chapter-9

प्रकरण ११ वे ‘तहलका’च्या थापा

२००२ च्या दंगलींच्या विषयावर साप्ताहिक ‘तहलका’ने एका स्टिंग ऑपरेशनचे प्रसारण ऑक्टोबर २००७ मध्ये केले. याबद्दल अनेकदा एक प्रश्न विचारला जातो: “हे स्टिंग ऑपरेशन हा सत्य जाणून घेण्याचा खरा प्रयत्न होता की नरेंद्र मोदी आणि गुजरात सरकार यांना प्रयत्नपूर्वक जबरदस्ती फासावर चढविण्यासाठी फक्त हे केले होते आणि त्याला काही किंमत नाही?” हे प्रकरण या प्रश्नाचे उत्तर अगदी स्पष्ट करेल. या स्टिंग ऑपरेशनमुळे निष्पाप मुस्लिमांमध्ये, भारतातील आणि परदेशातील सुजाण, चांगल्या- अर्थाच्या लोकांमध्ये प्रचंड मोठा संताप उसळला. ‘रेडिफ डॉट कॉम’च्या संकेतस्थळावर २५ ऑक्टोबर २००७ ला आलेला वृत्तांत असा होता: ‘‘गुजरात दंगली हा नरसंहार, मोदींची त्याला अनुमती : तहलका ओंकार सिंग, नवी दिल्ली शोध पत्रकारिता करणार्‍या साप्ताहिक ‘तहलका’ने गुरुवारी (२५ ऑक्टोबर २००७) २००२ च्या गुजरात दंगलींमागचे सत्य आपण उकलले, असा दावा केला. गोधरा रेल्वे जळीत कांडानंतर झालेल्या मुस्लिमांच्या हत्या या ‘संतापाच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेतून’ झाल्या नाहीत, तर संघ परिवारातील आणि प्रशासनातील ज्येष्ठ मंडळींकडून केलेला हा ‘नियोजित नरसंहार’ होता आणि त्याला मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा ‘आशीर्वाद’ होता असा ‘अपरिवर्तनीय पुरावा’ (‘irrefutable evidence’) आपल्याकडे असल्याचा दावा ‘तहलका’ने केला आहे. नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलताना ‘तहलका’चे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांनी दावा केला की गेले सहा महिने या साप्ताहिकाने स्टिंग ऑपरेशन केले आणि संघपरिवारातील अनेक नेत्यांशी ते सत्य बाहेर काढायला बोलले. या नेत्यांमध्ये भाजपाचे गोधराचे आमदार हरेश भट, शिवसेना नेते बाबू बजरंगी (जे आधी विहिंपमध्ये होते) विहिंप नेते अनिल पटेल आणि धवल जयंती पटेल यांचा समावेश होता. 78 ‘विहिंपच्या कार्यालय परिसरात बॉंब तयार केले गेले जात होते याचा आमच्याकडे पुरावा आहे’, असे संपादक (शोध) हरिंदर बावेजा यांनी ‘रेडिफ डॉट कॉम’ला सांगितले. ‘तहलकाच्या या जमीन हादरवून टाकणार्‍या तपासात, पहिल्यांदाच ज्यांनी हा संहार घडवून आणला त्यांच्याकडूनच सत्य ऐका. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी स्वत: आले आणि गुन्हेगारांची पाठ थोपटून त्यांनी ‘चांगले काम केले’ अशी शाबासकी दिल्याची धक्कादायक माहिती आहे.’ बावेजा म्हणाल्यात. मासिकाच्या या अहवालावर भारतीय जनता पार्टीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली, आणि म्हटले की तहलका सी.आय.ए. म्हणून (कॉंग्रेस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी) काम करत आहे. हे एक संगनमताने केलेले स्टिंग असून त्याला शोध पत्रकारिता मुळीच म्हणता येणार नाही. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘गुजरात विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कॉंग्रेसचा गलिच्छ चलाखी विभाग (‘dirty tricks department’) पुन्हा कार्यरत झाला आहे.’ या स्टिंग ओपरेशन मध्ये कॅमेरावर पकडल्या गेलेला एकही नेता बोलायसाठी उपलब्ध नव्हता, फक्त गुजरात विहिंपचे नेते धवल जयंती पटेल यांनी सांगितले की या दंगलींदरम्यान बजरंगी त्यांच्याशी बोलले नाहीत आणि त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन पाहिलेले नाही. (या स्टिंग ओपरेशन मध्ये) भट हे कॅमेर्‍यासमोर दाखविले गेलेत असे म्हणताना की ते एका बैठकीत उपस्थित होते जेथे मोदींनी त्यांना ‘त्यांच्या मनात असेल तसे करण्यासाठी ३ दिवसांचा वेळ दिला.’ ‘३ दिवसानंतर त्यांनी (मोदींनी) हे थांबवा असा आदेश दिला आणि त्याक्षणी सर्वकाही थांबले’, असे भट स्टिंग ओपरेशन मध्ये म्हणाले. नरोडा पाटिया हत्याकांडानंतर मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले, असेही ते म्हणाले. मासिकाने दावा केला की धवल जयंती पटेल यांनी गुप्तपणे काम करणार्‍या तहलकाच्या पत्रकाराला सांगितले की त्यांच्या स्वत:च्या बॉंब तयार करण्याच्या कारखान्यात विहिंपच्या कार्यकर्त्यांनी अनेक बॉंब तयार केलेत. ‘त्यांनी अगदी रॉकेट लॉंचरही तयार केले, जे या दंगलीत वापरण्यात आले,’ असे सांगणारा एक भाजपा आमदारही या स्टिंगमध्ये दाखवण्यात आला. गोधरा येथे २७ फेब्रुवारी २००२ ला साबरमती एक्स्प्रेसच्या एस ६ या डब्याला लावण्यात आलेली आग वास्तविक ‘जमावाच्या उत्स्फूर्त रागातून लागली होती. गुजरात सरकारच्या म्हणण्याप्रमाणे तो पूर्वनियोजित कट नव्हता’ व तो कट आहे हे सिद्ध करण्यासाठी रचल्या गेलेल्या खोट्या गोष्टी तहलकाने उघड केल्या, असाही दावा त्यांनी केला.” (संदर्भ : http://www.rediff.com/news/2007/oct/25godhra.htm) तहलकाच्या चौथ्या भागात, ४४ व्या अंकात १७ नोव्हेंबर २००७ ला तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांनी लिहिले: ‘‘…यावेळी – २००२ मधील गुजरातच्या सुनियोजित हत्याकांडाच्या आमच्या शोधात – कट, कारस्थाने शोधणारयांनी कळस गाठल्याचे दिसून आले. आम्ही कॉंग्रेससाठी काम करतो आहोत असा आरोप भाजपाने आमच्यावर केला, तर आम्ही भाजपासाठी काम करत आहोत, असे कॉंग्रेसने पसरवले! यातून स्पष्ट होते की आम्ही काहीतरी योग्यच करीत होतो. या सव आरोप प्रत्यारोपात ‘आयडिया ऑफ इंडिया’ची लढाई लालू यादव, मायावती आणि डाव्यांवर सोडण्यात आली. कॉंग्रेसला या वाक्प्रचाराचा अर्थ चांगला माहीत आहे, कारण त्यांच्याच पूर्वजांनी ही संकल्पना मांडली. पण आता त्यांना तिचा अर्थ आठवत नाही, असे दिसते. गुजरात हत्याकांडाच्या या रहस्योद्घाटनानंतर (तहलका स्टिंग ओपरेशन प्रसारित होऊन) आठवडाहून अधिक काळ लोटला तरी पंतप्रधान (तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग) आणि गृहमंत्री (तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील) यांनी एकही विधान केले नाही, ही असाधारण गोष्ट आहे. पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच आपण कसे मारले, का मारले आणि कोणाच्या परवानगीने मारले हे हत्या करणार्‍यांनी कॅमेर्‍यासमोर सांगितले होते. आणि हे कोणी क्षुल्लक गुन्हेगार नव्हते. ते धर्मांध, एक विचारधारेने झपाटलेले, उपखंडातील भयंकर दुखर्‍या नसेशी खेळणारे, घातकी फुटीला कारणीभूत ठरू शकणारे असल्यामुळे देशाला तोडून टाकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. [नोंद घ्या: तरुण तेजपाल चांगल्याने जाणतात की हे तथाकथित ‘गुन्हेगार’ बढाईखोर थापा, पोकळ गप्पा मारु शकत असतील आणि जे ते बोलले, गुप्तपणे रेकॉर्डींग़ सुरु आहे हे माहिती नसताना, त्यातील अगदी काहीही वास्तवात केलेले नसेल, याची दाट शक्यता आहे. पण ते उगाच मसाला टाकतात आहेत. आणि जर त्यांना हे सुचले नाही, की हे लोक पोकळ बढाईखोर थापा मारु शकत असतील, तर ते पत्रकार होण्यास योग्य नाहीत.] पण स्पष्टपणे, ‘रेस कोर्स रोड’ च्या सज्जन माणसासाठी ते पुरेसे नव्हते [तत्कालीन पंतप्रधान, मनमोहन सिंग]. अप्रामाणिक लोकांच्या टेकडीवर बसलेल्या प्रमाणिक आणि अधिकाराशिवाय जबाबदारी दिल्या गेलेल्या पंतप्रधानांवर टीका करणे कदाचित अयोग्य ठरेल. म्हणून आपण कॉंग्रेसच्या अशा रणनीतिकज्ञ लोकांकडे (strategists) पाहूया, जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाहीत, पण इतर अनेकांना जिंकून आणण्यासाठीचे गुपित जाणतात. या विचित्र गणनेने पाशवी हत्या आणि बलात्कारात मोंदींचे हात दर्शविणे म्हणजे गुजराती हिंदूंना पटवून देणे की बरोबर अशाच प्रकारचे नेतृत्व त्यांना हवे आहे! (आता ते म्हणतात मोंदींचा बलात्कारांमध्ये हात होता, हे खूपच दरिद्री विधान आहे. किमान काही आरोपींनी, मोदींनी दंगलखोरांची पाठ थोपटली, असे खोटे लपलेल्या कॅमेरयासमोर सांगितले, पण बलात्काराबद्दल तर कोणीही खोटेही बोलले नाही.) हिंसाचाराच्या पुराव्यांचा उपयोग करून हिंसाचाराच्या विरोधात ते मोठे प्रचारतंत्र उभारू शकतात हे त्यांच्या कधी डोक्यातही आले नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, आज कॉंग्रेस अशा किरकोळ व्यूहरचनाकारांकडून (strategists) चालविल्या जातो आहे, ज्यांना योग्य काय करावे ते कळतच नाही. त्यांच्याजवळ इतिहासाचा प्रकाशही नाही आणि भविष्यकाळाची दृष्टीही नाही… 82 ते आपण पुढील प्रकरणात पाहणार आहोत. आता आपण रमेश दवे या विहिंपच्या कार्यकर्त्याची विधाने पाहूया- ‘‘१२ जून २००७ रमेश दवे – त्या रात्री आम्ही (विश्‍व हिंदू परिषदेच्या) कार्यालयात गेलो. वातावरण फार अस्वस्थ करणारं होतं. प्रत्येकाला वाटत होतं आपण फार सोसलंय, कितीतरी वर्ष… नरेंद्रभाईंनी आम्हाला फार पाठिंबा दिला… तहलका – ते गोधराला पोचले, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? दवे – गोधरामध्ये त्यांनी फार कडक निवेदन दिलं. ते फार रागात होते. अगदी लहानपणापासून ते संघाबरोबर आहेत. त्यांचा संताप असा होता… त्यावेळी ते उघडपणे बाहेर आले नाहीत पण पोलीस यंत्रणा मात्र पूर्णपणे परिणामशून्य झाली…” ‌(संदर्भ: तहलकाची अधिकृत वेबसाईट) ‘पोलीस यंत्रणा पूर्णपणे परिणामशून्य होती’ हे विधान आणखी एक असत्यच आहे. २८ फेब्रुवारी, १ मार्च आणि २ मार्चला पोलिसांची कामगिरी काय होती, हे आपण यापूर्वी सविस्तर पाहिले आहे. आता आपण गोधराचे भाजपाचे माजी आमदार हरेश भट काय म्हणाले, ते पाहूया: “१ जून २००७ तहलका – गोधरा घटना घडल्यानंतर नरेंद्र मोदींची काय प्रतिक्रिया होती? हरेश भट – मी हे तुम्हाला सांगू शकत नाही… पण इतके सांगू शकतो की ती अनुकूल होती… त्या काळातल्या आमच्यातल्या सामंजस्यामुळे… तहलका – मला काहीतरी सांगा… त्यांनी? भट – मी काही विधान करू शकत नाही. पण त्यांनी जे केलं, ते कोणत्याही मुख्यमंत्र्याने आजवर केलं नव्हतं… तहलका – मी हे कुठेही सांगणार नाही… वास्तवात… मी तुमचंही नाव घेणार नाही. भट – त्यांनी आम्हाला तीन दिवस दिले… आम्हाला जे करायचे असेल त्यासाठी. ते म्हणाले की त्यानंतर ते आम्हाला वेळ देऊ शकणार नाहीत. हे त्यांनी उघडपणे सांगितलं. तीन दिवसांनंतर त्यांनी आम्हाला थांबायला सांगितलं आणि सर्व काही थांबलं. तहलका – हे सगळं ३ दिवसांनंतर थांबलं. अगदी लष्करालाही बोलावण्यात आलं. भट – सर्वच ताकदी आल्या… आम्हाला ३ दिवस होते… आणि त्या ३ दिवसात आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं. तहलका – ते असं म्हणाले? भट – हो. म्हणून तर मी म्हणतोय की त्यांनी जे केलं ते दुसरे कुठलेही मुख्यमंत्री करू शकले नसते. तहलका – ते तुमच्याशी बोलले? भट – मी तुम्हाला सांगितलं की मी त्या बैठकीमध्ये होतो. भट – त्यांना सरकार चालवायचं होतं… आता ते त्या त्रासाला तोंड देत आहेत… कित्येक खटले पुन्हा सुरू झाले आहेत… लोक त्यांच्याविरुद्ध बंड करत आहेत. तहलका – भाजपामधले लोक त्यांच्याविरुद्ध बंड करत आहेत. भट – भाजपातले लोक… त्यांनी जे काही केलं त्यामुळे त्यांची प्रतिमा प्राणापेक्षा मोठी झाली आहे आणि इतर राजकारण्यांना ते सहन होत नाही…’’ (सौजन्य – तहलकाचे अधिकृत संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट) इथे आता पुन्हा त्यांचे विधान पहा. ‘‘त्यांनी आम्हाला ३ दिवस दिले.’’ हे खोटे असून मार्च २००२ पासून माध्यमातील काही लोक ते पसरवीत आहेत आणि निष्पाप व चांगल्या उद्देशाचे लोक त्याला बळी पडत आहेत. या स्टिंग ऑपरेशनच्या एका दिवसानंतर सी.एन.एन.-आय.बी.एन.च्या हिंदी वाहिनीने हाच आरोप केला: ‘‘त्यांना ३ दिवसांची सूट देण्यात आली होते.’’ पण कल्पित कथा क्र. १५ मध्ये आपण सत्य काय ते पाहिले आहे. आपण यापूर्वीही हे सविस्तर पाहिले आहे की लष्कर अगदी तातडीने पोचले, (“frantically” called), तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस आले, पहिल्या तीन दिवसात पोलिसांनी ९८ दंगलखोरांना गोळ्या घालून मारले, गोळीबाराच्या ५४५० फैरी झाडल्या आणि अश्रुधुराची ६,५०० नळकांडी फोडली. हरेश भट यांची विधाने पूर्णपणे असत्य आहेत हे समजण्यासाठी एवढे पुरेसे आहे. याशिवाय हरेश भट असाही दावा करतात की ते त्या बैठकीत होते. सत्य असे आहे की २७ फेब्रुवारीला गोधरामध्ये नरेंद्र मोदी हरेश भट यांना भेटलेच नाहीत. ते (मोदी) संध्याकाळी गोधराला गेले आणि त्याच दिवशी अहमदाबादला परतले. ‘इंडिया टुडे’ने १२ नोव्हेंबर २००७ च्या अंकात उल्लेख केला आहे की गोधरामध्ये त्या दिवशी नरेंद्र 83 मोदी हरेश भट यांना भेटले नाहीत असे अधिकृत नोंदींवरून कळते. पुन्हा, गोधरातील २७ फेब्रुवारीच्या नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत हजर होण्याएवढे मोठे आपण होतो, असे सांगण्यासाठी भट बढाई मारत होते. आता दंगलीतील एक आरोपी सुरेश रिचर्ड यांची विधाने पाहूया : “१२ ऑगस्ट २००७ सुरेश रिचर्ड – (हत्याकांडाच्या दिवशी) संध्याकाळपर्यंत आम्ही जे केलं, ते आम्ही केलं… साधारण संध्याकाळी ७.३० वाजता… ७.१५ ला आमचे मोदीभाई आले. अगदी इथे, घराबाहेर. माझ्या बहिणींनी गुलाबाचा हार घालून त्यांचं स्वागत केलं… तहलका – नरेंद्रभाई मोदी… रिचर्ड – नरेंद्र मोदी. ते ब्लॅक कमांडोंसह आले होते… त्यांच्या ऍम्बॅसिडर गाडीतून ते उतरले आणि इथे चालत आले. माझ्या सर्व बहिणींनी त्यांचं स्वागत केलं… मोठा माणूस तो मोठाच माणूस ना… तहलका – ते रस्त्यावर उतरले? रिचर्ड – इथे, या घराजवळ. मग ते या बाजूनं गेले. नरोडामध्ये कशी स्थिती आहे ते पाहिलं… तहलका – पाटिया घटना घडली त्याच दिवशी? रिचर्ड – होय. त्याच संध्याकाळी. तहलका – २८ फेब्रुवारी… रिचर्ड – २८ तहलका – २००२ रिचर्ड – त्यांनी सर्व बाजूंनी चक्कर मारली. आणि म्हणाले, ‘आमच्या जातीला आशीर्वाद आहेत, आमच्या मातांनाही आशीर्वाद आहेत [आम्हाला जन्म दिल्याबद्दल].’ तहलका – ते ५ वाजता आले की ७ वाजता? रिचर्ड – साधारण ७ ते ७.३० च्या दरम्यान; त्यावेळी वीज नव्हती… दंगलीमध्ये सर्वकाही बेचिराख झालं होतं… तहलका – नरेंद्रभाई मोदींनी तुमच्या घराला भेट दिली, नरोडा पाटियातील हत्याकांडाच्या त्या दिवसानंतर ते पुन्हा कधी इथे आलेत का? रिचर्ड – कधीही नाही.” (http://www.tehelka.com/story_main35.asp?filename=Ne031107We_Were.asp ) २७ मार्च २०१०ला एस.आय.टी.ने विचारलेल्या प्रश्नांवर मोदींचे बाहेर आलेले (लीक झालेले) उत्तर होते की २८ फेब्रुवारीला संध्याकाळी, अहमदाबादमध्ये सर्किट हाऊसला नरेंद्र मोदी एका पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. हे समजण्यासाठी व्यवहारज्ञानाचा इवलासा कणही पुरेसा आहे की तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी, २८ फेब्रुवारीला संध्याकाळी ७-७:३०ला नरोडा पाटियामध्ये जाणे आणि त्यांनी दंगलखोरांची पाठ थोपटणे, ही अशक्यप्राय गोष्ट आहे. एक लक्षात घ्या की हा आरोप जवळजवळ ६ वर्षे कोणीही केला नाही- फेब्रुवारी २००२ ते नोव्हेंबर २००७ आणि अगदी नोव्हेंबर २००७ नंतरही या आरोपावर तहलकाशिवाय इतर कोणीही विश्वास ठेवणार नाही. खरे तर तहलकाही यावर विश्वास ठेवणार नाही, पण ते हा आरोप करतील. म्हणूनच पुरावा म्हणून या विधानांना थोडासाही अर्थ नाही. आणि तहलकाने दावा केला की त्यांच्याजवळ मोदींच्या सहभागाचे ‘अपरिवर्तनीय पुरावे’ आहेत! उलट, हे तथाकथित कबुलीजबाब अर्थहीन असल्याचेच ‘अपरिवर्तनीय पुरावे’ आहेत आणि मोदींनी दंगली अत्यंत कार्यक्षमतेने हाताळल्या आणि ३ दिवसात नियंत्रणात आणल्या, याचेही ‘अपरिवर्तनीय पुरावे’ आहेत. सरसरीने १९६०च्या दशकात गुजरातमध्ये दर ४ दिवसांत ३ दंगली होत होत्या. ‘इंडिया टुडे’ने १२ नोव्हेंबर २००७ च्या अंकात लिहिले आहे: ‘‘तहलकाचे स्टिंग ऑपरेशन प्रसारित झाल्यानंतर मोदींवर खटला भरण्याची मानवी हक्क कार्यकर्त्यांची मोठी मागणी सुरू आहे. पण गुजरातचे प्रसिद्ध फौजदारी वकील (क्रिमिनल लॉयर) आणि कॉंग्रेस नेते (नरेंद्र मोदींचा कट्टर विरोधक पक्ष) निरुपम नानावटी म्हणतात, ‘‘सहआरोपीचा कबुलीजबाब भारतीय पुरावा कायद्याच्या दृष्टीने पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाही. तपासयंत्रणांनी या कायद्याच्या १० व्या कलमाखाली नव्याने चौकशी करण्याचे ठरविले, तरच त्यामधून येऊ शकणारया नव्या पुराव्यावरून मोदींवर कारवाई करणे शक्य होऊ शकेल…’’” http://indiatoday.intoday.in/site/Story/1716/Gujarat:+The+noose+tightens.html?comp lete=1 84 तहलकाने प्रकाशित केलेल्या सर्व संवादांचे मूळ रूपात त्यांच्या स्वत:च्या वेबसाईटवर दिलेले मजकूर आपण पाहात आहोत. इथे गुजरात सरकारचे माजी वकील अरविंद पंड्या यांची मुलाखत पाहू: “६ जून २००७ अरविंद पंड्या – (गोधराच्या मुसलमानांना) असे वाटले की गुजराती स्वभावाने मवाळ असल्याने ते यातून सुटून जाऊ शकतील. भूतकाळात त्यांनी गुजरातींना मारहाण केली होती, अगदी संपूर्ण जगाला त्यांनी मारहाण केली, पण कोणीही धैर्य दाखविले नाही. कोणीही त्यांना रोख़ले नाही. आतापर्यंत नेहमीप्रमाणे, आताही आपण यातून सुटून जाऊ असे त्यांना वाटले. पण या आधी असे होऊ शकले, कारण येथे कॉंग्रेसची सत्ता होती. त्यांची मते मिळविण्यासाठी कॉंग्रेस पक्ष गुजराती आणि हिंदू लोकांना दडपत होता. पण यावेळी त्यांनी मार खाल्ला. आता इथे हिंदूंचे राज्य आहे. संपूर्ण गुजरातवर हिंदूंचे राज्य आहे आणि तेही विहिंप आणि भाजपाच्या… तहलका – त्यांचा अंदाज चुकला. पंड्या – नाही. काय झाले असते… कॉंग्रेसचे सरकार असते तर, त्यांनी हिंदूंना मुस्लिमांवर हल्ला कधीच करू नसता दिला. फक्त हिंदूंना दडपण्यासाठी त्यांनी आपली प्रशासनिक ताकद उपयोगात आणली असती. त्यांनी कधीही (मुस्लिमांना) हिंसाचारापासून रोखले नसते. हिंदूंनी शांतता राखावी असे त्यांनी आवाहन केले असते पण त्यांना (मुस्लिमांना) रोखण्यासाठी त्यांनी काही केले नसते. अगदी यासारख्या (गोधरा) प्रकरणातही त्यांनी कधी काही केले नसते. पण या प्रकरणात इथे हिंदू पाया असलेले सरकार होते आणि… त्यामुळे लोक तयार होते आणि राज्य सरकारही तयार होते. ही एक चांगली डोळेझाक आहे. तहलका – हे तर हिंदू समाजाचं चांगलंच नशीब होतं… संपूर्ण हिंदू समाजाचे. पंड्या – आणि आपण असं म्हणूया की राज्यकर्ताही स्वभावाने धीट होता. कारण त्यानं सांगितलं ‘बदला घ्या आणि मी तयार आहे.’ आपण आधी कल्याणसिंग यांना सलाम करायला हवा. कारण सर्वोच्च न्यायालयासमोर त्यांनी सर्व प्रकारची जबाबदारी स्वीकारली…‘मी हे केलं, मी सहभागी होतो’, असं सांगून. तहलका – नंतर, त्यांनी पक्ष बदलला तेव्हा. पंड्या – त्यांनी पक्ष बदलला. पण त्याचे संस्थापक होते… ते सर्वोच्च न्यायालयासमोर ठामपणे उभे राहिले आणि ‘मीच तो’ असं सांगितलं. तहलका – संपूर्ण जबाबदारी घेतली. पंड्या – त्यानंतर दुसरा हिरो आला… नरेंद्र मोदी… आणि त्यांनी हिंदूंच्या बाजूने उभे राहण्याच्या तोंडी सूचना पोलिसांना दिल्या. कारण संपूर्ण राज्य हिंदूंचे होते. ८ जून २००७ तहलका -– २७ फेब्रुवारीला मोदी गोधराला गेले, तेव्हा विहिंप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, हे खरे आहे का? पंड्या – नाही. त्यांनी हल्ला केला नाही. घडलं ते असं. तिथे ५८ मृतदेह आहेत… आणि संध्याकाळ झाली आहे… तुम्ही काय केलं असं लोकांनी विचारणं स्वाभाविक आहे… तहलका – सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत ते तिथे पोचले नाहीत… जेव्हा रोष वाढला, तेव्हा मोदी रागावले आणि त्यांनी… पंड्या – नाही. असं घडलं नाही. मोदी दीर्घकाळ आमच्याशी संपर्कात आहेत. तो मुद्दा विसरा. पण ते एका अधिकारपदावर होते आणि मर्यादा असणं स्वाभाविक आहे… आणि त्या त्यांना अनेक होत्या… पण त्यांनी हिंदूंच्या बाजूने सर्व संकेत दिले. राज्यकर्ता ठाम असेल, तर गोष्टी घडण्यास सुरुवात होते… तहलका – नरेंद्र मोदी २७ तारखेला गोधराहून परतल्यानंतर तुम्ही त्यांना भेटलात? पंड्या – नाही… याविषयीच्या प्रश्‍नांना मी काहीही उत्तर देणार नाही… मी देऊ नये. तहलका – सर, त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती, ते मला जाणून घ्यायचं आहे… पंड्या – जेव्हा नरेंद्र मोदींनी दूरध्वनीवरून पहिल्यांदा ऐकलं तेव्हा त्यांचं रक्त उकळायला लागलं. मला सांगा, आणखी मी काय सांगू… मी तुम्हाला काही अप्रत्यक्ष सूचना केल्या आहेत आणि त्यापेक्षा जास्त काही मी उघड करू शकत नाही… मी तसं करूही नये… तहलका – मला याची माहिती हवी आहे… त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? पंड्या – नाही. त्यांची पहिली प्रतिक्रिया अशी होती की त्यावेळी ते मंत्री नसते, तर त्यांनी बॉंब फोडले केले असते. त्यांची तशी क्षमता असती आणि ते मंत्री नसते, तर त्यांनी जुहापुरामध्ये (अहमदाबादमधील मुस्लिम बहुसंख्य भाग) नक्कीच काही बॉंबस्फोट केले असते.’’ पंड्या यांनी केलेली दोन्ही महत्त्वाची विधाने जाड अक्षरात दिली गेली आहेत. पहिले, की मोदींनी हिंदूंच्या बाजूने उभे राहण्याच्या तोंडी सूचना पोलिसांना दिल्या. हे अगदीच चूक आहे, कारण आपण 85 आतापर्यंत पाहिलेच आहे की फक्त पहिल्या ३ दिवसातच पोलिसांच्या गोळीबारात ९८ लोक ठार झाले, त्यातील बहुसंख्य हिंदू होते आणि दंगली नियंत्रणात आणण्यासाठी तसेच न होऊ देण्यासाठी पावलेही उचलली गेली होती, ती सर्व आपण आधी पाहिली आहेत. दुसरे विधान, ते मंत्री नसते, तर आणि त्यांची क्षमता असती तर जुहापुरामध्ये त्यांनी काही बॉंबचा स्फोट केला असता, हेही असंबद्ध आहे. जुहापुरामध्ये कोणीही बॉंबस्फोट घडविले नाहीत. पण पंड्या यांनी तहलकाविरुद्ध एक धक्कादायक आरोप केला. ‘ही ऑडिशन टेस्ट आहे’ असे सांगून ‘आजतक’मध्ये पत्रकार असलेल्या धीमंत पुरोहित या त्यांच्या मित्राने हे सर्व त्यांना बोलण्यास सांगितले, असा दावा त्यांनी केला. हे ओपरेशन प्रसारित झाल्यानंतर त्यांनी अनेक आरोपांबद्दल बदनामीचा खटला दाखल केला आणि पुरोहित यांना यामुळे अटकपूर्व जामीन मागावे लागले. मोदी गोधराला २७ फेब्रुवारीला संध्याकाळी गेले, तेव्हा विहिंप कार्यकत्यांनी त्यांच्यावर हल्ला केला नाही, हे पंड्या यांचे विधानही चूक आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या संकेतस्थळावर २७ फेब्रुवारीचीच बातमी आहे की विहिंप समर्थकांच्या संतापलेल्या जमावाने मोदींना धक्काबुक्की केली. https://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/VHP-activists-mob-Modi-at- Godhra/articleshow/2308257.cms?referral=PM आता आपण अहमदाबाद विहिंपचे प्रमुख राजेंद्र व्यास यांची मुलाखत पाहू : “८ जून २००७ तहलका – मला नरेंद्र मोदींबद्दल माहिती हवी आहे… त्यांचे पहिले शब्द काय होते? (गोधरा जळीतकांडानंतर) त्यांनी तुम्हा सर्वांना काय सांगितलं?… राजेंद्र व्यास – पहिल्यांदा ते म्हणाले की आपण सूड घेतला पाहिजे… हीच गोष्ट मी स्वत: जाहीरपणे सांगितली… तोपर्यंत मी काहीही खाल्लेसुद्धा नव्हते… पाण्याचा थेंबही घेतला नव्हता… मी इतक्या रागात होतो की इतके लोक मेले होते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहात होते… पण मग जेव्हा मी माझी ताकद वापरायला सुरुवात केली… शिव्याशाप द्यायला लागलो… ते (मोदी) म्हणाले, राजेंद्रभाई, शांत व्हा, सर्वच गोष्टींची काळजी घेतली जाईल. ‘सर्वच गोष्टींची काळजी घेतली जाईल,’ असं ते म्हणाले, तेव्हा त्यांना काय म्हणायचं होतं?… सर्वांनीच ते समजून घेतलं…’’ मोदींनी असे काही म्हटले होते, हे सिद्ध करायला कोणताही पुरावा नाही आणि यातील काहीही त्यांनी केले नाही, हे सिद्ध करण्यास पुरावा आहे. त्या दिवशी मोदी व्यास यांना भेटले होते की नाही हे दाखविण्यासाठी नोंदी तपासल्या पाहिजेत, कारण ते कामात खूप व्यस्त असल्याने ते व्यास यांना भेटणे फार कमी शक्यतेचे आहे, असे स्पष्ट दिसते. त्याबरोबरच राजेंद्र व्यास यांनीही यासारखे काही केले नसेल आणि केवळ पोकळ गप्पा मारत असतील, असे असण्याची शक्यता फार जास्त आहे. आता आपण पुन्हा लोकांनी कॅमेर्‍यासमोर पोलिसांबद्दल काय सांगितले ते पाहूया. सुरुवातीला बाबू बजरंगी: “१ सप्टेंबर २००७ नरेंद्रभाईंनी गुजरातमध्ये जे केले, तसे इतर कोणी करू शकत नाही. मला नरेंद्रभाईंचा पाठिंबा मिळाला नसता, तर गोधराचा बदला घेणे आम्हाला शक्य झाले नसते… पोलीस अगदी आमच्यासमोर उभे होते, जे घडतंय ते पाहात होते, पण त्यांनी डोळे आणि तोंड मात्र बंद केले होते. त्यावेळी पोलिसांची इच्छा असती, तर त्यांनी आम्हाला आत येऊ दिले नसते. तिथे फक्त एकच फाटक होतं, सोसायटीला असतं तसं, आणि मग ‘पाटिया’ सुरू होतं. आम्हाला थांबवायचं त्यांनी ठरवलं असतं तर, त्यांची संख्या ५० होती, ते थांबवू शकले असते. आम्हाला पोलिसांकडून चांगला पाठिंबा मिळाला… नरेंद्रभाईंमुळे… कारण गुजरातमध्ये जे काही घडलं ते चांगल्यासाठीच घडलं. या लोकांपासून (मुस्लिम) आम्हाला थोडीतरी सुटका मिळाली… ते इतके धीट आणि धाडसी बसले होते… मुस्लिम लोक पोलिसांकडे मदतीसाठी दूरध्वनी करत राहिले, त्यांच्याकडे पळाले. त्यांच्यात सालेम नावाचा एक माणूस होता… नरोडा पाटियाचा एक दादा… तो पोलीस जीपमध्ये चढला… आत शिरला… मी स्वत: त्याला पकडलं आणि बाहेर खेचलं. पोलीस मला म्हणाले, ‘मार त्याला, त्याला जिवंत सोडलं, तर तो आपल्याविरुद्ध साक्ष देईल…’ त्याला जरा बाजूला नेलं आणि तिथेच संपवलं… तो हरामखोर जिवंत राहिला असता, तर त्यानं सांगितलं असतं की मी पोलीस जीपमध्ये चढलो आणि त्यांनी मला बाहेर फेकलं… असं सगळं झालं… 90 तहलका- त्यांचं नाव काय? पटेल- मला माहीत नाही. पण… चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की ते जीवन दल भोळे, आमचे विभाग प्रचारक, यांच्याबरोबर आहेत…’’ या माणसाने केलेली विधाने खरी आहेत की खोटी, याचा तपास व्हायला हवा. पण अहमदाबादच्या कालुपूर आणि दरियापूर भागातील हिंदूंची सुरक्षितता महत्त्वाची होती, हे त्याचे विधान मात्र अगदी खरे होते. या माणसाने स्वत:ला दोषी ठरवले, मोदींना नाही. आता आपण एहसान जाफरी प्रकरणातील आरोपी मांगीलाल जैन यांचे म्हणणे पाहू या. “८ सप्टेंबर २००७ तहलका- तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलत होता, त्या इन्स्पेक्टरचे नाव काय? जैन – (के जी) एरडा (मेघानीनगरचे पोलीस निरीक्षक) तहलका- एरडा… त्यांनी काय केलं? जैन – त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्या दिवशी त्या लोकांना जनतेपासून दूर ठेवलं. तहलका – मुस्लिमांपासून दूर ठेवलं? जैन – लोकांपासून… हिंदूंपासून… त्यांनी आम्हाला सांगितलं की सगळं काही २ ते ३ तासात संपलं पाहिजे. तहलका – याचा अर्थ असा की त्यांनी तुम्हाला २-३ तास दिले. जैन – सगळं संपवायला. तहलका – सर्व काही संपवायला. जैन – असं तर पूर्ण अहमदाबादमध्ये घडत होतं. (हे गृहीत होतं.) कोणीही बाहेरचा माणूस येऊ शकत नव्हता. अगदी जादाची कुमकही येणार नव्हती. संध्याकाळपर्यंत तिथे कोणीही आलं नाही. त्यामुळे आम्हाला आमचं काम करणं अपेक्षित होतं. तहलका – २-३ तासात हवं ते करा असं त्यांनी तुम्हाला सांगितलं. जैन – त्यांनी असं सांगितलं आणि जमाव बेभान झाला. काहींनी लुटालूट सुरू केली. इतरांनी हत्यांना सुरुवात केली. कोणीतरी एका माणसाला बाहेर ओढलं, खाली पाडून त्याचे तुकडे केले आणि त्याला जाळलं. अशा प्रकारची कितीतरी कृत्यं झाली. तहलका – तुम्हाला २ महिन्यानंतर पकडलं? जैन – मी २ महिन्यानंतर समर्पण केले. तहलका – तुम्ही न्यायालयात हजर झालात का? जैन – न्यायालयात नाही.. मी गुन्हे शाखेच्या लोकांसमोर हजर झालो. तिथे सदाव्रतीसाहेब होते… मी त्यांना घरी बोलावलं. आम्ही रात्री जेवण घेतलं. त्यांनी मला शरण यायला सांगितलं आणि मी तसं केलं. तहलका – सदाव्रतींनी सहकार्य केलं? जैन- सहकार्य केलं… ते मला संध्याकाळी भेटले. तहलका – त्याची काही मदत झाली का? जैन – त्यांनी सांगितलं की मांगीलालचं नाव तिथे आहे. त्यांनी मला शरण यायला सांगितलं. तहलका – तुमच्या घरी? जैन- माझ्या घरी. काळजी करू नका. (ते म्हणाले) भिण्याचंही कारण नाही. उद्या सकाळी १० वाजता हजर व्हा. सर्व काही ठीक होईल. तमुचा मुलगा एक दोन महिन्यात बाहेर येईल. त्याचं नाव आता रेकॉर्डवर आल्यानं, दुसरा काही पर्याय नाही. त्याचं नाव आहे, याचाच अर्थ असा की त्यानं हजर व्हायला हवं. अगदी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्रीही यात काही करू शकत नाहीत… म्हणून मी गुन्हे शाखेसमोर हजर झालो… त्यांनी माझी चांगली काळजी घेतली. तहलका – त्यांनी तुमची चांगली काळजी घेतली. जैन- होय, साहेब. त्या कोठडीत भरपूर डास होते आणि ती गलिच्छ होती. आम्हाला तिथे ठेवलं नाही… त्यांच्या कार्यालयाच्या वर एक खोली होती. आम्हाला कार्यालयात ठेवलं. तिथे गाद्या होत्या… दिवसातून दोन वेळा माझ्या घरून जेवण यायचं. आम्ही तिथे ३ दिवस होतो… तहलका – ३ दिवस जैन – पहिल्याच दिवशी आम्हाला न्यायालयात हजर केलं. तहलका – तुम्हाला कोणत्या जागेवरून उचललं, याची नोंद त्यांनी कुठे केली? जैन – ते म्हणाले की त्यांनी आम्हाला घरातून ताब्यात गेतलं. तहलका – असं ते म्हणाले जैन – हो, ते असंच म्हणाले, पोलीस असेच असतात. ते सांगतात एक आणि करतात दुसरंच. आपलं नाव स्वच्छ राहावं, एवढंच त्यांना हवं असतं. तहलका – पण त्यांनी तुमची चांगली काळजी घेतली. 91 जैन – चांगली होती. आम्ही संध्याकाळी तिथे गेलो… आम्हाला दिवसातून २ वेळा चहा मिळायचा आणि आम्ही फोनही करू शकत होतो. मला घरूनही फोन येत होते… आम्हीही करत होतो… आम्हाला फोनची पूर्ण सोय होती. ३ दिवस आम्ही गुन्हे शाखेत होतो… त्यांनी आम्हाला स्पर्शही केला नाही… मी हे सांगितलं पाहिजे.. कोणीही माझ्याकडे बोटसुद्धा दाखवलं नाही… त्याच दिवशी त्यांनी माझी जबानी नोंदवली… ‘काय झालं… तुम्ही त्या दिवशी कुठे होता.’ (हेच त्यांनी विचारलं.) तहलका – तुम्ही काय सांगितलं? जैन – मी सांगितलं की दुकान बंद होतं आणि मी तिथे पाहायला म्हणून गेलो होतो… मी गटाचा एक भाग होतो… त्या जागेपासून माझं घर लांब होतं आणि तिथे प्रचंड जमाव होता. ज्यांनी हत्या केल्या त्यांच्यापैकी कुणालाही मी ओळखलं नाही. मी हेच सांगितलं… ‘हत्या कोणी केल्या, ते मला माहीत नाही. सर्व जण घोषणा देत होते. म्हणून मीही दिल्या…’ हेच मी त्यांना सांगितलं आणि नंतर मी सांगितलं की २ वाजता, हे सगळं झाल्यावर मी घरी गेलो. मी हेच सांगितलं. तहलका – तुम्ही तेच सांगितलं? जैन – हेच सांगितलं. तहलका – सर्व काही खरं सांगण्यासाठी त्यांनी तुमच्यावर जबरदस्ती केली नाही का? जैन – नाही, साहेब… मला स्पर्शही कोणी केला नाही… मी जे सांगितलं ते त्यांनी लिहून घेतलं. तहलका – अगदी तुम्ही सांगितलं, तेच त्यांनी लिहिलं? जैन – ते मला काहीही म्हणाले नाहीत… दोन दिवस मी रिमांडमध्ये होतो… पहिल्याच दिवशी रिमांड संपला. तो फक्त नावापुरताच होता. दोन दिवस मला घरून जेवणाचा डबा मिळाला… माझे कुटुंबीय मला भेटायला येत होते. मला सर्व सवलती होत्या. तहलका – याचा अर्थ, रिमांड ही फक्त औपचारिकता होती. … कायदेशीर प्रक्रिया. जैन – त्यांनी कायदेशीर प्रक्रिया नीटपणे पूर्ण केली…’’ ‘‘अगदी जादाची कुमकही येणार नव्हती… ते तिथे संध्याकाळपर्यंत येणार नव्हते… त्यामुळे आम्हाला सर्व काम करता आलं’’, हे त्यांचे विधान अगदी चुकीचे आहे. कारण कुमक त्याच दिवशी पोचली होती, पण तोपर्यंत जमाव १० हजारापर्ययत वाढला होता, असे ‘इंडिया टुडे’ म्हणतं. या माणसाची ही विधाने खरोखर सत्य असतील, तर त्याच्यावर खटला नक्कीच चालवावा. पण त्याची ही विधाने कायद्याच्या कक्षेत पुरावा म्हणून उभी राहणार नाहीत. गुलबर्ग प्रकरणातील आरोपी मदन चावल याची मुलाखत : “१२ जून २००७ चावल- त्या दिवशी मी तिथे होतो… पूर्ण दिवस, मी त्यांच्याबरोबर पळालो. त्यांनी जाफरीसाहेबांना आणले, तेव्हा मी तिथेच उभा होतो… त्यांनी त्यांना खाली पाडले, पाठीत लाथा घातल्या… त्यांना त्यांच्या खांडोळ्या करायच्या होत्या. तहलका- हे सगळं सविस्तर सांगा. हे कुठे सुरू झालं? चावल – मी माझ्या दुकानात होतो, तेव्हा ८.३० ते ९ च्या दरम्यान दुकाने बंद करण्यासाठी विहिंपचे लोक आले. ९-९.३० वाजता एका दुकानाला माझ्या दुकानासमोर जाळण्यात आलं. तेव्हा मला समजलं की ते सुरू झालं होतं. तहलका – ते दुकान मुस्लिमांचं होतं? चावल – हो, ते त्यांचं होतं. एकदा हे सुरू झाल्यावर लोकांची पळापळ सुरू झाली. पपांनी मला माझं दुकान बंद करायला सांगितलं… तो माझा भाग असूनही. माझं दुकान उघड राहिलं असतं तरी कोणीही काहीही म्हणू शकलं नसतं. दुकान बंद करायला त्यांनी सांगितल्यावर कोणी काहीही बोललं नाही. मग मी हाताच्या इशार्‍यांनी सांगितलं की हे बरोबर दिसत नाही, शेवटी ही धर्माची बाब आहे आणि म्हणून दुकान बंद करणंच महत्त्वाचं आहे. माझे वडील म्हणाले, ‘आजचा दिवस बंद ठेव. आपण घरी जाऊ.’ माझे वडील, इतर काहीजण, आम्ही घरी गेलो. नंतर १०.३० किंवा ११ वाजता मी घराबाहेर पडलो… त्यानंतर काही क्षणात मी जमावात सामील झालो… मी जमावाबरोबर होतो तेव्हा सर्व वेळ कल्लोळ सुरू होता… किमान अडीच तास हे सगळं होत राहिलं. तहलका – जमावाचं नेतृत्व कोण करत होतं? चावल – बरेच लोक जमावात सामील झाले होते. ज्या क्षणी ते दुकान पेटवलं गेलं, त्या क्षणी सर्वजण जमायला सुरुवात झाली. तहलका – विहिंपचे लोकही या जमावात होते का? चावल – सगळे होते. तहलका – विहिंपमधले कोण होते? चावल- त्यावेळी मला सर्व नेते माहीत नव्हते. माझे त्यांच्याशी कोणतेही संबंध नव्हते. कारण माझी पार्श्वभूमी व्यवसायाची असल्यानं त्याच क्षेत्रातले लोक मला माहीत होते… नंतर मात्र मी अतुलभाईंना भेटलो, तेव्हा मला आठवलं की तेही तिथे होते. तहलका – अतुल वैद तिथे होते? 92 चावल – अतुल वैद तिथे होते आणि भरतभाई तेली, तेही तिथे होते. ही मुलं… मोठी माणसं… मला तुरुंगातून बाहेर काढायला आले तेव्हा त्यांना मी भेटलो… ते पोलीस ठाण्यात आले होते… अर्थात ते सेंट्रल जेलमध्ये कधीच आले नाहीत… ते पोलीस ठाण्यात आले, तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की तेही तिथे होते. आणि मग मला आश्चर्य वाटायला लागलं की यांची नावं वगळून मला का अटक केली गेली… माझं नाव आलं तेव्हा अतुल वैद आणि भरत तेली यांची नावं का घेतली गेली नाहीत? मी त्याला फारसं महत्त्व दिलं नाही, कारण मला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी हेच लोक मला मदत करू शकले असते… त्यासाठीच मी माझं तोंड कधी उघडलं नाही. हे लोकही तिथे होते याबद्दल मी एक शब्दही उच्चारला नाही. कोणीही याबद्दल काही बोललं नाही… अगदी तुरुंगात असलेले ते ४० तरुणही बोलले नाहीत. तहलका- प्रत्येकाला हे माहीत होतं. चावल- त्यांना माहीत होतं. नेमकं काय झालं याबद्दल आम्ही कधीच काही बोललो नाही… तुरुंगात आम्ही हेच म्हणत राहिलो की आम्हाला याबद्दल काहीच माहीत नाही… आम्ही बरोबर जाळ्यात पकडलो गेलो… आग लावण्यासाठी केरोसीनचा उपयोग केला असा आरोप माझ्यावर पहिल्या आरोपपत्रात लावण्यात आला. त्या आरोपपत्रात ५.३० ते ६ च्या दरम्यान एरडासाहेबांच्या सांगण्यानुसार माझ्यावर गोळी झाडण्यात आली. तहलका – तुम्हाला गोळी कोणी मारली? चावल- ते एरडा साहेब म्हणाले तसं… तो पूर्ण विभाग. मी तुम्हाला ती जागा दाखवली ना? तहलका – हो. चावल – मी असाच तिथे उभा होतो…. त्यांच्याजवळ ८ ते १५ लोक उभे होते. आम्ही विचारलं, साहेब, तुम्ही काय करताय, त्यांना का वाचवताय? तहलका- हे तुम्ही एरडा साहेबांना विचारलं? चावल – लोकांनी… आम्ही ८ ते १५ लोक होतो… प्रत्येकानंच विचारलं, ‘तुम्ही हे काय करताय?’ तहलका- ते मुस्लिमांना कुठे घेऊन जात होते, हे तुम्ही विचारलं? चावल – आम्ही ‘त्यांना (मुस्लिमांना) कुठे घेऊन जात आहात’ हे विचारलं… तेव्हा त्यांनी ते काय करत आहेत, ते आम्हाला सांगितलं. तहलका – त्यांनी काय सांगितलं? चावल – त्यांनी सांगितलं, हे करा… जेव्हा ही गाडी (जिच्यात मुस्लिम होते) या बाजूनं येईल, तेव्हा आमचे पोलीस (गाडीबरोबर असलेले) पळून जातील… तुम्ही गाडीला आग लावा. सगळी घटना इथेच संपेल आणि कोणाविरुद्ध खटला दाखल करण्याचा प्रश्नच उभा राहणार नाही. ‘पूरी पिक्चर यहीं खतम हो जायेगी.’ त्यांनी हे सांगितलं, तेव्हा बागडी समाजाला वाटलं की जे साक्षीदार होऊ शकतात, त्यांनाच पोलीस घेऊन जात आहेत… (ते घाबरले) की ते त्यांना त्रास देऊ शकतात… त्यांनी एरडासाहेबांवर दगडफेक करायला सुरुवात केली… आणि जेव्हा त्यांच्यापैकी एक दगड त्यांना लागला तेव्हा मी पळून गेलो. त्यांनी त्यांचं रिव्हॉल्व्हर बाहेर काढलं… ते माझ्या मागे होते… माझ्यावर ओरडून त्यांनी मला थांबायला सांगितले. माझ्याबरोबर माझ्या पुतण्याला खेचून नेण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी माझ्यावर गोळी झाडली. तहलका – एरडासाहेबांनी तुमच्यावर गोळी झाडली? चुकून झाडली का? चावल – चुकूनच झाडली… ती माझ्या हातावर लागली. माझ्या हाताला जखम झाली, पण एकही दवाखाना उघडा नव्हता. सर्व बंद होते. अगदी हॉस्पिटलसुद्धा त्यावेळी… मग मी सिव्हिल हॉस्पिटलला गेलो… यासारख्या गोष्टींमध्ये मी यापूर्वी कधीच भाग घेतला नव्हता. त्यामुळे याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. त्या दिवशी हॉस्पिटलच्या रेकॉर्डवर मी माझं खरं नाव लिहून दिवस संपवला. तहलका – मग त्या सकाळी तुम्ही जाफरींना कसं मारलं? चावल – जाफरी. ते असं झालं की त्या लोकांनी त्यांना पकडलं, मी त्यांच्या पाठीत लाथ घातली आणि त्यांनी त्यांना बाजूला ओढलं. त्यांनी त्यांना ओढलं त्याचक्षणी. तहलका – तुम्ही जाफरींना लाथ मारली? चावल – लाथ मारली. तहलका – ते खाली पडले. चावल – गिरा… वो नहीं… खौंच… उनके हाथ में था ना…. पांच-छे जन पकड लिये थे, फिर उसको जैसे पकडके खडा रखा, फिर लोगों में किसीने तलवार मारी… हाथ काटे… हाथ काटके फिर पैर काटे… फिर ना, सब काट डाला… फिर टुकडे कर के फिर लकडा जो लगाये थे, लकडे उसपे रखके फिर जला डाला… जिंदा जला डाला. तहलका – मग जेव्हा तुम्ही जाफरींच्या शरीराचे तुकडे करत होता, तेव्हा एरडा त्यांना वाचवण्यासाठी आले नाहीत? चावल – कोणीही काहीही केलं नाही. त्यावेळी तर इरडासाहेब तिथे नव्हतेच. आपल्या वाहनासह ते मेघानीनगरला गेले होते. ते लोक जाफरीसाहेबांचे तुकडे करत आहेत, हे त्यांना माहीतच नव्हतं. हे सगळं १ किंवा १.३० वाजता घडलं. तहलका – पण जाफरीसाहेबांच्या उरलेल्या कुटुंबाला पळून जायची संधी मिळाली का? चावल – नाही. फक्त त्यांची पत्नी वाचली. तिनं हिंदूंसारखा वेश करून स्वत:ला हिंदू म्हणवून घेतलं. तहलका – पण त्यांच्या काही मुलींना वाचवलं… 93 चावल – त्या ठिकाणचं कोणीही सुटलं नाही, त्यांच्या कुटुंबातलंही कोणी वाचलं नाही. जे कोणी त्यावेळी तिथं नव्हते, तेवढेच वाचले. त्यांच्या बायकोनं सांगितलं की ती मोलकरीण आहे… हिंदू, मागच्या बाजूला असलेल्या पत्रेवाली चाळीत राहणारी. मला तुम्ही का मारता (ती म्हणाली) मी तर साधी नोकराणी आहे. तिनं हिंदूंसारखे कपडे घातले होते… चांगले कपडे. तहलका – तुम्ही तिला ओळखू शकला नाहीत, म्हणून ती वाचली? चावल – मी त्यापूर्वी कधीही तिला भेटलो नव्हतो. कारण जावं आणि त्यांना भेटावं अशी काही गरजच नव्हती. त्यांच्याबरोबर माझे कोणतेही संबंध नव्हते. तहलका – गुलबर्ग सोसायटी किती मोठी आहे? इथे बरेच लोक राहतात का? चावल – खूपच राहतात. तहलका – मग आता तिथे राहायला म्हणून लोक परत आले का? चावल – कोणीही परत आलं नाही… ती आता बंद आहे… आता जणू तुरुंगच आहे तो. कोणीही तिथे परतलं नाही. तहलका – पण त्या संध्याकाळी काही लोकांना वाचवण्यात आलं. चावल – ४० लोक पळून गेले… काहीजण आधीच सोडून गेले होते. तहलका – मग तुम्ही गुलबर्गमध्ये कसे शिरलात? चावल – लोकांनी आपापल्या घरातून गॅस सिलेंडर आणले. ते त्यांनी सोसायटीच्या बाहेरच्या भिंतींवर ठेवले… मग त्यांनी ब्रेड वगैरे बनवतात त्या बेकरीतून पाईप मिळवले आणि त्यांच्या मदतीनं गॅस सिलेंडर उघडले. मग ते तिथून लांब गेले आणि त्यांनी कापडाचा खुपडा (मशाल) केला आणि भिंतींवरच्या सिलेंडरवर तो फेकला. सिलेंडर्सचा स्फोट झाला आणि भिंत कोसळली. मग आम्ही आत गेलो. तहलका – भिंत बरीच उंच होती का? चावल – हो. बरीच. ती दोन फुटांची भिंत नव्हती. जवळजवळ १५-२० फूट उंच असेल. त्या भिंतीवर काटेरी तारांचं कुंपणही होतं. तहलका – तरी फक्त १ किंवा २ सिलेंडरमुळे ती भिंत पडली? चावल – दोन सिलेंडर… एक तिकडे फेकला होता आणि दुसरा समोरच होता. त्या सिलेंडर्समुळेच अर्थातच भिंत पडली. सिलेंडर खूप जड असतात. तहलका – त्यामुळे आतल्या घरांना आग लागली. चावल – लोकांनी त्यांची घरं जाळण्यासाठी, त्यांच्याच घरातल्या वस्तू वापरल्या… कोणालाही बाहेरून काही आणण्याची गरजच पडली नाही… त्यांच्याच वस्तू त्यांचीच घरं जाळायला कामी आल्या. तहलका – पाटियामध्येही अशीच घटना घडली. चावल – असंच घडलं पटियामध्येही’’ http://www.tehelka.com/story_main35.asp?filename=Ne031107They_hacked.asp ‘त्यांच्या कुटुंबापैकी कोणीही वाचलं नाही. फक्त त्यांची पत्नी वाचली’ हे सपशेल खोटे आहे. सत्य असे आहे की या घटनेत १८० पेक्षा जास्त मुस्लिमांना वाचविले गेले आणि त्यांच्या पत्नीबरोबरच तिथे असलेल्या इतर नातेवाईकांनाही वाचवण्यात आले. तसेच स्वत:ला वाचविण्यासाठी त्यांच्या पत्नीने आपण हिंदू असल्याचे भासविले, असे संकेत कुठेही मिळत नाहीत. हे अगदीच असत्य आहे. म्हणजे पुन्हा ही विधाने पूर्णपणे खोटी आहेत. तसेच जाफरींच्या देहाचे तुकडे केले गेले नाहीत. शवविच्छेदनाचा अहवाल सांगतो की गोळ्या लागून झालेल्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला, असे ‘द पायोनियर’चे एमडी आणि संपादक चंदन मित्रा यांच्या ‘अ स्टिंग विदाऊट व्हेनम’ या १२ नोव्हेंबर २००७ च्या ‘आऊटलुक’च्या लेखात म्हटले आहे. जाफरी यांचे पाय कापले, वगैरे सारखी चावल यांची विधाने पुन्हा बढाया मारणारी खोटी विधाने आहेत, हे स्पष्ट दिसते. विहिंपचे नेता अनिल पटेल यांनीही आपल्या मुलाखतीत या तहलकाच्या स्टिंग ओपरेशनमध्ये म्हटले आहे की दंगलींमध्ये मुस्लिंमावर हल्ले करण्यात कॉंग्रेसचे नेतेही गुंतले होते. याबद्दल कॉंग्रेस पक्षाला काय म्हणायचे आहे? ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या ९ ऑगस्ट २००३ च्या अंकात, दंगलींमध्ये मुस्लिमांवर हल्ले करणार्‍या २५ कॉंग्रेस नेत्यांवर असलेले आरोप आपण पाहिले आहेच. आरोपी आणि इतर लोकांच्या मुलाखतींबद्दल हे सर्व झाले. पण स्टिंग ऑपरेशननंतर त्यांचा दृष्टिकोन काय होता, हे कोणीही ऐकलेले नाही. स्वत:च्या बचावासाठी या लोकांना काय सांगायचे आहे? पण 98 या विषयावर तहलकाने दिलेले सर्व अहवाल वाचल्यावर, एक गोष्ट स्पष्ट दिसते की, सत्य बाहेर आणण्यात तहलकाला रस नाही, पण भाजपा आणि नरेंद्र मोदी व संघ परिवार यांना मलीन करण्यातच त्यांना खरा रस आहे. सत्य असे आहे की, ‘गोधरा’ घटनेनंतरही मुस्लिम तेवढेच आक्रमक होते आणि त्यांनी शेकडो हिंदूंना ठार मारले. याचे स्पष्टीकरण तहलका कसे देणार आहे? सर्व बेपत्ता झालेले लोक मृत झाले आहेत असे गृहीत धरून युपीए सरकारने दिलेल्या आकड्यांवरुन मृतांची संख्या ११७१ होते. तरीही तहलकाच्या संपादकांनी दावा केला की दंगलीत पहिल्या ३ दिवसात २५०० मुस्लिमांची हत्या झाली! असे लिहिले की जसे पहिल्या ३ दिवसांनंतर आणखीनही मुसलमान मारले गेलेत, आणि कोणीही हिंदू मारले गेले नाहीत! ५.५ कोटींच्या लोकसंख्येमध्ये हिंदू आणि मुस्लिम मिळून एकूण ११७१ मृत्यू झाले, याला शिरकाण (‘pogrom’) म्हणत नाहीत. तरीही दंगली ‘नरसंहार’ होत्या, असे तहलकाचे पालुपद सुरूच राहिले. ‘गोधरा’ नंतरच्या दंगलींमध्ये दंगल करणे आणि हिंदूंना ठार करणे, या आरोपांखाली ८० मुस्लिम दोषी ठरले आहेत. मुस्लिमांवर सिद्ध झालेल्या या आरोपांमुळे हे सिद्ध होते की मुस्लिमही तितकेच आक्रमक होते. मुस्लिमांनाही दोषी ठरवले गेले असताना, या दंगली म्हणजे ‘नरसंहार’ होते असे तरुण तेजपाल कसे म्हणू शकतात? पूर्ण स्टिंग ऑपरेशनमध्ये फक्त २ प्रकरणांची चर्चा करण्यात आली- एहसान जाफरी प्रकरण आणि नरोडा पाटिया प्रकरण. सदरपुरा, ओड आणि पंडरवाडा यांच्याबरोबरच राज्यातील खर्‍या मुस्लिमविरोधी दंगलींची ही दोन प्रकरणे आहेत. फक्त या दोन प्रकरणांच्या आधारावर तहलका गुजरात दंगलींना ‘नरसंहार’ म्हणते. दंगलींची अशी अनेक प्रकरणे आहेत- अहमदाबादजवळचे हिंमतनगर, अहमदाबादमधील दनीलिमडा, सिंधी मार्केट, भांडेरी पोल आणि गुजरातमधील इतर अनेक दंगली, जिथे मुस्लिम आक्रमक होते आणि त्यांनी हिंदूंवर हल्ला केला. या प्रकरणी शोध घेण्याचे किंवा मुस्लिम दोषी सिद्ध झाले आहेत, याची दखल घेण्याचे कष्ट तहलकाने घेतले का? या कबुलीजबाब उर्फ बढाईखोर थापांबद्दल तरुण तेजपाल यांनी बरेच काही लिहिले आहे. या प्रकरणात स्टिंग ऑपरेशनबद्दल जे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्याबद्दल कोणीही कधीही उत्तर दिले नाही. गुजरात दंगलींबद्दल जे खोटं बोलले, त्यासाठी कदाचित संबंधित खोटं बोलणारया लोकांना तुरुंगवास देणे योग्य ठरेल आणि नरेंद्र मोदी, संघ परिवार आणि भारतीय सुरक्षा दलांना त्यांनी खूप मोठी नुकसानभरपाई देणे योग्य ठरेल. कारण या खोट्या थापांमुळे निष्पाप मुस्लिम जहाल बनलेत, आणि भारताची, नरेंद्र मोदी आणि संघपरिवाराचीही प्रतिमा काळवंडली आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *