किंवा उंचीला कोणीही आव्हान दिले नाही. १९६९ च्या दंगलीत ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या बातमीत म्हटले आहे, ‘‘दंगेखोरांनी साबरमती हरिजन आश्रमालाही सोडले नाही.” त्यांनी आश्रमवासियांवर हल्ला केला आणि आश्रमाची नासधूस केली.” (संदर्भ: www.hindunet.org/hvk/articles/0402/171.htm) ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेली मुलाखत ३० मार्च २००२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. ती अशी- “प्रश्‍न – गोधरामध्ये साबरमती एक्स्प्रेसमधील ५८ कारसेवकांना जाळण्याची घटना आपल्या दृष्टीने पूर्वनियोजित होती का उत्स्फूर्त होती? या हल्ल्याला प्रवृत्त करणारी एखादी अनुचित घटना प्लॅटफॉर्मवर घडली होती का? उत्तर – साबरमती एक्स्प्रेसमधील ५८ निष्पाप कारसेवकांना कंपार्टमेंटमध्ये ज्या पद्धतीने जिवंत जाळून मारण्यात आले, ते पाहता हे मोठे कारस्थान होते. पूर्वनियोजित आणि निर्घृण (cold blooded) केलेला हा हल्ला होता. रेल्वे गोध्र्याला ७ वाजून ४३ मिनिटांनी आली आणि ५ मिनिटात म्हणजे ७ वाजून ४८ मिनिटांनी तिने गोधरा सोडले. अवघ्या ५०० मीटरवर सिग्नल फालिया येथे गाडी थांबविण्यात आली आणि जमावाने एकत्रितपणे हल्ला चढवला. असा हल्ला उत्स्फूर्त कसा असू शकतो? ही गाडी फैजाबादहून निघून ३६ तासांनी गोधराला पोचली. त्या संपूर्ण प्रवासात कारसेवकांनी काही वेडेवाकडे वर्तन केल्याची तक्रार नाही. पण गुजरात कॉंग्रेेसचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह चौधरी यांनी टीव्हीवरील आपल्या मुलाखतीत आरोप केला की कारसेवकांनी चहाचे पैसे दिले नाहीत, म्हणून ही घटना घडली. एवढी भीषण घटना योग्य ठरविणे अत्यंत हास्यास्पद (ridiculous) नाही का? प्रश्‍न – देवबंदच्या इस्लामी प्रणालीला मानणार्‍या तबलीगी जमीयत संघटनेकडून गोधरामध्ये धर्मांधता पसरविला जात असल्याच्या बातम्या येत आहेत आणि बहुसंख्य समाजातील काही व्यक्तींना, गेल्या काही वर्षात जिवंत जाळल्या गेल्याचे म्हटले जाते. या बातम्या खर्‍या आहेत का? या खर्‍या असतील, तर त्या कोणत्या तारखेला घडल्या, त्यात कोणाला जाळले गेले आणि संबंधित व्यक्तींवर कोणती कारवाई झाली? उत्तर – गोध्र्यातील रक्तरंजित जातीय इतिहास, ही गोष्ट लपून राहिलेली नाही. पण गेल्या २५-३० वर्षांत घटनांनी गंभीर आणि विकृत रूप घेतले आहे. याच भागात एका भयंकर प्रसंगात दोन कुटुंबाना जिवंत जाळण्यात आले होते. आणि १० वर्षांपूर्वी २ महिला शिक्षिकांसह, ४ शिक्षकांना शाळेत विद्यार्थ्यांसमोर तुकडे-तुकडे करून अत्यंत क्रूरपणे मारण्यात आले. त्या वेळच्या कॉंग्रेेस सरकारने नेहमीच्या पद्धतीने न्यायालयात खटले दाखल केले, पण खर्‍या गुन्हेगारांना शिक्षा करण्यात ते फार अपयशी ठरले. एवढंच नाही, या प्रकरणातला मुख्य दोषी अश्रफ याला त्याच्याच सहआरोपींनी तुरुंगात ठार मारले. आणि हे सर्व प्रकरण नेहमीसाठी बाजूला पाडले. प्रश्‍न – अहमदाबादमधील हिंसाचाराच्या ज्या बातम्या येत आहेत, त्यावरून तो संघटित असल्याचे दिसते. सशस्त्र जमाव हातात मतदारयाद्या घेऊन मुस्लिमांवर हल्ला चढवत होते अशा बातम्या आहेत. हर्ष मंदर या आय ए एस अधिकार्‍याने अहमदाबादमधील हिंसाचाराची गोठवून टाकणारी माहिती दिली आहे. प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण का ठेवू शकले नाही? पोलीसही निष्पक्ष नव्हते असा आरोप आहे. यावर आपले म्हणणे काय आहे? उत्तर- गुजरातसंबंधी ज्यांना माहिती आहे, त्यांना हे माहीत आहे की राज्य सांप्रदायिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. इथे पतंग उडविणे किंवा क्रिकेट सामने यासारख्या क्षुल्लक कारणांवरूनही भयंकर स्वरूपाच्या दंगली झाल्या आहेत. पूर्वीच्या प्रसंगांत एकाच वेळी २०० ठिकाणी हिंसाचार उसळला होता आणि ३०० पेक्षा जास्त गावांत, शहरांत अनेक महिने संचारबंदी लागू होती. याच्याशी तुलना करता, गोधरा हत्याकांडासारखी घटना इतिहासात कधीच घडली नव्हती. पण तरीही आम्ही तातडीने हालचाली केल्यामुळे हिंसाचार फक्त ७२ तासात आटोक्यात आणू शकलो. पोलिसांनी सुरुवातीलाच (पहिल्या ३ दिवसात) गोळीबाराच्या ३९०० फैरी झाडल्या. सीमावर्ती भागातून लष्कराला हलवून विमानाने अहमदाबादला आणले गेले आणि अवघ्या १६ तासात ते दंगलग्रस्त भागात तैनात झाले. सरकार किंवा पोलिसांकडून कोणतीही दिरंगाई झाली नाही…” 64 विचार करा, एक राज्य ज्यात एकाच वेळी २०० ठिकाणी दंगली होतात आणि ३०० शहरे आणि गावांमध्ये अनेक महिने लागोपाठ संचारबंदी चालू राहते! १९८० मध्ये तर गोधरा शहरातील संचारबंदी सलग वर्षभर लागू होती. त्या तुलनेत २००२ चा हिंसाचार फार कमी होता. पण हे सर्व माहीत असूनही माध्यमांतील काही लोकांना ते माहीत असल्याचे दाखवायची इच्छा नाही. एक माणूस- नरेंद्र मोदी, आणि एक पक्ष- भाजपा यांना लक्ष्य करण्यातच त्यांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. गुजरात सरकारने हिंसाचार थांबविण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक करण्याऐवजी माध्यमांतील या लोकांनी अत्यंत बेजाबबदारपणे दंगलींकडे डोळेझाक केल्याचा आरोप भाजपा सरकारवर केला आहे. ज्याला सत्य बघायचेच नाही, त्याला ते दिसत नाही. या शहामृगी भूमिकेमागची कारणे काय आहेत ती आपण पुढील एका प्रकरणांत पाहू.

One Response

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *