chapter-7

प्रकरण ८ २००२ च्या गुजरात दंगली आणि १९८४ च्या शीख-विरोधी दंगलींतील फरक

माध्यमांतील एका गटाने गुजरातमधील २००२ च्या दंगली आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ३१ ऑक्टोबर १९८४ ला झालेल्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगली सारख्याच असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. माध्यमांच्या या असत्य कथनाला चांगल्या हेतूचे निर्दोष लोकसुद्धा बळी पडले आहेत. १९८४ च्या शीखविरोधी दंगलींची चौकशी करणारया न्या. नानावटी आयोगाने आपला अहवाल तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांना ९ फेब्रुवारी २००५ ला सादर केला. हा अहवाल ६ महिने दाबून ठेवल्यानंतर मुदतीच्या अखेरच्या दिवशी, म्हणजे ८ ऑगस्ट २००५ ला प्रसिद्ध करण्यात आला. हा अहवाल प्रसिद्ध होताच माध्यमांतील एका मोठ्या गटाने १९८४ च्या दंगलींची तुलना गुजरातच्या २००२ च्या दंगलींशी करण्यास सुरुवात केली व दोघांना समान ठरविले. एन.डी.टी.व्ही.ने या विषयावर ‘द बिग फाइट’ हा कार्यक्रम ऑगस्ट २००५ मध्ये प्रसारित केला. ‘आउटलुक’चे तत्कालीन संपादक विनोद मेहता यांनी या कार्यक्रमात दोन्ही दंगली सारख्याच असल्याचे सांगत म्हटले, ‘दोन्हींमध्ये अनेक गोष्टींचे साम्य आहे. १९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली होती, तर गुजरातमध्ये ‘गोधरा’ घडले… या दोन्ही कारणांमुळे हत्याकांडाला कारण मिळाले…’’ ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या १२ ऑगस्ट २००५ च्या अंकातील संपादकीय असे होते- ‘‘आता मोदींची पाळी टाइटलर आणि सज्जन कुमार यांच्याकडून भाजपाने आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यावा जगदीश टाइटलर यांचा मंत्रिपदाचा आणि सज्जनकुमार यांचा दिल्ली सरकारमधील पदाच्या राजीनाम्यांचे आम्ही स्वागत करतो…दंगलींशी दूरान्वयानेही संबंध असणारया लोकांना सत्तेवर राहू देता कामा नये. धर्मनिरपेक्ष लोकशाहीमध्ये हे गृहीत आहे. मग त्यात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसारखे लोक कसे सुटतात? राजीनामा देण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. टाइटलर यांचा राजीनामा मागण्यात भाजपाबरोबरच त्यांचे सहयोगी पक्ष, अकाली दल आणि जनता दल (युनाइटेड) आग्रही होते. नानावटी आयोगाच्या अहवालावर सरकारने कारवाई करावी, या मागणीसाठी या पक्षांनी संसदी लोकशाहीतील नैतिकता आणि सार्वजनिक जीवनातील नैतिकता याचे कारण दिले. याच सर्व गोष्टी मोदींसाठीही लागू होतात…’’ माध्यमांच्या या भूमिकेनंतर भाजपाच्याच काही नेत्यांनाही या दोन्ही दंगलीत साम्य असल्याचे वाटायला लागले असू शकते. एन.डी.टी.व्ही.च्या ‘द बिग फाइट’ या नोव्हेंबर २००४ मधील कार्यक्रमात बोलताना कॉंग्रेस प्रवक्त्या जयंती नटराजन जेव्हा म्हणाल्या-‘‘आम्ही तुम्हाला (भाजपाला) सामान्य नागरी कायद्यासाठी सांप्रदायिक म्हणत नाही. आम्ही गुजरातमुळे तुम्हाला सांप्रदायिक म्हणतो’’ तेव्हा भाजपाचे प्रतिनिधी उत्तरलेत, ‘‘१९८४ च्या दंगलींमुळे मी तुम्हाला धर्मनिरपेक्षता विरोधी म्हणू शकतो. तुम्हाला दाखयावाला कोणताही चेहरा नाही.’’ इथर्पंत ठीक होते. पण त्यानंतर कदाचित या प्रतिनिधीने गुजरात दंगलींचे सत्य काय आहे, ते सांगायला हवे होते. गुजरातमधील दंगली गुजरात सरकारने अवघ्या ३ दिवसांत नियंत्रणात आणल्या. दंगलींत २४ हजार मुस्लिमांना आणि अनेक हिंदूंना वाचविले. यामुळेच भाजपा धर्मनिरपेक्ष असल्याचे दिसते, असे ते कदाचित ठणकावून सांगू शकले असते. याउलट मात्र त्यांनी नकळत गुजरात दंगली आणि १९८४ च्या दंगली सारख्या असल्याचे थोड्या प्रमाणात मान्य केले. 70 बी.पी. सिंघल यांनी इंग्रजी साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’च्या ९ ऑक्टोबर २००५ च्या अंकात आणि इंग्रजी दैनिक ‘द पायनियर’च्या २८ सप्टेंबर २००५ च्या अंकात या विषयावर लिहिलेला लेख फार उपयुक्त आहे. http://www.organiser.org/dynamic/modules.php?name=Content&pa=showpage&pid=99 &page=14 आता इथे दोन्हीमधील फरक तपशिलात पाहूया. गोधरा आणि इंदिरा गांधींची हत्या १९८४ साली इंदिरा गांधींची ३१ ऑक्टोबर १९८४ ला झालेली हत्या दंगलींचे कारण ठरली होती. इंदिरा गांधींची हत्या हे दहशतवादाचे कृत्य होते. २ लोकांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली, ते दोघेही दहशतवादी होेते. ही घटना मोठी मानवी शोकांतिका होती. पण ती गोधरासारखी नव्हती. गोधरामध्ये बळी पडलेल्यांना ट्रेनमध्ये बंद करून जिवंत जाळण्यात आले आणि बाहेर पडू दिले गेले नाही. इंदिरा गांधींच्या हत्येचा दोष कोणत्याही प्रकारे संपूर्ण शीख समाजावर लादता येऊ शकत नव्हता. ते कृत्य केवळ दोन लोकांनी केले होते आणि दोघेही इंदिरा गांधींचे अंगरक्षक होते. ते सर्वसामान्य लोक नव्हते, तर दहशतवादी होते. ही संपूर्ण घटना धर्मांध नाही, तर दहशतवादी स्वरूपाची होती. गुन्हेगारांना ताबडतोब पकडण्यात आले. भारताच्या पंतप्रधान असलेल्या एका कॉंग्रेस नेत्याला २ शिखांनी मारले होते. तो मुख्यत: एका व्यक्तीवरचा हल्ला होता. तो हल्ला एखाद्या समुदायावर किंवा कॉंग्रेस पक्षावरही नव्हता. हल्लेखोरांना एका व्यक्तीलाच मारायचे होते आणि त्याची शिक्षाही त्यांना नंतर झाली. याउलट, न्या. नानावटी, नरेंद्र मोदी, जॉर्ज फर्नांडिस, लालकृष्ण अडवाणी, विहिंप, भाजपा, ऑर्गनायझर, पांचजन्य हे सर्वजण दावा करीत असले, तरी गोधरा हत्याकांड ही खरी दहशतवादाची घटना नव्हती. ‘गोधरा’ची तुलना स्वतंत्र भारतातील कोणत्याही घटनेशी होऊ शकत नाही. इंदिरा गांधींना झालेल्या वेदना कदाचित काही क्षणांपुरत्याच होत्या. पण गोधरातल्या अग्निकांडात बळी पडलेल्यांचे तसे नव्हते. गोधरामध्ये रेल्वेगाडीच्या संपूर्ण डब्याला आग लावण्यात आली. कोणत्याही प्रवाशाला बाहेर पडू द्यावे नाही, यासाठी गाडीला मुस्लिमांनी दोन्ही बाजूंनी घेरले आणि या मुसलमानांकडे पेट्रोल बॉंब, ऍसिड बॉंब आणि तलवारी सारखी शस्त्र होती. प्रवाशांना अत्यंत घृणास्पदरित्या जिवंत जाळण्यात आले. त्यांच्या वेदना क्षणभराच्या नव्हत्या. त्या मुसलमान जमावाने लहान मुलांनाही पळून जाण्याची संधी दिली नाही, उलट १५ मुलांचीही जाळून हत्या केली. गोधरामध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हते. त्यांच्या हातात एके-४७ रायफल्स, बंदूका किंवा ग्रिनेड नव्हती. हे सर्वसामान्य स्थानिक मुसलमान होते. इंदिरा गांधींची हत्या स्थानिक २००० शिखांनी केली नाही. गोधरामाध्ये २ हजार हल्लेखोरांपैकी केवळ एकानेही पोलिसांना या कारस्थानाबद्दल सकळी ७: ४८ च्या आधी माहिती दिली असती, तरी हे हत्याकांड रोखता आले असते. २ हजार हल्लेखोरांपैकी एकानेही असे केले नाही. हे हल्लेखोर पकडल्याही गेले नाहीत. त्या हत्याकांडात २ हजार लोक सहभागी असताना २७ फेब्रुवारीला केवळ ३५ लोकांना अटक झाली. सर्व २ हजार लोकांना पकडले जाईल, अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती. पण किमान २००-३०० लोक तरी सहज पकडले जायला हवे होते. ‘इंडिया टुडे’ने या विषयावर काय सांगितले आहे, १८ मार्च २००२ च्या अंकात, ते आता पाहूया: ‘‘गुजरातचे माजी पोलीस महासंचालक एम.एम. सिंग, गुजरातने पाहिलेले कदाचित सर्वोत्तम अधिकारी, यांच्या म्हणण्यानुसार समस्या सुरू झाली ती २७ फेब्रुवारीला गोधरासून. त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी, ज्या भागातून हल्लेखोर आले, त्या 71 भागाला संपूर्ण वेढा घालून तातडीने कारवाई करायला हवी होती आणि गुन्हेगारांना पळून जाऊ द्यायला नको होते. हे घडले असते, तर प्रारंभीच हिंदूंचा क्षोभ काही प्रमाणात कमी झाला असता. ‘जेव्हा एखाद्या घटनेमुळे जातीय हिंसाचार सुरू होण्याची दाट शक्यता असते, तेव्हा त्या घटनेत सहभागी असणारया गटाविरुद्ध पोलीसांनी कठोर पावले उचलायला हवीत. त्याचा परिणाम उत्तम होतो.’… याबाबत आणख़ीन एक गोष्ट चर्चिली जाते आहे जिच्याबद्दल फार कमी लोक बोलायला तयार आहेत. या गोष्टीनुसार ‘गोधरा हत्याकांडातील संबंधित व्यक्तींवर संध्याकाळपर्यंत कारावाई करा, नाहीतर परिणामांना सामोरे जा,’ अशी चेतावणी विहिंप नेत्यांनी मोदींना २७ फेब्रुवारीला दिली होती. त्या संध्याकाळर्पंत पोलिसांनी प्रमुख ६ आरोपींपैकी दोघांना ताब्यात घेतले, शिवाय इतर ५० लोकांना ताब्यात घेतले. गोधरामधील हल्लेखोरांचा आकडा १ हजारांच्यावर असल्यामुळे अटक केलेल्यांची संख्या विहिंपला अगदीच कमी वाटली.” गोधरा हत्याकांडाच्या २००० पैकी अधिकांश दोषी मुक्त सुटले होते आणि हेच २८ फेब्रुवारीच्या स्फोटामागचे एक प्रमुख कारण होते. गोधरामधील हल्ला एका व्यक्तीवरचा नव्हे, तर हिंदू समाजावरचा होता. तो विहिंपसारख्या एखाद्या संघटनेवरचाही हल्ला नव्हता. १९८४ प्रमाणे येथे एका मृत व्क्तीवर हा हल्ला नव्हता. त्यामुळे त्याचा प्रतिकार एखाद्या संघटनेने नव्हे, तर संपूर्ण समाजाने केला. शिवाय इंदिरा गांधी हत्या प्रकरणात कोणीही या हत्येसाठी इंदिरा गांधींना किंवा कॉंग्रेस पक्षालाच जबाबदार धरून जखमेवर मीठ चोळले नाही. याउलट गोधरानंतर माध्यमे आणि राजकारण्यांनी एकत्रितपणे गोधरा हत्याकांडासाठी विहिंपला आणि जळून मृत झालेल्या रामसेवकांनाच जबाबदार ठरवून लोकांच्या जखमेवर मीठ चोळले. यात त्यांनी मृत महिला, मुले आणि पुरुष यांचा अपमानही केला. काहींनी, उदा. स्व. अमरसिंह चौधरींसारख्या कॉंग्रेस नेत्याने ‘रामसेवकांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा आणि खाद्यपदार्थांचे पैसे दिले नाहीत’ असे सांगून त्यांनाच हत्याकांडासाठी जबाबदार धरले. अनेकांनी रामासेवकांवरच बरोबरच्या मुस्लिम प्रवाशांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. यामुळे २८ फेब्रुवारी २००२ ला लोकांच्या संतापाचा स्फोट झाला. १९८४ ला इंदिराजींच्या हत्येनंतर लोकांना चिथावणी देणारे, असे काहीही घडले नव्हते. हल्लेखोरांमधील फरक १९८४ मधील दंगली हा समाजाचा उद्रेक नव्हता. एका राजकीय पक्षाच्या समर्थकांनी व आरोप केला जातो की त्याच पक्षाच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने केलेले ते हत्याकांड होते. स्व. राजीव गांधी (१९४४-१९९१), पी.व्ही. नरसिंह राव (१९२१-२००४), कमलनाथ, सज्जनकुमार, जगदीश टाइटलर यांच्यावर १९८४ च्या दंगलींमध्ये सामील असल्याचा (culpable) आरोप होता. पण त्यापैकी अनेकांच्या विरोधात कोणताही खटला नाही, आणि ज्यांच्यावर आहे, त्यांच्यापैकी कोणीही आतापर्यंत कोणत्याही न्यायालयात दोषी ठरले नाहीत. १९८४ मध्ये एका नेत्याच्या हत्येमुळे एक राजकीय पक्ष प्रक्षुब्ध झाला होता. संपूर्ण देशही दु:खी होता आणि संतप्त होता. पण देशाच्या मनात सुडाची भावना नव्हती- ती फक्त एका राजकीय पक्षाच्या मनात होती. २००२ ला गुजरातमध्ये गोधरा हत्याकांडामुळे संपूर्ण समाजच प्रक्षुब्ध झाला होता. ‘इंडिया टुडे’ने आपल्या १८ मार्च २००२ च्या अंकात म्हटले: ‘‘राजकीय समीक्षक अरविंद बोस्मिया म्हणतात, ‘अशा उद्रेकाचे नेतृत्व करणे, संघपरिवाराच्या शक्तीबाहेरचे काम आहे. गोधरा हत्याकांडाची ही प्रामुख्याने उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती’.” यावरून स्पष्ट आहे, की २००२ च्या गुजरात दंगली घडवून आणणे एकट्या संघपरिवाराला शक्य नव्हते. याउलट १९८४ मध्ये दंगलीत फक्त कॉंग्रेसचे समर्थकच सहभागी होते. १९८४ मध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी शिखांचे संरक्षण केले. राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाचे माजी अध्यक्ष तरलोचन सिंग यांनी हे नोंदीवर म्हटले आहे. (“संघाच्या स्वयंसेवकांनी १९४७ मध्ये फाळणीच्या दंगलींत आणि १९८४ मध्ये शिखांचे कसे रक्षण केले, हे शिख कधीच विसरू शकणार नाहीत” – तरलोचन सिंग, २६ जुलै २००३). याउलट २००२ च्या गुजरात दंगलीत केवळ गोधरातच नव्हे, तर नंतरच्या हिंदू आणि मुस्लिमांवरील हल्ल्यातही कॉंग्रेसजन सहभागी होते. ‘द टाइम्स ऑफ इंडियाने ९ ऑगस्ट २००३ ला दिलेल्या बातमीत म्हटले की गोधरानंतरच्या 72 दंगलीत मुस्लिमांची हत्या करण्यात सहभागी असल्याचा २५ कॉंग्रेस नेत्यांवर आरोप आहे. (संदर्भ : http://timesofindia.indiatimes.com//india/Cong-silent-on-cadres-linked-to-Guj- riots/articleshow/122796.cms ) शिवाय, काही मुसलमान कॉंग्रेसजन हे २००२ मध्ये गोधरानंतरच्या दंगलींत हिंदूंवरील हल्ल्यांत सामील होते. अशा काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांना यासाठी न्यायालयांनी दोषी घोषित केले आहे. दंगलींचा इतिहास इ.स. १७१४ पासून भारतात शेकडो हिंदू मुस्लिम दंगली झाल्या आहेत. इ.स. ६३६ पासूनच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष चालू आहे. मध्ययुगीन काळात परकीय मुस्लिम सत्ताधारयंनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. त्यापैकी काहींची माहिती आपण पहिल्या प्रकरणात घेतली आहे. इ.स. १७१४ पासूनच्या गुजरातमध्ये झालेल्या अनेक दंगलीत मुस्लिमच आक्रमक होते. १९४० च्या दशकात अहमदाबादतील दंगलीमध्ये हिंदूंचे सर्वाधिक नुकसान झाले- हिंदूंनी फार मार खाल्ला. १९६९ आणि १९८५ मध्येही गुजरातने भयंकर दंगली अनुभवल्या. गुजरातच्या लोकांच्या मनात या सर्व दंगलींच्या जखमा होत्या आणि अजूनही ताज्या आहेत. ‘शिखांचे शिरकाण’ असे १९८४ च्या दंगलींना म्हटले जावे. पण त्याऐवजी ‘संघर्ष’ असे म्हणायचे असले, तरी शीख आणि हल्लेखोर यांच्यातील हा पहिलाच संघर्ष होता. यापूर्वी कॉंग्रेस नेत्यांना शिखांनी कधीच दहशतीखाली ठेवले नव्हते, इ.स. ६३६ पासून तर नाहीच. स्वातंत्र्यानंतर १९८४ च्या आधी नवी दिल्लीत भाजपाच्या राज्यात (किंवा कॉंग्रेसच्या देखील राज्यात) हिंदू आणि शीख यांच्यात एकदाही दंगली झाल्या नाहीत, दोनदा तर जाऊच द्या. याउलट गुजरातमध्ये २००२ मध्ये भाजपा सत्तेवर असताना झालेल्या दंगलींपेक्षा, कॉंग्रेसच्या सत्ताकाळात किमान दोनदा फार अधिक गंभीर दंगली झाल्या होत्या. १९८४ च्या दंगली एकमात्र हिंदू-शीख दंगली होत्या, आणि सर्वांत रक्तरंजित होत्या. हल्लेखोरांवरील कारवाई १९८४ च्या दंगलींत हल्लेखोरांवर कोणतीही विशेष कारवाई करण्यात आली नाही. या दंगलींत मृतांची संख्या अधिकृतपणे ३ हजार असतानाही अटक केलेल्यांची संख्या मात्र फार कमी होती. माजी पोलीस महासंचालक बी.पी. सिंघल यांच्या म्हणण्यानुसार या दंगलींत पोलीस किंवा लष्कराच्या गोळीबारात १ हल्लेखोरसुद्धा ठार मारला गेला नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार या दंगलीत पहिले ३ दिवस पोलीस बेपत्ता होते. स्थानिक पातळीवर लष्कर उपलब्ध असूनही पूर्ण ३ दिवस त्याला पाचारणही केले गेले नव्हते. या दंगलींना माध्यमांची झळाळी मिळाली नाही. कारण त्या काळात टी.व्ही. माध्यम अगदीच बालवस्थेत होते. (संदर्भ: बी.पी. सिंघल यांनी इंग्रजी साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’च्या ९ ऑक्टोबर २००५ च्या अंकात यावर लिहिलेला लेख.) याउलट गुजरातमध्ये गुजरात पोलिसांनी २५,४८६ आरोपींपैकी २५,२०४ आरोपींना ऑक्टोबर २००५ पर्यंत अटक केली. मे २०१२ मध्ये २६,९९९ लोकांना अटक झाली होती, आणि आरोपींची संख्याही अगदी थोडी वाढली होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने २८ एप्रिल २००२ ला दिलेल्या बातमीनुसार तोपर्यंत २० हजार लोकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी १७ हजारहून अधिक हिंदू होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नेच ९ ऑगस्ट २००३ ला दिलेल्या बातमीत, दंगलीसंदर्भात आरोपी असलेल्या ३० हजार लोकांना अटक झाल्याचे म्हटले आहे. गुजरातमध्ये २७ फेब्रुवारी २००२ लाच संपूर्ण पोलीस दल, म्हणजे ७० हजार जवान तैनात करण्यात आले होते. त्याबरोबर जलद कृती दलाच्या उपलब्ध सर्व तुकड्याही तैनात होत्या. लष्कराला २८ फेब्रुवारीलाच ताबडतोब म्हणजे दंगली सुरु झाल्याच्या एका 76 धोरण म्हणून दंगली घडविण्याचे ठरविलेच असते, तर देशभरात कुठेही उत्पात घडविता आले असते. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. दंगली गुजरातपुरत्याच मर्यादित राहिल्यात. गुजरातमध्येसुद्धा पहिल्या ३ दिवसांतही सौराष्ट्र आणि कच्छ या भागात, म्हणजे १/३ राज्यात दंगली झाल्या नाहीत. गुजरातमधील १८,६०० गावांपैकी १० हजार गावांत विश्व हिंदू परिषदेच्या शाखा तेव्हा कार्यरत होत्या. त्यांनी ठरविले असते, तर या सर्व १० हजार गावांत दंगली होऊ शकल्या असत्या. प्रत्यक्षात दंगली फक्त ५० गावांमध्ये आणि शहरांसह एकूण जास्तीत जास्त ९० ठिकाणी झाल्यात. बेघर झालेले लोक गुजरातमधील २००२ च्या दंगलीत हिंदूही बेघर झाले. एप्रिल २००२ मध्ये गुजरातमधील निर्वासित शिबिरांत ४० हजार हिंदू राहात होते, हे आपण पाहिलेच आहे. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत एकही कॉंग्रेसजन किंवा शिखांशिवाय अन्य कोणी बेघर झाले नाही. बी.पी. सिंगल यांनी आपल्या लेखात म्हटले आहे, ‘‘दुसरया बाजूला बेघर झालेल्या शिखांसाठी कुठेही एकही निर्वासित शिबिर उभारण्यात येण्याचा प्रयत्न कुठेही करण्यात आला नाही. प्रत्यक्षात नानावटी आयोगाच्या अहवालानुसार शीख वस्त्यांमधून ‘राहणारया शिखांना पूर्ण पोलीस संरक्षण मिळेल,’ असे सांगून त्यांच्याकडील शस्त्रे काढून घेण्यात आली. आणि नंतर त्याच वस्त्यांवर हल्ले करण्यात आलेत.’’ शिखांनी हल्ला केल्यामुळे निर्वासित झालेल्या गैर-शिखांसाठी निर्वासित शिबिरे उभारण्याची वेळ येणे तर जाउच द्या, उलट बेघर झालेल्या दंगलग्रस्त शिखांना आसरा देण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. याउलट २००२ च्या गुजरात दंगलीत मुस्लिमांनी हल्ले चढविल्यामुळे बेघर झालेल्या हिंदूंसाठीही शिबिरे उभारावी लागली. ही शिबिरे कमी पडल्यामुळे काही हिंदूंना मंदिरांत आसरा घ्यावा लागला किंवा रस्त्यांवर झोपावे लागले. घेतल्या गेलेल्या निवडणुका निवडणूका हा विषय दंगलींशी थेट संबंधित नाही, तरीही या दोन्ही दंगलींशी निवडणुकीतही संबंधीत फरक उल्लेखनीय आहे. १९८४ मध्ये १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या काळात शीखविरोधी दंगली झाल्यात. त्यानंतर ४५ दिवसांत लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका झाल्यात. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे कॉंग्रेस पक्षाला या निवडणुकीत लोकसभेच्या ५४३ पैकी ४१५ जागा मळाल्यात. पाठोपाठ फेब्रुवारी १९८५ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतही कॉंग्रेस पक्षाला एकूण १८२ जागांपैकी १४९ इतक्या जास्त जागामळाल्यात. (कॉंग्रेस पक्षाने गुजरातमध्ये जिंकलेली ही अखेरची निवडणूक. त्यानंतर झालेल्या १९९०, १९९५, १९९८, २००२, २००७, २०१२ व २०१७ या सर्व निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा गुजरातमध्ये पराभव झाला.) गुजरातच्या दंगलीनंतर तेथे डिसेंबर २००२ ला विधानसभा निवडणूक झाली, म्हणजे ‘गोधरा’ घटनेनंतर तब्बल १० महिन्यांनी आणि दंगलींनंतर ८ महिन्यांनी. तरीही भाजपाला १८२ पैकी १२७ जागामळून प्रचंड बहुमतमळाले, व मिळलेली मते ५० टक्क्यांवर पोचली. भाजपा आणि कॉंग्रेस यांनामळालेल्या मतांतला फरक ११ टक्के इतका मोठा होता. इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की सर्व भाजपा-विरोधी लोक (पत्रकार व राजनेते) ‘मोदी हटाव’ या मोहिमेत गुंतले होते व त्यांना गुजरातमध्ये निवडणूक व्हायला नको होती. गुजरातचा मुख्यमंत्री कोण असावा, हे ठरविण्याची संधी लोकांनामळू नये, अशी त्यांची इच्छा होती, व ते आपल्या मनाने ‘मोदी-हटाओ’ म्हणत होते. म्हणून विधानसभा निवडणूक अनेक मार्गांनी पुढे ढकलण्यात आली. तरीही या सर्व भाजपा-विरोधी लोकांचा दारुण पराभव झाला. (१९८४ मध्ये मात्र लोकसभा निवडणूक दंगलींच्या ४५ दिवसांत घेण्यात आली, आणि या दंगली २००२ च्या दंगलींपेक्षाही फार मोठ्या होत्या.) 77 गुजरातच्या दंगलींबाबतचे सत्य सांगून लोकांना जागृत कोण करणार? स्वत:ला ‘जागरूक’ नागरिक म्हणवणारेच गुजरात दंगलींतील सत्याबद्दल अज्ञानी दिसतात. ज्यांना या दंगलींचे सत्य माहीत आहे, ते या संंबंधात लोकांचे व चांगल्या उद्देशाच्या नेत्यांचे प्रबोधन करताना दिसत नाहीत, काही अपवाद सोडले तर. सध्याच्या स्थितीत तरी गुजरात दंगलींबाबतच्या दंतकथा उखडून टाकून सत्य बाहेर येण्यासाठी बहुधा एक चमत्कारच घडावा लागेल.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *