सत्य – राज्यात असलेली १८६०० गावे, २४० नगरपरिषदा (240 towns), २५ जिल्हा केंद्रे, यापैकी जास्तीत जास्त ९० ठिकाणी दंगली झाल्यात. अहमदाबाद आणि बडोदा या दोन मोठ्या शहरांचा यात समावेश केला, तर कल्पनाशक्ती कितीही ताणली, तरी राज्यातील फक्त २ टक्के भाग जळत असल्याचे म्हटल्या जाऊ शकते. या दंगलींमध्ये राज्य सरकार स्वत: सहभागी असते किंवा त्यांनी दंगलींना प्रोत्साहन दिले असते, तर राज्यातील १८६०० गावांपैकी १० हजार गावांत दंगली झाल्या असत्या. पूर्वीच्या काळात झालेल्या दंगलींत एकाच वेळी ३०० गावांमध्ये संचारबंदी लागू होती. त्याच्याशी तुलना करता २००२ मध्ये फारच थोडा हिंसाचार झाला.
पहिल्या ३ दिवसांच्या दंगलीसुद्धा सौराष्ट्र आणि कच्छ भागात पसरल्या नव्हत्या, हे आपण पाहिलेच आहे. हे दोन्ही भाग िमळून गुजरातचा एक-तृतीयांश भूप्रदेश होतो. त्याचप्रमाणे गुजरातच्या एकूण २५ जिल्ह्यांपैकी फक्त ७ जिल्ह्यांत थोड्या मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. अधिकृत आकडेवारीनुसार उरलेले १८ जिल्हे बहुसंख्येने दंगलमुक्त होते किंवा अगदी किरकोळ झळ बसलेले होते. ६ डिसेंबर २००२ ला एन.डी.टी.व्ही.-स्टार न्यूजच्या पंकज पचौरी यांनी घेतलेल्या नरेंद्र मोदींच्या मुलाखतीत हे सत्य बाहेर आले, जे आपण पाहिले आहेच.