chapter-6

प्रकरण ६ मुस्लिमांवरील हल्ले

हिंदूंवरील हल्ले अधोरेखित करण्यासाठी आणि राजकीय विरोधक, इंग्रजी माध्यमांतील पूर्वग्रहदूषित पत्रकार आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्ते यांचा ढोंगीपणा उघड करण्यासाठीच हे पुस्तक लिहिले आहे, असे वरवर पाहता वाटू शकते. पण अशा पद्धतीचे लेबल लावणे किंवा वरपांगी समीक्षा करणे, ही मोठी चूक ठरू शकते. गुजरातच दंगलीत केवळ हिंदूंनाच झळ लागली, असे लेखकाला कुठेच सुचवाचे नाही. दंगलींच्या पहिल्या ३ दिवसात आणि नंतरही झालेल्या हिंसाचारात मुस्लिमांनाही मोठी झळ बसली. या प्रकरणात मुस्लिामांवर झालेल्या या हल्लंचाच विचार आपण करणार आहोत. प्रतिकियात्मक दंगलींमागच्या कारणांची चर्चा आपण दुसरया आणि तिसरया प्रकरणात विस्ताराने केली आहे. पण हिंदूंच्या या प्रक्षोभाला इतरही काही कारणे होती. ‘इंडिया टुडे’ने १८ मार्च २००२ च्या अंकात त्यापैकी अनेक कारणांची चर्चा केली आहे. संसदेवर झालेला हल्ला, मश्रूमप्रमाणे उगवणारे मदरसे, या कारणांची माहिती आपण घेतली आहे. आणखीन एक कारण होते की गोधरामध्ये मुस्लिमांनी ३ हिंदू तरुणींना पळवून नेले, त्यांच्यावर बलात्कार केला आणि त्यांचे स्तन कापून टाकले, ही बातमी (अफवा). या अफवेने हिंदू प्रक्षुब्ध झाले होते. तेवाटिया समितीच्या म्हणण्यानुसार ही बातमी खरी नव्हती, पण निदान २८ फेब्रुवारीला तरी तिचा खरे-खोटेपणा कळणे शक्य नव्हते. नरेंद्र मोदी-विरोधी असणारया ‘आउटलुक’ साप्ताहिकानेसुद्धा ११ मार्च २००२ च्या अंकात २८ फेब्रुवारीपर्यंतच्या घटनांचे वार्तांकन करताना यावर बातमी दिली की गुजरात सरकारने जरी या अफवा खोट्या असल्याचे सांगितले तरी जे नुकसान व्हायचे ते झाले होते. याचा अर्थ गुजरात सरकारने २८ फेब्रुवारीलाच अत्यंत तातडीने या अफवा खोट्या असल्याचे सांगितले होते. इतक्या तातडीने की ‘आउटलुक’ला ११ मार्चच्याच अंकात (२८ फेब्रुवरीपर्यंतच्या बातम्या देताना) या वृत्ताचा समावेश करण्यास पुरेसा अवधी होता. हादरवून टाकणारया गोधरा हत्याकांडामुळे लोकांच्या मनात कल्पनाही करता येणार नाही, इतका प्रचंड संताप उसळला होता. दंगलींसाठी केवळ संघ परिवारातील संघटनांना दोषी धरणे योग्य नव्हते. त्यापैकी कोणी दंगलीत सामील असेलच, तर तो केवळ योगायोग होता. ‘गोधरा’नंतरच्या दंगलीत मुस्लिमांवर झालेल्या हल्ल्यांत सहभागी असल्याचा आरोप २५ कॉंग्रेस नेत्यांवर असल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ९ ऑगस्ट २००३ च्या बातमीत म्हटले. गुजरातमधील दंगलींचा घटनास्थळी भेट देऊन अभ्यास करण्यासाठी ‘द कौन्सिल फॉर इंटरनॅशनल अफेअर्स अँड ह्युमन राईटस्’ या संस्थेने एक समिती पाठवली होती. या कौन्सिलचे उपाध्क्ष आणि कोलकाता आणि पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती डी.एस. तेवाटिया समितीचे अध्यक्ष होेते. या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील डॉ. जे.सी. बात्रा, चंदीगडचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. कृष्णसिंग आर्य, दिल्ली जनसत्ताचे माजी सहायक संपादक श्री. जवाहरलाल कौल, हिसारच्या जी.जे. विद्यापीठाचे मीडिया विभागाचे डीन प्रा. बी.के. कुथियालांचा समावेश होता. ही समिती १ एप्रिलला गुजरातला रवाना झाली आणि ७ एप्रिल २००२ ला (दिल्लीत) परतली. समितीच्या ‘गोधरा अँड आफ्टर’ या अहवालात म्हटले आहे – “…३. खासकरून मार्चच्या पहिल्या आठवड्यातील हिंदू जमावांत कनिष्ठ (गरीब), कनिष्ठ मध्यमवर्गी आणि उच्च मध्यमवर्गी अशा समाजघटकांचा समावेश होता. ४. देशात प्रथमच जाळपोळ आणि लुटालुटीमध्ये उच्च मध्यमवर्गी हिंदू सहभागी झाल्याचे पाहण्यास मिळाले. 68 ५. मुस्लिमांच्या काही निवडक संस्थांची मालमत्ता उद्ध्वस्त करण्यात हिंदू जमावांना अधिक रस असल्याचे वाटले. मुस्लिम मालकी असलेले, पण हिंदू नावे असलेल्या उपाहारगृहांची साखळी लक्ष्य होती, अशा बातम्या आहेत. या उपाहारगृहांसाठी आखाती (गल्फ) देशांतून मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली गेल्याचे मानले जात होते. त्यामुळे हिंदू प्रतिस्पर्धी उपाहारगृहे अडचणीत आल्याची भावना होती. ६. अभ्यासगटासमोर एक नवीनच माहिती दिली गेली, ती म्हणजे प्रक्षुब्ध जमावांत महिलांची मोठी उपस्थिती आणि प्रत्यक्ष सहभाग.” मुस्लिमांवर हल्ले २८ फेब्रुवारीला अहमदाबाद, बडोदा, साबरकांठा या जिल्ह्यांत प्रचंड मोठ्या जमावांचे हल्ले सुरू झाले. त्या शहराच्या इतिहासात प्रथमच गांधीनगरमध्येही असे हल्ले झाले. नंतर पंचमहाल, मेहसाणा, खेडा, जुनागड, बनासकांठा, पाटण, आणंद आणि नर्मदा या प्रामुख्याने ग्रामीण भाग असलेल्या जिल्ह्यांतही दुसरया दिवशी हिंसाचार पसरला. पुढच्या दोन दिवसांत भरूच, राजकोट आणि नंतर सुरत शहरेही हिंसाचारग्रस्त झाले. मुस्लिमांवर झालेल्या हल्ल्यांचे नेमके स्वरूप समजून घेण्यासाठी तत्कालीन इंग्रजी वृत्तपत्रांबरोबरच गुजराती वृत्तपत्रेही पाहिली पाहिजेत. ‘इंडिया टुडे’च्या १८ मार्च २००२ च्या अंकातील या संबंधीचा वृत्तांत या दृष्टीने उपयुक्त आहे. तो वृत्तांत असा – ‘‘आपल्याच भागात बेछूट आक्रमण करण्यास लोक कदाचित मागेपुढे पाहतील, हे लक्षात घेऊन ठरलेल्या लक्ष्यांवर हल्ले चढविण्यासाठी बाहेरच्या लोकांची मदत घेण्यात आली. अधिकांश जागी स्थानिकांनी या हल्ल्यांना विरोध तर केला नाहीच, पण ‘दुसरया’बद्दलचा विद्वेष इतका होता की त्यांनी दंगलखोरांना प्रोत्साहितच केले. मुस्लिम समाजाचे आर्थिक फायदे उद्ध्वस्त करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचे दिसते. मुस्लिम नावे असलेल्या दुकानांवर आणि व्यापारी संस्थांवर तर हल्ले झालेच, पण हिंदू आणि मुस्लिम भागीदार असलेल्या व ‘आशीर्वाद’ किंवा ‘सॅफरन’ अशी नावे असलेल्या उद्योग-व्यवसायांवरही नियोजनबद्ध हल्ले झाल्याचे समोर आले आहे. विशिष्ट उद्योगातील भागीदार किंवा भागधारक कोण आहेत, याची माहिती घेऊन, हे हल्ले करण्यात आले. त्यात एलीसब्रिजजवळील एक मेडिकल स्टोअर, गांधीनगर रोडवरील होंडा फ्रॅंचायजी आणि ओपल कार वाहून आणणारा हलोलचा ट्रकचालक यांचा समावेश होता. हिंसाचाराच्या पहिल्या सहा दिवसात उद्योगधंद्यांचे अंदाजे नुकसान रोज़ ५०० कोटींवर पोचले.’’ याच वृत्तांतात पुढे म्हटले आहे, ‘‘२७ फेब्रुवारीच्या गोधरा हत्याकांडानंतर सुरू झालेल्या सुडाच्या प्रवासात, राज्यभरात ६०० हून अधिक लोक मारले गेले आणि एकट्या अहमदाबादमध्ये २० हजार बेघर झाले. अनेक मशिदी आणि दर्गे जाळले वा उद्ध्वस्त केले गेले, तर काहींचे रूपांतर हुल्लडिया हनुमान मंदिर किवंा गोधरा बळींच्या आदरार्थ गोधाडिया मंदिर यांच्यात करण्यात आले. आकाशात फडकणारे भगवे ध्वज विकृत विजयाची साक्ष देतात. भूतकाळातही सांप्रदायिक दंगली झाल्या असल्या, तरी या दंगलींमुळे गुजरातची ‘सहिष्णू समाज’ ही भावना नष्ट झाली आहे.’’ The above is the beginning of the Chapter “Attacks on Muslims”. To read the full chapter, read the book “Gujarat Riots: The True Story”. http://www.amazon.in/Gujarat-Riots-True-Story- Truth/dp/1482841649/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1426094521&sr=8- 1&keywords=gujarat+riots+deshpande

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *