chapter-1

प्रकरण २ रे गोधरा हत्याकांड

“गोधरा”. हे केवळ पश्चिम भारताच्या गुजरात राज्याच्या पंचमहल जिल्ह्यातील एका शहराचे नाव नाही. त्यापलीकडे खूप काही या शब्दातून ध्वनित होते. हे नाव एक घटनाही सुचविते. मन बधिर करणारी, भेदरवून टाकणारी, कल्पनाही न करता येणारी आणि रानटी अशी घटना. ‘गोधरा’ हे नाव नोंदविते ५९ व्यक्ती, ज्यात २५ महिला आणि १५ मुले होती, यांची भीषण हत्या, व जखमी झालेले आणखी ४० लोक. स्वतंत्र भारताने अनेक हादरवून टाकणार्‍या घटना पाहिल्या आहेत. त्यातील ही सर्वात भयानक घटनांपैकी एक होती. मन बधिर करणार्‍या या भयानक घटनेमुळे झाल्या अशाच आणखीन भयानक गोष्टी, आणखीन अनेक घटना, आणखीन अनेक दंगली आणि आणखीन अनेक राजकीय बदल. गोधरा घटना ही दंगलींचे तात्काळ कारणही होती, ज्यात एकूण ११६९ लोक ठार झाले (यात पोलिस गोळीबारातील मृतांचाही समावेश आहे). पण धार्मिक संघर्षातून नासधूस होण्याची ही गोधराची पहिली वेळ नव्हती व अखेरचीही नव्हती. या शहराला सांप्रदायिक (धार्मिक) हिंसाचाराचा रक्तरंजित इतिहास होता. त्यासाठी ते ओळखले जात होते. गोधराच्या या सांप्रदायिक दंगलींच्या लांब इतिहासावर थोडक्यात एक नजर टाकूया. पंचमहल जिल्ह्याचे मुख्य केंद्र गोधरा आहे- जे सांप्रदायिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील समजले जाते. गुजरातच्या विश्व संवाद केंद्राने, गोधरातील सांप्रदायिक दंगली/अत्याचारांचा घटनाक्रम दिला. तो पुढे देत आहे – गोधरातील सांप्रदायिक दंगलींचा इतिहास १९२८: हिंदूंचे स्थानिक प्रमुख प्रतिनिधी पुरुषोत्तम एम. शाह यांची हत्या. १९४६: या वर्षी झालेल्या सांप्रदायिक दंगलीत पारशी, सोलापुरी फौजदारावर सदवा हाजी आणि चूडीघर या पाकिस्तानवादी मुस्लिम नेत्यांमुळे हल्ला. फाळणीनंतर चूडीघर पाकिस्तानात गेले. १९४८: तत्कालीन जिल्हाधिकारी पिंपुटकर यांच्यावर हल्ल्याचे कारस्थान सद्वा हाजी यांनी रचले, पण पिंपुटकर यांच्या अंगरक्षकाने स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन त्यांना वाचविले. यानंतर सद्वा हाजीही पाकिस्तानात गेलेत. जहूरपूर एका भागातील मशिदीजवळ २४ मार्चला एका हिदूची भोसकून हत्या (Stabbed to death). त्यानंतर उसळलेल्या दंगलीत हिंदूंची २००० घरे आणि मंदिरे जळाली. जिल्हाधिकारी (कलेक्टर) पिंपुटकर यांनी तातडीने संचारबंदी लागू करून हिंदूंची अन्य घरे वाचवली. ही संचारबंदी ६ महिने चालली. १९६५: ७ क्रमाकांच्या पोलिस चौकीजवळ असणारी हिंदूंची दुकाने जवळच्याच मुस्लिम घरातून (बिदानी व भोपा) आग लावणारया वस्तू फेकल्यामुळे जळाली. या भागातील अल्पसंख्यक समाजाच्या कॉंग्रेस आमदारामुळे हे घडू शकले, असा आरोप. रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पोलिस चौकीतील पोलिस उपमहानिरीक्षकावर हल्ला. 2 १९८०: २९ ऑक्टोबरला हिंदूंवर अशाच प्रकारचा हल्ला झाला, ज्याची सुरुवात गोधरा बसस्थानकाहून झाली. गोधरा स्टेशन रोड भागात गुंडगिरी व समाजविरोधी कृत्य करणार्‍या मुस्लिमांनी हा हल्ला योजिला. या हल्ल्यात ५ व ७ वर्षांच्या मुलांसह ५ हिंदूंना जिवंत जाळण्यात आले. या ठिकाणच्या शिकारी चाळीतील गुरुद्वाराही पेटविण्यात आला. स्टेशन भागातील हिंदूंची ४० दुकानांनाही आग लावण्यात आली. या दंगलींमुळे गोधरामध्ये लावलेली संचारबंदी १ वर्षभर सुरू होती. त्यामुळे शहरातील उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसला. १९९०: २० नोव्हेंबरला व्होरवाडा भागातील सैफीया मदरशात गुंडांनी ४ हिंदू शिक्षकांची (ज्यात दोन महिला शिक्षिकाही होत्या) त्यांच्या मुलांसमोर भीषण हत्या केली (त्यांचे तुकडे तुकडे केले). याच भागात एका हिंदू शिंप्यालाही भोसकून ठार करण्यात आले. या सर्व समाजविरोधी घटकांनी कॉंग्रेसच्या आमदाराच्या सांगण्यावरून केल्याचा आरोप होता. १९९२: रेल्वे स्टेशनभोवतीचा परिसर हिंदूंच्या हातून बळकाविण्यासाठी हिंदूंची १०० हून अधिक घरे जाळून टाकण्यात आली. हिंदूंनी इतरत्र स्थलांतर केल्यामुळे २००२ च्या वेळी हा भाग रिकामा होता. २००२: अहमदाबादला जाणार्‍या साबरमती एक्स्प्रेसच्या बोगी २७ फेब्रुवारीला मुस्लिम गुंडांनी पेटविल्या. या गाडीतील एस-६ कोचमधून अयोध्येहून परतणारे कारसेवक हे हल्लेखोरांचे लक्ष्य होते. या अग्निकांडात स्त्री-पुरुष, मुले मिळून ५९ निर्दोष लोक मारले गेले आणि ४० लोक जखमी झाले. संपूर्ण गाडी जाळून टाकण्याची हल्लेखोरांची योजना होती, पण ते असे करू शकले नाही कारण गाडी ४ तास उशिरा आल्यामुळे ते रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊ शकले नाही. (संदर्भ: विश्व संवाद केंद्र, गुजरात आणि The Indian Express dated 30th April, 2002 http://www.indianexpress.com/storyOld.php?storyId=1822, quoting Gujarat’s then MoS for Home Gordhan Zadaphiya) २००३: सप्टेंबरमध्ये झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हिंदू मुस्लिम यांच्यात दगडफेक आणि संघर्ष झाला. रेडिफ डोट कॉम आणि टाईम्स ऑफ इंडीया ने याबद्दलची बातमी दिली. पण ही घटना संघपरिवारातील नेत्यांसह सर्वजण विसरून गेले. http://timesofindia.indiatimes.com/india/Curfew-in- Godhra-after-clashes/articleshow/167495.cms? २००२ मार्च: १३ मार्च २००२ ला ५०० मुसलमानांच्या जमावाने गोधराच्या ‘जुन्या बस स्टॅंड’ जवळील जहुरपुरा भागात पुन्हा हिंदूंवर हल्ला केला. एन.डी.टी.व्ही. या वाहिनीचे वृत्त होते: “गोधरामध्ये जमावाचा हल्ला, १२ लोकांना अटक बुधवार, १३ मार्च २००२ (गोधरा): २७ फेब्रुवारीच्या रलवे स्टेशनला झालेला गदारोळ व नंतर झालेल्या हिंसक प्रतिक्रियेच्या दोन आठवड्याच्या आत आज पुन्हा तणाव पसरला जेव्हा एका अप्लसंख्यक जमावाने आरोपानुसार शहरांतील लोकांवर हल्ला केला, ज्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. पोलिसांनी म्हटले की ‘५०० लोकांच्या एक अल्पसंख्यक जमावा’ने जुन्या बस स्टॅंड जवळील जहुरपुरा भागात लोकांवर हल्ला केला. पोलिस म्हणालेत की जमावाने दगडफेक केली व खाजगी शस्त्रांतून गोळीबार केला. जमावाला पांगवायला पोलिसांनी गोळीबार केला व अश्रूधारेच्या नळकांड्या फोडल्या. कोणी मृत किंवा जखमी झाल्याचे कोणतेही वृत्त आतापर्यंत आले नव्हते. पोलिसांचे अतिरिक्त बळ, राज्य राखीव पोलिस व दंगल- विरोधी ‘रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स’ (जलद कृती दल) यांचे लोक वरीष्ठ डी.एस.पी. राजू भार्गव यांच्या नेतृत्वाखाली लगेच घटनास्थळी धावले आणि त्यांनी शोध मोहीम घेतली. ‘दोन महिलांसकट १२ लोकांना जवळच्या एका प्रार्थनास्थळाहून उचलले गेले’, असे पोलिस म्हणाले. स्थिती आटोक्यात पण तणावपूर्ण आहे, असेही पोलिस म्हणाले.” २७ फेब्रुवारीनंतर लगेच गोधरामध्ये मुसलमानांनी हिंदूंवर पुन्हा हल्ला केला. ‘टाईम्स ऑफ इंडिया’नेही ही पी.टी.आय.ची बातमी दिली, जी आज या लिंकवर वाचता येईल. http://timesofindia.indiatimes.com/india/Mob-attacks-people-in-Godhra-12- arrested/articleshow/3682215.cms गोधरासंबंधीचे सर्व तपशील (२००३ च्या दगडफेकीचा उल्लेख व १३ मार्च २००२ चा हल्ला सोडून) मिल्ली गॅझेट (Milli Gazette) नावाच्या मासिकात १६ मार्च २००२ ला लिहिलेल्या एका लेखातही प्रसिद्ध झाले आहेत. या लेखाचे शीर्षक आहे ‘गोधरा इन फरमेंट इव्हन बिफोर इन्डिपेन्डन्स’. (लिंक: http://www.milligazette.com/Archives/15042002/1504200276.htm) हे मासिक ‘भारतीय मुस्लिमांचा आवाज’ म्हणून ओळखले जाते. भारतीय मुस्लिमांचे हे इंग्रजी वृत्तपत्र असून त्यानेही गोधराचे हे सर्व तपशील प्रसिद्ध केले आहेत. गोधरा हत्याकांडानंतर त्याची चौकशी करण्यासाठी सरकारने नानावटी आयोग नियुक्त केला. ‘कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट १९५२’ नुसार या नानावटी आयोगाला चौकशीचे पूर्ण अधिकार देण्यात आले होते. नानावटी आयोगाने गोधरा हत्याकांडाबाबतचा आपला संपूर्ण अहवाल सप्टेंबर २००८ मध्ये सरकारला सादर केला. त्यामध्ये आयोगाने म्हटले आहे, ‘‘गोधरा शहर हे एक अत्यंत संवेदनशील स्थान आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुस्लिम लोकसंख्येची टक्केवारी मोठी आहे. गोधरामध्ये १९२५, १९२८, १९४६, १९४८, १९५०, १९५३, १९८०, १९८१, १९८५, १९८६, १९८८, १९८९, १९९०, १९९१ आणि १९९२ या वर्षात सांप्रदायिक दंगली झाल्या आहेत. १९४८ च्या दंगली सर्वात गंभीर होत्या. सुरुवातीला मुस्लिमांनी ८६९ हिंदूंची घरे जाळली. त्यानंतर हिंदूंनी ३०७१ मुस्लिमांची घरे जाळली.” आयोगाचा हा अहवाल संपूर्णपणे आपण वाचू शकता. त्याची लिंक अशी: http://www.home.gujarat.gov.in/homedepartment/downloads/godharaincident.pdf गोधरातील मुस्लिमांच्या धर्मांधतेबद्दल महात्मा गांधींनीही (१८६९-१९४८) लिहिले होते. गांधीजींचे नेमके शब्द होते:– ‘‘गोधरातील भयंकर घटनेबद्दल दोन आठवड्यांपूर्वी मी ‘नवजीवन’मध्ये एक टिपण लिहिले होते. श्री पुरुषोत्तम शहा यांने शूरपणे मारेकरयांच्या हाते आपल्या मृत्यूचा सामना केला. मी त्या टिपणाला शीर्षक दिले होते, ‘हिंदू मुस्लिम फाईट इन गोधरा.’(“गोधरा मध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष”). माझे हे शीर्षक अनेक हिंदू वाचकांना पटले नाही आणि त्यांनी त्यांच्या संतप्त प्रतिक्रियांचे पत्र मला पाठविले. (कारण हा संघर्ष एकतर्फी होता.) लेखाचे शीर्षक दुरुस्त करण्याची त्यांची मागणी मी मान्य करू शकलो नाही. कारण तिथे एखाद्याच्या बळी गेला की अनेकांचा, दोन जमातीत मुक्त संघर्ष झाला की एकाने आक्रमण केले आणि दुसर्‍याने फक्त मार खाल्ला, या घटना दोन समाजातील सततच्या संघर्षाचा भाग असल्या तर मी त्याला ‘फाईट’ [म्हणजे ‘संघर्ष’] असेच सांगावे. [माझेच शीर्षक बरोबर आहे, असे मला वाटते.] गोधरा असो वा अन्य ठिकाणे, सध्या दोन्ही जमातींमध्ये संघर्ष सुरू आहे. सुदैवाने ग्रामीण भाग अजूनही या संघर्षापासून दूर आहे. (आता तोही राहिलेला नाही.) हा संघर्ष छोट्या आणि मोठ्या शहरांपुरता मर्यादित असून तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे सतत चालू आहे. ज्या लोकांनी गोधराबद्दल मला पत्र पाठवली तेही ही घटना तेथील सततच्या सांप्रदायिकतेच्या तणावातून उद्भवली, हे नाकारू शकत नाहीत. पत्र पाठवणारयांनी फक्त शीर्षकाबद्दलच नाराजी व्यक्त केली असती तर मी त्यांना खाजगीत पत्र लिहिले असते आणि ‘नवजीवन’मध्ये त्यावर काही लिहिले नसते. पण पत्र पाठवणारयांनी जी अनेक पत्रे माझ्याकडे पाठवली आहेत, त्यामध्ये इतर अनेक मुद्द्यांवर संताप व्यक्त झाला आहे. नुकताच गोधरा येथे जाऊन आलेला अहमदबादचा एक स्वयंसेवक (Volunteer) लिहितो- ‘या भांडणांवर आपण शांत राहिले पाहिजे असे तुम्ही म्हणता. तुम्ही खिलाफत प्रकरणी शांत का राहिले नाही? आम्हाला मुस्लिमांच्या बाजूने उभे राहायला का सांगितलेत? तुम्ही आपल्या अहिंसेच्या तत्त्वाबद्दल शांत का राहत नाही? हिंदू आणि मुस्लिम एकमेकांच्या गळ्यावर चालून येत असताना आणि त्यात हिंदू अणू पर्यंत चिरडले जात असताना, तुमचे मौन योग्य आहे, असे तुम्ही कसे म्हणता? इथे अहिंसेचा प्रश्न कसा येतो? मी दोन घटनांकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो. एका हिंदू दुकानदाराने माझ्याकडे तक्रार अशी केली. तो म्हणतो, मुस्लिम माझ्या दुकानातून तांदळाच्या गोण्या घेऊन जातात, पण अनेकदा पैसे देत नाहीत. माझे गोदाम लुटले जाईल या भीतीने मी त्यांना पैसे देण्याचा आग्रहही करू शकत नाही. त्यामुळे मी स्वत:च दर महिन्याला ५०-७० मण तांदूळ त्यांना अनिच्छेनेभेट देतो. इतरांची तक्रार अशी आहे की, ‘मुस्लिम आमच्या घरात शिरतात आणि आमच्या समोर आमच्या स्त्रियांचा अपमान करतात. आणि आम्हाला गप्प बसावे लागते. आम्ही विरोध करायची हिंमत केली तर आम्ही संपून जाऊ. आम्ही साधी तक्रारही दाखल करू शकत नाही.’ अशा प्रकारच्या घटनांमध्ये तुमचा सल्ला काय आहे? इथे तुम्ही आपली अहिंसा प्रत्यक्षात कशी आणणार? का तरीही तुम्ही मौनच बाळगणार?’ या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी या पानांवर पुन्हा पुन्हा दिली आहेत. पण ती पुन्हा विचारली जात असल्यामुले पुनरावृत्तीचा धोका पत्करून मी माझे मत पुन्हा स्पष्ट करतो. अहिंसा हा भित्र्या किंवा भेकड लोकांचा मार्ग नाही. मृत्यूही 4 पत्करायला तयार असणार्‍या वीरांची तो मार्ग आहे. जो हातात तलवार घेऊन मृत्यूला समोर जातो तो नक्कीच शूर आहे. पण बोटसुद्धा वर न करता मृत्यूला सामोरा जाणारा, माझ्या मते, अधिक शूर आहे. पण मारहाणीच्या भीतीने शरणागती पत्करून तांदळाच्या गोण्या देणारा माणूस हा एक भेकड आहे. तो अहिंसेचा समर्थक असूच शकत नाही. याला अहिंसा म्हणजे काय, हे कळलेच नाही. मारहाणीच्या भीतीने आपल्या घरातील आपल्याच स्त्रियांचा अपमान पाहणारा पुरुषार्थी असूच शकत नाही,त्याच्या उलटा आहे. असा व्यक्ती नवरा होण्यास, वडील होण्यास, भाऊ होण्यास योग्य नाही. अशा व्यक्तींना तक्रार करण्याचा काही अधिकारच नाही…’’ यावरून १९२८ मध्ये झालेल्या पुरुषोत्तम शहा यांच्या हत्येबद्दल गांधीजींनी लिहिले होते, हे स्पष्ट आहे. गांधीजींनी इतर लेखनातही एकदा ‘हिंदू भेकड आहेत’ असे म्हटले होते. वरील गांधीजींचे शब्द त्यांच्या Collected Works, Volume 43, pages 81-82 मध्येही वाचता येतील. URL: http://www.gandhiashramsevagram.org/gandhi-literature/mahatma-gandhi- collected-works-volume-43.pdf गोधरातील हत्याकांड कसे घडले आपण या शहराचा रक्तरंजित इतिहास पाहिला आहे. आता २७ फेब्रुवारी २००२ (बुधवार) ला भयंकर, दिग्मूढ करणारे हत्याकांड नेमके कसे घडले, ते थोड्या पार्श्वभूमीसह पाहू. विश्व हिंदू परिषदेने अयोध्येमध्ये फेब्रुवारी-मार्च २००२ मध्ये एक ‘पूर्णाहुती यज्ञ’ आयोजित केला होता. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी १५ मार्च २००२ पासून सुरु होईल, अशी घोषणा विहिंपने केली. देशभरातून लोक यज्ञात सहभागी होण्यासाठी अयोध्येला येत होते आणि परत जात होते. अयोध्येतील राममंदिराची उभारणी अविवादित भूमीवर सुरू होण्याच्या घोषित तारखेपर्यंत म्हणजे १५ मार्च पर्यंत ते अयोध्येत थांबले नाहीत. (१९९४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात अयोध्येतील अविवादित जमीन मूळ मालकांना दिल्या जाऊ शकल्याचे आदेश दिले होते. वादग्रस्त नसलेली बहुतेक जमीन विहिंप आणि तिच्या संलग्न संस्थांच्या मालकीची होती आणि आहे.) फेब्रुवारी मध्यापासून ते २७ फेब्रुवारीपर्यंत देशभरातून अयोध्येत आलेले सामान्य लोक पूर्णाहुती यज्ञात सहभागी होत होते आणि आपापल्या घरी परतत होते. यांना ‘रामसेवक’ किंवा ‘कारसेवक’ म्हणायचे. पूर्णाहुती यज्ञात सहभाग घेतल्यानंतर एक ट्रेन भरून कारसेवक २७ फेब्रुवारी २००२ ला साबरमती एक्स्प्रेसने अहमदाबाद, गुजरातला परत येत होते. सहभागी झालेले रामसेवक विहिंपचे सदस्य होते की तिच्या रामजन्मभूमी आंदोलनाला पाठिंबा देणारे सर्वसामान्य लोक होते, हे या लेखकाला माहीत नाही. साबरमती एक्स्प्रेस अहमदाबादला पहाटे लवकर पोचणे अपेक्षित होते. ती गाडी ४ तास उशिराने धावत होती (स्रोत: इंडिया टुडे, ११ मार्च २००२). गाडीने सकाळी गोधरा स्थानक सोडल्यानंतर लगेच ७ वाजून ४८ मिनिटांनी एका मोठ्या जमावाने गाडी थांबवली (जमावातील लोकांचा अंदाजा ५०० ते २ हजारच्या क्षेत्रात दिला जातो). गाडी थांबवली गेली, ते ठिकाण गोधरा स्टेशनपासून ५०० ते ७०० मीटरवर आहे. ‘सिग्नल फ़ालिया’ असे या जागेेचे नाव आहे. साबरमती एक्स्प्रेस रेल्वे स्टेशनवर नव्हे, तर सिग्नल फ़ालियाला पेटविण्यात आली. त्यामुळे हल्लेखोर गाडी बाहेरून पेटवू शकले नाहीत. जर हल्लेखोर प्लॅटफॉर्मवर असते, तर त्यांना गाडी फार उंच नसती गेली. सिग्नल फालियाला मात्र (प्लॅटफॉर्म नव्हता, म्हणून) उंचीमुळे ती बाहेरून पेटविता आली नाही. त्यामुळे हल्लेखोरांपैकी काही लोक बाजूच्या एस-७ कोचचे प्रवेशदार (Vestibule) कापून एस-६ बोगीत शिरले, एस-६ बोगीला आतून आग लावली व पुन्हा बाहेर आले. त्यांच्याजवळ पेट्रोल बॉंब, ऍसिड बॉंब आणि तलवारी होत्या, अशी वृत्ते आहेत. हल्लेखोरांनी बोगीत पेट्रोल ओतले आणि बोगी पेटवून दिली. या भीषण आगीतून रामसेवक बाहेर येऊ नयेत म्हणून बोगीच्या सर्व बाजूंनी २ हजार हल्लेखोर उभे होते. आत आग आणि बाहेर सशस्त्र मुसलमान हल्लेखोर अशा कात्रीत रामसेवक सापडले. [‘आग अंतरी प्रचंड शत्रू मझसी वेढीतो’ हे वाक्य खरे झाले]. यात ५९ रामसेवक 5 अतिशय भीषणपद्धतीने जळून ठार झालेत. अनेक मृतदेह भयानकपणे जळून खाक झाले होते. बळी पडलेल्यात १५ मुले होती ज्यात नुकतीच चालू लागलेली बालके अणि ६५ वर्षांच्या वरचे ज्येष्ठ नागरिकही होते. या सर्वांची अत्यंत भीषणपणे हत्या करण्यात आली. जळीतकांडातून वाचलेल्या १६ वर्षीय मुलीचे वर्णन २७ फेब्रुवारीला साबरमती एक्स्प्रेसने अयोध्येहून परतणार्‍या रामसेवकांमध्ये गायत्री पांचाळ ही अकरावीत शिकणारी मुलगीही होती. त्या अमानुष, क्रूर अग्निकांडाची गायत्री वाचलेली प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, जिने आपल्या डोळ्यांसमोरच आई, वडील आणि दोन बहिणींना जिवंतपणे जळताना पाहिले. गुजरातमधील रमोल (अहमदाबादजवळील जागा) गावात राहणारे हर्षदभाई पांचाळ २२ फेब्रुवारीला अयोध्येत कारसेवेसाठी निघाले. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी नीताबेन, व तीन मुली प्रतिक्षा, छाया आणि गायत्री याही होत्या. त्यांच्याबरोबर हर्षदभाईंची मेहुणी, तिचा मुलगा, त्यांची शेजारी पूजाबेन आणि तिचा भावी पती हेही होते. अहमदाबादला परत येताना हर्षदभाई आणि त्यांचे कुटुंबीय, पूजाबेन आणि तिचा भावी पती हे एका कंपार्टमेंटमध्ये होते, तर त्यांची मेहुणी, साडू आणि त्यांचा मुलगा हे दुसर्‍या कंपार्टमेंटमध्ये होते. या १० लोकांपैकी एकमेव वाचलेली व्यक्ती गायत्री हिने या संपूर्ण घटनेचे केलेले वर्णन असे: – ‘‘२७ तारखेच्या सकाळी ८ वाजण्याच्या सुमाराला गाडीने गोधरा स्टेशन सोडले. सर्व रामसेवक मोठ्याने रामधूनाचा घोष करत होते. गाडी काही मीटर धावली नाही तोच ती अचानक थांबली. कदाचित कुणीतरी ट्रेन रोखायला साखळी ओढली असावी. काय घडले आहे हे समजण्याच्या आधीच आम्हाला गाडीकडे चालत येणारा एक मोठा जमाव दिसला. त्या लोकांच्या हातात तलवारी, गुप्ती, भाले आणि अशी इतर वेगवेगळी भयानक शस्त्रे होती आणि लोक गाडीवर दगडफेक करत होते. आम्ही सगळे घाबरून गेलो आणि कसेतरी कंपार्टमेंटच्या खिडक्या आणि दारे लावू शकलो. बाहेर असलेले लोक मोठ्याने ओरडत होते ‘मारो काटो’ आणि गाडीवर हल्ला करत होते. जवळच असलेल्या मशिदीचा एक लाऊडस्पीकरही मोठ्याने ‘मारो, काटो, लादेनना दुष्मनोने मारो’ (“मारा, कापा, लादेनच्या शत्रूंना मारा”) अशा घोषणा देत होता. ते हल्लेखोर इतके प्रखर होते की ते कंपार्टमेंटच्या खिडक्या तोडू शकले आणि त्यांनी दरवाजे बाहेरून बंद केलेत. त्यानंतर कोणीही जिवंत वाचू नये म्हणून त्यांनी आत पेट्रोल टाकले आणि कंपार्टमेंटला आग लावली. त्यापूर्वी अनेक हल्लेखोर कंपार्टमेंटमध्ये जबरदस्तीने घुसले. त्यांनी रामसेवकांना बेदम मारहाण केली आणि त्यांचे सामान लुटले. लुटालुटीनंतर कंपार्टमेंटमध्ये पेट्रोल ओतले. आम्ही घाबरून मदतीसाठी आरडाओरडा करत होतो. पण आमच्या मदतीला येणारे कोणी होतेच कुठे? नंतर काही पोलीस कंपार्टमेंटकडे येताना दिसले, पण प्रक्षुब्ध जमावाने त्यांनाही दूर नेले. कंपार्टमेंटमध्ये इतका मोठा धूर झाला होता की आम्ही एकमेकांना पाहू शकत नव्हतो व सर्वांचा जीव धुरामुळे गुदमरत होता. कंपार्टमेंटमधून बाहेर पडणे हे अति अवघड होते पण मी आणि पूजा कसेतरी खिडकीतून खाली उडी मारू शकलो. पूजाला पाठीला लागले ज्यामुळे तिला उठताही येत नव्हते. गाडीच्या बाहेर उभे असलेले लोक आम्हाला नेण्यासाठी पकडायला धावले पण आम्ही निसटू शकलो आणि जळत्या गाडीच्या खालपर्यंत धावू शकलो, आणि खालून आम्ही रांगत रागंत केबिनकडे आलो. माझे आईवडील आणि (दोन) बहिणी यांना माझ्यासमोर जीवंत जळताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.’’ सुदैवाने गायत्री फार वाईट जखमी झाली नाही. ती पुढे म्हणते- ‘‘आम्ही कशाबशा स्टेशनपर्यंत पोचण्यात यशस्वी झालो आणि तिथे आमची मावशी भेटली. गाडीच्या बोगी संपूर्ण जळाल्यानंतर हल्लोखोरांचा जमाव पांगला. आम्ही पाहिले की त्या जमावामध्येही स्त्री, पुरुष आणि आमच्यासारखे युवक होते- दोन्ही लिंगांचे. कुटुंबीयांची प्रेते गोधरा स्टेशनवर आणल्यानंतर (evacuating) मी येथे परतली. आमच्या बरोबर असलेल्या १८ लोकांपैकी १० लोकांनी आपले प्राण दिलेत.’’ गायत्रीचे वडील सुतारकाम करीत असत, तर तिची आई, शाळेच्या माध्यान्ह भोजन योजनेत काम करायची. मोठी बहीण प्रतिक्षा जिल्हाधिकारी कार्यालयात (कलेक्टरेटमध्ये) नोकरी करत होती. एवढे सगळे घडल्यानंतरही गायत्री ठामपणाने म्हणाली की पुन्हा संधी मिळाली तर ती केव्हाही कारसेवेला जाईल. ती म्हणाली ‘‘माझ्या आईवडिलांचे बलिदान मी वाया जाऊ देणार नाही.’’ (संदर्भ: विश्व संवाद केंद्र, गुजरात and various English dailies such as The Indian Express dated 28th February, 2002) 6 पोर्ट्समाऊथ हेराल्ड या विदेशी वृत्तपत्राने आपल्या बातमीत म्हटले, ‘‘अयोध्येतील धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊन परत येत असताना झालेल्या अग्निकांडात १६ वर्षीय गायत्री पांचाळ हिने आपले आईवडील आणि दोन बहिणी त्या आगीत डोळ्यांसमोर जळताना पाहिले. ‘‘पाहावे तिकडे आगीच्या ज्वाला पसरल्या होत्या. माझी आई जळत होती, तिचे कपडे पेटल्याचे मी पाहिले…नंतर माझ्या वडिलांचा मृतेदह घेऊन जाताना मी पाहिले. त्यांचे मृतदेह काळ्याने झाकले होते. त्यानंतर मी बेशुद्ध पडले.’’ (URL: http://www.seacoastonline.com/article/20020228/news/302289980 ) गोधरा हत्याकांडामध्ये झालेल्या क्रूरपणाच्या तपशीलांमध्ये एका दलित कारसेवकाचीही झालेल्या हत्येची कहाणी सांगण्यासारखी आहे. सैजपूरमध्ये राहणारा उमाकांत गोविंदभाई हा २५ वर्षांचा दलित तरुण कलेक्टर कार्यालयात काम करत होता. उमाकांत पेटलेल्या डब्याचे बंद असलेले दार तोडून उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना, हल्लेखोरांनी त्याच्यावर दगडफेक केली व बांबूंनी त्याला जळत्या डब्यात परत ढकलले, असे डॉ. सुवर्णा रावळ यांनी ‘तरुण भारत’ या मराठी वृत्तपत्रात २१ जुलै २००२ ला लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. या घटनेच्या एक वर्षानंतर २७ फेब्रुवारी २००३ ला ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने म्हटले: “कोमल (२०), अवनी (१९), गायत्री (१७) आणि प्रियंका (१५) या चार पांचाळ बहिणींसाठी गेले संपूर्ण वर्ष अश्रूंनी भरलेले होते. २७ फेब्रुवारीच्या गोधरा अग्निकांडाच्या कौरयात त्यांचे वडील हर्षद पांचाळ, आई मीता पांचाळ, व बहिणी प्रतिक्षा आणि छाया यांचा मृत्यू झाला. आणि पुढे त्यांचे आयुष्य पुन्हा कधीही पूर्वीसारखे झाले नाही. याचा परिणाम. मॅट्रिकला उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेली (टॉपर असलेली) गायत्री आता आजारी असते आणि बारावीत अभ्यास पूर्ण करण्यासाठी लढत आहे. आपले पालक गमावलेल्या या मुली अनेकदा रात्री डोळ्यात अश्रू घेऊन झोपायला जातात कारण त्या भीषण घटनेच्या आठवणी रोज पुन्हा येतात. कोमल म्हणते, ‘आम्ही आयुष्य चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत पण ते फारच अवघड आहे. पालकांच्या प्रेमाशिवाय सगळं आयुष्यच निरर्थक वाटतंय.’” (URL: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/38702737.cms?prtpage=1 ) गोधरासारखे नरसंहार स्वतंत्र भारतात कुठेही पाहायला मिळाले नव्हते. इतर कुठल्या घटनेशी, जसे इंदिरा गांधींच्या हत्येशी किंवा केरळमधील कन्नुर जिल्ह्यात झालेल्या क्रूर राजकीय हत्याकांडांशी (जो जिल्हा राजकीय हत्याकांडांसाठी जाणला जातो) सुद्धा गोधरा घटनेची तुलना होऊ शकत नाही. गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरावर २४ सप्टेंबर २००२ ला झालेला अतिरेकी हल्ला किंवा भारतातील इतर मंदिरांवर झालेले हल्ले आणि देशभर जागोजागी झालेले भीषण बॉंबस्फोट, यापैकी कशाचीही तुलना गोधराच्या हादरवून टाकणार्‍या अग्निकांडाशी होऊ शकत नव्हती. गोधरातील घटना हा अचनाक उद्भवलेला हिंसाचार किंवा दहशतवादाचा हल्ला नव्हता. विश्व हिंदू परिषदेपासून नानावटी आयोगापर्यंत अनेकजण याला दहशतवादाचे कृत्य असल्याचे म्हणत आहेत. पण दहशतवाद पूर्णपणे वेगळा असतो. दहशतवादी घटनांच्या वेदना क्षणभरासाठी टिकतात (momentary pain). इंदिरा गांधींची (१९१७-१९८४) हत्या गोळ्या घालून झाली. ते हत्येचे प्रकरण होते- देशाच्या पंतप्रधानांच्या. कुठेही होणारया हत्या बहुधा भोसकून किंवा गोळ्या घालून होतात. पण गोधराचे तसे नव्हते. त्याहून फार जास्त वाईट होते. ते खरे दहशतवादाचे नव्हे तर पूर्वनियोजित, अमानवतेचे कृत्य (act of barbarism) होते. ‘दहशतवाद्यांना धर्म नसतो’, अशी पोपटपंची माध्यमातले अनेक लोक सतत करत असतात. पण गोधरातले अग्निकांड एक वा दोन अतिरेक्यांनी केले नाही. ते एका जमावाने केले, पाचशेपेक्षा जास्त लोकांच्या जमावाने जो सर्वसामान्य नागरिकांचा होता. त्यापैकी कोणालाही अतिरेकी प्रशिक्षण मिळालेे नव्हते. ते एके ४७, एके ५६ सारख्या रायफली किंवा ग्रेनेड्स जवळ असलेले दहशतवादी नव्हते. हे लोक विदेशी नव्हे, तर स्थानिक होते. गोधराचे हे धर्मांध आणि पूर्वनियोजित कृत्य स्थानिक मुस्लिमांनी केले. 7 फेब्रुवारी २००३ मध्ये एका मुस्लिम आरोपीने न्यायालयात कबूल केले की गोधरा हत्याकांड हे पूर्वनियोजित होते, धर्मांध मुसलमानांनी आधीच पेट्रोल आणून ठेवले होते, व त्याने स्वतः त्यात भाग घेतला होता. १६ वर्षीय गायत्री पांचाळने म्हटल्यानुसार त्याने मान्य केले की रेलवे डब्याला आग लावायच्या आधी कारसेवकांचे सामानही मुसलमानांनी लुटले व लुटणारयांमध्ये तो स्वतः सुद्धा होता. http://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/Umarji-was-indirectly-stalling-Godhra- probe/articleshow/36903039.cms पुढे ऑगस्ट २००३ मध्ये त्याने आपली कबुली वापस घेतली. पण न्यायालयासमोर दिलेला कबुलीजवाब हा पुरावा म्हणून मानला जातो. हा न्यायालयीन कबुलीजवाब हा निर्णायक पुरावा होता पण प्रसारमाध्यमांनी तो दाबून टाकला. असा कबुलीजवाब आहे याची लोकांना आठवणही करुन नाही दिली. २००५ बिहार निवडणुकींआधी लालू प्रसाद यादव यांनी नेमलेल्या बॅनर्जी समितीने (या समितीला गुजरात ऊच्च न्यायालयाने २००६ साली बेकायदेशीर घोषित केले) म्हटले की गोधरा हत्याकांड हा एक ‘अपघात’ होता, आणि हे सांगितले नाही की जर रेलवे गाडीला आग अपघाताने लागली तर जबरदस्त दगडफेक कशी झाली, जळते बोळे कसे फेकले गेले आणि या आरोपीने न्यायालयाला दिलेल्या कबुलीजवबाचे काय. त्यावेळेस प्रसारमाध्यमांनी या न्यायालयीन कबुलीजवाबाबद्दल सांगणं आणखीनच महत्त्वाचे होते. पण त्यांनी हे लपवून ठेवले. अनावश्यक गोंधळ व शंका निर्माण करायचा प्रसारमाध्यमांनी प्रयत्न केला, वाटेल त्या थापा पसरवून आणि मुसलमानांनी पूर्वनियोजित हल्ल्यात रेलवे डबा जाळला हेच अमान्य करून. इंग्रजी माध्यमांच्या प्रतिक्रिया गोधरा हत्याकांडानंतर पहिले तीन दिवस गुजरातमध्ये उसळलेल्या दंगली या फक्त गोधरा घटनेचा परिणाम नव्हत्या. त्या दुसर्‍या काही गोष्टींचाही परिणाम होत्या आणि हे दुसरे काही म्हणजे गोधरा घटनेनंतर डाव्या उदारमतवादी ‘धर्मनिरपेक्ष’ माध्यमांनी नोंदविलेल्या प्रतिक्रिया. यात जवळपास सर्व माध्यमे विशेषत: स्टार न्यूज आणि एनडीटीव्ही (या दोन्हींची तेव्हा भागीदारी होती) सारख़्या टी.व्ही. वाहिन्या, जवळजवळ सर्व इंग्रजी वृत्तपत्रांचे संपादक आणि भाजपा, शिवसेना वगळता सर्व राजकीय नेते या डाव्या, उदारमतवादी, ‘धर्मनिरपेक्ष’ गटात समाविष्ट होते. २७ फेब्रुवारी २००२ ला देशातल्या सर्व टीव्ही वाहिन्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करणारा, गैर-भाजपाचा, जवळपास प्रत्येक नेता लोकांच्या जखमेवर मीठ चोळत होता, हे सांगून की गोधरा हत्याकांड योग्य कसे आहे किंवा स्वाभाविक (rationalizing) कसे आहे. विदेशी वृत्तपत्रे तर या बाबतीत भारतीय माध्यमांपेक्षाही वाईट होती. ते आपण नंतर बघूच. त्यावेळी ‘द हिंदुस्तान टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राचे मुख्य संपादक वीर संघवी होते. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या २८ फेब्रुवारी २००२ च्या अंकात त्यांनी ‘वन वे टिकेट’ या नावाचा एक लेख लिहिला. तो २७ फेब्रुवारीलाच म्हणजे गोधरा हत्याकांडाच्या दिवशीच लिहिला गेला असणार. हा पूर्ण लेख असा आहे: – ‘‘गोधरा हत्याकांडावर धर्मनिरपेक्षतावादी म्हणविल्या जाणार्‍या सर्वांकडून आलेल्या प्रतिक्रियांमध्ये काहीतरी अतिशय काळजी करण्यासारखे आहे. तपशिलांमध्ये काही वाद असले, तरी रेल्वे मार्गावर काय घडले, हे आता आपल्याला माहीत आहे. गोधरा स्टेशन सोडल्यानंतर लगेच साबरमती एक्स्प्रेसला, दोन हजार लोकांच्या एका जमावाने थांबवले. अयोध्येतील पूर्णाहुती यज्ञात सहभाग घेतल्यानंतर अहमदाबादला परतणार्‍या कारसेवकांनी गाडीतील अनेक बोगी भरलेल्या होत्या. जमावाने गाडीवर पेट्रोल आणि ऍसिड बॉंबने हल्ला केला. काही साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार जमावाने स्फोटकेही वापरली. चार बोगी जळाल्या आणि किमान ५७ लोक जिवंत जाळले गेले,ज्यामध्ये डझनहून अधिक मुलांचाही समावेश होता. काही लोकांच्या म्हणण्यानुसार रामसेवकांनी मुस्लिमविरोधी घोषणा दिल्या तर काहींच्या मते त्यांनी मुस्लिम प्रवाशांना चिडवले व त्रास दिला. या म्हणण्यांनुसार मुसलमान प्रवासी गोधरा स्टेशनवर उतरले आणि त्यांनी आपल्या समाजाच्या 8 लोकांकडे मदत मागितली. काहींच्या मते स्थानिक मुस्लिमांना भडकाविण्यासाठी रामसेवकांच्या घोषणाच पुरेशा होत्या आणि हा हल्ला हा बदला होता. या लोकांची ही म्हणणे कितपत सत्य आहेत, हे समजायला थोडा वेळ लागेल, पण काही गोष्टी अगदी स्पष्ट दिसतात. कोणीही असे म्हटलेले नाही की रामसेवकांनी हिंसाचार सुरू केला. काही मुस्लिम प्रवाशांशी ते वाईट वागले, एवढेच सर्वांत जास्त वाईट म्हट्ल्या गेलेले आहे. चालत्या गाडीतून किंवा प्लॅटफॉर्मवरून दिलेल्या घोषणा स्थानिक मुस्लिमांना भडकविण्यासाठी पुरेशा होत्या, त्यांच्या पैकी दोन हजारांना सकाळी ८ वाजता तातडीने एकत्र करू शकत होत्या आणि त्यांना पेट्रोल बॉंब, ऍसिड बॉंब घेऊन येता येण्याएवढा वेळ मिळतो, हे आश्चर्यजनक वाटते. हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि जमाव गाडीची वाट पाहत पूर्णपणे तयार होता, हे काही रामसेवकांचे म्हणणे तुम्हाला वादग्रस्त जरी वाटले, तरी हे कोणीही नाकारू शकत नाही,की जे झाले ते असमर्थनीय होते, अक्षम्य होते, व कुठ्ल्याही कारणाचा (चिथावणीचा) परिणाम म्हणून समजल्या जण्यासारखे नव्हते. पण तरीही सर्व धर्मनिरपेक्षतावाद्यांनी अगदी याच प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बुधवारी (२७ फेब्रुवारी २००२) टीव्ही वाहिन्यांवर येणारे गैर-भाजपाचे सर्व नेते आणि जवळपास सर्व माध्यमे यांनी गोधरा हत्याकांडाला ‘अयोध्या आंदोलनाची प्रतिक्रिया’ असे सांगितले. हत्याकांडात बळी गेलेले रामसेवक होते, इथपर्यंत हे अवलोकन योग्य आहे. पण जवळपास कोणीही पुढचा अगदी स्पष्ट मुद्दा व्यक्त केला नाही- हा हल्ला रामसेवकांनी आपल्यावर ओढवून घेतलेला नाही. डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर विहिंपचे स्वयंसेवक परतत असताना त्यांच्यापैकी एका ट्रेनभर लोकांवर असा हल्ला झाला असता, तरीही ते चुकीचेच असते, पण निदान मुस्लिमांचा प्रक्षोभ कशामुळे उसळला हे समजण्याजोगे असते. यावेळी मात्र असे कोणतेही प्रक्षोभक कृत्य झालेले नाही. ही शक्यता आहे सरकारचे आणि न्यायालयांचे सर्व आदेश झुगारून देऊन विश्व हिंदू परिषद राममंदिराची उभारणी सुरू करेल. पण आता तरी असे काहीच घडलेले नाही. एवढेच नव्हे तर आतापर्यंत अयोध्येमध्ये कोणताही खरा संघर्षही झालेला नाही. आणि तरीही सर्व धर्मनिरपेक्षतावाद्यांचे म्हणणे एकच आहे की ‘कारसेवकांवर हे हत्याकांड होणारच होते.’ मूळत: ते गुन्ह्याचा निषेध करतात पण बळींनाच (पीडितांना) दोष देतात. आपण (म्हणजे ‘धर्मनिरपेक्षतावादी’ लोक) भारतात ज्या प्रकारच्या धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात ही घटना (गोधरा) बघतो आहोत, त्या संदर्भातून ही घटना बाहेर काढून दुसर्‍या संदर्भात तपासली, तर अशी वृत्ती किती विचित्र वाटते ते बघा. गेल्या वर्षी जुळ्या मनोर्‍यांवर (Twin Towers of the World Trade Centre in New York i.e. 9/11) हल्ला झाला, तेव्हा ‘न्यूयॉर्कच्या लोकांवर तो होणारच होता’ असे आपण म्हटले का? त्यावेळीही अमेरिकेच्या धोरणांबद्दल धर्मांध मुस्लिमांच्या मनात तीव्र संताप होता. पण आपण तेव्हा हा विचारही केला नाही की हा संताप योग्य आहे की नाही. त्याऐवजी आपण ती भूमिका घेतली जी सर्व सूज्ञ लोकांनी घ्यायला हवी- की कुठलाही नरसंहार हा वाईट असतो व त्याचा निषेधच केला पाहिजे. ग्रॅहॅम स्टेन्स आणि त्याच्या मुलांना जिवंत जाळण्यात आले, त्यावेळी ख्रिश्चन मिशनरींनी धर्मांतर केल्यामुळे त्यांनी स्वत:ला कुप्रसिद्ध केले होते आणि त्यामुळे हे होणारच होते, असे आपण म्हटले का? अर्थातच नाही. मग हे गरीब बिचारे कारसेवकच याला अपवाद कसे? या कारसेवकांचे माणूसपणही आपण इतके का नाकारतो आहोत की या घटनेकडे अत्यंत दु:खद घटना हेसुद्धा न पाहण्याऐवजी तिला ‘विहिंपच्या धर्मांध धोरणाचाच हा परिणाम आहे’, असे का म्हणतो आहोत? याचे उत्तर, मला वाटते असे आहे की हिंदू मुस्लिम संबंधांकडे पाहण्यासाठी आपले ‘प्रोग्रामिंग’ असे झाले आहे की- हिंदू भडकावतात आणि मुस्लिम मार खातात. (“We are programmed to see Hindu-Muslim relations in the simplistic terms: Hindus provoke, Muslims suffer”.) जेव्हा हे साचेबद्ध सूत्र चालू शकत नाही- आता हे स्पष्ट आहे की गोधरा घटनेत नि:शस्त्र हिंदूंना मोठ्या सशस्त्र मुस्लिम जमावाने ठार केले- तेव्हा आपल्याला (‘धर्मनिरपेक्ष’ लोकांना) कशी प्रतिक्रिया द्यावी हे माहितीच नाही. आपण सत्यापासून दूर पळतो- की काही मुस्लिमांनी असे भयंकर कृत्य केले की ज्याचे समर्थन करणे शक्य नाही- आणि बळी गेलेल्यांना, पीडितांना दोष देण्याचा मार्ग घेतो. अशी भूमिका घेण्यासाठी अर्थातच आपल्याजवळ ‘तर्कसंगत कारणे’ असतात. मुस्लिम अल्पसंख्य आहेत त्यामुळे ते विशेष सवलतींचे पात्र. मुसलमान आधीच भेदभावाला सामोरे जातात, मग त्यांच्यासाठी जीवन आणखीन कठीण का करायचे? तुम्ही जर सत्य लोकांना सांगितले, तर हिंदूंच्या भावना भडकतील आणि हे बेजबाबदारपणाचे कृत्य ठरेल, ही आणि अशी अनेक कारणे दिली जातात. ही कारणे मला चांगली माहीत आहे, कारण -इतर अधिकांश पत्रकारांप्रमाणेच- मीही वेळोवेळी ती वापरली आहेत. आणि अनेक वेळा ही कारणे योग्य आणि आवश्यकही असतात, असे मी आजही म्हणतो. पण शेवटी एक अशी वेळ येते की हा ‘धर्मनिरपेक्ष’ व्यवहार मर्यादेपलीकडे तर जातोच, पण त्याचा विपरीत परिणामही होतो. हिंदूंनी भरलेल्या रेल्वे गाडीचे एका मुस्लिम जमावाने हत्याकांड केले, हे सर्वांना स्पष्ट दिसत असताना, हत्यांसाठी विहिंपला दोषी ठरविण्याने किंवा मृत महिला व पुरुषांनीच हे हत्याकांड ओढवून घेतले, असे म्हटल्याने काहीच साध्य होणार नाही. (आणि त्या मुलांचे काय? ते ही आपल्या हत्येसाठी जबाबदार होते?) असा म्हटल्याने हत्याकांडातील मृतांचा (मुलांचाही) अपमान तर होतोच, पण वाचकांच्या बुद्धीमत्तेचाही अपमान होतो. विहिंपचे विरोधी असलेले, उदारमतवादी हिंदूही आता गुजरातमधून येणार्‍या बातम्यांमुळे हादरून गेले आहेत, की रेल्वेच्या 9 बोगी प्रथम बाहेरून बंद केल्या गेल्या व नंतर आग लावल्या गेली, व स्त्रियांच्या डब्याला सर्वाधिक नुकसान झाले, यामुळे फाळणीच्या वेळच्या (१९४७ च्या) दु:खी स्मृती जाग्या झाल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला वाटणारी प्रामाणिक चिंता माध्यमांनी, किंवा कुठल्याही धर्मनिरपेक्ष संस्थांनी, लक्षात घेतली नाही, तर त्यांचीच विश्वासार्हता धोक्यात येण्याची शक्यता असते. असे काही ८० च्या दशकात झाले, जेव्हा धर्मनिरपेक्ष माध्यमे आणि सरकार यांनी घेतलेल्या टोकाच्या धर्मनेरपेक्ष भूमिकांमुळे उदारमतवादी हिंदूंनादेखील आपण आपल्याच देशात दुय्यम दर्जाचे नागरिक झाल्याचे वाटायला लागले होते. यावर झालेल्या हिंदू प्रतिकारानेच अयोध्या आंदोलनाला समोर आणले आणि तोपर्यंत अगदी लहान असलेले अयोध्या आंदोलन राजकारणाच्या केंद्रस्थानी आले, व यामुळे लालकृष्ण अडवाणींच्या भाजपाचा उदय झाला. मला भीती याची वाटते आहे की पुन्हा असेच काहीतरी घडेल. ‘स्टेन्सची हत्या होते, तेव्हा मात्र ती अत्यंत दु:खद घटना असते आणि ५७ रामसमेवक जाळून मारले जातात, तेव्हा मात्र ती ‘अपरिहार्य राजकीय घटना’ आहे, असे का?’, असा साधा प्रश्न विहिंप हिंदूंसमोर ठेवणारच. आपण धर्मनिरपेक्षतावादी या नात्याने या प्रश्नाचे कोणतेही चांगले उत्तर देऊ शकणार नसल्यामुळे, हिंदू विहिंपच्या बोलण्यावरच विश्वास ठेवतील. पुन्हा एकदा हिंदूंना असे वाटेल, की आपल्यावर होणार्‍या अत्याचारांची कोणालाही फ़िकीर नाही. त्यातून धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या हिंदू यातनांवर असलेल्या बेपरवाईवर विजय मिळविण्यासाठी हिंदू अस्मितेचे चिन्ह म्हणून ते अयोध्येत राममंदिर बांधण्यामध्येच सार्थकता शोधतील. पण समजा असे घडले नाही, आणि हिंदूंच्या प्रतिकाराचा कोणताही धोका नसला, तरीही मला वाटते की धर्मनिरपेक्षतावाद्यांनी थोडा काळ थांबून विचार करायला हवा. आपण स्वत:ला एक प्रश्न विचारायची आवश्यकता आहे. आपण आपल्याच मांडणीच्या, आरोपांच्या एवढे आहारी गेलो आहोत का, की ज्यामुळे एक भयंकर हत्याकांडसुद्धा फक्त संघपरिवाराला ठोकण्याचा प्रसंग बनते?” (संदर्भ: http://www.hvk.org/specialreports/guild/1.html) आज हा लेख वीर संघवींच्या वैयक्तीक वेबसाईटवरही वाचता येऊ शकतो. http://www.virsanghvi.com/Article-Details.aspx?key=611 जसे आपण पाहतो, वीर संघवी यांनी हा लेख लिहिला, तेव्हा गुजरातमध्ये दंगली सुरू झाल्या नव्हत्या. पण त्यांचा लेख नीट वाचला, तर लक्षात येते की गोधरा हत्याकांडावर झालेल्या ‘धर्मनिरपेक्षता’वाद्यांच्या अमानुष प्रतिक्रियेरून गुजरातमध्ये हिंदूंची प्रतिसादाची लाट येणार आहे, हे त्यांना माहीत होते. त्यांची ही दोन वाक्येच पहा- “विहिंपचे विरोधी असलेले, उदारमतवादी हिंदूही आता गुजरातमधून येणार्‍या बातम्यांमुळे हादरून गेले आहेत, की रेल्वेच्या बोगी प्रथम बाहेरून बंद केल्या गेल्या व नंतर आग लावल्या गेली, व स्त्रियांच्या डब्याला सर्वाधिक नुकसान झाले’’ आणि ‘‘मला भीती अशी वाटते की पुन्हा असेच काहीतरी घडेल.’’ वीर संघवी यांनी लिहिलेल्या या लेखामुळे सगळ्याचे स्पष्टीकरण मिळते, केवळ गोधराबद्दलचेच नव्हे तर गोधरा नंतर जे झाले त्याचेही. या कबुली देणारया लेखामुळे स्वत:ला ‘धर्मनिरपेक्षता’वादी म्हणविणारे सर्व संपादकांचे इतर सर्व मुद्द्यांवरचे (उदा. देशात झालेल्या सर्व साप्रदायिक दंगली आणि हिंदू व इतर अल्पसंख्यात्मक यांच्यात झालेेले संघर्ष, याला धर्मनिरपेक्षतावाद्यांनी दिलेला प्रतिसाद) वर्तनही कळते. त्यांचे हे वाक्य बघा, ‘‘हिंदू मुस्लिम संबंधांकडे पाहण्यासाठी आपले ‘प्रोग्रामिंग’ असे झाले आहे की- हिंदू भडकावतात आणि मुस्लिम मार खातात.’’ (“We are programmed to see Hindu-Muslim relations in the simplistic terms: Hindus provoke, Muslims suffer”.) वीर संघवी यांनी खोट्या धर्मनिरपेक्षतेचा (pseudo-secularism) दिलेला हा पहिला आणि सर्वांत मोठा कबुलीजबाब आहे- स्वत:साठीच नव्हे, तर सर्व स्वयंघोषित धर्मनिरपेक्षतावाद्यांसाठी. कोणीतरी भडकावतो आणि कोणावर तरी अत्याचार होतात, अशा पूर्वाग्रहातून एखाद्या घटनेकडे पाहणे, याने पाहणारयाची नैतिक आणि मानसिक दिवाळखोरीही दिसते. विहिंपच्या कार्यकर्त्याने एका मुस्लिमावर हल्ला केला असो किंवा मुस्लिमांनी विहिंप कार्यकर्त्यांना हाणामारी केली असो किंवा त्यांना जाळून टाकले असो, तरीही स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष संपादक घडलेल्या घटनेबद्दल विहिंपलाच जबाबदार धरतील व विहिंपला ठोकून काढतील. प्रत्यक्ष घटना काय घडली, दोष कुणाचा, कोणावर अत्याचार झाले, यापैकी 10 कशाचाही तपास न करता डोळे बंद करून प्रत्येक हिंदू-मुस्लिम संघर्षात हे संपादक हिंदू गटालाच जबाबदार धरतील. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कन्हैयालाल मुन्शी (१८८७-१९७१) यांनी असेच काहीतरी म्हटले होते-‘‘सांप्रदायिक संघर्षाचा मुद्दा असताना काय घडले, याचा गुणवत्तेवर विचार न करता जर प्रत्येक वेळी बहुसंख्य समाजालाच दोष दिला, तर यामुळे सहिष्णुतेचा पारंपरिक ओढा सुकून जाईल.’’ (संदर्भ: Pilgrimage to Freedom by K.M. Munshi, p. 312 प्रकाशक- भारतीय विद्या भवन). त्याच पानावर त्यांनी पुढे लिहिले होते-“जेव्हा बहुसंख्य समाज सहिष्णू असतो तेव्हा अल्पसंख्यकांनी त्यांच्याबरोबर राहण्यास बदलायला शिकले पाहिजे. तसे घडले नाही, तर भविष्यकाळ अनिश्चित आहे आणि एक मोठा स्फोट थांबविणे अशक्य आहे” (“an explosion cannot be avoided’’). कोणत्याही घटनेमध्ये तिच्या गुणवत्तेची परीक्षा न करता, अबकने क्षयज्ञवर हल्ला केला की उलटे झाले हे न बघता अबक आणि क्षयज्ञ यांच्या नावांवरुन (हिंदू व मुसलमान यावरून) कोण दोषी व कोण पीडित हे ठरविणे हे दाखविते की ‘तटस्थ निरीक्षक’ (स्वयंघोषित धर्मनिरपेक्षतावादी) हे पूर्वग्रहदूषित आहेत. भारतातील हिंदू-मुस्लिमांचे संदर्भ वास्तवात निराळेच राहिले आहेत. अनेकवेळा अल्पसंख्य समाजच दंगली सुरू करतो. संघ-भाजपाविरोधी असणारे आणि डावीकडे झुकलेले पत्रकार गणेश कनाटे यांनी नागपूरमधील ‘द हितवाद’ या इंग्रजी दैनिकात १५ ऑगस्ट २००३ ला त्यांच्या सदरामध्ये लिहिले- ‘‘मुसलमान दंगली सुरू करतात आणि मग ते त्यांनीच सुरू केलेल्या दंगलीत जबरदस्त मार खातात.’’ गणेश कनाटे यांच्यासारखा ‘धर्मनिरपेक्षता’वादी पत्रकार देखील हे म्हणला की मुस्लिमच अधिकांश दंगली सुरू करतात. कॉंग्रेस सरकारच्याच गृहमंत्रालयाने आपल्या अहवालात असे म्हटले की १९६८ ते १९७० या काळात झालेल्या २४ दंगलीपैकी २३ दंगली मुस्लिमांनी सुरू केल्या. या अहवालाचा उल्लेख अटलबिहारी वाजपेयी यांनी १४ मे १९७० ला केलेल्या संसदेतील भाषणात केला. हा लेखक हे स्प्ष्ट करतो की त्याला असे वाटते की कोणत्याही समाजाबद्दल पूर्वग्रह न ठेवता प्रत्येक दंगलीचा स्वतंत्र विचार करून त्यात कोण दोषी आहे, हे तपासून गुणवत्तेवर ठरविले पाहिजे. “BJP Vis-à-vis Hindu resurgence” (प्रकाशन व्हॉइस ऑफ इंडिया, जाने. १९९७) या पुस्तकात बेल्जियमस्थित विश्वप्रसिद्ध विद्वान डॉ. कॉनरॅड एल्सट यांनी म्हटले आहे: ‘‘दुसरे उदाहरण आहे ते दंगलीच्या बातम्यांचे. बहुतेक दंगली जरी मुस्लिमांनी सुरू केल्या असल्या (उदा. डिसें. १९९२ व जाने. १९९३ च्या मुंबईतील दंगली) तरी त्यांच्या बातम्या देताना जागतिक मीडिया मध्ये मात्र ‘पूर्णपणे तयार हिंदूंच्या सशस्त्र गटांनी बिचार्‍या संरक्षण नसलेल्या मुस्लिमांचा नरसंहार केला’, अशा पद्धतीने जगभर रंगविल्या जातात. पत्रकार आणि विचारवंतांच्या सर्व संदर्भात १९९० मधील अडवाणींची वास्तवात शांततापूर्ण रथयात्रा ‘हिंसक, रक्तरंजित यात्रा’ बनली आहे.’’ जवळ जवळ सर्वच माध्यमांनी गोधरातील घटना समर्थनीय (Rationalize) ठरविली. गोधरा अग्निकांडाला समर्थनीय ठरवत असताना आपण ती योग्य आहे (Justify), असे म्हणत नसल्याचेही खुलासे बहुतेकांनी केले. पण प्रत्यक्षात त्यांनी गोधरा अग्निकांडाला समर्थनीय तर ठरविलेच, पण काही प्रमाणात ती योग्य असल्याचेही म्हटले. ‘भडकाविण्या’तील बनावटगिरी किंवा माध्यमरचित ‘चिथावणी’ वीर संघवी यांनी सांगितल्यानुसार काही लोकांनी असे म्हटले की रामसेवकांनी मुस्लिमविरोधी घोषणा दिल्या, तर काहींच्या मते त्यांनी मुस्लिम प्रवाशांना त्रास दिला. पहिली गोष्ट म्हणजे असे सर्व दावे पूर्णपणे खोटे आहेत. कारण तसे काहीही झाल्याचा एक कणही पुरावा नाही. असे असूनही टीव्ही वाहिन्या आणि वृत्तपत्रे यांनी अशा स्वरचित कहाण्या प्रसारित केल्या. हा चिथावणी देण्यातला तपशिलाचा भाग होता. बहुतेकांनी गोधरा ही विहिंपच्या राममंदिर आंदोलनाची प्रतिक्रिया होती, असेच म्हटले. अयोध्या आंदोलनच या हत्याकांडासाठी चिथावणी देणारे ठरले, असे त्यांनी म्हटले. 11 ‘इंडिया टुडे’, ‘द वीक’, ‘आऊटलुक’ या साप्ताहिकांनी आणि ‘फ्रंटलाइन’ या पाक्षिकाने आपल्या अंकात अशा तद्दन खोट्या कहाण्या प्रकाशित करून हिंदूंनीच गोधरासाठी चिथावणी दिल्याचे काल्पनिक प्रसंग उभे केले. यामध्ये गोधरा स्टेशनवर मुस्लिम चहावाला आणि रामसेवक यांच्यात झालेले भांडण किंवा स्टेशनवरून रामसेवकांनी एका मुस्लिम मुलीला पळविल्याची घटना अशा बनावट, खोट्या तपशिलांचा त्यात समावेश होता. गोधरातील अग्निकांड पूर्वनियोजित होते हे पूर्णपणे माहीत असूनही बहुसंख्य माध्यमांनी सुचेल ती चिथावणी जबरदस्तीने शोधण्याचा प्रयत्न केला. वीर संघवी यांच्या ‘हिंदुस्तान टाइम्स’ नेच गोधरा हत्याकांडाचे वार्तांकन करताना २८ फेब्रुवारी २००२ ला पहिल्या पानावर शीर्षक दिले होतेे – ‘अयोध्येचा गुजरातला तडाखा’. म्हणजे त्यांनी गोधरा हत्याकांडासाठी अयोध्या आंदोलनाला मुख्य आणि सर्वांत मोठे कारण ठरविले होते. एवढेच नाही, तर शीर्षकामध्ये मूळ घटनेचा उल्लेखही न करता केवळ काल्पनिक चिथावणीलाच महत्त्व दिले. ‘‘गोधरामधील हल्ल्यात ५८ रामसेवकांची जाळून हत्या’ हे किंवा असे शीर्षक ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सुचले नाही. दक्षिण भारतातील सर्वाधिक खपाचे इंग्रजी वृत्तपत्र असलेल्या ‘द हिंदू’ने १ मार्च २००२ च्या आपल्या अंकात या संदर्भात लिहिलेले संपादकीय असे आहे: ‘‘प्राणघातक वाढ ‘‘अयोध्येहून परतणार्‍या कारसेवकांवर बुधवारी झालेल्या थरकाप उडविणार्‍या अग्निकांडात साबरमती एक्स्प्रेसमधील ५० पेक्षा जास्त लोक जाळून टाकल्याची घटना आणि त्याचा परिणाम म्हणून गुजरातमध्ये पसरलेल्या दंगली असोत, ज्यात जमावांनी अल्पसंख्यकांना लक्ष्य करून त्यांच्या संपतीवर हल्ले केले आहेत, दोन्ही घटना अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी विश्‍व हिंदू परिषदेने देशभर सुरू केलेल्या विध्वंसक अभियानाचाच थेट परिणाम आहे. गोधरामध्ये काय घडले, याबद्दल वेगवेगळी आणि परस्परविरोधी मते व्यक्त झाली आहेत. पण या भयंकर घटनेचा नि:संदिग्धपणे कठोर शब्दात निषेधच केला पाहिजे आणि निष्पाप लोकांच्या हत्येला योग्य ठरविण्यासाठी कोणत्याही चिथावणीला दूरान्वयानेही इथे आणावे नाही. सरकारने या हत्याकांडाला जबाबदार असणार्‍यांचा त्वरित शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर न्यायाला आणले पाहिजे. राज्यात वाढत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांना, त्या हाताबाहेर जाण्यापूर्वीच, नियंत्रणात आणले पाहिजे. आणि लोकांच्या मनात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण केला पाहिजे. हे सर्व म्हटल्यानंतर एक कटू सत्य स्पष्टपणे सांगितलेच पाहिजे की गोधरासारख्या भयंकर घटना घडणार हे आधीच सांगता येण्यासारखे होते, कारण हा विहिंपच्या आक्रमक धर्मांध आंदोलनाचा परिणाम आहे.काय वाटेल ते होऊ दे, पण आम्ही १५ मार्चपासून अयोध्येत राममंदिराची उभारणी करणारच, अशा निर्धाराने विहिंपने चालविलेल्या जनआंदोलनात दहा लाखहून अधिक रामसेवकांना एकत्र केले- ज्यामुळे धर्मांधतेच्या भावना पसरविल्या. विहिंप आणि संघपरिवाराने तथाकथित ‘अविवादित जमीन’ आमच्या ताब्यात द्या असे अंतिमोत्तर वाजपेयी सरकारला दिले आहे…(उरलेल्या पूर्ण संपादकीयात विहिंप, संघ परिवार यांना ठोकले आहे, व अडवाणींच्या १९९० च्या रथ यात्रेच्या संपूर्ण मार्गावर संप्रदायिक शांतताभंग झाल्याचे म्हटले आहे)’’ गोधरातील हे अमानुष हत्याकांड (अशी घटना मानवी इतिहासात यापूर्वी कदाचित नोंदली गेली नसेल) अनेक विदेशी वृत्तपत्रांनी योग्य ठरवून त्याचे समर्थनच केले. ‘द इंडिपेन्डन्ट’ या ब्रिटिश वृत्तपत्राने मृत कारसेवकांचा अपमान करून त्यांच्यावर बेजबाबदार, निराधार आरोपही केलेत. पीटर पॉफम यांनी २० मार्च २००२ ला लिहिलेला वृत्तांत खाली दिला आहे. हा वृत्तांत इंटरनेटवरूनही सतत फिरत होता व सहज वाचल्या जाऊ शकतो. – ‘‘…बोगी क्र. एस-६ मध्ये जे घडले तो अंतिम सामना होता. कहाणी ३६ तास आधीच सुरू झाली होती. …त्यापैकी अनेकजण दारू प्यायलेले होते किंवा दारूच्या बाटल्या बरोबर घेऊन प्रवास करत होते. लवचिक, सहिष्णू असलेल्या हिंदू धर्मात यासंबधी कडक असे नियम नाहीत. देशातले एकमेव ‘ड्राय’ राज्य असलेल्या गुजरातध्ये ते परत येत होते. हे दारू पिण्यामागचे/जवळ बाळगण्यामागचे आणखीन एक कारण होते. …गाडीला उशीर झाला होता. दीड दिवसाचा प्रवास केल्यानंतर ती साडेचार तास उशिराने धावत होती. म्हणूनच पहाटे २.५५ वाजता गोधरा स्टेशनवर पोचण्याऐवजी ती सकाळी ७-१५ ला पोचली [हे चूक आहे, ही वेळ ७-४२ आहे]. या वेेळेपर्यंत कारसेवक पूर्ण दारुच्या नशेत होते. 12 गोधरापासून ७५ कि.मी. अलीकडे असणार्‍या दाहोड या स्टेशनपासूनच संघर्षाला सुरुवात झाली होती. गाडी दाहोडला सकाळी ६ वाजता पोचली आणि एस-६ बोगीमधून अनेक कारसेवक चहा-नाशतासाठी प्लॅटफॉर्मवर उतरले. ते आधीच नशेत असल्यामुळे त्यांचा स्वत:वर ताबा नव्हता. प्लॅटफॉर्मवरील चहाचा ठेला चालविणारा मुस्लिम आणि कारसेवकांमध्ये बाचाबाची सुरू झाली. एकाच्या म्हणण्यानुसार कारसेवकांनी ‘जय श्रीराम म्हण नाहीतर पैसे देणार नाही’ असे त्या चहावाल्याला सांगितले. मुस्लिम चहावाल्याने नकार देताच कारसेवकांनी गाडीत चढण्यापूर्वी त्याचा ठेला उद्ध्वस्त केला. या चहावाल्याने रेल्वे पोलिसांकडे त्यासंबंधीची तक्रार नोंदवली. [अर्थात, हे सर्व खोटे आहे, असे काहीच झाले नाही. अशी तक्रारही नाही.] गोधरामध्ये पुन्हा अशीच घटना घडली. नशेत धुत झालेले कारसेवक प्लॅटफॉर्मवर उतरले. त्यांनी चहा नाश्ता घेतला आणि तेथील मुस्लिम चहावाल्याशी भांडण सुरू केले. कारसेवक आणि मुस्लिम चहावाला त्यांच्यात नेमके काय घडले याबद्दल साक्षीदाराची मते वेगवेगळी आहेत. पण ‘द इन्डिपेन्डन्ट’च्या बातमीदाराला भेटलेल्या सर्वांचे एका गोष्टीवर एकमत झाले, ती म्हणजे म्हातार्‍या चहावाल्याबरोबर बाचाबाची झाली. आपले नाव न छापण्याच्या अटीवर एका साक्षीदाराने सांगितले, ‘कारसेवकांनी चहावाल्याची मुद्दाम भांडण केले. दाढी ओढली आणि त्याला मारले…त्यावेळी कारसेवक, ‘मंदिर का निर्माण करो, बाबर की औलादको बाहर करो’ अशा घोषणा सतत देत होते.’ अचानक घटनेला वेगळेच वळण लागले. एक कारसेवकाने एका मुस्लिम महिलेला पकडून ठेवले. ती कोण होती, या प्रकरणात कशी ओढली गेली हे अद्याप गूढच आहे. पण चार वेगवेगळ्या साक्षीदारांनी या घटनेचे वर्णन केले आहे. एकाच्या म्हणण्यानुसार ती चहावाल्याची १६ वर्षांची मुलगी होती. बापाला मारहाणीपासून वाचविण्यासाठी ती पुढे आली. दुसर्‍या एकाच्या म्हणण्यानुसार रेल्वेलाइनजवळ कपडे धुणार्‍या महिलेला कारसेवकांनी पकडले. तिसर्‍याच्या म्हणण्यानुसार बुरखा घातलेली एक तरुण मुलगी स्टेशनजवळच्या रस्त्याने शाळेत जात होती. तिला उचलून कारसेवकाने गाडीत घातले. सर्वांच्या म्हणण्यानुसार कारसेवकांनी एका मुस्लिम स्त्रीचे अपहरण केले. एका स्थानिक पोलिसाने आपले नाव न सांगता ही घटना खरी असल्याचे मान्य केले. [अर्थात, हे सर्व धादांत खोटे आहे. असे काहीही झाले नाही.] आणि अचानक आतापर्यंत फार छोटे प्रकरण जास्तच स्फोटक बनले. कारसेवक फार जास्त नशेत होते नाही तर अशी स्टंटबाजी करण्यासाठी त्यांनी दुसरे स्टेशन निवडले असते. कारण आता गोधराचे विशिष्ट सामाजिक भूगोल या खेळात रंग भरायला लागले. …हिंदूंच्या दुर्दैवाने गोधरा स्टेशन अशा ठिकाणी आहे, जे संपूर्णपणे मुस्लिम आहे. रेल्वे मार्गावर दोन्ही बाजूंनी मुस्लिम दुकानदारांची, विशेेषत: मोटार दुरुस्ती करणार्‍यांची दुकाने आणि गॅरेज आहेत. या छोट्या झोपडपट्टीला ‘सिग्नल फ़ालिया’ म्हटले जाते. या व्यवसायांमुळे दंगलीसाठी आवश्यक असणारी दगड, विटा, पेट्रोल, पॅराफीन, गॅस सिलेंडर अशी साधने येथे सहज उपलब्ध होती. त्या बरोबरच गुन्हेगारांचे अड्डे तेथे असल्यामुळे आणि त्यावरच अनेकांचा रोजगार असल्यामुळे दंगलीसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळही उपलब्ध होतेच. कारसेवकांनी मुस्लिम महिलेला बोगी क्र. एस. ६ मध्ये नेले, व याचे वृत्त सर्वत्र पसरले. दुसर्‍या बाजूने येणारी गाडी पकडण्यासाठी उभ्या असलेल्या अहमदने सांगितले की ‘ती मुलगी मदतीसाठी ओरडत होती. त्या गाडीतून प्रवास करणारे मुस्लिम प्रवासी गाडीतून उतरले आणि त्या मुलीची सुटका करण्यासाठी गर्दी वाढत गेली. त्यामुळे काहीतरी भयंकर घडणार हे समजून मी घरी पळून गेलो…’ गाडी पुढे निघाली तेव्हा प्लॅटफॉर्मवर जमलेल्या जमावाने गाडीवर दगडफेक सुरू केली. गाडीत असलेल्या कुणीतरी साखळी ओढली. गाडी थांबली, पण पुन्हा सुरू होऊन पुढे निघाली. ती जेमतम १ कि.मी.पुढे पोचली असताना कोणीतरी पुन्हा साखळी ओढली. मग गाडी थांबली आणि थांबलेलीच राहिली. एका साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार “जवळपासच्या भागामधून जमाव गाडीजवळ जमायला लागला. जमावाने ‘त्या मुलीला परत करा’ अशी मागणी कारसेवकांकडे केली. मुलीला परत करण्याऐवजी कारसेवकांनी बोगीच्या खिडक्या बंद करून घेतल्या. त्यामुळे जमाव संतप्त झाला.” आता बाचाबाचीला हिंसक संघर्षाचे स्वरूप आले. कारसेवक हातात तलवारी व काठ्या घेऊन जमावासमोर आले. तोपर्यंत बाहेरचा जमाव हजारांवर पोचला होता. जवळच्या झोपडपट्टीतून आलेले लोक पेट्रोल, गॅस अशी ज्वलनशील साधने बरोबर घेऊन आले होते. त्यांनी गॅस सिलेंडरच्या साहाय्याने खिडक्यांवरचे गज तोडले आणि सिलेंडर आत फेकले. नंतर त्यांनी पेट्रोल बॉंब आत फेकले. त्यामुळे आत अडकलेले लोक आगीत बळी पडले. तासाभरानंतर जेव्हा पोलिस संख्येने घटना स्थळी पोचले तेव्हा वाचविण्याजोगे काहीच शिल्लक नव्हते…’’ अर्थात, हे सर्व खोटे आहे. ‘द इंंडिपेन्डन्ट’ सारखे विदेशी वृत्तपत्र अशा थराला जाऊन लिहिते, त्याचे कारण भारतीय माध्यमे आहेत. भारतीय माध्यमांनीच मृत कारसेवकांचा वारंवार अपमान केला आणि मुस्लिम धर्मांधांचे समर्थन केले. त्यामुळे अशा विदेशी लेखकांनी असे लिहिले. १५ लहान मुलेही दारू प्यायली होती, असे या लेखकाला वाटते का? २५ महिलाही बळी पडल्या, त्यांचे काय? या लेखकाच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगितली पाहिजे की या युक्तिवादाने ग्रॅहॅम स्टेन्सने त्याची हत्या ओढवून घेतली होती (हा एक ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन मिशनरी होता ज्याची हत्या जानेवारी १९९९ मध्ये ओदिशामध्ये झाली होती). स्टेन्स गरीब, निष्पाप हिंदूंचे धर्मांतरण करीत होता आणि धर्मांतरण थांबविण्याच्या वारंवार दिलेल्या चेतावणींकडे दुर्लक्ष केले. तरीही मृत व्यक्तीचा अपमान करायचा नाही म्हणून आम्ही स्टेन्सवर 13 टीका करत नाही. पण या वृत्तपत्राने हे केले व मृत हिंदूंचे चारित्र्य हननही केले. या विदेशी वृत्त्पत्राच्या थापा व मृत कारसेवकांचे चारित्र्य हनन हे उत्तर देण्यायोग्यही नाहीत इतक्या खालच्या स्तराचे आहेत. त्यावेळचे रा.स्व.संघाचे प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी ‘तरुण भारत’ या मराठी दैनिकात जुलै २००२ मध्ये एका लेखात लिहिले होते- ‘‘द टाइम्स ऑफ इंडियाच्या २८ फेब्रुवारीच्या अंकातील वार्तांकनाचे शीर्षक असे आहे: ‘गुजरात ट्रेनवर जमावाचा हल्ला, ५५ ठार.’ या वार्तांकनाचे लेखक आहेत सज्जद शेख. गोधरा हत्याकांडाची कारणे सांगताना ते लिहितात- ‘गाडीतील कारसेवकांनी सिग्नल फालियाजवळ सफाई काम करणार्‍या (Washerwoman) काही महिलांशी गैरवर्तन केले. ते पुढे म्हणतात, ‘दाहोडमधील धार्मिक स्थळांवर हल्ला झाल्याची अफवा गोधरा अग्निकांडाला कारणीभूत ठरली.’ ज्या घटनांचा उल्लेख त्याने केला आहेे त्यावरून ५५ लोकांना जाळून मारणे समर्थनीय असल्याचे त्याला सुचवायचे नसले, तरी कारणे समजण्यासारखी आहेत, हे त्यातून व्यक्त होते. या मुख्य वृत्तामध्ये सुरुवातीपासूनच सर्व दोष कारसेवकांना दिला गेला आहे. पण सिग्नल फालियाजवळ गाडी कशी थांबली आणि तिथे हजारोंचा जमाव दगड, काठ्या, पेट्रोल बॉंब, स्फोटके घेऊन का उभा होता आणि गाडीची वाट पाहत होता, याची चौकशी करण्याचा मात्र त्याने प्रयत्न केला नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या १ मार्चच्या अंकात सिद्धार्थ वरदराजन यांची एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. ते म्हणतात, ‘साबरमती एक्स्प्रेसवरील हल्ला कितपत पूर्वनियोजित होता की नाही हे अधिकृत चौकशीनंतरच कळेल. पण एका गोष्टीबद्दल अजिबात शंका नाही की गुरुवारी (२८ फेब्रुवारीला) गुजरातमध्ये मुस्लिमांवर झालेले हिंसक हल्ले निश्चितच पूर्वनियोजित होते. २७ फेब्रुवारी आणि २८ फेब्रुवारीच्या घटना वेगळ्या काढताना बातमीदाराने लावलेले दुहेरी मापदंड स्पष्ट दिसतात. २७ फेब्रुवारीचा कारसेवकांवरचा हल्ला पूर्वनियोजित होता की नाही हे ‘अधिकृत चौकशीनंतर ठरेल’ असे वरदराजन म्हणतात पण २८ तारखेला हिंदूंनी केलेल्या हिंसक प्रतिकाराबाबत मात्र ते स्वत:च निर्णय घेतात आणि मुस्लिमांवरील हल्ले पूर्वनियोजित होते, असे सांगून टाकतात. त्यामुळे मूळ भयंकर घटनेचे ते समर्थन (Rationalization) करतात आणि उत्स्फूर्त प्रतिक्रियेला मात्र पूर्वनियोजित ठरवून मोकळे होतात. ही बातमी गोधरा हत्याकांडांनतर दोनच दिवसांनी प्रसिद्ध झाली आहे. या संपूर्ण ४५०+ शब्दांच्या बातमीत कारसेवकांवरील हल्ल्याचा उल्लेख फक्त एकदाच आला आहे, व बाकी पूर्ण लेख या घटनेनंतर मुस्लिमांच्या भीषण कत्तली कशा झाल्या याचे वर्णन करण्यात गेला आहे.’’ (URL: www.hindunet.org/hvk/articles/0702/99.html ) ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राने २७ फेब्रुवारीच्या घटनांचे वार्तांकन २८ फेब्रुवारी २००२ च्या अंकात असे केले. ‘जमावाने गुजरातेत रेल्वे पेटविल्यामुळे ५७ मृत’ हे बातमीचे शीर्षक आहे. बातमीदार मानस दासगुप्ता या बातमीत म्हणतात- “प्रत्यक्ष साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार १२०० रामसेवक या गाडीतून प्रवास करत होते. याच गाडीने काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाताना रामसेवकांनी जी असभ्य भाषा वापरली होती आणि ज्या घोेषणा दिल्या होत्या त्यामुळे स्थानिक मुस्लिम चिडले (Irritate) होते. ही गाडी परतीच्या प्रवासात गोधरा स्टेशनवर येत असताना या रामसेवकांनी वृत्तांनुसार घोेषणाबाजी केली होती.’’ (संदर्भ: http://www.thehindu.com/2002/02/28/stories/2002022803070100.htm) ‘द इन्डिपेन्डन्ट’ ने जे टोक गाठले ते मात्र सुदैवाने कोणत्याही भारतीय वृत्तपत्राने गाठले नाही, पण भारतीय माध्यमांचा खरा चेहरा मात्र ‘द इन्डिपेन्डन्ट’च्या बातमीवरून जगासमोर आला. भारतीय माध्यमांनीही अशाच प्रकारचे वार्तांकन केले होते. फरक इतकाच की त्यांनी टोक गाठले नाही. विदेशी माध्यमांत आलेल्या बातम्यांकडे दुर्लक्ष केले, तरी वीर संघवींचे दुसरे निरीक्षण तेवढेच महत्त्वाचे आहे. ११ सप्टेंबरला घडलेल्या घटनेपूर्वी दिलेल्या ‘चिथावण्यांकडे’ भारतीय धर्मनिरपेक्षतावाद्यांनी लक्ष दिले होते का? सत्य असे आहे की ११ सप्टेंबर पूर्वी ओसामा बिन लादेनच्या अल कैदाने ‘अमेरिकेने त्यांचे मुस्लिमविषयक धोरण बदलावे. नाहीतर परिणामांना तयार रहावे’ अशा चेतावण्या वारंवार दिल्या होत्या. पण अल कैदाच्या चेतावण्या कोणीही आठवल्या नाहीत किंवा अमेरिकेच्या मुस्लिम धोरणावरही कोणीही प्रश्न विचारले नाहीत. ११ सप्टेंबरच्या घटनेनंतर सर्वांनी चर्चा केली ती अल कैदामुळे जगासमोर निर्माण झालेल्या धोक्याची आणि त्यांनी फक्त इस्लामी दहशतवादाचा निषेध केला. 14 आपल्याकडे मात्र गोधरा हत्याकांडानंतर या घटनेला विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवार यांना जबाबदार धरून ठोकून काढण्यात आले. संघ परिवाराविरुद्ध गरळ ओकल्याच्या या प्रकाराकडे वीर संघवी यांनीही त्यांच्या लेखात लक्ष वेधले आहे. ते म्हणतात, ‘‘आपण आपल्याच विचारांचे एवढे कैदी झालो आहोत का, की एवढ्या भीषण हत्याकांडालाही आपण संघपरिवाराला ठोकण्याचा प्रसंग बनवावा?’’ वीर संघवींनी मान्य केलेला कारसेवकांचे माणूसपणही नाकारण्याचा हा मुद्दा सर्वांत महत्त्वाचा आहे. १५ मुलांसह कारसेवकांच्या बाबतीत माध्यमांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे, त्यांचे माणूसपणही नकारल्यामुळे (dehumanization) देशभर संताप उसळला, ‘गोधरा’ जेथे घडले, त्या गुजरातमध्ये तर अधिकच. समजा, अनेकजण म्हणतात त्याप्रमाणे कारसेवकांनी गैरवर्तन केले असते किंवा चहाचे पैसे देण्याचे नाकारले असते किंवा मुस्लिमविरोधी घोषणा दिल्या असत्या किंवा मुस्लिम प्रवाशांवर टीका टिप्पणी केली असती, तरीही त्याचा उल्लेख जरी केला असता तरी जे घडले त्याबद्दल मृतांना दोषी ठरवायला नको होते. (कारसेवकांवर झालेले आरोप संदिग्ध आणि परस्पर विरोधी आहेत. याचाच अर्थ त्या जबरदस्ती केलेल्या खोट्या स्वरचित चिथावण्या आहेत.) ग्रॅहॅम स्टेन्स प्रत्यक्षात धर्मांतरण करत होता आणि अनेक वेळा चेतावणी देऊनही त्याने ते थांबविले नव्हते. तरीही त्याच्या हत्येबद्दल त्यालाच कोणी दोषी धरत नाही, कारण कोणीही मृतांचा अपमान करत नाही. पण या घटनेमध्ये कारसेवकांनी काहीही केले नसताना, मृतांनाच दोषी ठरविण्यासाठी त्यांच्यावर निराधार आणि संपूर्णतया चुकीचे आरोप केले गेले. कारसेवकांनी कोणतही गैरवर्तन केले असते, तरीही अशा प्रकारचे अग्निकांड समर्थनीय ठरू शकत नाही. इथे मात्र हिंदूंना जाळून मारणार्‍या मुस्लिमांना दोषी ठरवण्याऐवजी बहतुेक माध्यमांनी विशेषत: टीव्ही माध्यमांनी आणि राजकारण्यांनी कारसेवकांवर खोटे आरोप केले, जेव्हा मृत व्यक्ती त्यांचे खंडन करायला जिवंतही नव्हते. आणि सर्व आरोप पूर्णत: चुकीचे होते. या मानवी शोकांतिकेत, पूर्वनियोजित भीषण हत्याकांडात ज्यांना आपले जीव गमवावे लागले, त्यांच्यावरच त्यांनी न केलेल्या गोष्टींचे खोटे आरोप केले गेलेत. टीव्ही माध्यमे आणि वृत्तपत्रांच्या या धोरणाचीही गुजराती लोकांना सवय झाली होती. हिंदू विचारधारेवरचे हल्ले, कारसेवक, अयोध्या आंदोलन, विश्व हिंदू परिषद यांना सतत दोष देत मुस्लिमांचेच समर्थन करायचे, ही त्यांची वृत्तीही गुजराती लोकांना माहिती होती. पण गोधरा हत्याकांड हे जरा जास्तच आहे, असे लोकांना वाटले. स्वयंघोषित धर्मनिरपेक्षतावाद्यांचे ह्रदय एवढ्या भीषण हत्याकांडात १५ लहान मुलांसकट निष्पापांचे बळी गेल्याने तरी विरघळेल असे वाटले होते. किमान या भीषण घटनेनंतर तरी कारसेवकांचा अपमान करणे, विहिंपला आणि अयोध्या आंदोलनाला ठोकणे ते थांबवतील असे वाटले. आता तरी माध्यमे, गैर-भाजपा राजनेते धर्मांध मुस्लिमांचा निषेध करतील, जिहादी म्हणून कोणतीही चिथावणी नसलेले हत्याकांड केल्याबद्दल त्यांच्यावर टीका करतील, असे गुजराती लोकांना वाटले. पण असे काहीच घडले नाही. माध्यमे त्यांच्या नेहमीच्याच पद्धतीने वागत राहिली आणि वीर संघवी यांना हिंदूंची तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची वाटत असलेली भीती गुरुवार दि. २८ फेब्रुवारी २००२ ला खरी ठरली. पण सुरुवातीच्या ३ दिवसात उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियेनंतर वीर संघवी यांना आपल्याच शब्दांचा विसर पडला. धर्मनिरपेक्षतावादी बंधूंना चेतावणी देताना ‘ते त्यांच्या भूमिकेमुळे हिंदूंना प्रक्षोभित करत आहेत’ असे संघवी म्हणाले होते. त्यांनी स्वत: हिंदूंमध्ये असलेल्या रागाबद्दल आणि प्रतिकाराच्या शक्यतेबद्दल जे म्हटले होते, त्याचा त्यांना गोधरानंतरच्या दंगलींचा निषेध करताना विसर पडला आणि त्यांनी आपल्या वृत्तपत्रातून पुढे अनेक वेळा नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘मास मर्डरर’ म्हणजे ‘सामूहिक खुनी’ असा केला. हिंदूंचा हा राग केवळ दंगली संपेपर्यंतच टिकला असे नाही तर तो पुढेही कायम राहिला. निदान डिसेंबर २००२ पर्यंत तरी तो कायम होता. १२ डिसेंबर २००२ ला गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक झाली. 15 त्यात भाजपाने १८२ पैकी १२७ जागा मिळवून प्रचंड बहुमत मिळविले, तर कॉंग्रेसला फक्त ५१ जागा जिंकता आल्या. एवढेच नाही, तर भाजपाच्या मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांवर पोचली, म्हणजे कॉंग्रेसच्या ३९ टक्के मतांपेक्षा ११ टक्क्यांनी जास्त. गोधरानंतर दंगली न झालेल्या सौराष्ट्र आणि कच्छ भागातही भाजपालाच अभूतपूर्व यश मिळाले. ‘इंडिया टुडे’ साप्ताहिकाच्या ३० डिसेंबर २००२ च्या अंकातील माहितीनुसार दंगलीचा प्रभाव असलेल्या १०२ मतदारसंघांपैकी भाजपाने ७९ जागा जिंकल्या. हे आकडेसुद्धा शंकापूर्ण आहेत, पण तरी ते खरे धरून चालू. याचा अर्थ ज्या भागात दंगलींचा प्रभाव नव्हता, त्या भागातील ८० पैकी ४८ जागा भाजपने जिंकल्या. म्हणजेच ६० टक्के जागा जिंकल्या. १९९५ पासून दोन वेळा सलग भाजपा सत्तेवर आला असला तरीही ६० टक्के जागांवर विजय हा प्रचंडच म्हटला पाहिजे. ७ वर्षे सत्तेवर असल्याचा फटका भाजपाला बसण्याऐवजी (anti-incumbency) पक्षाने जे यश मिळवले, त्याचे कारण गोधरा आणि त्यावर धर्मनिरपेक्षतावादी ब्रिगेडच्या प्रतिक्रियेची संतप्त हिंदू प्रतिक्रिया होती. डाव्या उदारमतवादी धर्मनिरपेक्ष ब्रिगेडने आणखी एक मोठी चूक केली. गोधरा हत्याकांडात हल्ला करणार्‍या मुस्लिमांचा आकडा त्यांनी शक्य तेवढा कमी सांगण्याचा प्रयत्न केला. कुलदीप नय्यर यांनी ‘डेक्कन हेराल्ड’मध्ये ३ एप्रिल २००२ ला लिहिलेल्या लेखात हल्लेखोर ५०० होते, असे म्हटले. ‘इंडिया टुडे’ ने ११ मार्च २००२ च्या अंकात हा आकडा ५०० हून जास्त, असा दिला. गोधराविषयी ६ जुलै २००२ ला लिहिलेल्या लेखात कुलदीप नय्यर यांनी म्हटले: ‘‘गोधरा घडले नसते, तर नरेंद्र मोदींनी हे घडवून आणले असते. दुर्दैवाने काही मुस्लिम त्यांच्या हातात खेळले.’’ बाकीचे लेखक हल्लेखोरांचा आकडा हजारच्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करीत होते, तर काहींनी तो दीड हजार दिला. वीर संघवी आणि न्या. तेवाटिया समितीने तो दोन हजार दिला आहे, तो योग्य वाटतो. गोधरा हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या हिंदूंचा आकडा आलोक तिवारी या धर्मनिरपेक्षतावादी संपादकांनी ५६ देताना म्हटले- “केवळ ५६ हिंदूंची हत्या झाली, याचा अर्थ शेकडो मुस्लिमांची हत्या केली पाहिजे, असा होत नाही.’’ खरे तर गोधरातील हल्लेखोरांची संख्या दीड हजार होती का दोन हजार हे महत्त्वाचे नाही. पण हे आकडे देण्यातून माध्यमांची वृत्ती स्पष्ट होते. हिंदूंचे होणारे नुकसान कमीत कमी दाखवा, मुस्लिमांचे अत्याचार शक्य तेवढे कमी वर्णन करा आणि मुस्लिमांच्या दु:खांचे मात्र सर्वाधिक भांडवल करा व अतिशयोक्ती करा, ही धर्मनिरपेक्षतावाद्यांची वृत्ती यातून स्पष्ट होते. गुजतरातमध्ये झालेल्या दंगली एकतर्फी नव्हत्या. त्यामध्ये शेकडो हिंदूंचा मृत्यू होऊनही या माध्यमांनी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून मृत मुस्लिमांची संख्या मात्र सतत वाढवीत नेली. केंद्रात सत्तेवर आलेली संयुक्त पुरोगामी आघाडी, संघ, भाजपा आणि मोदी यांची कट्टर विरोधी असूनही त्यांनी या दंगलीत मृतांची संख्या ७९० मुस्लिम आणि २५४ हिंदू अशी दिली. (आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधी करत होत्या आणि डाव्यांचा त्यांना बाहेरून पाठिंबा होता.) पण माध्यमे मात्र मृत मुस्लिमांची संख्या हजार, दोन हजार, तीन हजार सांगत होती. “राज्य सरकारनेच प्रायोजित केलेल्या या नरसंहारामध्ये हजारो मुस्लिम मारले गेले”, असेही या माध्यमांनी सांगून टाकले. असे खोटे सांगून त्यांना काय मिळते? गोधरा पूर्वनियोजित, नंतरची दंगल चिथावणीचा परिणाम गोधरातील हल्ला कोणत्याही चिथावणीशिवाय पूवनियोजित होता, हे स्पष्ट आहे. गोधरा स्टेशनवरील छोट्या बाचाबाचीचे रूपांतर इतक्या मोठ्या अग्निकांडात होणे, हे अशक्य आहे. वीर संघवी यांनी आपल्या लेखात हेच म्हटले आहे. ते म्हणतात की चालत्या गाडीतून दिलेल्या घोषणा किंवा प्लॅटफॉर्मवरील घोषणा मुस्लिमांना भडकावतील आणि केवळ ५ मिनिटात दोन हजारांहून अधिक मुस्लिम पेट्रोल बॉंब, ऍसिड बॉंब घेऊन पोचतील हे आश्चर्यजनक वाटते. ती वेळही सकाळी ८ वाजताची होती. एक माहितीनुसार हत्याकांडाच्या आदल्या रात्री १४० लिटर पेट्रोल कॅनमध्ये भरून आणण्यात आले होते. गुजरातच्या विश्व संवाद केंद्राच्या म्हणण्यानुसार आधीच्या दाहोड स्टेशनवर विशिष्ट जमातीच्या लोकांना खाली उतरण्यास सांगितले होते. ही माहिती लेखकाने स्वंतत्रपणे तपासलेली नाही. 16 ‘इंडिया टुडे’ सारख्या साप्ताहिकाने कथित चिथावणी दिल्या व ग्राफिक्सही (चित्र) प्रसिद्ध केली. पण हे सर्व लोक एक गोेष्ट विसरले. रेल्वे गाडीवर हल्ला करायचा असेल, तर हल्लेखोर जमावाला गाडीच्या किमान दोन बाजूंनी यावे लागेल. अग्निकाडांची ही घटना उत्स्फूर्तपणे घडली, असे मानले तर मुस्लिमांना गाडीला दोन्ही बाजूंनी घेरणे फार अवघड होते. मग किमान ५०० हल्लेखोर तरी गाडीच्या दुसर्‍या बाजूला कसे पोचले? तसे घडले नसते, तर हल्लेखोरांच्या हल्ल्यानंतरही कारसेवक गाडीच्या दुसर्‍या बाजूने उड्या टाकून पळून जाऊ शकले असते. तसेही या घटनेत सांगितल्या जाणार्‍या चिथावणीच्या सर्व गोष्टी काल्पनिक आणि विरोधाभासी आहेत. कुलदीप नय्यर (जन्म १९२३) अतिशय संघ, भाजपा विरोधी आणि मुस्लिमांच्या व पाकिस्तानच्या बाजूचे म्हणून ओळखले जातात. तरीही ३ एप्रिल २००२ ला लिहिलेल्या आपल्या लेखात ते स्पष्टपणे म्हणतात- ‘‘गोधराचा हल्ला पूर्वनियोजित होता, याबद्दल मला कोणतीही शंका नाही. कारण त्याशिवाय केवळ ३ मिनिटात ५०० हल्लेखोर पेट्रोल, रॉकेल यासह येऊन अशा ठिकाणी पोचणे शक्यच नाही जेथे केवळ झाडाझुडपातून पळत यावे लागते.’’ खरे सांगायचे तर असा अमानुष गुन्हा कोणी मुक्या प्राण्यांच्या बाबतीतही करू नये. ५९ जनावरे जर अशाच पद्धतीने गाडीत बंद करून आगीत ढकलून, होरपळून मारली असती, तरीही प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने त्याला भीषण शोकांतिकाच म्हटले असते. पण हे कारसेवक असल्याने त्यांच्यावर खोटे आरोप केले गेले. घटनेचा दिखाऊ निषेध सर्वांनी केला, पण हत्याकांडाचा दोष मुस्लिमांवर न टाकता मृत व्यक्ती आणि विहिंपवर ढकलला. वीर संघवी यांनी म्हटल्याप्रमाणे कारसेवकांचे अ-मानवीकरण करण्यात आले. खरे सांगायचे, तर त्यांना पशूंपेक्षाही वाईट वागणूक मिळाली. आणि त्यानंतर जेव्हा घटना सरळ सरळ चिथावणीतून घडल्या, तेव्हा माध्यमांनी मात्र त्याकडे (चिथावणीकडे) दुर्लक्ष केले. गोधरानंतरच्या दंगलींचे वार्तांकन करताना, गोधरा कांड मात्र संपूर्णपणे दुर्लक्षिले गेले. गोधरा हल्ल्यांना बाजूला ठेवून वार्ताहरांनी फक्त पुढल्या तीन दिवसातील हिंदूंच्या प्रतिकाराचेच रसभरीत वर्णन केले, व त्याचा मोठा विरोध केला. इतक्या वर्षानंतरही आज गोधरानंतरच्या दंगलींचा विषय निघतो, तेव्हाही गोधराकडे दुर्लक्ष करून असे सुचविले जाते की, तेव्हाच्या भाजपा सरकारनेच विहिंप आणि बजरंग दलाच्या मदतीने कोणत्याही चिथावणीशिवाय मुस्लिमांची कत्तल केली. चिथावणीशिवायही खूप मोठ्या असलेल्या गोधराघटनेकडे, जी केवळ चिथावणी नव्हे तर दंगलींचे कारण होती, दुर्लक्ष करून पुढील ३ दिवसातील हिंदू प्रतिकाराची फक्त वार्तांकने केली गेली आणि ही वार्तांकनेही एकतर्फी, वाढवलेली आणि अतिशयोक्तीची होती. माध्यमांच्या वृत्तीतील फरक नंतरच्या त्यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होतो. गोधरानंतर असे म्हटले गेले ‘‘सरकारने तातडीने गुन्हेगारांना पकडून न्यायासनासमोर उभे करावे. या घटनेचा निषेध व्हायला हवा. पण विश्व हिंदू परिषदेच्या अयोध्या आंदोलनामुळे असे काहीतरी घडणारच होते…विहिंपला ठोकणे…’’ गोधरानंतरच्या दंगलींबद्दल मात्र असे म्हटले गेले की, ‘‘नरसंहार, हत्याकांड…,मोदींनी राजीनामा द्यावा…., आंतरराष्ट्रीय लज्जास्पद…., आपण रवांडा किंवा हिटलर सारखे आहोत का?…” वीर संघवी म्हणालेत, ‘‘तुम्ही सत्य सांगितलेत, तर हिंदूंच्या भावना भडकतील आणि हे बेजबाबदारपणाचे ठरेल.’’ याचा अर्थ वीर संघवी हे मान्य करतात की स्वयंघोषित धर्मनिरपेक्षतावादी तद्दन खोटे बोलतात, मग त्यांच्या मनात उद्देश काहीही असो. ते केवळ गोधरा घटनेबद्दलच खोटे बोलले नाहीत तर तर तिच्या ३ महिन्यानंतरपर्यंतही ते खोटेच बोलत होते. डिसेंबर २००२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळातही ते खोटे बोलले. त्यांनी ते खोटे पुन्हा पुन्हा इतके वेळा उगाळले की कदाचित या स्वरचित खोट्या विधानांवर त्यांचाच विश्वास बसायला लागला असावा. 17 २७ फेब्रुवारी २००२ लाच गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ कॉंग्रेस नेते अमरींसह चौधरी (१९४१-२००४) यांनी रात्री टीव्हीवर प्रतिक्रिया दिली, गोधरा घटनेचा निषेध करीत असताना त्यांनी, चहाचे पैसे न देऊन चिथावणी देण्याचा आरोप करून कारसेवकांवरच सर्व दोष ढकलला. (पुन्हा वीर संघवींचेच निरीक्षण. घटनेचा निषेध केला, पण दोष मात्र मृतांनाच दिला.) संघाचे इंग्रजी ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकाने १० मार्च २००२ च्या अंकात २७ फेब्रुवारीपर्यंतच्या सर्व घटनांचे वर्णन केले आहे. याच अंकात ‘ऑर्गनायझर’ने एक बातमीही दिली आहे. ‘‘रा.स्व.संघाकडून हत्यांचा निषेध आणि संयम राखण्याचे आवाहन’’ या बातमीत संघाचे तत्कालीन सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निवेदन दिले आहे. त्यामध्ये देेवींने गोधरा घटनेनंतर हिंदू समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन केले आहे. संघाने असे आवाहन गोधरानंतर लगेच, पण दंगली सुरू होण्यापूर्वी केले होते. ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकाच्या १० मार्चच्या अंकातील या वृत्ताचे छायाचित्र इथे दिले आहे. त्याच अंकात त्याच पानावर संघाचे तत्कालीन सरकार्यवाह मोहन भागवत यांचेही आवाहन प्रसिद्ध केले आहे. मोहन भागवत (जन्म १९५०) यांनी आपल्या आवाहनात शांतताभंग होईल अशी कोणीतही कृती म्हणजे घोषणाबाजी, दगडफेक करू नये, असे आवाहन केल आहे. २७ फेब्रुवारीलाच मोहन भागवतांनी प्रसिद्धीला दिलेले हे आवाहन ‘ऑर्गनायझर’ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याचेही छायाचित्र येथे दिले आहे. 18 ‘इंडिया टुडे’ साप्ताहिकाने ११ मार्च २००२ च्या अंकात या घटनांवर मुखपृष्ठकथा केली आहे. त्यात २८ फेब्रुवारीपर्यंतच्या घटनांचे वर्णन आहे. त्यातील एक वर्णन असे- ‘‘राज्यातील मूड संघर्षाचा आहे. गाडीत जळून मेलेल्या अहमदबादजवळच्या रामोल गावातील ११ मृतांची शवे घेऊन १० हजार लोकांनी शवयात्रा काढली. हा जमाव ‘‘तुम्हारी शहीदी बेकार नहीं जायेगी, मंदिर बनाकर ही रहेंगे’’ यासारख्या घोषणा देत होता…राज्यात मुख्य विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसची या घटनेनंतरची प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाची होती. वरिष्ठ नेते अमरसिंह चौधरी यांनी गोधरा घटनेचा निषेध केला, पण त्यांनी चिथावणीचा आरोप करून रामसेवकांना दोष दिला. अ.भा.कॉंग्रेस समितीचे ज्येष्ठ सदस्य अहमद पटेल यांनी कडक निषेध केला. त्यांना प्रतिक्रिया व्यक्त करायला वेळ मिळेल. गुजरातला ओळखीची असलेली रक्तरंजित हिंसाचाराची साखळी कदाचित आता फक्त सुरू झाली आहे.’’ याचा अर्थ २८ फेब्रुवारीलाच रक्तरंजित हिंसाचाराची साखळी गुजरातमध्ये सुरू झाली आहे, आणि पुढे आणखीन अनेक दिवस ती चालणार आहे, हे ‘इंडिया टुडे’ ला माहीत होते. पण प्रत्यक्षता या दंगली ३ दिवसातच थांबल्या. अहमदाबाद, वडोदरा आणि गोधराजवळच्या काही भागात छोट्या घटना (Stray riots) नंतरही घडत राहिल्या. भाजपाविरोधी आणि मोदीविरोधी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘आऊटलुक’ साप्ताहिकाने ११ मार्च २००२ च्या अंकात म्हटले आहे (प्रत्यक्षात २८ फेब्रुवारीला): ‘‘गुजरात नेहमीच सांप्रदायिक तणावाने स्फोटक बनलेला आहे आणि एखादी लहानशी ठिणगीही मोठे संकट उभे करते. गोधराचे भूत याच मार्गावरून पुढील अनेक महिने जाणार, असे दिसते.’’ (संदर्भ: http://www.outlookindia.com/magazine/story/200-on-the-human-richter/214849 ) 19 गोधरा आणि इतर शोकात्मिक घटनांतील फरक हिंदू समाजाच्या यातना समजू न शकणारे काही लोक विचारतात, ‘‘फक्त गोधरानंतरच दंगली का उसळल्या? अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्यानंतर (२४ सप्टेंबर २००२) किंवा मुंबईच्या २६/११/२००८ च्या हल्ल्यानंतर अशा दंगली का झाल्या नाहीत?’’ याची उत्तरे अनेक आहेत. मुंबई, जम्मू, नवी दिल्ली अशा देशातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात, हे हल्ले दहशतवाद्यांनी केले आणि ते कृत्य दहशतवादाचे होते. गोधरात मात्र हल्ला दहशतवादी नव्हता, तर धर्मांध द्वेषातून झालेला रानटी हल्ला होता (an act of communalism and barbarism). हल्लेखोरही वेगळे होते. दहशतवाद्यांना धर्म नसतो, असे म्हटले जाते. अक्षरधाम मंदिरावर हल्ला करणार्‍यांना माध्यमांनीही दहशतवादी असे म्हटले आणि तेच योग्य होते. त्या हल्ल्यात दोन विदेशी दहशतवाद्यांनी ३० पेक्षा जास्त लोकांना ठार मारले. हे कृत्य स्थानिक मुस्लिमांनी केले नव्हते. ‘अक्षरधाममध्ये मुस्लिमांनी ३० हिंदूंना ठार केले’ असे कोणत्याही माध्यमाने म्हटले नाही. ‘अक्षरधाम मंदिरावर दहशतवाद्यांचा हल्ला’ असे म्हटले. या दोन्ही घटनांप्रमाणेच (अक्षरधाम व २६/११) २७ फेब्रुवारी २००२ ला टीव्ही वाहिन्या, वृत्तपत्रे आणि भाजपाविरोधी नेत्यांनी गोधरा घटनेला ‘‘मानवी शोकांतिका’’ असे म्हटले असते, तर कदाचित पुढच्या दंगली टाळता आल्या असत्या. गोधरात जमाव किमान १ हजारांच्या वर होता आणि तेवाटिया समितीच्या अहवालानुसार तो दोन हजार होता. अनेक इंग्रजी वृत्तपत्रांनी दुसर्‍या दिवशी दिलेल्या बातमीप्रमाणे २७ फेब्रुवारीच्या हल्ल्यासाठी त्यादिवशी केवळ ३५ जणांना अटक झाली होती, जे लोकांना फार कमी वाटले. गुजरातचे उत्कृष्टपोलीस अधिकारी एम.एम.सिंग यांच्या म्हणण्यानुसार हत्याकांडानंतर गोधराचा तो परिसर पोलिसांनी संपूर्णपणे घेरायला हवा होता. पोलिसांनी संपूर्ण परिसर घेरला असता, तर हिंदूंच्या भावना काही प्रमाणात काबूत राहिल्या असत्या, असे सिंग म्हणाले. ‘इंडिया टुडे’ सारख्या साप्ताहिकानेही १८ मार्च २००२ च्या अंकात म्हटले की ‘दंगलींचा दोष मोदी सरकारवर टाकल्या जात आहे- गोधरा हत्याकांडातील आरोपींना पकडण्यात आलेल्या अपयशामुळे.’ या साप्ताहिकानुसार हल्लेखोरांना पळून जाण्याची संधी मिळू दिली नसती, तर लोकांचा राग सर्व मुस्लिमांवर निघाला नसता. हे साप्ताहिक म्हणते- ‘‘गोधरा हत्याकांडाला जबाबदार असणार्‍यांना अटक करण्यात मोदी सरकारला अपयश आल्यामुळे २८ फेब्रुवारीचा प्रारंभिक उद्रेकाचा दोष सरकारवर दिला जात आहे. ज्या झोपडपट्टीतून हा हल्ला करण्यात आला, ती रेल्वेच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या उभी होती आणि हल्ल्यातील प्रमुख १० संशयितांपैकी प्रत्येकाचे गुन्हेगारी रेकॉर्ड होते. त्यापैकी काहींना राजकीय आशीर्वादही होता. मुख्य संशयित हाजी बिलाल याचे संबंध चोरट्या व्यापाराशी आणि चोरटी मानवी वाहतूक करणार्‍यांशी होते. एका भाजपा आमदाराच्या म्हणण्यानुसार हाजी इतका ताकदवान गुंड होता की काही महिन्यांपूर्वी त्याच्या घराच्या दारावर अधिकार्‍यांना नोटीस चिकटवणेही कठीण झाले होते. २७ फेब्रुवारीलाच विश्व हिंदू परिषदेने ‘या लोकांवर तातडीने कारवाई करा’ अशी मागणी सरकारकडे केली होती. पण तसे न झाल्यामुळे लोकांच्या संतापाचा आगडोंब सर्व मुस्लिमांवर कोसळला.’’ (संदर्भ: http://archives.digitaltoday.in/indiatoday/20020318/cover3.html). गोधरातील कृत्य स्थानिक मुस्लिमांनी केले होते आणि त्यापैकी बहुतेकजण मुक्त सुटले, माध्यमे मृत कारसेवकांचा अपमान करत राहिली आणि विहिंप, संघपरिवार यांना ठोकत राहिली, व त्याचा परिणाम म्हणून अखेर २८ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये संतप्त लोकांचा उद्रेक झाला. ‘‘दगडफेकीनंतर ते रॉकेलचे डबे घेऊन आमच्या डब्यात शिरले आणि त्यांनी आग लावली. आमच्यापकी काही जणांनाच खिडक्या तोडून बाहेर जाता आले. मोठी माणसे आणि म्हातारी माणसे मात्र आतच अडकली. म्हातारया महिला ‘आम्हाला मारू नका’ असे विनवत होत्या. पण त्यांनी ऐकले नाही.’’ या जळीत कांडातून वाचलेली १६ वर्षांची गायत्री पांचाळ सांगत होती. आपण गाडीतून उडी मारल्यानंतरही ३-४ लोक आपल्यामागे धावले, असे तिने सांगितले. (इंडियन एक्स्प्रेस, २८ फेब्रुवारी २००२) 20 त्या दुर्दैवी गाडीतून खाली उतरलेली देविका लुहाना ही ६५ वर्षांची महिला संतापाने थरथर कापत होती. ती म्हणाली, ‘‘ही सर्वांत भयंकर गुंडगिरी होती. माझ्यासारख्या म्हातार्‍यांनाही त्यांनी साडले नाही आणि अंदाधुंद दगडफेक केली. या भीषण कृतीबद्दल ते सर्व नरकात जातील.’’ स्वत:च्या जीवासाठी धावताना तिला आपली बॅगही घेता आली नाही. ‘‘ते महिलांच्या डब्यात शिरले आणि आम्ही काही प्रतिसाद देण्याच्या आतच त्यांनी पूर्ण बोगीला आग लावली. आमच्यापैकी काहीजण निसटू शकले, पण आमच्या अनेक बहिणी आगीत सापडल्या…हे सर्व भयंकर होते.’’ दुर्गा वाहिनीची कार्यकर्ती हेतल पटेल सांगत होती. त्या घटनेच्या धक्क्यातून १३ वर्षांचा ग्यानप्रकाश अजूनही बाहेर आलेला नाही आणि त्याला दहशत पुन्हा पुन्हा होते व तो सतत रडत असतो. ‘माझ्या डोळ्यासमोर माणसे जळत आहेत, हे मी विसरूच शकत नाही.’ असे तो अहमदाबादच्या नागरी रुग्णालयात उपचार घेताना सांगतो. साबरमती एक्स्प्रेसच्या एस-२ बोगीमध्ये ग्यानप्रकाश होता. त्याचे कुटुंब एका नातेवाइकाची मैयत संपवून अहमदाबादला परत येत होते. ते सर्व कानपूरला गाडीत चढले. ग्यानप्रकाश सांगतो, ‘‘गाडीने गोधरा स्टेशन सोडले व लगेच काही अंतरावर ती थांबली. अचानक गाडीवर प्रचंड दगडफेक सुरू झाली. ही दगडफेक सुमारे तासभर सुरू होती. मग आमच्या डब्यात बाहेरून काहीतरी येऊन पडले आणि सर्वत्र धूर झाला. धूर इतका कोंडला होता की मला श्वासही घेता येत नव्हता. माझे वडील मला म्हणाले, ‘पटकन गाडीतून खाली उतर.’ मी दाराजवळ जाऊन पाहतो तर मी पाहिले की बाहेर पडणार्‍यांना जमाव भोसकत होता. मी दुसर्‍या बाजूला गेलो आणि गाडीतून खाली उडी मारली.” (मिड डे, ६ मार्च २००२) ‘‘आम्हाला मारू नका’’ अशा विनवण्या वृद्ध महिला करीत होत्या, पण हल्लेखोरांनी कोणालाच सोडले नाही, न मुलांना, न म्हातारया माणसांना आणि स्त्रियांना तर मुळीच नाही. सर्वात भयानक हे होते की बाहेर पडू पाहणार्‍या सर्वांना ते आत ढकलत होते आणि दु:खाने विव्हळणार्‍या विनवणी करणार्‍या ५९ हिंदूंना ते जळताना पाहत होते. (गायत्री पांचाळसारख्या ज्या काहींनी आपली सुटका करून घेतली, त्यांनाही पुन्हा गाडीत ढकलण्याचा प्रयत्न झालाच.) २००० लोकांच्या जमावाने ५९ लोकांना गोळ्या घालून मारले असते, तरी हे इतके भयानक नसते. गाडीला आग लावून जमाव पळून गेला असता, तरीही लोक एवढे प्रक्षुब्ध झाले नसते. पण हल्लेखोर जमावाने वर्णनही न करता येणारा रानटीपणा दाखवला. १५ लहान मुलांसह ५९ लोकांना जळताना ते पाहत राहिले आणि बाहेर पडू पाहणार्‍यांना आत ढकलले. पाकिस्तानातील कराची रेल्वेे स्टेशनवर २ हजार हिंदूंनी ५९ मुस्लिमांची जाळून हत्या केली, अशी कल्पना तरी आपण करू शकतो का? पाकिस्तानी हिंदूंनी जर असे केले असते, तर पाकिस्तानमध्ये त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केल्यावर एकेकाला वेचून ठार केले असते. दुसर्‍या दिवशी हिंदूंनी एवढा तीव्र प्रतिकार का केला, हे समजून घ्यायचे असेल तर गोधरा हत्याकांडातील प्रसिद्ध झालेले फोटो पाहायला हवेत. हे सर्व समजून घेण्यासाठी फोटो पाहणे अत्यावश्यक आहे. ‘गोधरा फोटोस’ असा सर्च इंटरनेटरवर टाकला, तरी हे सर्व फोटो पाहता येतील. ते खालील लिंकवरही आहेत. http://www.gujaratriots.com/index.php/2011/10/godhra-photos/ चेतावणी : भयंकर फोटो मानवी दु:ख समजू शकणार्‍या कोणीही हे फोटो पाहिले, तर गुजरातमध्ये झालेल्या प्रतिकाराचे कारण त्याला समजू शकेल. पण काही राजकीय नेते आणि माध्यमे कायम हिंदूंवरच्या यातनांकडे डोळेझाकच करत असतात. काही लोक हिंदूंना आणि विशेषत: विहिंप समर्थकांना माणूस म्हणायलाही तयार नसतात. 21 गोधरासारखी भयंकर घटनासुद्धा तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांचे हृदय वितळवू शकली नाही. गोधरासारख्या घटनेनंतरही ते मुस्लिमांचे समर्थन करतात आणि मुलांसह मृत झालेल्यांना दोष देतात, तर मग नेमके काय घडल्यावर हे ‘धर्मनिरपेक्षतावादी’ मुस्लिमांच्या कुठ्ल्याही कृत्याचा निषेध करतील असा प्रश्न पडतो.

One Response

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *