जबरदस्ती फासावर चढविण्यासाठी फक्त हे केले होते आणि त्याला काही किंमत नाही?” हे प्रकरण या प्रश्नाचे उत्तर अगदी स्पष्ट करेल. या स्टिंग ऑपरेशनमुळे निष्पाप मुस्लिमांमध्ये, भारतातील आणि परदेशातील सुजाण, चांगल्या-अर्थाच्या लोकांमध्ये प्रचंड मोठा संताप उसळला.
‘रेडिफ डॉट कॉम’च्या संकेतस्थळावर २५ ऑक्टोबर २००७ ला आलेला वृत्तांत असा होता:
‘‘गुजरात दंगली हा नरसंहार, मोदींची त्याला अनुमती : तहलका
ओंकार सिंग, नवी दिल्ली
शोध पत्रकारिता करणार्या साप्ताहिक ‘तहलका’ने गुरुवारी (२५ ऑक्टोबर २००७) २००२ च्या गुजरात दंगलींमागचे सत्य आपण उकलले, असा दावा केला.
गोधरा रेल्वे जळीत कांडानंतर झालेल्या मुस्लिमांच्या हत्या या ‘संतापाच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेतून’ झाल्या नाहीत, तर संघ परिवारातील आणि प्रशासनातील ज्येष्ठ मंडळींकडून केलेला हा ‘नियोजित नरसंहार’ होता आणि त्याला मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा ‘आशीर्वाद’ होता असा ‘अपरिवर्तनीय पुरावा’ (‘irrefutable evidence’) आपल्याकडे असल्याचा दावा ‘तहलका’ने केला आहे.
नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलताना ‘तहलका’चे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांनी दावा केला की गेले सहा महिने या साप्ताहिकाने स्टिंग ऑपरेशन केले आणि संघपरिवारातील अनेक नेत्यांशी ते सत्य बाहेर काढायला बोलले. या नेत्यांमध्ये भाजपाचे गोधराचे आमदार हरेश भट, शिवसेना नेते बाबू बजरंगी (जे आधी विहिंपमध्ये होते) विहिंप नेते अनिल पटेल आणि धवल जयंती पटेल यांचा समावेश होता.
‘विहिंपच्या कार्यालय परिसरात बॉंब तयार केले गेले जात होते याचा आमच्याकडे पुरावा आहे’, असे संपादक (शोध) हरिंदर बावेजा यांनी ‘रेडिफ डॉट कॉम’ला सांगितले.
‘तहलकाच्या या जमीन हादरवून टाकणार्या तपासात, पहिल्यांदाच ज्यांनी हा संहार घडवून आणला त्यांच्याकडूनच सत्य ऐका. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी स्वत: आले आणि गुन्हेगारांची पाठ थोपटून त्यांनी ‘चांगले काम केले’ अशी शाबासकी दिल्याची धक्कादायक माहिती आहे.’ बावेजा म्हणाल्यात.
मासिकाच्या या अहवालावर भारतीय जनता पार्टीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली, आणि म्हटले की तहलका सी.आय.ए. म्हणून (कॉंग्रेस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी) काम करत आहे. हे एक संगनमताने केलेले स्टिंग असून त्याला शोध पत्रकारिता मुळीच म्हणता येणार नाही. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘गुजरात विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कॉंग्रेसचा गलिच्छ चलाखी विभाग (‘dirty tricks department’) पुन्हा कार्यरत झाला आहे.’
या स्टिंग ओपरेशन मध्ये कॅमेरावर पकडल्या गेलेला एकही नेता बोलायसाठी उपलब्ध नव्हता, फक्त गुजरात विहिंपचे नेते धवल जयंती पटेल यांनी सांगितले की या दंगलींदरम्यान बजरंगी त्यांच्याशी बोलले नाहीत आणि त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन पाहिलेले नाही.
(या स्टिंग ओपरेशन मध्ये) भट हे कॅमेर्यासमोर दाखविले गेलेत असे म्हणताना की ते एका बैठकीत उपस्थित होते जेथे मोदींनी त्यांना ‘त्यांच्या मनात असेल तसे करण्यासाठी ३ दिवसांचा वेळ दिला.’ ‘३ दिवसानंतर त्यांनी (मोदींनी) हे थांबवा असा आदेश दिला आणि त्याक्षणी सर्वकाही थांबले’, असे भट स्टिंग ओपरेशन मध्ये म्हणाले. नरोडा पाटिया हत्याकांडानंतर मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले, असेही ते म्हणाले.
मासिकाने दावा केला की धवल जयंती पटेल यांनी गुप्तपणे काम करणार्या तहलकाच्या पत्रकाराला सांगितले की त्यांच्या स्वत:च्या बॉंब तयार करण्याच्या कारखान्यात विहिंपच्या कार्यकर्त्यांनी अनेक बॉंब तयार केलेत. ‘त्यांनी अगदी रॉकेट लॉंचरही तयार केले, जे या दंगलीत वापरण्यात आले,’ असे सांगणारा एक भाजपा आमदारही या स्टिंगमध्ये दाखवण्यात आला. गोधरा येथे २७ फेब्रुवारी २००२ ला साबरमती एक्स्प्रेसच्या एस ६ या डब्याला लावण्यात आलेली आग वास्तविक ‘जमावाच्या उत्स्फूर्त रागातून लागली होती. गुजरात सरकारच्या म्हणण्याप्रमाणे तो पूर्वनियोजित कट नव्हता’ व तो कट आहे हे सिद्ध करण्यासाठी रचल्या गेलेल्या खोट्या गोष्टी तहलकाने उघड केल्या, असाही दावा त्यांनी केला.”
(संदर्भ : http://www.rediff.com/news/2007/oct/25godhra.htm)
तहलकाच्या चौथ्या भागात, ४४ व्या अंकात १७ नोव्हेंबर २००७ ला तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांनी लिहिले:
‘‘…यावेळी – २००२ मधील गुजरातच्या सुनियोजित हत्याकांडाच्या आमच्या शोधात – कट, कारस्थाने शोधणारयांनी कळस गाठल्याचे दिसून आले. आम्ही कॉंग्रेससाठी काम करतो आहोत असा आरोप भाजपाने आमच्यावर केला, तर आम्ही भाजपासाठी काम करत आहोत, असे कॉंग्रेसने पसरवले! यातून स्पष्ट होते की आम्ही काहीतरी योग्यच करीत होतो. या सव आरोप प्रत्यारोपात ‘आयडिया ऑफ इंडिया’ची लढाई लालू यादव, मायावती आणि डाव्यांवर सोडण्यात आली. कॉंग्रेसला या वाक्प्रचाराचा अर्थ चांगला माहीत आहे, कारण त्यांच्याच पूर्वजांनी ही संकल्पना मांडली. पण आता त्यांना तिचा अर्थ आठवत नाही, असे दिसते.
गुजरात हत्याकांडाच्या या रहस्योद्घाटनानंतर (तहलका स्टिंग ओपरेशन प्रसारित होऊन) आठवडाहून अधिक काळ लोटला तरी पंतप्रधान (तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग) आणि गृहमंत्री (तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील) यांनी एकही विधान केले नाही, ही असाधारण गोष्ट आहे. पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच आपण कसे मारले, का मारले आणि कोणाच्या परवानगीने मारले हे हत्या करणार्यांनी कॅमेर्यासमोर सांगितले होते. आणि हे कोणी क्षुल्लक गुन्हेगार नव्हते. ते धर्मांध, एक विचारधारेने झपाटलेले, उपखंडातील भयंकर दुखर्या नसेशी खेळणारे, घातकी फुटीला कारणीभूत ठरू शकणारे असल्यामुळे देशाला तोडून टाकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. [नोंद घ्या: तरुण तेजपाल चांगल्याने जाणतात की हे तथाकथित ‘गुन्हेगार’ बढाईखोर थापा, पोकळ गप्पा मारु शकत असतील आणि जे ते बोलले, गुप्तपणे रेकॉर्डींग़ सुरु आहे हे माहिती नसताना, त्यातील अगदी काहीही वास्तवात केलेले नसेल, याची दाट शक्यता आहे. पण ते उगाच मसाला टाकतात आहेत. आणि जर त्यांना हे सुचले नाही, की हे लोक पोकळ बढाईखोर थापा मारु शकत असतील, तर ते पत्रकार होण्यास योग्य नाहीत.] पण स्पष्टपणे, ‘रेस कोर्स रोड’ च्या सज्जन माणसासाठी ते पुरेसे नव्हते [तत्कालीन पंतप्रधान, मनमोहन सिंग].
अप्रामाणिक लोकांच्या टेकडीवर बसलेल्या प्रमाणिक आणि अधिकाराशिवाय जबाबदारी दिल्या गेलेल्या पंतप्रधानांवर टीका करणे कदाचित अयोग्य ठरेल. म्हणून आपण कॉंग्रेसच्या अशा रणनीतिकज्ञ लोकांकडे (strategists) पाहूया, जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाहीत, पण इतर अनेकांना जिंकून आणण्यासाठीचे गुपित जाणतात. या विचित्र गणनेने पाशवी हत्या आणि बलात्कारात मोंदींचे हात दर्शविणे म्हणजे गुजराती हिंदूंना पटवून देणे की बरोबर अशाच प्रकारचे नेतृत्व त्यांना हवे आहे! (आता ते म्हणतात मोंदींचा बलात्कारांमध्ये हात होता, हे खूपच दरिद्री विधान आहे. किमान काही आरोपींनी, मोदींनी दंगलखोरांची पाठ थोपटली, असे खोटे लपलेल्या कॅमेरयासमोर सांगितले, पण बलात्काराबद्दल तर कोणीही खोटेही बोलले नाही.) हिंसाचाराच्या पुराव्यांचा उपयोग करून हिंसाचाराच्या विरोधात ते मोठे प्रचारतंत्र उभारू शकतात हे त्यांच्या कधी डोक्यातही आले नाही.
वस्तुस्थिती अशी आहे की, आज कॉंग्रेस अशा किरकोळ व्यूहरचनाकारांकडून (strategists) चालविल्या जातो आहे, ज्यांना योग्य काय करावे ते कळतच नाही. त्यांच्याजवळ इतिहासाचा प्रकाशही नाही आणि भविष्यकाळाची दृष्टीही नाही…
सध्याच्या कॉंग्रेसने उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी भारतीयांवर शोककळा आणली आहे. अशा भारतीयांना भारताच्या आत्म्यासाठी सांस्कृतिक युद्ध सुरू करेल, अशा एखाद्या राजकीय छत्राची गरज असते. योग्य काय ते न सांगून, योग्य ते न करून कॉंग्रेस सभ्य भारतीयांचा संकल्प दुबळा करते…’’
तरुण तेजपाल यांच्या या निवेदनामुळे, तहलका स्टिंगच्या मागे कॉंग्रेस पक्ष नव्हता असा विचार करून कोणीही मूर्ख बनू नये. यामागे कॉंग्रेस असण्याची शक्यता आहे. पण कॉंग्रेसचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता, असेही असू शकते. पण हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नाही, कारण स्टिंग ऑपरेशनचा निवाडा त्याच्या गुणवत्तेवर दिला गेला पाहिजे. अगदी कॉंग्रेसने जरी ते स्टिंग ओपरेशन प्रायोजित केले असले, तरी त्यामुळे ते खोटे बनत नाही. आणि कॉंग्रेसचा त्याच्याशी काही संबंध नसेल, तरी ते खरे बनते, असेही नाही.
याच लेखात तरुण राजपाल यांनी तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने (१९९८-२००४) ‘तहलका’ विरुद्ध उचललेल्या कायदेशीर पावलांबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी हे प्रकरण पूर्णपणे नीट वाचले, तर भाजपा किंवा नरेंद्र मोदी किंवा कॅमेर्यासमोर बोलणार्या एखाद्या आरोपीने त्यांच्यावर खटला भरला नाही आणि त्यांना आणि तहलकाला कोट्यावधी रुपयांची नुकसानभरपाई कायदेशीररित्या मागितली नाही, याबद्दल ते आपल्या नशिबाला धन्यवाद देतील.
आता आपण त्या तथाकथित कबुली जबाबांकडे पाहूया, जे लोकांनी कॅमेर्यावर दिले. पहिल्यांदा आपण हे स्टिंग ऑपरेशन कोणत्या संदर्भात करण्यात आले, ते लक्षात घेतले पाहिजे. तहलकाचे बातमीदार आशिष खेतान आपल्या गुप्त कॅमेर्यासह लोकांना भेटले आणि ‘विहिंपच्या दृष्टिकोनातून एक पुस्तक लिहिण्याची इच्छा असलेला एक लेखक’ अशी स्वत:ची ओळख त्यांनी दिली. आपण संवाद रेकॉर्ड करीत आहोत, असे लोकांना न सांगता ते दंगलींबद्दल अगदी सहजपणे लोकांशी बोलले. हे तथाकथित कबुलीजबाब वास्तवात फुशारक्या मारणारया थापा आहेत, हे या पार्श्वभूमीमुळे समजण्यास अनेकांना मदत होईल.
काही लोकांनी या स्टिंग ऑपरेशनच्या नीतितत्त्वांवर आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. खरे सांगायचे तर, ज्यांना कॅमेर्यात बद्ध करण्यात आले आहे, ते खाजगीपणाचा भंग केल्याबद्दल ‘तहलका’वर दावा करू शकतील. कारण जे संभाषण खाजगी होते, ते फसवणुकीने, दगाबाजीने सार्वजनिक करण्यात आले. हिंदुत्वाच्या विचारांवर पुस्तक लिहिण्याचा उद्देश असल्याचे सांगूनही लेखकाने फसवणूक केली होती.
या स्टिंग ऑपरेशनची सर्व नीतितत्त्वे योग्य होती असे मानून आपण या तथाकथित कबुलीजबाबांकडे विस्ताराने पाहूया. दंगलीतील एक आरोपी बाजू बजरंगी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय म्हणालेत ते पाहूया-
“१० ऑगस्ट २००७
तहलका – पाटियाची घटना घडली त्या दिवशी (२८ फेब्रुवारी २००२) मोदींनी तुम्हाला पाठिंबा नाही दिला का?
बजरंगी– त्यांनी सर्व काही अगदी बरोबर केले, अन्यथा कोणाजवळ इतकी ताकद होती? या सर्वात पूर्ण त्यांचा हात होता. त्यांनी पोलिसांना वेगळ्या पद्धतीने वागायला सांगितले असते तर… त्यांनी आम्हाला संपविले असते… ते करू शकले असते… त्यांचा पूर्णपणे ताबा होता…
तहलका – त्यांचे नियंत्रण होते?
बजरंगी – संपूर्ण शहरावर त्यांचे संपूर्णपणे नियंत्रण होते… संपूर्ण गुजरातवर… (पण) दोन दिवसांसाठी, नरेंद्र भाईंचे पूर्ण नियंत्रण होते.. तिसर्या दिवसापासून… वरून फारच दबाव आला… सोनिया वगैरे सर्वजण इथे आले…
…
तहलका– नरेंद्रभाई तुम्हाला भेटायला नाही आले (तुरुंगात)?
बजरंगी – नरेंद्रभाई मला भेटायला आले असते, तर ते पेचात सापडले असते. त्यांनी यावे अशी माझी अपेक्षा नव्हती, अगदी आजही मला ही अपेक्षा नाही.
तहलका – ते कधी तुमच्याशी दूरध्वनीवरून बोलले का?
बजरंगी – तसा तर मी त्यांच्याशी बोललो… पण तुम्ही म्हणता तसं नाही. सगळं जग उच्च स्वरात गायला लागते…
तहलक – पण तुम्ही गायब झाले होते तेव्हा… तेव्हा ते
बजरंगी – हूं… मी दोनदा किंवा तीनदा त्यांच्याशी बोललो.
तहलका – त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन दिले …
बजरंगी – मर्द आदमी है, नरेंद्रभाई…[खरा पुरुष आहे] स्वत:ला बॉंब बांधून घे आणि उडी मार असं ते मला म्हणाले असते तर… त्यासाठी मला एक सेंकदही लागला नसता… मी स्वत:भोवती बॉंब बांधून घेतला असता आणि मला सांगितले असते त्या जागी मी उडी मारली असती… हिंदूंसाठी. (आमची प्रतिक्रिया–फुशारकी मारून खोटे बोलणे!)
तहलका – ते जर नसते, तर नरोडा पाटिया, गुलबर्ग (एहसान जाफरी प्रकरण, चामनुपरा) आणि इतर…
बजरंगी – हे घडले नसते… ते फार कठीण असते…
१ सप्टेंबर २००७
तहलका – हत्याकांडाच्या दिवशी नरेंद्रभाई पाटियामध्ये आले होते का?
बजरंगी – नरेंद्रभाई पाटियामध्ये आले होते. पण घटना घडली त्या जागी ते येऊ शकले नाहीत कारण ते कमांडो फमांडो त्यांच्याबरोबर होते! ते पाटियामध्ये आले, त्यांनी आमचा उत्साह पाहिला आणि ते निघून गेले. आपल्यामागे ते एक चांगलं वातावरण ठेवून गेले.
तहलका– त्यांनी म्हटले की तुम्ही सर्व लोक आशीर्वाद मिळालेले आहात…
बजरंगी – दुसर्या दिवशी गोष्टी थांबणार नाहीत, ते पाहायला नरेंद्रभाई आले होते. ते पूर्ण अहमदाबादमध्ये फिरले. सर्व ठिकाणी जिथे मियां (मुस्लिम) होते, हिंदू भागात ते गेले… लोकांना म्हणाले की तुम्ही चांगलं काम केलं आहे, आणखी करायला हवं… (आमची प्रतिक्रिया: यावर विश्वास ठेवणे शक्य आहे का? :D)
बजरंगी – (हत्याकांडानंतर) आयुक्तांनी आदेश दिले (माझ्या विरुद्ध)… मला माझे घर सोडण्यास सांगितले गेले. मी पळालो… नरेंद्रभाईंनी मला ठेवले ते… साडेचार महिन्यांसाठी माऊंट अबू मधल्या गुजरात भवनात. त्यानंतर (मी केले) नरेंद्रभाईंनी जे सांगितले ते सर्व… नरेंद्रभाईंनी गुजरातमध्ये जे केले, ते इतर कोणीही करू शकत नाही… मला नरेंद्रभाईंचा पाठिंबा नसता, तर बदला (गोधराचा) घेणं आम्हाला शक्य झालं नसतं… (सर्व संपल्यानंतर) नरेंद्रभाई खूष झाले, लोक खूष झाले, आम्हीही खूष झालो… मी तुरुंगात गेलो आणि परत आलो… आणि माझं पूर्वीचं आयुष्य पुन्हा जगायला लागलो.
बजरंगी – नरेंद्रभाईंनी मला तुरुंगातून बाहेर काढलं. त्यांनी सतत न्यायाधीश बदलत ठेवले. माझी सुटका व्हावी, अशा पद्धतीने त्यांनी सर्व घडवून आणलं. अन्यथा मी अजूनही बाहेर येऊ शकलो नसतो. पहिले न्यायाधीश ढोलकियाजी होते. ते म्हणाले ‘बजरंगीला फासावर चढवलं पाहिजे’ एकदाच नाही तर ४-५ वेळा… त्यांनी माझी फाईल बाजूला फेकून दिली. मग दुसरे आले, त्यांनी मला फासावर चढवावे हे म्हणणे टाळले, हे म्हणायला फक्त कमी पडले. त्यानंतर तिसरे आले. तोपर्यंत तुरुंगात येऊन साडेचार महिने लोटले होते. त्यानंतर नरेंद्रभाईंनी मला निरोप पाठवला.. ते काहीतरी मार्ग काढतील, असा. त्यानंतर त्यांनी अक्षय मेहता नावाच्या न्यायाधीशांची नेमणूक केली. त्यांनी माझ्या फाईलकडे पाहिलंही नाही… ते फक्त म्हणाले (जामीन) मंजूर आणि आम्ही सर्वजण बाहेर आलो. आम्ही मुक्त होतो. यासाठी मी देवावर विश्वास ठेवतो. हिंदुत्वासाठी आम्ही मरायलाही तयार आहोत…’’ (आमची प्रतिक्रिया: पण ज्याला कायद्याचे थोडेसेही ज्ञान असेल, त्याला माहीत असेल की एक मुख्यमंत्री न्यायाधीश बदलू शकत नाहीत!)
(संदर्भ : http://www.tehelka.com/story_main35.asp?filename=Ne031107To_Get.asp )
आता त्यांचे हे विधान बघा : ‘‘दोन दिवस ते नियंत्रणात होते.’’ हे निखालस असत्य विधान आहे. बढाई मारणारी थाप. आपण या पुस्तकात यापूर्वीच पाहिले आहे की, दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या ‘द हिंदू’ या नरेंद्र मोदींवर कडवट टीका करणार्या वृत्तपत्राने लिहिले होते : – “२८ फेब्रुवारीला एका समाजावरच हल्ले होत होते, पण १ मार्चला अल्पसंख्य समाजाने प्रतिकार केल्यामुळे स्थिती आणखी बिघडली.”
यातून हेच स्पष्ट होते की दंगलीच्या दुसर्या दिवशी मुस्लिम आक्रमक होते. हिंदू अजिबातच ‘पूर्ण नियंत्रणात’ नव्हते. पोलिसांनी काहीही केले नाही, हे बजरंगीचे विधान आणखी एक असत्य आहे. ‘द हिंदू’ने लिहिले आहे, – ‘‘२८ फेब्रुवारीला संध्याकाळपर्यंत किमान १० जण पोलीस गोळीबारात ठार झाले, असे समजते (फक्त अहमदाबादमध्ये).” अहमदाबादमध्ये २८ फेब्रुवारीला चामनपुरा भागातील एहसान जाफरी यांच्या घरासमोर पोलिसांनी गोळीबार करून ५ लोकांना ठार केले. २८ फेब्रुवारीला पोलिसांनी गोळीबाराच्या एकूण १४९६ फैरी झाडल्या. त्यातील किमान ६०० एकट्या अहमदाबादमध्ये झाडल्या आणि अश्रुधुराची ४२९७ नळकांडी राज्यभर फोडली. त्यांनी ७०० लोकांना अटकही केली.
बाबू बजरंगी असेही म्हणाले की नरेंद्र मोदी हत्याकांडाच्या दिवशी, म्हणजे २८ फेब्रुवारीला, नरोडा पाटियामध्ये आले होते. पण अधिकृत नोंदींवरून असे कळते की त्या दिवशी मोदींनी त्या जागेला भेट दिली नाही. ‘इंडिया टुडे’ने १२ नोव्हेंबर २००७च्या अंकात लिहिले:
‘‘पण या स्टिंग ओपरेशनचा परिणाम काही प्रमाणात कमी झाला, स्टिंगमध्ये ज्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत त्यांच्या विधानांमध्ये काही चुका असल्यामुळे. कॅमेर्यासमोर बोलणार्या १४ लोकांपैकी दोघांनी सांगितले की अहमदाबादमधील नरोडा पाटिया भागात झालेल्या (२८ फेब्रुवारी) हत्याकांडानंतर (ज्यात एका हिंदू जमावाकडून ८९ मुस्लिम मारले गेले) दुसर्या दिवशी त्यांना धन्यवाद देण्यासाठी मोदी नरोडा पाटियामध्ये आले होते.
पण या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबू बजरंगी आणि सुरेश रिचर्ड यांची विधाने खोट्या फुशारक्या मारणारी वाटतात कारण त्या दिवशी नरेंद्र मोदी नरोडा पाटियामध्ये आले नव्हते असे अधिकृत नोंदी दाखवतात.’’
वस्तुस्थिती अशी आहे की २८ फेब्रुवारीला आणि १ मार्चलाही मोदींनी नरोडा पाटियाला भेट दिलीच नव्हती. २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन्ही दिवशी मोदी संध्याकाळी अहमदाबादच्या ‘सर्किट हाऊस’ मध्ये एक पत्रकार परिषद घेत होते. या लोकांनी केलेल्या विधानांच्या सत्यासत्यतेची पडताळणी करण्याची ‘तहलका’ची जबाबदारी नव्हती का? हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून पुस्तक लिहिणार्या व्यक्तीशी आपण खाजगीमध्ये बोलत आहोत असा विचार करून त्यांनी खोट्या बढाया मारल्या की सत्य सांगितले याची शहानिशा, एका मुख्यमंत्र्यावर गंभीर आरोप करण्यापूर्वी करायला नको होती का?
इथे लक्षात घेतले पाहिजे की नरेंद्र मोदींनी आपल्याला मदत केली, असे सांगणारे बाबू बजरंगी तहलकाच्या बातमीदारासमोर बढाई मारत होते की त्यांचा (बजरंगींचा) बिग बॉस नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संबंध होता आणि मोदींकडून थेट मदत मिळण्याइतके ते मोठे होते. यापेक्षा या प्रकरणात अधिक काहीच नाही. ‘तहलका’लाही हे चांगलेच माहीत आहे की आपण नरेंद्र मोदींकडून मदत मिळविण्याएवढी मोठी व्यक्ती आहोत हे दाखविण्यासाठी फक्त बजरंगी अशा फुशारक्या मारीत होते. (वास्तव असे आहे की एस.आय.टी.ला दिलेल्या उत्तरांपैकी उघड झालेल्या उत्तरातून, बाबू बजरंगीला मोदी अजिबात ओळखत नव्हते आणि बर्याच उशिरा, अनेक महिन्यांनी फक्त वृत्तपत्रांतूनच त्यांनी बजरंगीचे नाव ऐकले होते, ही वास्तविकता मोदींनी एस.आय.टी. ला सांगितली.) तहलकालाही हे माहीत होते की तो खोट्या फुशारक्या मारेल आणि म्हणूनच त्यांनी असे प्रश्न त्याला विचारले.
वास्तवात, या १४ आरोपींपैकी एकाचेही एकही वाक्य भारतातील कोणत्याही न्यायालयाच्या दृष्टीने पुरावा म्हणून दखलपात्र नाही. पोलिसांना कॅमेर्यासमोर जाणीवपूर्वक दिल्या गेलेल्या कबुलीजबाबाला पुरावा मानता येत नाही – फक्त न्यायालयात न्यायाधीशांसमोर दिलेला कबुलीजबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. ते फुशारकी मारणारे असत्य जबाब आहेत, हे आपण यातील चुकांमधून पाहिलेच आहे. त्यात चुका नसत्या, तरीही या ‘कबुलीजबाबांना’ पुरावा म्हणून काही किंमत नाही.
इथे एक लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना बोलण्यासाठी प्रवृत्त करतील असाच परिणाम साधणारे प्रश्न तहलकाचा बातमीदार विचारत आहे. तहलकाच्या बातमीदाराने असा प्रश्न विचारला: “नरेंद्र मोदी नरोडा येथे आले नाहीत का?’’ इत्यादी आणि याला बजरंगी आणि इतर आरोपींनी ‘हो’ असे उत्तर दिले आणि त्यात आपले स्वत:चे तिखट-मीठही मिसळले. आपल्याला हव्या त्या विषयावर लोकांनी खोटे बोलावे अशा पद्धतीने जाणीवपूर्वक हे प्रश्न तयार केले गेले होते.
नरोडा पाटियाबद्दलची विधाने अशीच तद्दन खोटी आहेत. पोलिसांनी नरोडा पाटियातील ९०० मुस्लिमांना वाचविले, ९५ मुस्लिम मारले गेले (सर्व बेपत्ता मृत जाहीर झाल्यानंतर) आणि तेथे १००० मुस्लिम होते, या सर्वांना जमाव मारणार होता असे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने म्हटले होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ची बातमी म्हणते की २८ फेब्रुवारीला (गुरुवारी) रात्री जमावाची पांगापांग केल्यानंतर १ मार्चच्या (शुक्रवार) पहाटे पोलिसांनी ४०० मुस्लिमांना सुरक्षित स्थळी हलविले. त्यापैकी काहीजणांना जवळच्या राज्य राखीव पोलिसांच्या मुख्यालयात हलविण्यात आले.
न्यायाधीशांच्या संदर्भातील सर्वच विधाने चुकीची आहेत. मुख्यमंत्री न्यायाधीश बदलू शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या एस.आय.टी.ने या सर्वाची तपासणी केली असून असेच निष्कर्ष काढले आहेत, ते आपण पुढील प्रकरणात पाहणार आहोत. आता आपण रमेश दवे या विहिंपच्या कार्यकर्त्याची विधाने पाहूया-
‘‘१२ जून २००७
रमेश दवे – त्या रात्री आम्ही (विश्व हिंदू परिषदेच्या) कार्यालयात गेलो. वातावरण फार अस्वस्थ करणारं होतं. प्रत्येकाला वाटत होतं आपण फार सोसलंय, कितीतरी वर्ष… नरेंद्रभाईंनी आम्हाला फार पाठिंबा दिला…
तहलका – ते गोधराला पोचले, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?
दवे – गोधरामध्ये त्यांनी फार कडक निवेदन दिलं. ते फार रागात होते. अगदी लहानपणापासून ते संघाबरोबर आहेत. त्यांचा संताप असा होता… त्यावेळी ते उघडपणे बाहेर आले नाहीत पण पोलीस यंत्रणा मात्र पूर्णपणे परिणामशून्य झाली…” (संदर्भ: तहलकाची अधिकृत वेबसाईट)
‘पोलीस यंत्रणा पूर्णपणे परिणामशून्य होती’ हे विधान आणखी एक असत्यच आहे. २८ फेब्रुवारी, १ मार्च आणि २ मार्चला पोलिसांची कामगिरी काय होती, हे आपण यापूर्वी सविस्तर पाहिले आहे. आता आपण गोधराचे भाजपाचे माजी आमदार हरेश भट काय म्हणाले, ते पाहूया:
“१ जून २००७
तहलका – गोधरा घटना घडल्यानंतर नरेंद्र मोदींची काय प्रतिक्रिया होती?
हरेश भट – मी हे तुम्हाला सांगू शकत नाही… पण इतके सांगू शकतो की ती अनुकूल होती… त्या काळातल्या आमच्यातल्या सामंजस्यामुळे…
तहलका – मला काहीतरी सांगा… त्यांनी?
भट – मी काही विधान करू शकत नाही. पण त्यांनी जे केलं, ते कोणत्याही मुख्यमंत्र्याने आजवर केलं नव्हतं…
तहलका – मी हे कुठेही सांगणार नाही… वास्तवात… मी तुमचंही नाव घेणार नाही.
भट – त्यांनी आम्हाला तीन दिवस दिले… आम्हाला जे करायचे असेल त्यासाठी. ते म्हणाले की त्यानंतर ते आम्हाला वेळ देऊ शकणार नाहीत. हे त्यांनी उघडपणे सांगितलं. तीन दिवसांनंतर त्यांनी आम्हाला थांबायला सांगितलं आणि सर्व काही थांबलं.
तहलका – हे सगळं ३ दिवसांनंतर थांबलं. अगदी लष्करालाही बोलावण्यात आलं.
भट – सर्वच ताकदी आल्या… आम्हाला ३ दिवस होते… आणि त्या ३ दिवसात आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं.
तहलका – ते असं म्हणाले?
भट – हो. म्हणून तर मी म्हणतोय की त्यांनी जे केलं ते दुसरे कुठलेही मुख्यमंत्री करू शकले नसते.
तहलका – ते तुमच्याशी बोलले?
भट – मी तुम्हाला सांगितलं की मी त्या बैठकीमध्ये होतो.
भट – त्यांना सरकार चालवायचं होतं… आता ते त्या त्रासाला तोंड देत आहेत… कित्येक खटले पुन्हा सुरू झाले आहेत… लोक त्यांच्याविरुद्ध बंड करत आहेत.
तहलका – भाजपामधले लोक त्यांच्याविरुद्ध बंड करत आहेत.
भट – भाजपातले लोक… त्यांनी जे काही केलं त्यामुळे त्यांची प्रतिमा प्राणापेक्षा मोठी झाली आहे आणि इतर राजकारण्यांना ते सहन होत नाही…’’ (सौजन्य – तहलकाचे अधिकृत संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट)
इथे आता पुन्हा त्यांचे विधान पहा. ‘‘त्यांनी आम्हाला ३ दिवस दिले.’’ हे खोटे असून मार्च २००२ पासून माध्यमातील काही लोक ते पसरवीत आहेत आणि निष्पाप व चांगल्या उद्देशाचे लोक त्याला बळी पडत आहेत. या स्टिंग ऑपरेशनच्या एका दिवसानंतर सी.एन.एन.-आय.बी.एन.च्या हिंदी वाहिनीने हाच आरोप केला: ‘‘त्यांना ३ दिवसांची सूट देण्यात आली होते.’’ पण कल्पित कथा क्र. १५ मध्ये आपण सत्य काय ते पाहिले आहे. आपण यापूर्वीही हे सविस्तर पाहिले आहे की लष्कर अगदी तातडीने पोचले, (“frantically” called), तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस आले, पहिल्या तीन दिवसात पोलिसांनी ९८ दंगलखोरांना गोळ्या घालून मारले, गोळीबाराच्या ५४५० फैरी झाडल्या आणि अश्रुधुराची ६,५०० नळकांडी फोडली. हरेश भट यांची विधाने पूर्णपणे असत्य आहेत हे समजण्यासाठी एवढे पुरेसे आहे. याशिवाय हरेश भट असाही दावा करतात की ते त्या बैठकीत होते. सत्य असे आहे की २७ फेब्रुवारीला गोधरामध्ये नरेंद्र मोदी हरेश भट यांना भेटलेच नाहीत. ते (मोदी) संध्याकाळी गोधराला गेले आणि त्याच दिवशी अहमदाबादला परतले. ‘इंडिया टुडे’ने १२ नोव्हेंबर २००७ च्या अंकात उल्लेख केला आहे की गोधरामध्ये त्या दिवशी नरेंद्र मोदी हरेश भट यांना भेटले नाहीत असे अधिकृत नोंदींवरून कळते. पुन्हा, गोधरातील २७ फेब्रुवारीच्या नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत हजर होण्याएवढे मोठे आपण होतो, असे सांगण्यासाठी भट बढाई मारत होते.
आता दंगलीतील एक आरोपी सुरेश रिचर्ड यांची विधाने पाहूया :
“१२ ऑगस्ट २००७
सुरेश रिचर्ड – (हत्याकांडाच्या दिवशी) संध्याकाळपर्यंत आम्ही जे केलं, ते आम्ही केलं… साधारण संध्याकाळी ७.३० वाजता… ७.१५ ला आमचे मोदीभाई आले. अगदी इथे, घराबाहेर. माझ्या बहिणींनी गुलाबाचा हार घालून त्यांचं स्वागत केलं…
तहलका – नरेंद्रभाई मोदी…
रिचर्ड – नरेंद्र मोदी. ते ब्लॅक कमांडोंसह आले होते… त्यांच्या ऍम्बॅसिडर गाडीतून ते उतरले आणि इथे चालत आले. माझ्या सर्व बहिणींनी त्यांचं स्वागत केलं… मोठा माणूस तो मोठाच माणूस ना…
तहलका – ते रस्त्यावर उतरले?
रिचर्ड – इथे, या घराजवळ. मग ते या बाजूनं गेले. नरोडामध्ये कशी स्थिती आहे ते पाहिलं…
तहलका – पाटिया घटना घडली त्याच दिवशी?
रिचर्ड – होय. त्याच संध्याकाळी.
तहलका – २८ फेब्रुवारी…
रिचर्ड – २८
तहलका – २००२
रिचर्ड – त्यांनी सर्व बाजूंनी चक्कर मारली. आणि म्हणाले, ‘आमच्या जातीला आशीर्वाद आहेत, आमच्या मातांनाही आशीर्वाद आहेत [आम्हाला जन्म दिल्याबद्दल].’
तहलका – ते ५ वाजता आले की ७ वाजता?
रिचर्ड – साधारण ७ ते ७.३० च्या दरम्यान; त्यावेळी वीज नव्हती… दंगलीमध्ये सर्वकाही बेचिराख झालं होतं…
तहलका – नरेंद्रभाई मोदींनी तुमच्या घराला भेट दिली, नरोडा पाटियातील हत्याकांडाच्या त्या दिवसानंतर ते पुन्हा कधी इथे आलेत का?
रिचर्ड – कधीही नाही.”
(http://www.tehelka.com/story_main35.asp?filename=Ne031107We_Were.asp )
२७ मार्च २०१०ला एस.आय.टी.ने विचारलेल्या प्रश्नांवर मोदींचे बाहेर आलेले (लीक झालेले) उत्तर होते की २८ फेब्रुवारीला संध्याकाळी, अहमदाबादमध्ये सर्किट हाऊसला नरेंद्र मोदी एका पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. हे समजण्यासाठी व्यवहारज्ञानाचा इवलासा कणही पुरेसा आहे की तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी, २८ फेब्रुवारीला संध्याकाळी ७-७:३०ला नरोडा पाटियामध्ये जाणे आणि त्यांनी दंगलखोरांची पाठ थोपटणे, ही अशक्यप्राय गोष्ट आहे. एक लक्षात घ्या की हा आरोप जवळजवळ ६ वर्षे कोणीही केला नाही- फेब्रुवारी २००२ ते नोव्हेंबर २००७ आणि अगदी नोव्हेंबर २००७ नंतरही या आरोपावर तहलकाशिवाय इतर कोणीही विश्वास ठेवणार नाही. खरे तर तहलकाही यावर विश्वास ठेवणार नाही, पण ते हा आरोप करतील. म्हणूनच पुरावा म्हणून या विधानांना थोडासाही अर्थ नाही. आणि तहलकाने दावा केला की त्यांच्याजवळ मोदींच्या सहभागाचे ‘अपरिवर्तनीय पुरावे’ आहेत! उलट, हे तथाकथित कबुलीजबाब अर्थहीन असल्याचेच ‘अपरिवर्तनीय पुरावे’ आहेत आणि मोदींनी दंगली अत्यंत कार्यक्षमतेने हाताळल्या आणि ३ दिवसात नियंत्रणात आणल्या, याचेही ‘अपरिवर्तनीय पुरावे’ आहेत. सरसरीने १९६०च्या दशकात गुजरातमध्ये दर ४ दिवसांत ३ दंगली होत होत्या. ‘इंडिया टुडे’ने १२ नोव्हेंबर २००७ च्या अंकात लिहिले आहे:
‘‘तहलकाचे स्टिंग ऑपरेशन प्रसारित झाल्यानंतर मोदींवर खटला भरण्याची मानवी हक्क कार्यकर्त्यांची मोठी मागणी सुरू आहे. पण गुजरातचे प्रसिद्ध फौजदारी वकील (क्रिमिनल लॉयर) आणि कॉंग्रेस नेते (नरेंद्र मोदींचा कट्टर विरोधक पक्ष) निरुपम नानावटी म्हणतात, ‘‘सहआरोपीचा कबुलीजबाब भारतीय पुरावा कायद्याच्या दृष्टीने पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाही. तपासयंत्रणांनी या कायद्याच्या १० व्या कलमाखाली नव्याने चौकशी करण्याचे ठरविले, तरच त्यामधून येऊ शकणारया नव्या पुराव्यावरून मोदींवर कारवाई करणे शक्य होऊ शकेल…’’”
http://indiatoday.intoday.in/site/Story/1716/Gujarat:+The+noose+tightens.html?complete=1
तहलकाने प्रकाशित केलेल्या सर्व संवादांचे मूळ रूपात त्यांच्या स्वत:च्या वेबसाईटवर दिलेले मजकूर आपण पाहात आहोत. इथे गुजरात सरकारचे माजी वकील अरविंद पंड्या यांची मुलाखत पाहू:
“६ जून २००७
अरविंद पंड्या – (गोधराच्या मुसलमानांना) असे वाटले की गुजराती स्वभावाने मवाळ असल्याने ते यातून सुटून जाऊ शकतील. भूतकाळात त्यांनी गुजरातींना मारहाण केली होती, अगदी संपूर्ण जगाला त्यांनी मारहाण केली, पण कोणीही धैर्य दाखविले नाही. कोणीही त्यांना रोख़ले नाही. आतापर्यंत नेहमीप्रमाणे, आताही आपण यातून सुटून जाऊ असे त्यांना वाटले. पण या आधी असे होऊ शकले, कारण येथे कॉंग्रेसची सत्ता होती. त्यांची मते मिळविण्यासाठी कॉंग्रेस पक्ष गुजराती आणि हिंदू लोकांना दडपत होता. पण यावेळी त्यांनी मार खाल्ला. आता इथे हिंदूंचे राज्य आहे. संपूर्ण गुजरातवर हिंदूंचे राज्य आहे आणि तेही विहिंप आणि भाजपाच्या…
तहलका – त्यांचा अंदाज चुकला.
पंड्या – नाही. काय झाले असते… कॉंग्रेसचे सरकार असते तर, त्यांनी हिंदूंना मुस्लिमांवर हल्ला कधीच करू नसता दिला. फक्त हिंदूंना दडपण्यासाठी त्यांनी आपली प्रशासनिक ताकद उपयोगात आणली असती. त्यांनी कधीही (मुस्लिमांना) हिंसाचारापासून रोखले नसते. हिंदूंनी शांतता राखावी असे त्यांनी आवाहन केले असते पण त्यांना (मुस्लिमांना) रोखण्यासाठी त्यांनी काही केले नसते. अगदी यासारख्या (गोधरा) प्रकरणातही त्यांनी कधी काही केले नसते. पण या प्रकरणात इथे हिंदू पाया असलेले सरकार होते आणि… त्यामुळे लोक तयार होते आणि राज्य सरकारही तयार होते. ही एक चांगली डोळेझाक आहे.
तहलका – हे तर हिंदू समाजाचं चांगलंच नशीब होतं… संपूर्ण हिंदू समाजाचे.
पंड्या – आणि आपण असं म्हणूया की राज्यकर्ताही स्वभावाने धीट होता. कारण त्यानं सांगितलं ‘बदला घ्या आणि मी तयार आहे.’ आपण आधी कल्याणसिंग यांना सलाम करायला हवा. कारण सर्वोच्च न्यायालयासमोर त्यांनी सर्व प्रकारची जबाबदारी स्वीकारली…‘मी हे केलं, मी सहभागी होतो’, असं सांगून.
तहलका – नंतर, त्यांनी पक्ष बदलला तेव्हा.
पंड्या – त्यांनी पक्ष बदलला. पण त्याचे संस्थापक होते… ते सर्वोच्च न्यायालयासमोर ठामपणे उभे राहिले आणि ‘मीच तो’ असं सांगितलं.
तहलका – संपूर्ण जबाबदारी घेतली.
पंड्या – त्यानंतर दुसरा हिरो आला… नरेंद्र मोदी… आणि त्यांनी हिंदूंच्या बाजूने उभे राहण्याच्या तोंडी सूचना पोलिसांना दिल्या. कारण संपूर्ण राज्य हिंदूंचे होते.
८ जून २००७
तहलका -– २७ फेब्रुवारीला मोदी गोधराला गेले, तेव्हा विहिंप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, हे खरे आहे का?
पंड्या – नाही. त्यांनी हल्ला केला नाही. घडलं ते असं. तिथे ५८ मृतदेह आहेत… आणि संध्याकाळ झाली आहे… तुम्ही काय केलं असं लोकांनी विचारणं स्वाभाविक आहे…
तहलका – सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत ते तिथे पोचले नाहीत… जेव्हा रोष वाढला, तेव्हा मोदी रागावले आणि त्यांनी…
पंड्या – नाही. असं घडलं नाही. मोदी दीर्घकाळ आमच्याशी संपर्कात आहेत. तो मुद्दा विसरा. पण ते एका अधिकारपदावर होते आणि मर्यादा असणं स्वाभाविक आहे… आणि त्या त्यांना अनेक होत्या… पण त्यांनी हिंदूंच्या बाजूने सर्व संकेत दिले. राज्यकर्ता ठाम असेल, तर गोष्टी घडण्यास सुरुवात होते…
तहलका – नरेंद्र मोदी २७ तारखेला गोधराहून परतल्यानंतर तुम्ही त्यांना भेटलात?
पंड्या – नाही… याविषयीच्या प्रश्नांना मी काहीही उत्तर देणार नाही… मी देऊ नये.
तहलका – सर, त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती, ते मला जाणून घ्यायचं आहे…
पंड्या – जेव्हा नरेंद्र मोदींनी दूरध्वनीवरून पहिल्यांदा ऐकलं तेव्हा त्यांचं रक्त उकळायला लागलं. मला सांगा, आणखी मी काय सांगू… मी तुम्हाला काही अप्रत्यक्ष सूचना केल्या आहेत आणि त्यापेक्षा जास्त काही मी उघड करू शकत नाही… मी तसं करूही नये…
तहलका – मला याची माहिती हवी आहे… त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती?
पंड्या – नाही. त्यांची पहिली प्रतिक्रिया अशी होती की त्यावेळी ते मंत्री नसते, तर त्यांनी बॉंब फोडले केले असते. त्यांची तशी क्षमता असती आणि ते मंत्री नसते, तर त्यांनी जुहापुरामध्ये (अहमदाबादमधील मुस्लिम बहुसंख्य भाग) नक्कीच काही बॉंबस्फोट केले असते.’’
पंड्या यांनी केलेली दोन्ही महत्त्वाची विधाने जाड अक्षरात दिली गेली आहेत. पहिले, की मोदींनी हिंदूंच्या बाजूने उभे राहण्याच्या तोंडी सूचना पोलिसांना दिल्या. हे अगदीच चूक आहे, कारण आपण आतापर्यंत पाहिलेच आहे की फक्त पहिल्या ३ दिवसातच पोलिसांच्या गोळीबारात ९८ लोक ठार झाले, त्यातील बहुसंख्य हिंदू होते आणि दंगली नियंत्रणात आणण्यासाठी तसेच न होऊ देण्यासाठी पावलेही उचलली गेली होती, ती सर्व आपण आधी पाहिली आहेत. दुसरे विधान, ते मंत्री नसते, तर आणि त्यांची क्षमता असती तर जुहापुरामध्ये त्यांनी काही बॉंबचा स्फोट केला असता, हेही असंबद्ध आहे. जुहापुरामध्ये कोणीही बॉंबस्फोट घडविले नाहीत.
पण पंड्या यांनी तहलकाविरुद्ध एक धक्कादायक आरोप केला. ‘ही ऑडिशन टेस्ट आहे’ असे सांगून ‘आजतक’मध्ये पत्रकार असलेल्या धीमंत पुरोहित या त्यांच्या मित्राने हे सर्व त्यांना बोलण्यास सांगितले, असा दावा त्यांनी केला. हे ओपरेशन प्रसारित झाल्यानंतर त्यांनी अनेक आरोपांबद्दल बदनामीचा खटला दाखल केला आणि पुरोहित यांना यामुळे अटकपूर्व जामीन मागावे लागले. मोदी गोधराला २७ फेब्रुवारीला संध्याकाळी गेले, तेव्हा विहिंप कार्यकत्यांनी त्यांच्यावर हल्ला केला नाही, हे पंड्या यांचे विधानही चूक आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या संकेतस्थळावर २७ फेब्रुवारीचीच बातमी आहे की विहिंप समर्थकांच्या संतापलेल्या जमावाने मोदींना धक्काबुक्की केली.
आता आपण अहमदाबाद विहिंपचे प्रमुख राजेंद्र व्यास यांची मुलाखत पाहू :
“८ जून २००७
तहलका – मला नरेंद्र मोदींबद्दल माहिती हवी आहे… त्यांचे पहिले शब्द काय होते? (गोधरा जळीतकांडानंतर) त्यांनी तुम्हा सर्वांना काय सांगितलं?…
राजेंद्र व्यास – पहिल्यांदा ते म्हणाले की आपण सूड घेतला पाहिजे… हीच गोष्ट मी स्वत: जाहीरपणे सांगितली… तोपर्यंत मी काहीही खाल्लेसुद्धा नव्हते… पाण्याचा थेंबही घेतला नव्हता… मी इतक्या रागात होतो की इतके लोक मेले होते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहात होते… पण मग जेव्हा मी माझी ताकद वापरायला सुरुवात केली… शिव्याशाप द्यायला लागलो… ते (मोदी) म्हणाले, राजेंद्रभाई, शांत व्हा, सर्वच गोष्टींची काळजी घेतली जाईल. ‘सर्वच गोष्टींची काळजी घेतली जाईल,’ असं ते म्हणाले, तेव्हा त्यांना काय म्हणायचं होतं?… सर्वांनीच ते समजून घेतलं…’’
मोदींनी असे काही म्हटले होते, हे सिद्ध करायला कोणताही पुरावा नाही आणि यातील काहीही त्यांनी केले नाही, हे सिद्ध करण्यास पुरावा आहे. त्या दिवशी मोदी व्यास यांना भेटले होते की नाही हे दाखविण्यासाठी नोंदी तपासल्या पाहिजेत, कारण ते कामात खूप व्यस्त असल्याने ते व्यास यांना भेटणे फार कमी शक्यतेचे आहे, असे स्पष्ट दिसते. त्याबरोबरच राजेंद्र व्यास यांनीही यासारखे काही केले नसेल आणि केवळ पोकळ गप्पा मारत असतील, असे असण्याची शक्यता फार जास्त आहे.
आता आपण पुन्हा लोकांनी कॅमेर्यासमोर पोलिसांबद्दल काय सांगितले ते पाहूया. सुरुवातीला बाबू बजरंगी:
“१ सप्टेंबर २००७
नरेंद्रभाईंनी गुजरातमध्ये जे केले, तसे इतर कोणी करू शकत नाही. मला नरेंद्रभाईंचा पाठिंबा मिळाला नसता, तर गोधराचा बदला घेणे आम्हाला शक्य झाले नसते… पोलीस अगदी आमच्यासमोर उभे होते, जे घडतंय ते पाहात होते, पण त्यांनी डोळे आणि तोंड मात्र बंद केले होते. त्यावेळी पोलिसांची इच्छा असती, तर त्यांनी आम्हाला आत येऊ दिले नसते. तिथे फक्त एकच फाटक होतं, सोसायटीला असतं तसं, आणि मग ‘पाटिया’ सुरू होतं. आम्हाला थांबवायचं त्यांनी ठरवलं असतं तर, त्यांची संख्या ५० होती, ते थांबवू शकले असते. आम्हाला पोलिसांकडून चांगला पाठिंबा मिळाला… नरेंद्रभाईंमुळे… कारण गुजरातमध्ये जे काही घडलं ते चांगल्यासाठीच घडलं. या लोकांपासून (मुस्लिम) आम्हाला थोडीतरी सुटका मिळाली… ते इतके धीट आणि धाडसी बसले होते…
मुस्लिम लोक पोलिसांकडे मदतीसाठी दूरध्वनी करत राहिले, त्यांच्याकडे पळाले. त्यांच्यात सालेम नावाचा एक माणूस होता… नरोडा पाटियाचा एक दादा… तो पोलीस जीपमध्ये चढला… आत शिरला… मी स्वत: त्याला पकडलं आणि बाहेर खेचलं. पोलीस मला म्हणाले, ‘मार त्याला, त्याला जिवंत सोडलं, तर तो आपल्याविरुद्ध साक्ष देईल…’ त्याला जरा बाजूला नेलं आणि तिथेच संपवलं… तो हरामखोर जिवंत राहिला असता, तर त्यानं सांगितलं असतं की मी पोलीस जीपमध्ये चढलो आणि त्यांनी मला बाहेर फेकलं… असं सगळं झालं…
(शेवटी तिथे ७००–८०० मृतदेह सापडले). ते तिथून हलविण्यात आले. त्या रात्री आयुक्त आले आणि त्यांनी सांगितलं की एका जागी इतके मृतदेह असले, तर त्याचा त्यांना त्रास होईल. म्हणून त्यांनी मृतदेह उचलले आणि पूर्ण अहमदाबादमध्ये पसरून टाकले. जेव्हा शवविच्छेदनासाठी ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले तेव्हा ‘इकडून आणले, तिकडून आणले’ असं सांगण्यात आले…
१० ऑगस्ट २००७
त्या रात्री २.३० वाजता मी पोलीस निरीक्षकांना (मायसोरवाला) कॉल केला… ते म्हणाले ‘इकडे येऊ नका’ (पोलीस ठाण्यात). माझ्या विरुद्ध ‘दिसल्याबरोबर गोळ्या घाला’ असा आदेश होता. बाबू बजरंगी जेव्हा सापडेल, तेव्हा त्याला गोळ्या घाला. त्यांनी मला पळून जायला सांगितलं…आमच्या मायसोरवालांनी. ‘तुमच्यासाठी मी काही करू शकत नाही’ असं ते मला म्हणाले… त्यांनी मला कॉल केला असंही मी कोणाला सांगायचं नव्हतं. पण तरीही त्यांनी माझ्या घरी बाईकस्वार पाठवला… माझ्या मुलांना त्यावेळी काय वाटलं असेल याची तुम्हीच कल्पना करा…
(चार महिन्यांनंतर) नरेंद्रभाई मला म्हणाले… त्यांच्यावर बराच मोठा दबाव आहे. माध्यमं, टी.व्ही. आणि बातम्या… बाबू बजरंगी गुंड आहे. मला अजूनही पकडलं नाही म्हणून लालूंनी संसदेत तक्रार केली… म्हणून नरेंद्रभाई मला म्हणाले शरणागती पत्करा… मी म्हणालो, ‘ठीक आहे, साहेब, तुम्ही सांगत असाल तर मी तसं करतो’ (आमची प्रतिक्रिया: पण नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की ते बाबू बजरंगीला अजिबात ओळखत नाहीत आणि अनेक वर्षांनंतर माध्यमांकडूनच त्यांनी त्याचे नाव ऐकले. म्हणून हे सर्व खोटे आहे.) गांधीनगरजवळ मी शरण गेलो… ते एक मोठं नाटकच होतं… पूर्णपणे नाटक… पोलिसांना, गुन्हे शाखेला सांगण्यात आलं की मी त्या भागातून जाणार आहे… त्यावेळी गुन्हे शाखेचे सहआयुक्त असलेले पी.पी.पाण्डेही तिथे होते आणि १२-१३ कार आल्यात. हे लोक बिलोडा ते गांधीनगर रस्त्यावर वाट पहात राहिले. त्यांनी काही गाड्यांची तपासणी केली… मला तिथं उतरावं लागलं… हा नाटकाचाच भाग होता. मी सरळ गुन्हे शाखेत गेलो असतो तर माध्यमांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी माझे तुकडे केले असते. हे नाटक होतं… त्यांनी मला पकडलं, दोरीने बांधलं… सगळंच नाटक. त्यांनी मला सांगितलं की फक्त देखाव्यासाठी त्यांनी मला बांधलं आहे…’’
(संदर्भ: http://www.tehelka.com/story_main35.asp?filename=Ne03110TheirEyes.asp )
आता, पुन्हा, या सगळ्यालाच फार कमी किंमत आहे. कारण आपण पाहिल्याप्रमाणे त्यांचे आधीचे निवेदन ‘‘२८ फेब्रुवारीला मोदी नरोडा पाटियाला आले होते’’ हे चुकीचे आहे. नरोडामध्ये ७००–८०० मृतदेह पडले होते, हे दुसरे खोटे आहे. कारण सर्व बेपत्ता लोक मृत असल्याचे जाहीर झाल्यानंतरही नरोडा पाटियातील दंगलीमध्ये ९५ लोक ठार झाले होते. आपण हेही पाहिले आहे की मुस्लिमांना मारण्याची परवानगी देण्याऐवजी या घटनेत पोलिसांनी ९०० मुस्लिमांना वाचविले होते आणि जमाव पांगविल्यानंतर ४०० मुस्लिमांना सुरक्षित जागी हलविले होते. सलीम नावाच्या व्यक्तीबद्दलचे बजरंगीने दिलेले सर्व तपशीलही फार संशयास्पद वाटतात. स्टिंगनंतर बाबू बजरंगीने नरोडा पाटियामध्ये कुठल्याही जमावाचे नेतृत्व केल्याचे नाकारले. एक म्हण आहे, ‘जो भौकते है, वो काटते नहीं.’ जे बढाई मारतात आणि गंडवतात, ते आतून फार घाबरट असतात, असेच ही म्हण सांगते.
या विषयावर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे मौन बाळगला. म्हणूनच या ‘स्टिंग’मधील बरेच कच्चे दुवे माहीत करून घेता आले नाही. बजरंगींविरुद्ध ‘दिसताक्षणी गोळ्या घाला’ असे आदेश कुठल्याही वेळी असणे अशक्य आहे. बजरंगी कोणत्या जागी आणि कोणत्या परिस्थितीत शरण आले, याची बारकाईने चौकशी होण्याची गरज आहे, कारण त्यांनी जे सांगितले ते सर्व संशयास्पद आहे. ‘‘तिथे ५० पोलीस होते, पण त्यांनी काहीही केले नाही’’ हे विधानही पूर्ण खोटे आहे. कारण ‘इंडिया टुडे’ने लिहिले होते : ‘‘नरोडा पाटियामध्ये सर्वात भयंकर संहार झाला. सकाळपासून जमा होणार्या आणि धुडगूस घालणार्या जमावांना रोखण्यासाठी आवश्यक असलेली पोलिसांची कुमक तिथे नव्हती. जवळपास कुठल्याच शक्तीचे पोलिस तिथे नव्हते. तिथे किमान ४ ते ५ हजारांचे ३ जमाव होते आणि ते मुस्लिमांवर हल्ले करीत होते.’’
आपण पाहिले आहे की (नरोडाचे माजी पोलीस निरीक्षक) मायसोरवाला म्हणाले, की सामान्य परिस्थिती असताना नरोडा ठाण्यातील ८० पोलीस ही संख्या पुरेशी असायची पण २८ फेब्रुवारीची परिस्थिती अभूतपूर्व होती आणि अत्यंत वेगाने हाताबाहेर जात होती. ते म्हणाले की त्यांनी पोलिसांची कुमक मागवली आणि जादाचे २४ एस.आर.पी. त्यांना देण्यात आले. पण तरीही १७ हजार हल्लेखोरांसमोर ही संख्या अपुरीच होती.
१९ ऑगस्ट २००४ ला नानावटी आयोगासमोर मायसोरवाल्यांनी हे सांगितले. शिवाय, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालू यादव यांनी संसदेमध्ये बाबू बजरंगीला अटक करण्याची मागणी खरोखर केली होती का, हे माहीत नाही आणि हे खोटेच असल्याचे दिसते.
आता आपण पोलिसांच्या भूमिकेबद्दल सुरेश रिचर्ड काय म्हणाले, ते पाहू:
“१२ ऑगस्ट २००७
पोलीस आमच्याबरोबर होते… अगदी आताही मी हेच तुम्हाला सांगू शकतो… पोलीस. तो फार महान दिवस होता. ते अगदी आमच्या समोर गोळीबार करत होते. त्यांनी ७० किंवा ८० किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना मारले असावे… अगदी महिलांनाही सोडले नाही…
आम्ही जाळून सगळं बेचिराख केलं आणि परत आलो. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला बोलावलं… मुस्लिम गटारात लपले आहेत, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही तिथे गेलो तेव्हा पाहिलं की त्यांची घरं पूर्णपणे जळली होती. पण त्यांच्यापैकी ७ किंवा ८ जण गटारात लपून बसले होते. आम्ही गटाराचं झाकण बंद केलं… आम्ही त्यांच्या मागे गेलो असतो, तर आमच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. आम्ही झाकण बंद केलं आणि मोठमोठे दगड त्यावर ठेवले. नंतर तिथे त्यांना ८ किंवा १० मृतदेह सापडले. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ते तिथे लपले होते. पण आम्ही त्यांना बंद केलं आणि तिथे तयार झालेल्या गॅसमुळे ते मेले… हे संध्याकाळी घडलं… धमाल रात्रीपर्यंत सुरू राहिली… साधारण ८.३० पर्यंत…”
मोदींच्या भूमिकेबद्दल हा माणूस बढाई मारणारे खोटे बोलला आहे. नानावटी आयोगासमोर मायसोरवाला यांनी दिलेल्या साक्षीप्रमाणे १७ हजारांच्या मोठ्या जमावासमोर पोलीस हतबल झाले होते आणि ‘इंडिया टुडे’ नेही जमावाचा आकडा जवळपास तोच दिला होता. असे असूनही त्यांनी ‘७० किंवा ८० किंवा त्यापेक्षा जास्त’ मुस्लिमांना मारले नाही आणि याउलट त्यांनी ४०० मुस्लिमांना सुरक्षित जागी हलवले आणि ९०० मुस्लिमांचे प्राण वाचवले. आतापर्यंत कोणीही, नरोडा पाटियातील वाचलेल्या कुठल्याही मुस्लिम व्यक्तीनेदेखील किंवा अन्य कोणी, ‘नरोडा पाटियामध्ये पोलिसांनी ७० किंवा ८० किंवा त्यापेक्षा जास्त मुस्लिमांना ठार मारले,’ असा आरोप केला नाही. मुलाखतीत त्याने केलेल्या इतक्या चुका पाहता, त्या दिवशी नरोडा पाटियामध्ये हा माणूस हजरच नसेल, असे वाटते.
अहमदाबाद विहिंपचे प्रमुख राजेंद्र व्यास पोलिसांच्या भूमिकेबद्दल म्हणाले:
“राजेंद्र व्यास – ‘सर्व मुस्लिमांना मारा’ असे मुख्यमंत्री असल्यामुळे नरेंद्र भाई म्हणू शकत नव्हते. मी हे जाहीरपणे म्हणू शकतो कारण मी विहिंपमधला होतो. प्रवीणभाई तोगडिया हे म्हणू शकतात. पण ते (मोदी) असं म्हणू शकत नाही. पण आम्ही गुजरातीत म्हणतो तसं ‘आंखडा कान खडा’ (कानाडोळा करणे)… म्हणजे, त्यांनी आम्हाला काय हवे ते करायला सूट दिली, कारण आम्ही आधीच मुस्लिमांवर वैतागलो होतो. पोलीस आमच्याबरोबर होते. कृपा करून मी काय सांगायचा प्रयत्न करतोय, ते समजून घ्या. पोलीस आमच्या बाजूला होते आणि पूर्ण हिंदू समाजही. भाई (मोदी) याबद्दल खूप काळजी घेत होते. नाहीतर पोलीस दुसर्या बाजूला गेले असते…
तहलका – हो, ते कॉंग्रेसचे सरकार असते तर.
व्यास– तसे झाले असते तर चित्र अगदीच विरोधी दिसले असते.
तहलका – पण पोलीसही शेवटी हिंदूच आहेत. त्यांनी कोणती भूमिका घेतली, ते मला जाणून घ्यायचं आहे.
व्यास– ते मुस्लिमांजवळ गेले नाहीत…(जरी) लोकांनी त्यांना बोलावले, तरी ‘आम्ही येत आहोत’ इतकंच ते सांगायचे. त्यावेळी त्यांनी असंच केलं. दुसरं त्यांनी केलं ते म्हणजे ‘तुम्हाला काय हवं ते करा’ असं त्यांनी लोकांना सांगितलं… त्यांनी स्वत: काही केलं नाही.”
हेही सर्व खोटे आहे. पोलिसांनी केलेल्या वास्तविक कृतीचे तपशील आपण आधीच पाहिले आहेत.
एम.एस. विद्यापीठाचे अकाउंटंट धीमंत भट म्हणाले :
“९ मे २००७
माझ्यासारख्या ५० लोकांना पोलीस आयुक्तांनी खास परवानगी दिली होती. मदतीसाठी संचारबंदी असलेल्या भागात फिरण्याची… शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी. ती केवळ सबब होती… मी खुला आहे…स्पष्ट आहे (त्याबाबतीत). पण आम्ही हिंदूंना मदत कशी केली? त्यावेळी हिंदू घरांमध्ये लाकडी काठी सुद्धा नव्हती. मग आम्ही काय केलं? आम्ही लोखंडी पाईप घेतले.. प्रत्येकी ३ फुटांचे… लोखंडी सळ्या… बजरंग दलाचे लोक असतील तर त्रिशूळ. सर्व सामान (शस्त्रे) एकत्र ठेवण्यासाठी बजरंग दलाच्या लोकांची एक योजना होती. आम्ही गेलो आणि वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींना त्यांचा पुरवठा केला. हे फार गरजेचं होतं…’’
या गोष्टींचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. वादासाठी जरी ते म्हणतात ते खरे मानले तरी पोलिसांनी त्यांना मुद्दाम परवानगी दिली होती का? तो खोटे बोलतोय असा वाटते आहे. पण तो खरोखरच दोषी असेल, तर त्याला शिक्षा झाली पाहिजे.
धवल जयंती पटेल म्हणाले:
“तहलका–- गोधरानंतर जेव्हा तुम्ही बॉंब तयार केले आणि अहमदाबादला पाठवले, तेव्हा रस्त्यात तुम्हाला पोलिसांनी अडवले नाही का?
पटेल – आम्ही ते पोलिसांपासून लपवले… पोलिसांनी आम्हाला जाऊ दिले असते. फक्त जय श्रीराम म्हटल्याने फरक पडतो. शेवटी, पोलिसही हिंदूच आहेत, त्यांनाही समजायचे….”
हेही पुन्हा शंकास्पद आहे. खरेच त्यांनी बॉंब बनविले होते की नाही. पण त्यांचा कबुलीजबाब खरा असेल, तर हे पोलिसांवर आरोपपत्र कसे? त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांनी बॉंब पोलिसांपासून लपवले. पोलीस या दंगलीत सामील असते, तर पोलिसांपासून बॉंब लपविण्याची गरज त्यांना असती का?
आता अहमदाबादमधील कालुपूर भागाचे विहिंपचे जिल्हामंत्री रमेश दवे यांचे निवेदन पाहा:
“१२ जून २००७
पोलीस खूप मदत करत होते…खूप मदत. म्हणूनच तर जेव्हा मानवी हक्काचे लोक आले… जेव्हा त्यांनी सर्व काही पाहिले… तेव्हा ते म्हणाले यात राजकारण्यांची भूमिका होती… पोलीसही, खरंतर हिंदू समाजाचा असलेला प्रत्येकजण…कारण, अखेर पोलीस तरी कोण होते?… पोलीस हिंदूही होतेच… पण वस्तुस्थिती अशी होती की ते सरकारच्या दबावाखाली होते… काही करावं असं त्यांना वाटलं असतं, तरी ते करू शकत नव्हते…
(एस.के.) गडवीसाहेब इथले नवे डीसीपी होते. संचारबंदी लागू होती आणि ते गस्त घालत होते… मी त्यांच्याकडे सायकलवर गेलो आणि ‘नमस्कार’ असे त्यांना म्हटलं… ‘संचारबंदी असताना तुम्ही बाहेर कसे?’ त्यांनी विचारलं…‘मी महाराज आहे’, मी म्हटलं, ‘जिथे जायची इच्छा असेल तिथे मी जाऊ शकतो…’ तोपर्यंत मी विश्व हिंदू परिषदेचा आहे हे त्यांना माहीत नव्हतं. मग ते म्हणाले की जवळच्या मंदिराच्या वरच्या भागात त्यांना चढायचं आहे. तिथे त्यांना काय करायचं आहे, असं मी विचारलं. ते म्हणाले की बाहेरचे बरेच मुस्लिम तिथे बसले आहेत. त्यांना धडा शिकवायचा आहे….
मी म्हणालो, ‘तुम्हाला त्यांना धडा शिकवायचा असेल, तर मी अशा एका योग्य जागी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. पण त्यातील किमान ४ किंवा ५ जणांना तुम्ही माराल असं वचन तुम्हाला द्यावं लागेल…’ त्यांनी वचन दिलं… मग आम्ही त्या जागी गेलो. ते म्हणाले, ‘मी इथे याआधी आलो आहे.’… मी म्हटलं ‘इथं आधी आला होता की नाही, हे विसरा.’ तिथं एक घर होतं. कुलूप लावून बंद केलेलं. मी किल्ली आणायला सांगितली आणि आम्ही गच्चीवर गेलो. तिथून अगदी समोर ‘ती जागा’ दिसत होती. त्यांनी गच्चीवरूनच गोळीबाराला सुरुवात केली. आणि काही समजण्याच्या आतच त्यांनी ५ लोकांना ठार केलं…
‘माझं नाव कुठेही घेऊ नका’ असं गडवी साहेबांनी आम्हाला सांगितलं, पण सर्वच पोलिसांनी आम्हाला मदत केली… अगदी सगळ्यांनी. खरं तर असं सांगू नये पण त्यांनी आम्हाला कार्ट्रिजही दिली…”
(संदर्भ: http://www.tehelka.com/story_main35.asp?filename=Ne031107All_The_Cops.asp)
१२ नोव्हेंबर २००७ चा ‘इंडिया टुडे’ चा अंक म्हणतो: “याबरोबर रमेश दवे या विहिंप कार्यकर्त्याने आशिष खेतान या तहलकाच्या बातमीदाराला कॅमेर्यासमोर सांगितले की पोलीस विभागीय आयुक्त एस.के.गडवी यांनी ‘मी किमान ५ मुस्लिमांना या दंगलीत मारेन’ असे वचन त्याला दिले आणि दरियापूर भागात ५ मुस्लिमांना मारून आपले वचन पूर्ण केले. अधिकृत नोंदी असे दाखवतात की अहमदाबादच्या दरियापूर भागात गडवी यांनी नेमणूक दंगलीनंतर एका महिन्याने झाली आणि त्यांच्या कार्यकालात अशी कोणतीही घटना घडली नाही.”
यामुळे तहलका आणि रमेश दवे यांचा खोटेपणा पुन्हा उघड होतो. आता आपण गुलबर्ग प्रकरणात आरोपी असलेल्या प्रल्हाद राजू यांनी केलेली विधाने पाहूया.
“८ सप्टेंबर २००७
तहलका– गुलबर्ग घटनेच्या दिवशी पोलीस तुमच्याशी कसे वागले?
राजू– आम्हाला बघण्याखेरीज पोलिसांनी काहीही केलं नाही…
तहलका– तुम्हाला जे करायचं होतं, ते त्यांनी करू दिलं?
राजू– त्या दिवशी त्यांनी एकालाही अटक केली नाही. एकालाही त्यांनी स्पर्शसुद्धा केला नाही. (आमची प्रतिक्रिया: हे अगदी चूक आहे. त्या दिवशी पोलिसांनी ७०० जणांना अटक केली.)
तहलका – त्यांनी एकालाही थांबवलं नाही?
राजू– ४.३० नंतर त्यांनी आम्हाला पांगवलं
तहलका – तोपर्यंत कोणालाही थांबवलं नाही?
राजू– वरून आदेश आले तेव्हा… आम्हाला तिथून जायला सांगितलं.
तहलका – ४.३० पर्यंत तुम्हाला हवं ते त्यांनी करू दिलं?
राजू – हो. गुन्हे शाखेचे लोक आमच्याशी खूपच चांगले वागले… आम्हाला अगदी घरच्यासारखं वाटत होतं… आमच्या घरातले लोक आम्हाला भेटायला येत होते आणि त्यांना येऊ दिलं जात होतं… जवळजवळ आठवडाभर आम्हाला गुन्हे शाखेत ठेवण्यात आलं…”
हेही पुन्हा शेखी मिरवणारे खोटे आहे आणि या जबानीवरून असे वाटते की २८ फेब्रुवारीला गुलबर्ग सोसायटी परिसरात हा माणूस कदाचित उपस्थितच नव्हता. कारण ‘इंडिया टुडे’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘आऊटलुक’च्या वृत्तांताप्रमाणे एहसान जाफरी यांनी हिंदू जमावावर गोळीबार केल्यामुळे १ ठार आणि १५ जण जखमी झाले. पोलिसांनी गोळीबार करून ५ दंगलखोरांना ठार मारले आणि हल्लेखोर जमाव प्रचंड मोठा असूनही १८० मुस्लिमांचा जीव वाचवला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या २८ फेब्रुवारी २००२ च्या ऑनलाइन वृत्तांतात कोठेही पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप करण्यात आलेला नाही. पोलिसांनी १२४ फैरी आणि १३४ अश्रूधारेची नळकांडी फोडली इथे, शिवाय लाठी-चार्ज केला जमावावर- असे एस.आय.टीने म्हटले.
अता विहिंपचे राज्य विभाग प्रमुख अनिल पटेल यांची मुलाखत पाहा-
“१३ जून २००७
अनिल पटेल – हे पाहा, काही भाग असे होते जिथे आमची सुरक्षितता महत्त्वाची होती.
तहलका– जसे की?
पटेल – कालुपूर, दरियापूर…. या भागाच्या अगदी कडेला हिंदू राहतात… त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही इथून काही सामान (शस्त्रं) पाठवलं.
तहलका – इथून पाठवलं.
पटेल – वेळोवेळी… तिथे काही पोलीस होते, ज्यांच्या संपर्कात आम्ही होतो. ते यायचे, सामान घ्यायचे आणि ते जिथे पोचवायचे असेल तिथे सुरक्षितपणे पोचवायचे. इथे पोलिसांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला…. काही जण तर असंही म्हणाले की काहीतरी करा…. त्यांना लुटा, मारा त्यांना, संपवा त्यांना… माझं तर एकदा एका डीएसपीशी भांडण झालं. आमच्या एका बंधूनं एका मुस्लिमाचा कान कापला तलवारीनं आणि डीएसपींनी त्याला अटक केली. मी डीएसपींना सांगितलं की आमचे लोक मरेपर्यंत जिवंत जाळले गेले. तुम्ही भ्रष्टाचारी आहात आणि वडोदरात तुम्ही मुस्लिमांबरोबर जेवणात सहभागी होता. नंतर त्यांनी त्या बंधूला सोडलं. डीएसपी एन.डी.सोळंकी फार चांगले होते. ते म्हणाले, ‘त्याला सोडा…’
तहलका– म्हणजे सोळंकींनी पाठिंबा दिला?
पटेल – पूर्ण. पूर्ण. त्यांनी मला संपूर्ण पाठिंबा दिला. म्हणजे पाहा, जेव्हा दंगली संपत आल्या, जेव्हा वातावरण शांत व्हायला लागलं, तेव्हा बिलोडा खेड्यातला कोणीतरी म्हणाला की तिथे काहीही घडलं नाही. काहीतरी करायला हवं.. तिथे एक मन्सूरी नावाचा माणूस होता… तो ‘सिमी’चा सहानुभूतीदार होता…त्याचे भाजीचे दुकान होते… त्यावर मरेपर्यंत शस्त्रांचे वार केले… नंतर आमच्या भागातले एक सहमंत्री (विहिंप नेता) अरविंदभाई सोनी यांना अटक झाली. मी बिलोडाला गेलो आणि नंतर डीएसपींना बोलावलं आणि त्यांच्याशी बोललो… जयंतीभाई आणि मी दोघंही गेलो, त्यांना भेटलो आणि सांगितलं की अरविंदभाईंना सोडा. तिथे सर्व काही लेखी होतं. त्या अटकेच्या रिपोर्टमध्ये, पण अरविंदभाईंना जेव्हा न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं तेव्हा (विहिंप) कार्यालयात परत जायला त्यांना सांगण्यात आलं…
तहलका– कार्यालयात जायला…
पटेल– ते तिथे जवळजवळ दीड महिना राहिले.
तहलक – असं डीएसपींनी सांगितलं? डीएसपी कोण होते?
पटेल– एन.डी.सोळंकी
पटेल– तिथे श्रीकुमार हे आयबी अधिकारी हाते. त्यांनी ‘साबरकांठा विहिंपने अहमदाबादला शस्त्रे पुरवली आहेत.’ असा फॅक्स अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांना पाठवला होता.. या बाबीची चौकशी झाली… आमचा ब्लॉक मंत्री पकडला गेला (अटक झाली). या चौकशीसाठी जे निरीक्षक आले होते, ते संघाशी संबंधित होते…
तहलका– त्यांचं नाव काय?
पटेल– मला माहीत नाही. पण… चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की ते जीवन दल भोळे, आमचे विभाग प्रचारक, यांच्याबरोबर आहेत…’’
या माणसाने केलेली विधाने खरी आहेत की खोटी, याचा तपास व्हायला हवा. पण अहमदाबादच्या कालुपूर आणि दरियापूर भागातील हिंदूंची सुरक्षितता महत्त्वाची होती, हे त्याचे विधान मात्र अगदी खरे होते. या माणसाने स्वत:ला दोषी ठरवले, मोदींना नाही. आता आपण एहसान जाफरी प्रकरणातील आरोपी मांगीलाल जैन यांचे म्हणणे पाहू या.
“८ सप्टेंबर २००७
तहलका– तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलत होता, त्या इन्स्पेक्टरचे नाव काय?
जैन – (के जी) एरडा (मेघानीनगरचे पोलीस निरीक्षक)
तहलका– एरडा… त्यांनी काय केलं?
जैन – त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्या दिवशी त्या लोकांना जनतेपासून दूर ठेवलं.
तहलका – मुस्लिमांपासून दूर ठेवलं?
जैन – लोकांपासून… हिंदूंपासून… त्यांनी आम्हाला सांगितलं की सगळं काही २ ते ३ तासात संपलं पाहिजे.
तहलका – याचा अर्थ असा की त्यांनी तुम्हाला २-३ तास दिले.
जैन – सगळं संपवायला.
तहलका – सर्व काही संपवायला.
जैन – असं तर पूर्ण अहमदाबादमध्ये घडत होतं. (हे गृहीत होतं.) कोणीही बाहेरचा माणूस येऊ शकत नव्हता. अगदी जादाची कुमकही येणार नव्हती. संध्याकाळपर्यंत तिथे कोणीही आलं नाही. त्यामुळे आम्हाला आमचं काम करणं अपेक्षित होतं.
तहलका – २-३ तासात हवं ते करा असं त्यांनी तुम्हाला सांगितलं.
जैन – त्यांनी असं सांगितलं आणि जमाव बेभान झाला. काहींनी लुटालूट सुरू केली. इतरांनी हत्यांना सुरुवात केली. कोणीतरी एका माणसाला बाहेर ओढलं, खाली पाडून त्याचे तुकडे केले आणि त्याला जाळलं. अशा प्रकारची कितीतरी कृत्यं झाली.
तहलका – तुम्हाला २ महिन्यानंतर पकडलं?
जैन – मी २ महिन्यानंतर समर्पण केले.
तहलका – तुम्ही न्यायालयात हजर झालात का?
जैन – न्यायालयात नाही.. मी गुन्हे शाखेच्या लोकांसमोर हजर झालो. तिथे सदाव्रतीसाहेब होते… मी त्यांना घरी बोलावलं. आम्ही रात्री जेवण घेतलं. त्यांनी मला शरण यायला सांगितलं आणि मी तसं केलं.
तहलका – सदाव्रतींनी सहकार्य केलं?
जैन– सहकार्य केलं… ते मला संध्याकाळी भेटले.
तहलका – त्याची काही मदत झाली का?
जैन – त्यांनी सांगितलं की मांगीलालचं नाव तिथे आहे. त्यांनी मला शरण यायला सांगितलं.
तहलका – तुमच्या घरी?
जैन– माझ्या घरी. काळजी करू नका. (ते म्हणाले) भिण्याचंही कारण नाही. उद्या सकाळी १० वाजता हजर व्हा. सर्व काही ठीक होईल. तमुचा मुलगा एक दोन महिन्यात बाहेर येईल. त्याचं नाव आता रेकॉर्डवर आल्यानं, दुसरा काही पर्याय नाही. त्याचं नाव आहे, याचाच अर्थ असा की त्यानं हजर व्हायला हवं. अगदी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्रीही यात काही करू शकत नाहीत… म्हणून मी गुन्हे शाखेसमोर हजर झालो… त्यांनी माझी चांगली काळजी घेतली.
तहलका – त्यांनी तुमची चांगली काळजी घेतली.
जैन– होय, साहेब. त्या कोठडीत भरपूर डास होते आणि ती गलिच्छ होती. आम्हाला तिथे ठेवलं नाही… त्यांच्या कार्यालयाच्या वर एक खोली होती. आम्हाला कार्यालयात ठेवलं. तिथे गाद्या होत्या… दिवसातून दोन वेळा माझ्या घरून जेवण यायचं. आम्ही तिथे ३ दिवस होतो…
तहलका – ३ दिवस
जैन – पहिल्याच दिवशी आम्हाला न्यायालयात हजर केलं.
तहलका – तुम्हाला कोणत्या जागेवरून उचललं, याची नोंद त्यांनी कुठे केली?
जैन – ते म्हणाले की त्यांनी आम्हाला घरातून ताब्यात गेतलं.
तहलका – असं ते म्हणाले
जैन – हो, ते असंच म्हणाले, पोलीस असेच असतात. ते सांगतात एक आणि करतात दुसरंच. आपलं नाव स्वच्छ राहावं, एवढंच त्यांना हवं असतं.
तहलका – पण त्यांनी तुमची चांगली काळजी घेतली.
जैन – चांगली होती. आम्ही संध्याकाळी तिथे गेलो… आम्हाला दिवसातून २ वेळा चहा मिळायचा आणि आम्ही फोनही करू शकत होतो. मला घरूनही फोन येत होते… आम्हीही करत होतो… आम्हाला फोनची पूर्ण सोय होती. ३ दिवस आम्ही गुन्हे शाखेत होतो… त्यांनी आम्हाला स्पर्शही केला नाही… मी हे सांगितलं पाहिजे.. कोणीही माझ्याकडे बोटसुद्धा दाखवलं नाही… त्याच दिवशी त्यांनी माझी जबानी नोंदवली… ‘काय झालं… तुम्ही त्या दिवशी कुठे होता.’ (हेच त्यांनी विचारलं.)
तहलका – तुम्ही काय सांगितलं?
जैन – मी सांगितलं की दुकान बंद होतं आणि मी तिथे पाहायला म्हणून गेलो होतो… मी गटाचा एक भाग होतो… त्या जागेपासून माझं घर लांब होतं आणि तिथे प्रचंड जमाव होता. ज्यांनी हत्या केल्या त्यांच्यापैकी कुणालाही मी ओळखलं नाही. मी हेच सांगितलं… ‘हत्या कोणी केल्या, ते मला माहीत नाही. सर्व जण घोषणा देत होते. म्हणून मीही दिल्या…’ हेच मी त्यांना सांगितलं आणि नंतर मी सांगितलं की २ वाजता, हे सगळं झाल्यावर मी घरी गेलो. मी हेच सांगितलं.
तहलका – तुम्ही तेच सांगितलं?
जैन – हेच सांगितलं.
तहलका – सर्व काही खरं सांगण्यासाठी त्यांनी तुमच्यावर जबरदस्ती केली नाही का?
जैन – नाही, साहेब… मला स्पर्शही कोणी केला नाही… मी जे सांगितलं ते त्यांनी लिहून घेतलं.
तहलका – अगदी तुम्ही सांगितलं, तेच त्यांनी लिहिलं?
जैन – ते मला काहीही म्हणाले नाहीत… दोन दिवस मी रिमांडमध्ये होतो… पहिल्याच दिवशी रिमांड संपला. तो फक्त नावापुरताच होता. दोन दिवस मला घरून जेवणाचा डबा मिळाला… माझे कुटुंबीय मला भेटायला येत होते. मला सर्व सवलती होत्या.
तहलका – याचा अर्थ, रिमांड ही फक्त औपचारिकता होती. … कायदेशीर प्रक्रिया.
जैन – त्यांनी कायदेशीर प्रक्रिया नीटपणे पूर्ण केली…’’
‘‘अगदी जादाची कुमकही येणार नव्हती… ते तिथे संध्याकाळपर्यंत येणार नव्हते… त्यामुळे आम्हाला सर्व काम करता आलं’’, हे त्यांचे विधान अगदी चुकीचे आहे. कारण कुमक त्याच दिवशी पोचली होती, पण तोपर्यंत जमाव १० हजारापर्ययत वाढला होता, असे ‘इंडिया टुडे’ म्हणतं. या माणसाची ही विधाने खरोखर सत्य असतील, तर त्याच्यावर खटला नक्कीच चालवावा. पण त्याची ही विधाने कायद्याच्या कक्षेत पुरावा म्हणून उभी राहणार नाहीत.
गुलबर्ग प्रकरणातील आरोपी मदन चावल याची मुलाखत :
“१२ जून २००७
चावल– त्या दिवशी मी तिथे होतो… पूर्ण दिवस, मी त्यांच्याबरोबर पळालो. त्यांनी जाफरीसाहेबांना आणले, तेव्हा मी तिथेच उभा होतो… त्यांनी त्यांना खाली पाडले, पाठीत लाथा घातल्या… त्यांना त्यांच्या खांडोळ्या करायच्या होत्या.
तहलका– हे सगळं सविस्तर सांगा. हे कुठे सुरू झालं?
चावल – मी माझ्या दुकानात होतो, तेव्हा ८.३० ते ९ च्या दरम्यान दुकाने बंद करण्यासाठी विहिंपचे लोक आले. ९-९.३० वाजता एका दुकानाला माझ्या दुकानासमोर जाळण्यात आलं. तेव्हा मला समजलं की ते सुरू झालं होतं.
तहलका – ते दुकान मुस्लिमांचं होतं?
चावल – हो, ते त्यांचं होतं. एकदा हे सुरू झाल्यावर लोकांची पळापळ सुरू झाली. पपांनी मला माझं दुकान बंद करायला सांगितलं… तो माझा भाग असूनही. माझं दुकान उघड राहिलं असतं तरी कोणीही काहीही म्हणू शकलं नसतं. दुकान बंद करायला त्यांनी सांगितल्यावर कोणी काहीही बोललं नाही. मग मी हाताच्या इशार्यांनी सांगितलं की हे बरोबर दिसत नाही, शेवटी ही धर्माची बाब आहे आणि म्हणून दुकान बंद करणंच महत्त्वाचं आहे. माझे वडील म्हणाले, ‘आजचा दिवस बंद ठेव. आपण घरी जाऊ.’ माझे वडील, इतर काहीजण, आम्ही घरी गेलो. नंतर १०.३० किंवा ११ वाजता मी घराबाहेर पडलो… त्यानंतर काही क्षणात मी जमावात सामील झालो… मी जमावाबरोबर होतो तेव्हा सर्व वेळ कल्लोळ सुरू होता… किमान अडीच तास हे सगळं होत राहिलं.
तहलका – जमावाचं नेतृत्व कोण करत होतं?
चावल – बरेच लोक जमावात सामील झाले होते. ज्या क्षणी ते दुकान पेटवलं गेलं, त्या क्षणी सर्वजण जमायला सुरुवात झाली.
तहलका – विहिंपचे लोकही या जमावात होते का?
चावल – सगळे होते.
तहलका – विहिंपमधले कोण होते?
चावल– त्यावेळी मला सर्व नेते माहीत नव्हते. माझे त्यांच्याशी कोणतेही संबंध नव्हते. कारण माझी पार्श्वभूमी व्यवसायाची असल्यानं त्याच क्षेत्रातले लोक मला माहीत होते… नंतर मात्र मी अतुलभाईंना भेटलो, तेव्हा मला आठवलं की तेही तिथे होते.
तहलका – अतुल वैद तिथे होते?
चावल – अतुल वैद तिथे होते आणि भरतभाई तेली, तेही तिथे होते. ही मुलं… मोठी माणसं… मला तुरुंगातून बाहेर काढायला आले तेव्हा त्यांना मी भेटलो… ते पोलीस ठाण्यात आले होते… अर्थात ते सेंट्रल जेलमध्ये कधीच आले नाहीत… ते पोलीस ठाण्यात आले, तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की तेही तिथे होते. आणि मग मला आश्चर्य वाटायला लागलं की यांची नावं वगळून मला का अटक केली गेली… माझं नाव आलं तेव्हा अतुल वैद आणि भरत तेली यांची नावं का घेतली गेली नाहीत? मी त्याला फारसं महत्त्व दिलं नाही, कारण मला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी हेच लोक मला मदत करू शकले असते… त्यासाठीच मी माझं तोंड कधी उघडलं नाही. हे लोकही तिथे होते याबद्दल मी एक शब्दही उच्चारला नाही. कोणीही याबद्दल काही बोललं नाही… अगदी तुरुंगात असलेले ते ४० तरुणही बोलले नाहीत.
तहलका– प्रत्येकाला हे माहीत होतं.
चावल– त्यांना माहीत होतं. नेमकं काय झालं याबद्दल आम्ही कधीच काही बोललो नाही… तुरुंगात आम्ही हेच म्हणत राहिलो की आम्हाला याबद्दल काहीच माहीत नाही… आम्ही बरोबर जाळ्यात पकडलो गेलो… आग लावण्यासाठी केरोसीनचा उपयोग केला असा आरोप माझ्यावर पहिल्या आरोपपत्रात लावण्यात आला. त्या आरोपपत्रात ५.३० ते ६ च्या दरम्यान एरडासाहेबांच्या सांगण्यानुसार माझ्यावर गोळी झाडण्यात आली.
तहलका – तुम्हाला गोळी कोणी मारली?
चावल– ते एरडा साहेब म्हणाले तसं… तो पूर्ण विभाग. मी तुम्हाला ती जागा दाखवली ना?
तहलका – हो.
चावल – मी असाच तिथे उभा होतो…. त्यांच्याजवळ ८ ते १५ लोक उभे होते. आम्ही विचारलं, साहेब, तुम्ही काय करताय, त्यांना का वाचवताय?
तहलका– हे तुम्ही एरडा साहेबांना विचारलं?
चावल – लोकांनी… आम्ही ८ ते १५ लोक होतो… प्रत्येकानंच विचारलं, ‘तुम्ही हे काय करताय?’
तहलका– ते मुस्लिमांना कुठे घेऊन जात होते, हे तुम्ही विचारलं?
चावल – आम्ही ‘त्यांना (मुस्लिमांना) कुठे घेऊन जात आहात’ हे विचारलं… तेव्हा त्यांनी ते काय करत आहेत, ते आम्हाला सांगितलं.
तहलका – त्यांनी काय सांगितलं?
चावल – त्यांनी सांगितलं, हे करा… जेव्हा ही गाडी (जिच्यात मुस्लिम होते) या बाजूनं येईल, तेव्हा आमचे पोलीस (गाडीबरोबर असलेले) पळून जातील… तुम्ही गाडीला आग लावा. सगळी घटना इथेच संपेल आणि कोणाविरुद्ध खटला दाखल करण्याचा प्रश्नच उभा राहणार नाही. ‘पूरी पिक्चर यहीं खतम हो जायेगी.’ त्यांनी हे सांगितलं, तेव्हा बागडी समाजाला वाटलं की जे साक्षीदार होऊ शकतात, त्यांनाच पोलीस घेऊन जात आहेत… (ते घाबरले) की ते त्यांना त्रास देऊ शकतात… त्यांनी एरडासाहेबांवर दगडफेक करायला सुरुवात केली… आणि जेव्हा त्यांच्यापैकी एक दगड त्यांना लागला तेव्हा मी पळून गेलो. त्यांनी त्यांचं रिव्हॉल्व्हर बाहेर काढलं… ते माझ्या मागे होते… माझ्यावर ओरडून त्यांनी मला थांबायला सांगितले. माझ्याबरोबर माझ्या पुतण्याला खेचून नेण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी माझ्यावर गोळी झाडली.
तहलका – एरडासाहेबांनी तुमच्यावर गोळी झाडली? चुकून झाडली का?
चावल – चुकूनच झाडली… ती माझ्या हातावर लागली. माझ्या हाताला जखम झाली, पण एकही दवाखाना उघडा नव्हता. सर्व बंद होते. अगदी हॉस्पिटलसुद्धा त्यावेळी… मग मी सिव्हिल हॉस्पिटलला गेलो… यासारख्या गोष्टींमध्ये मी यापूर्वी कधीच भाग घेतला नव्हता. त्यामुळे याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. त्या दिवशी हॉस्पिटलच्या रेकॉर्डवर मी माझं खरं नाव लिहून दिवस संपवला.
तहलका – मग त्या सकाळी तुम्ही जाफरींना कसं मारलं?
चावल – जाफरी. ते असं झालं की त्या लोकांनी त्यांना पकडलं, मी त्यांच्या पाठीत लाथ घातली आणि त्यांनी त्यांना बाजूला ओढलं. त्यांनी त्यांना ओढलं त्याचक्षणी.
तहलका – तुम्ही जाफरींना लाथ मारली?
चावल – लाथ मारली.
तहलका – ते खाली पडले.
चावल – गिरा… वो नहीं… खौंच… उनके हाथ में था ना…. पांच-छे जन पकड लिये थे, फिर उसको जैसे पकडके खडा रखा, फिर लोगों में किसीने तलवार मारी… हाथ काटे… हाथ काटके फिर पैर काटे… फिर ना, सब काट डाला… फिर टुकडे कर के फिर लकडा जो लगाये थे, लकडे उसपे रखके फिर जला डाला… जिंदा जला डाला.
तहलका – मग जेव्हा तुम्ही जाफरींच्या शरीराचे तुकडे करत होता, तेव्हा एरडा त्यांना वाचवण्यासाठी आले नाहीत?
चावल – कोणीही काहीही केलं नाही. त्यावेळी तर इरडासाहेब तिथे नव्हतेच. आपल्या वाहनासह ते मेघानीनगरला गेले होते. ते लोक जाफरीसाहेबांचे तुकडे करत आहेत, हे त्यांना माहीतच नव्हतं. हे सगळं १ किंवा १.३० वाजता घडलं.
तहलका – पण जाफरीसाहेबांच्या उरलेल्या कुटुंबाला पळून जायची संधी मिळाली का?
चावल – नाही. फक्त त्यांची पत्नी वाचली. तिनं हिंदूंसारखा वेश करून स्वत:ला हिंदू म्हणवून घेतलं.
तहलका – पण त्यांच्या काही मुलींना वाचवलं…
चावल – त्या ठिकाणचं कोणीही सुटलं नाही, त्यांच्या कुटुंबातलंही कोणी वाचलं नाही. जे कोणी त्यावेळी तिथं नव्हते, तेवढेच वाचले. त्यांच्या बायकोनं सांगितलं की ती मोलकरीण आहे… हिंदू, मागच्या बाजूला असलेल्या पत्रेवाली चाळीत राहणारी. मला तुम्ही का मारता (ती म्हणाली) मी तर साधी नोकराणी आहे. तिनं हिंदूंसारखे कपडे घातले होते… चांगले कपडे.
तहलका – तुम्ही तिला ओळखू शकला नाहीत, म्हणून ती वाचली?
चावल – मी त्यापूर्वी कधीही तिला भेटलो नव्हतो. कारण जावं आणि त्यांना भेटावं अशी काही गरजच नव्हती. त्यांच्याबरोबर माझे कोणतेही संबंध नव्हते.
तहलका – गुलबर्ग सोसायटी किती मोठी आहे? इथे बरेच लोक राहतात का?
चावल – खूपच राहतात.
तहलका – मग आता तिथे राहायला म्हणून लोक परत आले का?
चावल – कोणीही परत आलं नाही… ती आता बंद आहे… आता जणू तुरुंगच आहे तो. कोणीही तिथे परतलं नाही.
तहलका – पण त्या संध्याकाळी काही लोकांना वाचवण्यात आलं.
चावल – ४० लोक पळून गेले… काहीजण आधीच सोडून गेले होते.
तहलका – मग तुम्ही गुलबर्गमध्ये कसे शिरलात?
चावल – लोकांनी आपापल्या घरातून गॅस सिलेंडर आणले. ते त्यांनी सोसायटीच्या बाहेरच्या भिंतींवर ठेवले… मग त्यांनी ब्रेड वगैरे बनवतात त्या बेकरीतून पाईप मिळवले आणि त्यांच्या मदतीनं गॅस सिलेंडर उघडले. मग ते तिथून लांब गेले आणि त्यांनी कापडाचा खुपडा (मशाल) केला आणि भिंतींवरच्या सिलेंडरवर तो फेकला. सिलेंडर्सचा स्फोट झाला आणि भिंत कोसळली. मग आम्ही आत गेलो.
तहलका – भिंत बरीच उंच होती का?
चावल – हो. बरीच. ती दोन फुटांची भिंत नव्हती. जवळजवळ १५-२० फूट उंच असेल. त्या भिंतीवर काटेरी तारांचं कुंपणही होतं.
तहलका – तरी फक्त १ किंवा २ सिलेंडरमुळे ती भिंत पडली?
चावल – दोन सिलेंडर… एक तिकडे फेकला होता आणि दुसरा समोरच होता. त्या सिलेंडर्समुळेच अर्थातच भिंत पडली. सिलेंडर खूप जड असतात.
तहलका – त्यामुळे आतल्या घरांना आग लागली.
चावल – लोकांनी त्यांची घरं जाळण्यासाठी, त्यांच्याच घरातल्या वस्तू वापरल्या… कोणालाही बाहेरून काही आणण्याची गरजच पडली नाही… त्यांच्याच वस्तू त्यांचीच घरं जाळायला कामी आल्या.
तहलका – पाटियामध्येही अशीच घटना घडली.
चावल – असंच घडलं पटियामध्येही’’
http://www.tehelka.com/story_main35.asp?filename=Ne031107They_hacked.asp
‘त्यांच्या कुटुंबापैकी कोणीही वाचलं नाही. फक्त त्यांची पत्नी वाचली’ हे सपशेल खोटे आहे. सत्य असे आहे की या घटनेत १८० पेक्षा जास्त मुस्लिमांना वाचविले गेले आणि त्यांच्या पत्नीबरोबरच तिथे असलेल्या इतर नातेवाईकांनाही वाचवण्यात आले. तसेच स्वत:ला वाचविण्यासाठी त्यांच्या पत्नीने आपण हिंदू असल्याचे भासविले, असे संकेत कुठेही मिळत नाहीत. हे अगदीच असत्य आहे. म्हणजे पुन्हा ही विधाने पूर्णपणे खोटी आहेत. तसेच जाफरींच्या देहाचे तुकडे केले गेले नाहीत. शवविच्छेदनाचा अहवाल सांगतो की गोळ्या लागून झालेल्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला, असे ‘द पायोनियर’चे एमडी आणि संपादक चंदन मित्रा यांच्या ‘अ स्टिंग विदाऊट व्हेनम’ या १२ नोव्हेंबर २००७ च्या ‘आऊटलुक’च्या लेखात म्हटले आहे. जाफरी यांचे पाय कापले, वगैरे सारखी चावल यांची विधाने पुन्हा बढाया मारणारी खोटी विधाने आहेत, हे स्पष्ट दिसते.
विहिंपचे नेता अनिल पटेल यांनीही आपल्या मुलाखतीत या तहलकाच्या स्टिंग ओपरेशनमध्ये म्हटले आहे की दंगलींमध्ये मुस्लिंमावर हल्ले करण्यात कॉंग्रेसचे नेतेही गुंतले होते. याबद्दल कॉंग्रेस पक्षाला काय म्हणायचे आहे? ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या ९ ऑगस्ट २००३ च्या अंकात, दंगलींमध्ये मुस्लिमांवर हल्ले करणार्या २५ कॉंग्रेस नेत्यांवर असलेले आरोप आपण पाहिले आहेच.
आरोपी आणि इतर लोकांच्या मुलाखतींबद्दल हे सर्व झाले. पण स्टिंग ऑपरेशननंतर त्यांचा दृष्टिकोन काय होता, हे कोणीही ऐकलेले नाही. स्वत:च्या बचावासाठी या लोकांना काय सांगायचे आहे? पण गुजरातमधील कॉंग्रेस नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला (जन्म १९४०) या तहलका ऑपरेशनबद्दल काही वेगळेच बोललेत.
“गुजरात नरसंहारावरचे ‘तहलका स्टिंग ओपरेशन’ हा नरेंद्र मोदी सरकारचा ‘उशिराने बाहेर आलेला’ प्रयत्न आहे. लवकरच होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारांमध्ये आपली ढासळलेली प्रतिमा पुन्हा सावरण्याचा हा प्रयत्न आहे,” असा आरोप केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री शंकरसिंह वाघेला यांनी शनिवारी (२७ ऑक्टो २००७) केला. ‘‘भारतीय जनता पार्टीच्या गुजरात शाखेत सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा हा एक प्रयत्न आहे’’ असेही ते म्हणाले. ‘‘आपण कट्टर हिंदू आहोत आणि हिंदुत्वाची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यासाठीच हे एका ‘खोट्या एनकाऊंटर’ सारखे आहे”, असाही आरोप वाघेलांनी केला.
(संदर्भ : http://ia.rediff.com/news/2007/oct/27modi.htm )
‘तहलका’च्या संकर्षण ठाकूर यांनी दावा केला की, ‘आपण एका गर्भवती महिलेचे पोट फाडले आणि तिचा गर्भ बाहेर काढला’ (लेखी उत्तरात गर्भाचा उल्लेख नाही) असा कबुलीजबाब बजरंगीने दिला. वास्तवात बजरंगी म्हणाला की त्याच्यावरची एफ.आय.आर. असा आरोप लावते की त्याने एका गर्भवती महिलेचे पोट फाडले, आणि त्याने असे काही केले नाही.
२७ ऑक्टोबर २००७ ला इंटरनेटवर आलेल्या एका लेखात म्हटले होते:
‘‘ …संपादकांपैकी एक शोमा चौधरी यांनी मृतांचा आकडा २५०० दाखवला होता. लक्षात ठेवा की अपहरण केलेल्या हिंदू वधूंचे बजरंगीने पुन्हा अपहरण केले असे रंगवून त्याला माध्यमांनी प्रसिद्ध बनविले. त्याआधी बजरंगी अगदी साधा, कोणालाच माहीत नसलेला माणूस होता. अगदी ‘तहलका’ने त्याच्यावर प्रदीर्घ लेख लिहिणं सुरु केल्यापासून काही काळ असेच सुरू होते. यातून हेच सिद्ध होते की आपण काय करतो आहोत, ते त्यांना चांगलेच माहीत होते. त्यांना, दंगलींचा संबंध पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी जोडून थेट मोदींपर्यंत पोचवायचा होता.
पुराव्यावर ते धडपडलेच आणि मग त्यांनी घाईघाईने ते जाहीरही केले, असे नाही. या सर्वच गोष्टींची योजना अतिशय बारकाईने आराखडा तयार करून करण्यात आली होती. प्रश्न अतिशय काळजीपूर्वक आणि खूप आधी तयार करण्यात आले होते. अगदी धाडसी बातमीदारही पडत्या फळाची संधी घेऊन पूर्वतयारीशिवाय प्रश्न विचारत नव्हता. बाबरी मशीद घटनेच्या पूर्वतयारीबद्दल हरेश भट यांची विस्तृत मुलाखत घेण्यात आली आणि ती अगदी बेमालूमपणे ‘गोधरा’ नंतरच्या दंगलीत मिसळण्यात आली. स्वाभाविकपणे यातून हे ‘स्टिंग ओपरेशन’ एक कट-कारस्थान असल्याचे मत अनेक ठिकाणांहून आले…
खरे सांगायचे तर अस्सल स्टिंगसाठी सतत दिले जाणारे चित्रपटांचे संदर्भ व्यत्यय आणणारे होते. ज्यांचे चित्रीकरण करण्यात आले होते, ते त्यांना वारंवार ‘कास्ट ओफ कॅरेक्टर्स’ असे म्हणत होते…
…तुम्ही तुमचे डोके खाजवत असाल तर कदाचित तुम्ही शोमा चौधरींचे सदर वाचू नये. स्टिंगच्या मर्यादांबाहेर जाऊन (आणि कदाचित तिच्या बौद्धिक मर्यादेबाहेर) आपल्या लोकशाहीबद्दल प्रश्न विचारण्याची तिला काय आवश्यकता होती, याचे कोणालाही नवल वाटेल. हे स्टिंग राजकीय नाही, तर बळींना न्याय देण्याच्या उद्देशाने केलेली फक्त शोधपत्रकारिता आहे, हे ठामपणे सांगण्याच्या प्रयत्नात त्या शेवटी हिंदूंना, मोदींना मत न देण्याचे, आवाहन करतात.
‘आज भारतातील खरी समस्या हिंदू आणि मुस्लिम यांच्यात नाही. ती हिंदू आणि हिंदूंमध्ये आहे. मोदी कशासाठी आहेत याच्या दृश्य पुराव्यांना सामोरे जाऊनही जर गुजरातचे हिंदू मोदींना पुन्हा निवडून देणार असतील तर आपल्याला हिंदू म्हणजे काय हे पुन्हा आग्रहाने सांगावे लागेल.’
त्यामुळे मोदींना अडकविण्यासाठी ‘अपरिवयर्तनीय पुरावे’ इथून जे सुरु झाले ते एक नैतिक प्रार्थना म्हणून संपुष्टात आले. या प्रकरणाला भक्कम पाठिंबा मिळेल असा काहीही टेप्समधला पुरावा त्यांनी सांगितलाही नाही आणि युक्तिवादही दिला नाही. हा माझा मार्ग किंवा महामार्ग आहे,… पण स्टिंगवर तुम्ही विश्वास ठेवणार नसाल, तर आपली लोकशाही दोषयुक्त आहे किंवा तुम्ही धर्मांध हिंदू आहात.
दरम्यान जिहादी दंतकथांमध्ये या स्टिंगने हळूळू आपला मार्ग बनवण्यास सुरुवात केली आहे. जहाल विचारांचा ज्यांच्यावर सहज परिणाम होईल अशा तरुणांची भरती करून दहशतवादी हल्ले करण्यासाठी त्यांना स्टिंग दाखवून तयार केले जात आहे. जर काही नाही तर, गोधरा गाडीला लागलेली आग, हा अपघात नव्हता, असे या स्टिंगने सिद्ध केले. तरी मध्यपूर्व आणि पाकिस्तानमधील वृत्तपत्रे मात्र तसेच लिहीत आहेत…
…उदाहरणार्थ, आशिष खेतान (तहलकाचे) यांच्या म्हणण्यानुसार प्रा. बंदूकवाला यांना निर्दयपणे ठार मारण्यात आले. पण अगदी अलीकडे इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रा. बंदूकवाला रहस्यमयरित्या हजर झाले!
त्याचप्रमाणे, बजरंगीने टेपवर बोलताना सांगितले की त्याच्या एफआयआरमध्ये असा आरोप आहे की त्याने एका गर्भवती महिलेचे पोट फडले. हळूहळू बजरंगी टेपवर त्याच्या गुन्ह्याची कबुली देत आहे, असे समजले गेले. आणि अखेर दृश्यफितीमध्ये गर्भवती महिलेच्या पोटातून गर्भ बाहेर काढण्यात आसुरी आनंद दाखवणारा बजरंगी पाहिला!…”
(संदर्भ : http://barbarindians.blogspot.com/2007_10_01_ archive.html )
स्टिंग ऑपरेशननंतर हरेश भट म्हणाले, ‘‘ही स्टिंग ऑपरेशन कसे काम करतात, हे तुम्हाल माहीत आहे. मी दुसर्याच कशावर तरी बोलत होतो आणि ते बदलून, रचून काहीतरी दुसरंच दाखवलं. आम्हाला विरोध करणार्यांचा हा राजकीय कांगावा आहे.’’
बाबू बजरंगी म्हणाले, “माझं नाव कोण अणि का घेतंय हे मला माहीत नाही. मी नरोडा पाटियामध्ये कोणत्याही जमावाचं नेतृत्व केलं नाही. स्टिंग ऑपरेशननं मी असं म्हणताना दाखवलंय की मी तलवार घेतली आणि महिलेचं पोट फाडलं. पण मी असं सांगण्याचा प्रत्यन करत होतो की मी हे केल्याचा एफआयआर माझ्याविरुद्ध नोंदला गेला आणि मी असे करणे नाकारतो.’’ (इंडियन एक्स्प्रेस, २६ ऑक्टोबर २००७)
‘तहलका’ आणि ‘आज तक’ त्यांच्या गुजरात स्टिंगमध्ये इतके वाहवत गेले की ते फेब्रुवारीतील तारखांनी त्रासले. बी.पी.सिंघल ‘पायोनियर’च्या २९ ऑक्टोबर २००७ च्या अंकातील ‘गुजरात का सच’ या आपल्या लेखात लिहितात, ‘‘आजतक’ने पुन्हा ‘तीन दिवस झाल्यानंतरही मोदींनी लष्कराला बोलावले नाही’ या आपल्या धुप्रदाचे तुणतुणे वाजवले. टीव्ही वाहिनीने प्रतिक्रियेसाठी फोनवर माझ्याशी संपर्क साधला, तेव्हा मी सूत्रसंचालकाला सांगितले की गोधरा हत्याकांड २७ फेब्रुवारी २००२ ला झाले, हिंदूंची प्रतिक्रिया २८ फेब्रुवारीला सुरु झाली आणि १ मार्चला सकाळी लष्कर ध्वजसंचलन करत होते… त्याने मला मध्येच अडवले आणि म्हणाला, ‘हेच नमके आम्हीही म्हटलं आहे की २९, ३० आणि ३१ या तारखांना त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही आणि स्पष्ट ३ दिवस हत्यारयांना दिले…’ तेव्हा मला त्याला मध्येच थांबवून सांगावे लागले की ती २८ तारीख होती २८ फेब्रुवारी २००२ आणि या महिन्यात २९, ३० आणि ३१ या तारखा येत नाहीत. फोन अर्थातच बंद केला गेला…”
आता स्टिंग ऑपरेशनचे प्रसारण झाल्यानंतर, एका ब्लॉग लेखकाने ‘व्हाय मोदी शुड गो?’ [मोदींनी का जावे?”] या शीर्षकाचा एक ब्लॉग लिहिला. त्यात तो म्हणतो, ‘‘हे खरे आहे की बहुसंख्य दंगलखोरांनी मोदींचे नाव थेट घेतले नाही – खरे तर त्यांनी स्वत:लाच गुंतवले…यात काहीच शंका नाही की ‘अपरिवर्तनीय पुरावा’ असल्याचा तहलकाचा दावा तिखटमीठ लावून केलेलाच समजावा लागेल आणि या पुराव्यांपैकी एकही पुरावा न्यायालयात उभा राहू शकणार नाही, अशीही दाट शक्यता आहे.”
(संदर्भ : http://retributions.nationalinterest.in/why-modi-should-go/ )
आणि याच लेखकाने नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली. एका अत्यंत कडवट मोदीविरोधी लेखात त्याने कबुली दिली आहे की ‘अपरिवर्तनीय पुराव्याचा’ तहलकाचा दावा, तिखटमीठ लावून केला गेला आहे.
इंटरनेटवर प्रकाशित एका लेखात असेही लिहिले होते: –
‘‘त्या तथाकथित रहस्योद्घाटनातील अभिनेत्यांकडे पाहू, जे तहलका दावा करते की गुप्त कॅमेर्याने टिपले आहे.
बाबू बजरंगी – स्टिंगच्या पूर्ण मजकुरामध्ये ही व्यक्ती दंगलींमध्ये स्वत:खेरीज अन्य कोणालाही गुंतवत नाही. स्टिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा साक्षीदार म्हणून ही व्यक्ती गणली गेली आहे. एफ.आय.आर. आधीच नोंदवल्याने आणि बजरंगी महत्त्वाचा आरोपी म्हणून ओळखला गेल्याने इथे आश्चर्यकारक असे काय आहे?
राजेंद्र व्यास – गोधरात आपण काय केले यावर जरा सविस्तर बोलले. पुन्हा स्वत:खेरीज इतरांच्या सहभागाबद्दल एक शब्दही थेट बोलत नाहीत.
रमेश दवे – गोधरा घटनेबद्दल त्याच त्याच सुरात बोलतात. स्वत:चे आणि राजेंद्र व्यास यांचेच नाव घेतात. तहलकाच्या बातमीदाराने पुन्हा पुन्हा टोकल्यानंतरही आणि प्रवृत्त केल्यावरही नरेंद्र मोदींचा प्रत्यक्ष संबंध असल्याबद्दल एका शब्दही बोलत नाही.
मदन चावल – आधी आपण विहिंप नेत्यांना पाहिल्याचे सांगितले. नंतर विहिंप नेत्यांची नावे माहीत नव्हती असे म्हणाला आणि मग दावा केला की अतुल वैद, भरत तेली यांना आपण पाहिले असल्याचे आठवले. गुलबर्ग घटनेत फक्त स्वत:चेच नाव घेतले. दुसर्या कोणालाही थेट गुंतविले नाही.
प्रल्हाद राजू– गुलबर्ग घटनेत स्वत:लाच गुंतवले. तहलकाने विहिंप आणि रा.स्व.संघाला गुंतवण्यासाठी प्रोत्साहन दिले, तेव्हा इतकेच उत्तर दिले की ‘अतुल वैद यांनी मला सर्वांबरोबर जायला सांगितले’. दुसर्या कोणाबद्दलही आणखीन काही सांगितले नाही.
मांगीलाल जैन – गुलबर्ग घटनेत स्वत:लाच गुंतवले. अतुल वैद आणि भरत तेली यांची नावे घ्यायला मुलाखतकाराने वारंवार उत्तेजित केल्यावर एवढेच सांगितले की इन्स्पेक्टर एरडा यांनी ‘तुला २-३ तास आहेत’ असे सांगितले.
प्रकाश राठोड, सुरेश रिचर्ड– नरोडा पाटिया घटनेत स्वत:लाच गुंतवतात. दुसर्या कोणाचेही नाव घेतले नाही. घटनास्थळी मोदींनी भेट दिल्याचे ओझरते उल्लेख.
धीमंत भट– शीर्षके सांगतात की ही कल्पना मोदींची होती, तर सविस्तर लेखी उत्तर सांगते की ही स्थानिक नेत्यांची बैठक होती आणि कोणाचेही नाव देत नाहीत. या व्यक्तीने थेट संदर्भही दिले नाहीत आणि मोदी किंवा इतरांबद्दल थेट विधानेही केली नाहीत. स्वत:लाच गुंतवले.
दीपक शाह– स्वत:ला आणि धीमंतला गुंतवले. सांगण्यासारखे ठोस काही जवळ नाही. फक्त स्थानिक कायदा गटातील वकिलांची नावे घेतली, एवढीच माहिती.
अनिल पटेल– इतरांपेक्षा जास्त चांगलं करतात. त्यांनी स्वत:चे नाव तर गुंतवलेच, पण कॉंग्रेस कार्यकर्त्यांनाही गुंतविले. त्यांचे ५ पानांचे लेखी स्टिंगचे मजकूर पूर्वीच आरोपी ठरलेले आणि जामिनावर बाहेर आलेल्या लोकांची नावे घेणारे आहे. त्यांच्या कानावर आलेल्या संवादातून प्रवीण तोगडियांशी काही बोलल्याचे बोलतात, पण त्याने दंगलीच्या कारस्थानात तोगडियांचा हात होता, असा अर्थ निघत नाही. आरोपींना जामिनावर कसे सोडवायचे याचीच चर्चा त्यात दिसते.
हे सर्व आरोपी आहेत आणि या सर्वांनी इतर कोणाचे प्रत्यक्ष नाव न घेता, फक्त स्वत:ला गुंतविले आहे! हे आपल्यासाठी ‘तहलका’ आहे! आणि आता, काही अविश्वसनीय दावे – बॉंब आणि रॉकेट लॉंचरचे – जे कधीही उपयोगात आणलेच गेले नाहीत.
हरेश भट– गोधराचे आमदार, दंगलीबद्दलचे आरोपी. यांनी बंदुका आणि इतर शस्त्रे बाहेरच्या राज्यांतून मागवली असा अविश्वसनीय दावा केला. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे कारण दूरच्या पंजाब किंवा उत्तर प्रदेशमधून एखादा ट्रक गुजरातमध्ये पोचण्यास बरेच दिवस लागतात. आपल्या या राज्यांच्या यादीत ते बिहार, मध्य प्रदेश अशी भर घालतच राहिले.
धवल जयंती पटेल – जोशपूर्ण असल्याचा देखावा, ‘डायनामाईट फॅक्टरी’ बद्दल बोलले, मोठमोठे दावे केले, पण एकही नेमकी घटना सांगू शकले नाहीत, ज्यात बॉंब वापरले गेले.
अनिल पटेल – यांचा लेखी मजकूर सर्वाधिक हास्यास्पद आहे. मुलाखत घेणार्याने याच्या तोंडात शब्द टाकण्याचा प्रयत्न केला एकच प्रश्न विचारून आणि त्याने फक्त ‘हो’ म्हणून उत्तर दिले- की डायनामाईटचे कारखाने होते, जिथून स्फोटके अहमदाबादला जात होती.
भरपूर सनसनाटी भंपकपणा पण जिथे बॉंब वापरले गेले, अशा एकाही घटनेचा नेमका उल्लेख नाही. केवळ पोकळ वल्गना. यापेक्षा ‘तहलका’ कडून काय अपेक्षा करता येईल? संकेतस्थळावरील (तहलकाच्या वेबसाईटवर) इतर माहिती हा सनसनाटी भंपकपणाच आहे…
सतत काही ना काही हेडलाइन्स तयार करण्यासाठी उत्सुक असलेली सनसनाटी माध्यमे आणि डाव्यांमधील जहाल गट एकत्र येऊन सत्याचे खोटे स्वरूप पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत…”
(संदर्भ : http://offstumped.wordpress.com/2007/10/26/tehelka-expose-on-gujarat-riots-offstumped-reaction/ )
२७ ऑक्टोबर २००७ ला अरविंद पंड्या यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले की सरकारी वकीलपदाचा ते राजीनामा देत आहेत आणि फसवणूक, गुन्हेगारी कट, विश्वासघात, अफरातफर, घुसखोरी आणि सांप्रदायिक शांततेचा भंग अशा गुन्ह्यांचा त्यांच्यावर आरोप करून धीमंत पुरोहित या ‘आजतक’च्या प्रतिनिधीविरुद्ध ते गुन्हेगारीचे खटले दाखल करत आहेत. त्यांनी असा युक्तिवाद केला की, पुरोहित यांनी आपल्याला एका टी.व्ही. मालिकेत भूमिका दिल्याचे सांगितले आणि त्यांची ऑडिशन टेस्ट घेण्यासाठी त्यांना दिलेली वाक्ये, ते वाचत असताना, एका लपवून ठेवलेला कॅमेरातून त्यांचे चित्रीकरण केल्या गेले त्यांना न सांगता. त्यांच्या या कायदेशीर कृतीचा परिणाम असा झाला की पुरोहित यांनी अटकपूर्वीच्या जामिनीचा अर्ज केला.
बाबू बजरंगी यांनी ‘‘मी गर्भवती महिलेचे पोट फाडले असे एफआयआर म्हणतो पण मी असे केले नाही” असे सांगितले हे माहीत असूनही तहलकाने “मी तिचे पोट फाडले असे बजरंगींनी मान्य केले” असे म्हटले. यातून हे लक्षात येते की आरोपींच्या तोंडून आपल्याला हवे ते वदवून घेणे आणि येन केन प्रकारेण त्यांना दोषी ठरवणे हाच तहलकाचा उद्देश होता. खरे काय ते बाहेर आणणे हा उद्देशच नव्हता. आता आपल्याकडे डॉ. जे.एस.कनोरिया यांचा त्या स्त्रीचे गर्भाशय काढलेच गेले नव्हते, असा अहवाल आहे, ज्यानी हे सिद्ध होते की असे झालेच नाही! त्यामुळे ‘आपण हे कृत्य केले’ असे बजरंगी फुशारकीनेही सांगत असता, तरी हे खरे आहे की नाही याची खात्री ‘तहलका’ने करायला हवी होती याचा तपास करून. आणि डॉ. कनोरिया यांच्या अहवालाने हे स्पष्ट केले असते की बजरंगी बढाईखोरपणे खोटे बोलत होता. पण तो बढाईखोरपणे खोटेही बोलत नव्हता, तर तो गुन्हा पूर्णपणे नाकारत होता. ‘तहलका’च्या बाजूने हा किती मोठा फौजदारी गुन्हा आहे!
आम्ही जे २००८ पासून या तहलकाच्या दाव्याबद्दल सांगत आहोत, ते सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या व देखरेख केलेल्या एसआयटीच्या अंतिम अहवालाने (२०१२ साली हा सार्वजनिक झाला) खरे ठरविले आहे. ‘तहलका’च्या या स्टिंगवर एस.आय.टी.च्या अहवालातील पृष्ठ क्र. २७३-२७४ वर काही मतप्रदर्शन केले गेले आहे, ते असे :
“या संदर्भात, इथे हेही जोडले पाहिजे की माजी आमदार श्री. हरेश भट्ट आणि बाबू बजरंगी (नरोडा पाटिया घटनेतील आरोपी) यांनी सीडीवरील आपले बोलणे आणि आपला आवाज खरा असल्याचे मान्य केले आहे. श्री हरेश भट्ट यांनी म्हटले आहे की आशिष नावाची एक व्यक्ती त्यांच्याकडे आली आणि त्याने त्यांना सांगितले की हिंदुत्वाच्या विषयावर त्यांना एक प्रबंध लिहायचा आहे आणि यासाठी काही सनसनाटी माहिती त्यांनी द्यावी, जेणेकरून ते आपल्या या मिशनमध्ये यशस्वी होतील. ते पुढे म्हणतात की, आशिष त्यांना अहमदाबादमधल्या आणि गोधरामधल्या त्यांच्या घरी, एका महिन्यात किमान ७-८ वेळा भेटला आणि जेव्हा गुजरात दंगलीचा संदर्भ आला, तेव्हा त्यांनी एका काल्पनिक कथा त्याला दिली कारण आशिषला आपल्या प्रबंधासाठी काहीतरी मसालेदार मजकूर हवा होता. ते म्हणाले की ‘माझी स्वत:ची गन फॅक्टरी होती, जेथे डिझेल बॉंब आणि पाइप बॉंब बनवले जात व ते हिंदूंमध्ये वितरित केले गेले, पंजाबमधून २ ट्रक भरून तलवारी मागविण्यात आल्या आणि त्या हिंदूंना देण्यात आल्या, त्यांच्या फॅक्टरीत एक रॉकेट लॉंचर बनविण्यात आले, त्यात गनपावडर भरण्यात आली, ५९५ गावठी बॉंबचा स्फोट करण्यात आला, आणि कुठली सीबीआय चौकशी झाली’, ही सर्व माहिती पूर्णपणे चुकीची आणि निराधार आहे. त्यांनी हे ही नमूद केले की नरेंद्र मोदींनी उघडपणे, ‘तुम्हाला काही करायला ३ दिवस आहेत आणि त्यानंतर वेळ देता येणार नाही’ याबद्दल ते जे बोलले ती एक काल्पनिक कथा आहे आणि वास्तवात मोदींनी असे काहीही त्यांना कधीच सांगितले नाही.
बाबू बजरंगी म्हणाले की आशिष खेतानने त्यांना एक लिखित मजकूर दिला आणि तो त्यांनी फक्त वाचून दाखवला आणि यातील कोणतीही गोष्ट बरोबर नव्हती. पुढे, ३ दिवसांचा वेळ मोदींनी त्यांना कधी आणि कसा दिला, याबद्दलही आशिष खेतान यांनी त्यांना प्रश्न विचारले नाहीत. हरेश भट्ट यांच्या मालकीच्या गन फॅक्टरीबद्दल आणि नरेंद्र मोदींनी तीन वेळा न्यायाधीश बदलल्याबद्दलचे कथन, कल्पना कितीही ताणली तरी स्वीकारता येऊ शकत नाही, कारण अशी कोणतीही गन फॅक्टरी पोलिसांना सापडू शकली नाही आणि न्यायाधीशांची बदली करणे नरेंद्र मोदी यांना शक्य नाही, कारण तो अधिकार गुजरात उच्च न्यायालयाचा आहे. बाबू बजरंगी यांच्या रेकॉर्डेड निवेदनात वास्तविकांवर आधारित अनेक चुका आहेत. उदाहरणार्थ, बजरंगी म्हणालेत की नरोडा पाटियामध्ये ७००–८०० मृतदेह पडले होते आणि ते अहमदाबादमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी टाकून द्या, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या हे सांगून की या मृतदेहांचे स्पष्टीकरण करणे कठीण जाईल. हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण नरोडा पाटियामध्ये फक्त ८४ मृतदेह सापडले आणि ११ जण बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले.’’
पृष्ठ क्र. २८७ वर एस.आय.टी. ने हेही म्हटले की: ‘‘तहलकाने बाबू बजरंगी यांचे स्टिंग ऑपरेशन केल्याच्या संदर्भात जयपूरच्या एफएसएलने (फोरेंसिक लॅब) हमी दिली आहे की तहलका सीडीवरचा आवाज नरोडा पाटिया प्रकरणातील आरोपी बाबू बजरंगी यांचाच आहे… बाबू बजरंगी यांनी या स्टिंग ऑपरेशनमध्ये ज्या गोष्टी उघड केल्या आहेत, त्यांना फार तर फार न्यायालयाबाहेरील कबुलीजबाब म्हणता येईल. पण बाबू बजरंगी यांनी उघड केलेल्या तथ्यांना पाठिंबा देणारा, पुष्टी देणारा कुठलाच पुरावा नाही. याउलट बाबू बजरंगी यांनी केलेले दावे चुकीचे असल्याचेच दिसून आले आहे.’’
पण हे सर्व येथेच संपत नाही. गोधरा घटनेसाठीही ‘तहलका’ने काही काल्पनिक चिथावण्या रचण्याचा प्रयत्न केला आणि म्हटले की, गोधरा रेल्वे स्थानकावर कारसेवक आणि मुस्लिम यांच्यात झालेल्या झटापटीचा परिणाम म्हणून गोधराचे जळीत कांड उत्स्फूर्तपणे घडले. गोधराची घटना पूर्वनियोजित होती असे म्हणण्यासाठी गुजरात सरकारलाही त्यांनी दोषी धरले. अर्थात, २००० मुस्लिम इतक्या तातडीने, सकाळी ८ वाजता सिग्नल फालियाजवळ कसे पोचले, त्यांच्याजवळ पेट्रोल बॉंब, ऍसिड बॉंब आणि तलवारी कशा येऊ शकल्या, गाडीला दोन्ही बाजूंनी घेराव कसा घातला गेला ज्याने जळत्या डब्यातून पळून जाऊन स्वत:चा जीव रामसेवकांना वाचविता नाही आला, जेव्हा गोधरा स्थानकावर गाडी फक्त ५ मिनिटे थांबते याचे स्पष्टीकरण तहलका देऊ शकले नाही.
तरीही, जर फक्त चर्चा करण्यासाठी आपण असे गृहीत धरले की मुलाखती देणार्या अनेक लोकांचे कबुलीजबाब खरोखरच सत्य आहेत, तर त्यातून गुजरात दंगली हा ‘नरसंहार’ होता (एकाच समाजाचे लोक मारले जाणे), हे कसे दिसते? तहलकाने दंगलींना ‘नरसंहार’ म्हटले. गुजरात दंगलींत २५४ हिंदूंना कोणी मारले? युपीए सरकारमधील केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जायस्वाल यांनी ११ मे २००५ ला संसदेत दिलेली ही संख्या आहे.
या विषयावर तहलकाने दिलेले सर्व अहवाल वाचल्यावर, एक गोष्ट स्पष्ट दिसते की, सत्य बाहेर आणण्यात तहलकाला रस नाही, पण भाजपा आणि नरेंद्र मोदी व संघ परिवार यांना मलीन करण्यातच त्यांना खरा रस आहे. सत्य असे आहे की, ‘गोधरा’ घटनेनंतरही मुस्लिम तेवढेच आक्रमक होते आणि त्यांनी शेकडो हिंदूंना ठार मारले. याचे स्पष्टीकरण तहलका कसे देणार आहे? सर्व बेपत्ता झालेले लोक मृत झाले आहेत असे गृहीत धरून युपीए सरकारने दिलेल्या आकड्यांवरुन मृतांची संख्या ११७१ होते. तरीही तहलकाच्या संपादकांनी दावा केला की दंगलीत पहिल्या ३ दिवसात २५०० मुस्लिमांची हत्या झाली! असे लिहिले की जसे पहिल्या ३ दिवसांनंतर आणखीनही मुसलमान मारले गेलेत, आणि कोणीही हिंदू मारले गेले नाहीत! ५.५ कोटींच्या लोकसंख्येमध्ये हिंदू आणि मुस्लिम मिळून एकूण ११७१ मृत्यू झाले, याला शिरकाण (‘pogrom’) म्हणत नाहीत. तरीही दंगली ‘नरसंहार’ होत्या, असे तहलकाचे पालुपद सुरूच राहिले. ‘गोधरा’ नंतरच्या दंगलींमध्ये दंगल करणे आणि हिंदूंना ठार करणे, या आरोपांखाली ८० मुस्लिम दोषी ठरले आहेत. मुस्लिमांवर सिद्ध झालेल्या या आरोपांमुळे हे सिद्ध होते की मुस्लिमही तितकेच आक्रमक होते. मुस्लिमांनाही दोषी ठरवले गेले असताना, या दंगली म्हणजे ‘नरसंहार’ होते असे तरुण तेजपाल कसे म्हणू शकतात?
पूर्ण स्टिंग ऑपरेशनमध्ये फक्त २ प्रकरणांची चर्चा करण्यात आली- एहसान जाफरी प्रकरण आणि नरोडा पाटिया प्रकरण. सदरपुरा, ओड आणि पंडरवाडा यांच्याबरोबरच राज्यातील खर्या मुस्लिमविरोधी दंगलींची ही दोन प्रकरणे आहेत. फक्त या दोन प्रकरणांच्या आधारावर तहलका गुजरात दंगलींना ‘नरसंहार’ म्हणते. दंगलींची अशी अनेक प्रकरणे आहेत- अहमदाबादजवळचे हिंमतनगर, अहमदाबादमधील दनीलिमडा, सिंधी मार्केट, भांडेरी पोल आणि गुजरातमधील इतर अनेक दंगली, जिथे मुस्लिम आक्रमक होते आणि त्यांनी हिंदूंवर हल्ला केला. या प्रकरणी शोध घेण्याचे किंवा मुस्लिम दोषी सिद्ध झाले आहेत, याची दखल घेण्याचे कष्ट तहलकाने घेतले का?
या कबुलीजबाब उर्फ बढाईखोर थापांबद्दल तरुण तेजपाल यांनी बरेच काही लिहिले आहे. या प्रकरणात स्टिंग ऑपरेशनबद्दल जे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्याबद्दल कोणीही कधीही उत्तर दिले नाही. गुजरात दंगलींबद्दल जे खोटं बोलले, त्यासाठी कदाचित संबंधित खोटं बोलणारया लोकांना तुरुंगवास देणे योग्य ठरेल आणि नरेंद्र मोदी, संघ परिवार आणि भारतीय सुरक्षा दलांना त्यांनी खूप मोठी नुकसानभरपाई देणे योग्य ठरेल. कारण या खोट्या थापांमुळे निष्पाप मुस्लिम जहाल बनलेत, आणि भारताची, नरेंद्र मोदी आणि संघपरिवाराचीही प्रतिमा काळवंडली आहे.
Leave A Comment