गुजरात दंगलीत २ हजार मुस्लिमांची हत्या झाली

सत्य- कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी ११ मे २००५ ला संसदेत लेखी उत्तरात दंगलींसंबंधी दिलेली आकडेवारी अशी आहे- दंगलीत ७९० मुस्लिम आणि २५४ हिंदू मारले गेले. २५४८ लोक जखमी झालेत आणि २२३ लोक बेपत्ता होते (तेव्हा). या उत्तरामध्ये दंगलीमुळे प्रभावित झालेल्या विधवा स्त्रियांची संख्या ९१९ तर अनाथ झालेल्या मुलांची संख्या ६०६ दिली आहे. नरेंद्र मोदींचे कट्टर विरोधक असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने दिलेली ही आकडेवारी आहे. आघाडीतील अनेक नेत्यांनी वेळोवेळी बोलताना दंगलीतील आकडे वाटेल तसे वाढवून सांगितले होते. 

(संदर्भ: http://www.expressindia.com/news/fullstory.php?newsid=46538)

 

   ‘िमल्ली गॅझेट’ या भारतीय मुस्लिमांच्या इंग्रजी वृत्तपत्रानेही हे वृत्त प्रसिद्ध केले. (संदर्भ: http://www.milligazette.com/Archives/2005/01-15June05-Print-Edition/011506200511.htm)

 

   अनेक इंग्रजी दैनिकांची संपादके, लेखकांनी लिहिलेले लेख, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांतून संपादकीय पानावर प्रसिद्ध झालेली वार्तांकने या सर्वांमधून वर्षानुवर्षे केवळ मृतांचा आकडा खूप वाढवून सांगितला जात होता. ‘डिसेंबर २००२ च्या विधानसभा निवडणुकीत विजय िमळाला असला, तरी गुजरातच्या २००२ च्या नरसंहारात २ हजार निष्पाप मुस्लिमांच्या हत्येचे पाप धुतले जाणार नाही’ किंवा ‘हजारो मुस्लिमांची हत्या झालेल्या गुजरात नरसंहाराची भाजपाला पुढील काळात मदत होणार नाही’, इत्यादी प्रकारची शीर्षके आणि विधाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘हिंदुस्तान टाइम्स’ अशा दैनिकांतील लेखांतून करण्यात आली.

 

   नरेंद्र मोदी यांना मार्च २००५ मध्ये अमेरिकेचा राजकीय व्हिसा नाकारण्यात आला आणि त्यांच्या अमेरिका भेटीच्या आधीच्याच दिवशी अमेरिकन सरकारने त्यांना १९९८ साली दिलेला प्रवासी व्हिसाही रद्द केला. त्यावेळी दंगलींतील ही सर्व आकडेवारी पुन्हा प्रसिद्धीत आली. मोदींचा १९९८ चा प्रवासी व्हिसा रद्द करायला अमेरिकन सरकारला गुजरात दंगलींनंतर ३ वर्षे का लागली, हे कोणीच सांगितले नाही. पण याचा अर्थ स्पष्ट आहे की, २००२ च्या दंगलीनंतर ३ वर्षांपर्यंत मोदींजवळ अमेरिकन व्हिसा होता.

 

   पण ‘गोधरा’नंतरच्या दंगलीतील मुस्लिम हत्यांचे हे आकडे फार अतिशयोक्ती केलेले आहेत. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘आज तक’च्या प्रभू चावला यांनी एक मुलाखत घेतली. ‘इंडिया टुडे’च्या ४ नोव्हेंबर २००२ च्या अंकात ती प्रसिद्ध झाली आहे, ती अशी: –

 

प्रश्‍नआपले विरोधक आपल्याला ‘हिंदूंचा जिन्नाह’ असे म्हणतात.

उत्तर – मी हे प्रथमच ऐकतो आहे, जरी मी आपल्याला शत्रू मानत नाही.

 

प्रश्‍न – दंगलींमध्ये ११०० निष्पाप लोकांच्या हत्येला आपल्याला जबाबदार धरले जाते.

उत्तर – आपल्या आधीच्या  मुलाखतीत आपण ९०० म्हणालात. आता ११०० म्हणत आहात. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये झालेल्या मृतांचे आकडे तुम्ही गुजरातच्या आकड्यात घालता आहात का? (मोदी महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये १० आणि ११ ऑक्टोबर २००२ ला झालेल्या दंगली आणि इतर दंगलींबद्दल बोलत होते, ज्यांचा गोधराशी काहीही संबंध नव्हता.)

 

प्रश्‍न – मग मृतांचा योग्य आकडा किती आहे?

उत्तर – ‘गोधरा’ घडले नसते, तर गुजरातमध्ये दंगली झाल्याच नसत्या.

… 

प्रश्‍न – राज्यातील लोकांना संरक्षण देण्यात आपल्याला अपयश आले, हे आपण मान्य करता का?

उत्तर – आम्ही आमच्या कर्तव्यात अयशस्वी झालो असतो, तर ९८ टक्के गुजरातमध्ये शांतता नसती. केवळ ७२ तासात आम्ही दंगली आटोक्यात आणल्या.

… 

प्रश्‍न – नरेंद्र मोदींमुळे गुजरातची बदनामी होत आहे, हे आपण का मान्य करत नाही?

उत्तर – हे खरं असेल तर गुजरातच्या जनतेलाच याचा निर्णय देण्याची संधी द्या, निवडणुकींच्या माध्यमातून.’’

(संदर्भ:  http://indiatoday.intoday.in/story/communal-riots-in-gujarat-were-unfortunate-narendra-modi/1/218781.html

 

   आपण वर पाहिल्याप्रमाणे केवळ ४ महिन्यात मोदींच्या झालेल्या २ मुलाखतीत दंगलींतील मृतांचा आकडा ९०० वरून ११०० वर पोचला! आता तो ९०० वरून २००० वर पोचविला जात आहे. या पद्धतीने येत्या १० वर्षांत कदाचित हा आकडा १० हजारांवर झेप घेईल! ‘गुजरातच्या दंगलीत हजारो मुस्लिम मारले गेले’ किंवा ‘गुजरातमध्ये ३ हजार निष्पाप मुस्लिमांची हत्या झाली’ अशी विधाने आत्ताच केली जात आहेत.

 

असत्य कथनाचा निष्पाप लोकांवरही झालेला परिणाम

 

   ‘गोधरा’नंतरच्या दंगली एकतर्फी होत्या, असा विश्‍वास सर्वत्र, संघपरिवारातील लोकांमध्येही, दृढ आहे. गुजरात दंगलीत २ हजार मुस्लिम मारले गेले, या थापेवर संघाचे इंग्रजी साप्ताहिक असलेल्या ‘ऑर्गनायझर’च्या प्रतिनिधीचाही एकदा विश्‍वास बसला (२००५ मध्ये). त्याने आपल्या लेखात म्हटले, ‘अहमदाबादमध्ये २ हजारांवर मुस्लिम मारले गेले होते.’ (केवळ अहमदाबादचाच आकडा ‘दोन हजार वर’ नेला, जेव्हा पूर्ण गुजरातचा आकडा ८०० हून कमी मुसलमान असा होता.) गुजरातच्या दंगलींत खरे नेमके काय घडले, याबद्दल भाजपाचे अनेक नेतेही पूर्णपणे अंधारात असल्याचे वाटते. टी.व्ही. वाहिन्यांवर किंवा इतरत्र कॉंग्रेसचे नेते किंवा भाजपाविरोधी पत्रकार यासंबंधी प्रश्‍न विचारत, तेव्हा त्याचे योग्य उत्तर देण्यात भाजपा नेते अपयशी ठरत होते. ते फक्त “गुजरात दंगलींना ‘गोधरा’च जबाबदार आहे” किंवा “डिसेंबर २००२ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने नरेंद्र मोदींना आणि भाजपालाच कौल दिला आहे” एवढेच सांगत. या नेत्यांपैकी कोणीही मुस्लिमांचे आक्रमण, दंगलींत हिंदूंना बसलेली झळ, पोलिस गोळीबारातील मृतांचे आकडे किंवा १८,६०० गावांपैकी फक्त ९० ठिकाणीच दंगली झाल्यात, यातला एकही मुद्दा मांडत नव्हते. याचे मुख्य कारण, माध्यमांच्या धादांत खोट्या बातम्यांवर बसलेला विश्‍वास व सत्याची जाणीव नसणे, हे होते.

 

   अहमदाबादसह देशाच्या विविध शहरांत झालेले अतिरेकी दहशतवादी हल्ले आणि बॉंबस्फोट ‘गुजरात दंगलींच्या घटनेमुळे’ असे सांगून भारतीय इंग्रजी माध्य्मांनी समर्थनीय ठरवले. गुजरातमधील दंगली गोधरा हत्याकांडामुळे उसळल्या होत्या. पण बहुसंख्या इंग्रजी माध्यमांनी रामजन्मभूमी आंदोलनाचे नाव पुढे करत गोधरा हत्याकांड मात्र समर्थनीय ठरवले. पण त्यांच्या दृष्टीने ‘गोधरा’ नंतरच्या दंगलीही ‘गोधरा’मुळे समर्थनीय किंवा समजण्यासारख्या ठरल्या नाहीत. वास्तविक या दंगलींत केवळ मुस्लिमच नव्हे, तर हिंदूही मोठ्या प्रामाणावर मारले गेले. असे असूनही गोधरा हत्याकांडाशी नंतरच्या दंगलींचा संबंध जोडायलाच त्यांनी नकार दिला. ‘गोधरा’ नंतरच्या दंगलींवरील तथाकथित ‘प्रतिक्रिया’ (अतिरेकी हल्ले) मात्र त्यांच्या दृष्टीने समर्थनीय होत्या!

 

   ‘‘आम्ही गुजरात दंगलींचा सूड घेत आहोत” हा अनेक अतिरेक्यांचा दावा, माध्यमांच्या असत्य कथनाचा परिणाम किती भयंकर होता, हेच सिद्ध करणारा आहे. गुजरातच्या दंगली म्हणजे ‘नरसंहार’ असल्याचे भासवून काही माध्यमांनी निष्पाप मुस्लिमांना अतिरेकी होण्यास प्रवृत्त केले. पाकिस्तानचा क्रिकेट संघ मार्च २००५ मध्ये भारताच्या दौरयावर आला. या संघाने ‘राजकीय कारणांसाठी’ अहमदाबादमध्ये खेळायला नकार दिला, कारण या शहरात ‘मुस्लिमांचे हत्याकांड’ झाले होते. माध्यमांनी अनेक वर्षे तद्दन खोट्या बातम्या पसरविल्याचा हा परिणाम होता. हे खोटेपण आणि या कल्पित कथा पूर्णपणे उघड्या पाडणे आवश्यक आहे.

 

   कट्टर भाजपाविरोधी इटालियन-जन्मित सोनिया गांधी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा असताना आणि साम्वाद्यांचा (डाव्यांचा) संपुआला बाहेरून पाठिंबा असताना त्यांच्या सरकारने संसदेत अधिकृतपणे लेखी उत्तरात गुजरात दंगलींतील मृतांचा आकडा ७९० मुस्लिम आणि २५४ हिंदू, असा दिला आहे, हे लक्षात घेण्याजोगे आहे. हे सरकार आणि त्यातील सहभागी पक्ष (यात मुस्लिम-लीग देखील सामील होती) कट्टर भाजपाविरोधी असल्याने त्यांचे हे आकडेदेखील अतिशयोक्तीपूर्ण असू शकतील. हे उत्तर लेखी असल्यामुळे आपण काय करीत आहोत, हे सरकारला पक्के माहीत होते. कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि बाबरी मशीद कृती समितीचे वकील आर.के. आनंद यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला सरकारने दिलेले हे उत्तर आहे. गुजरात सरकारने ११६९ मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई दिली (ex-gratia). (११६९ मध्ये ८६३ मुस्लिम आणि ३०६ हिंदू असल्याचे सांगितले जाते. पण मला हे स्वतंत्रपणे तपासता आले नाही.) गुजरात दंगलीमध्ये बळी पडलेल्या ११६९ लोकांना केंद्रातील सुंक्त पुरोगामी आघाडी सरकारने वेगळे ३.५० लाख रु. प्रत्येकी, २००८ मध्ये दिलेत. याचा अर्थ मृतांचा एकूण आकडा ११६९ च आहे, कारण हे सर्वस्वी अशक्य आहे की कट्टर भाजपा-विरोधी संपुआ कुठल्याही मुस्लिम पीडिताला भरपाई देणार नाही.

 

   ‘इंडिया टुडे’ने दंगली जवळजवळ थांबल्यानंतर २० मे २००२ च्या अंकात मृतांचा एकूण आकडा ९७२ दिला आहे. यामध्ये ‘इंडिया टुडे’ने गोधरा हत्याकांडातील ५७ कारसेवकांचाही समावेश केला आहे (ग़ोधरामध्ये ५९ लोक मारले गेले, पण त्यावेळेस इंडिया टुडेने ५७ आकडा दिला होता). त्यामुळे गोधरा नंतरचा आकडा ९१५ च राहतो. १० मे ते २१ मे २००२ या काळातील इंग्रजी वृत्तपत्रे वाचली, तर लक्षात येईल की या १० दिवसांत दंगली झाल्या नाहीत. त्यामुळे बोलाविलेले लष्कर २१ मे २००२ ला गुजरातमधून परतायला लागले. त्यामुळे १० मे २००२ नंतर गुजरातमध्ये जास्तीत जास्त २० मृत्यू  झाले असावेत. त्यामुळे गुजरात दंगलींचा आकडा फार तर ९३५ वर जातो. ‘हितवाद’ या इंग्रजी दैनिकाने गुजरात दंगलीतील मृतांचा आकडा ९३६ असल्याचे म्हटले होते. बेपत्ता झालेल्यांचा आकडा मृतांत समाविष्ट करण्याआधी अधिकृत आकडा ९५२ होता.

 (संदर्भ : http://www.telegraphindia.com/1090301/jsp/nation/story_10608005.jsp )

 

   संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने दिलेला मृतांचा आकडाच बरोबर आहे, असे आपण खरे समजूया. पण यामुळे गुजरात दंगलीत ७९० मुस्लिमांपेक्षा अधिक मुस्लिम मारले गेले, असे म्हणायला कोणतेही विश्‍वासार्ह कारण दिसते का? मग इंग्रजी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या गुजरातमध्ये २ हजारांवर मुस्लिम मारले गेल्याचे खोटे का सांगत आहेत? एकूण १२७ लोक बेपत्ता होते. त्यापैकी किती हिंदू, हे माहीत नाही. म्हणजे सर्व बेपत्ता मारले गेले, असे गृहीत धरले, तरी दंगलीतील मृतांचा आकडा ११७१ होतो. ७९० + २५४ + १२७ = ११७१. हा आकडा ११६९ च्या अगदी जवळ आहे. यापेक्षा एकहीजण अधिक मारला गेला, असे सांगण्याची सोय कोणालाही, म्हणजे मानवी हक्क संघटना असोत, धार्मिक स्वातंत्र्य गट असोत किंवा एन.डी.टी.व्ही.सारख्या वाहिन्या असोत, नव्हती.

  

   असे असूनही मुंबईतील ११ जुलै २००६ च्या बॉंबस्फोटानंतर (यात १८७ मृत झाले) ‘हितवाद’ या इंग्रजी दैनिकाच्या रविवारच्या अंकात ‘इनसाइट’ या सदरात लिहिताना स्वंघोषित धर्मनिरपेक्षतावादी प्रफुल्ल बिडवई यांनी म्हटले, ‘गुजरातमध्ये विहिंप, बजरंग दल आणि भाजपाने दोन हजार मुस्लिमांचा नरसंहार केला.’ आणि बिडवई एकटेच नव्हते. एप्रिल-मे २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी एन.डी.टी.व्ही.ने ‘गुजरातमध्ये २ हजार मुस्लिम मारले गेले,’ असे विधान पुन्हा पुन्हा केले.

 

   २ हजार हा आकडा गुजरात दंगलींत मारल्या गेलेल्या मुस्लिमांचा नाही, तर गोधरा हत्याकांडात साबरमती एक्स्प्रेसवर हल्ला करणारया मुस्लिमांचा आहे. हिंसाचार कोणताही असो, गोधरातील किंवा गोधरानंतरचा, आणि मृत्यू एकाचाही असला, तरी त्याचे समर्थन होऊच शकत नाही. पण खोटेपणाचा फायदा कोणाला होतो? आणि मला वाटते, कोणत्याही प्रसंगातील आकडा योग्य आहे की नाही, हे पाहणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. 

 

   २००२ मध्ये ठार झालेल्या हिंदूंचा आकडा कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न एन.डी.टी.व्ही.च्या बरखा दत्त यांनी केला. आपल्या एका टॉक शो मध्ये बोलताना त्यांनी म्हटले, ‘‘गोधरात ठार झालेल्या कारसेवकांचा आकडा किती? ५३ का ५७?’’ बरोबर आकडा होता ५९. स्वयंघोषित धर्मनिरपेक्षतावादी नेहमीच मुस्लिमांचा अतिरेक कमी करण्याचा आणि हिंदूंना बसलेली झळ कमीत कमी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करतात, हे आपण दुसरया प्रकरणात पाहिलेच आहे. त्यांची हीच मानसिकता गुजरात दंगलींतील मुस्लिम मृतांचा आकडा फुगत राहण्यास कारणीभूत आहे. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेज़ मुशर्रफ यांनी सप्टेंबर २००२ मधील युनोतील (संयुक्त राष्ट्रातील) भाषणात गुजरात दंगलीत २ हजार मुस्लिम मारले गेले, असा कांगावा केला. मार्क्सवादी पक्षाचे मुखपत्र ‘पीपल्स डेमोक्रसी’च्या १६ जुलै २००६ च्या अंकात तिस्ता सेटलवाड यांनी ‘व्हॉट एल्स गुजरात’ (“What Ails Gujarat?”) असा लेख लिहिला. त्यात २५०० मुस्लिम हा आकडा दिला, जसे की एकही हिंदू मृत झाला नाही!

 (संदर्भ: http://pd.cpim.org/2006/0716/07162006_teesta.htm )

 

   ‘तहलका’ने २००७ मध्ये आपण गुजरात दंगलीबद्दल मोठे स्टिंग ऑपरेशन केले असल्याचा आव आणला आणि दंगलीत पहिल्या ३ दिवसातच २५०० मुस्लिम मृत झाले, असे सांगितले! याचा अर्थ त्यानंतर झालेल्या दंगलीत आणखी मुस्लिम मारले गेले, असे त्यांना सुचवाचे होते. मुस्लिमांना बसलेली झळ, ही मंडळी कशी वाढवत नेतात, अतिशयोक्ती करतात, हे यावरून दिसते.

कल्पित कथा

Tags: No tags

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *