नरेंद्र मोदींनी दंगलखोरांना ३ दिवस मोकळे रान दिले

सत्य – हा आरोप निराधार आहे. २८ फेब्रुवारीलाच नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये तातडीने (“frantically”) लष्कराला बोलाविले, असे ‘हिंदू’ने म्हटले. ‘इंडिया टुडे’ने १८ मार्च २००२ च्या अंकात संपूर्ण घटनाक्रम दिला ‘क्रोनोलॉजी ऑफ अ क्रायसिस’ या लेखात, जो आपण आधी पाहिला आहे, त्यावरूनही हे निश्‍चितपणे सिद्ध होते की लष्कराला लवकरात लवकर बोलाविले गेले.

 

   दंगलीच्या दुसरया दिवशीच, म्हणजे १ मार्च २००२ ला लष्कराने अहमदाबाद, बडोदा, सुरत आणि गोधरा या शहरांत ध्वजसंचलन केले. त्यामुळे कोणालाही मोकळे रान देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही माध्यमांनी वारंवार धादांत खोटे सांगितले. सी.एन.एन-आय.बी.एन.च्या हिंदी वाहिनीने २६ ऑक्टोबर २००७ ला टी.व्ही. पडद्यावर वाक्य लिहिले होते की, ‘गुजरातमध्ये हत्याकांडासाठी ३ दिवसांची मोकळीक दिली होती.’ प्रत्यक्षात वास्तव असे आहे की, पहिल्या ३ दिवसांपैकी २ दिवस लष्कर तैनात होते आणि पहिल्या दिवसापेक्षा पुढील २ दिवसांत हिंसाचार फार कमी होता. ‘हिंदू’ने ३ मार्च  २००२ च्या अंकात म्हटले आहे की २ मार्चला, म्हणजे दंगलीच्या तिसरया दिवशी, अहमदाबादमधील परिस्थिती सुधारली.

 

   दंगलीच्या दुसरयाच दिवशी, म्हणजे १ मार्चलाच अल्पसंख्यकांनी प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केली होती, असे वृत्तही ‘हिंदू’ने दिले. पुढील २ दिवसांचा प्रश्‍नच उद्भवत नाही, कारण लष्कर तैनात होते. आणि २८ फेब्रुवारीला लष्कर जेव्हा तैनात नव्हते, तेव्हाही पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ११ हिंदू मारले गेले आणि १६ जखमी झाले. पोलिसांनी १,४९६ फैरी झाडल्या, त्यापैकी किमान ६०० फैरी एकट्या अहमदाबादमध्ये २८ फेब्रुवारीलाच झाडण्यात आल्या. याचदिवशी अश्रुधुराची ४,२९७ नळकांडी राज्यभर (अहमदाबाद मोजून) फोडण्यात आली आणि ७०० लोकांना अटक करण्यात आली. दंगलीच्या दुसरयाच दिवशी पोलिसांनी संजेलीमधून २,५०० मुस्लिमांना हत्याकांडातून वाचविले.

   

   तीन दिवस तर सोडाच, पण नरेंद्र मोदींनी दंगलखोरांना तीन िमनिटांचाही वेळ दिला नाही. दंगली होऊ नये व हिंसाचार थांबावा, यासाठी सरकारने उचललेल्या पावलांचा तपशील आपण पहिलाच आहे. ‘रेडिफ डॉट कॉम’ने २७ फेब्रुवारी २००२ लाच दिलेल्या वृत्तात म्हटले की: “राज्यातील सर्व भागात या घटनेची (गोधरा हत्याकांड) बातमी पसरल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि त्यामुळे राज्यसरकारने, प्रतिबंधक उपाय योजण्यासाठी तातडीने पावले उचलली. गोधरा आणि गुजरातमधील इतर भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.” 

(संदर्भ: http://www.rediff.com/news/2002/feb/27train.htm )

 

   पी.टी.आय.चा हवाला देत ‘रेडिफ डॉट कॉम’ने २८ फेब्रुवारीला संध्याकाळी दिलेली बातमी अशी: ‘‘लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले असून जलद कृती दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना अहमदाबाद आणि इतर ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.” 

(संदर्भ : http://www.rediff.com/news/2002/feb/28train15.htm  )

 

   गोधरा हत्याकांड घडल्यानंतर २७ फेब्रुवारीलाच ‘रेडिफ डॉट कॉम’ने दिलेली बातमी अशी: ‘‘आणखीन हिंसाचार उफाळू नये म्हणून जलद कृती दलाच्या दोन कंपन्या आणि राज्य राखीव दलाची एक कंपनी गोधरा येथे तैनात करण्यात आली आहे.’’ (पी.टी.आय. वृत्त) 

(संदर्भ : http://www.rediff.com/news/2002/feb/27train4.htm )

 

   बडोद्यामध्ये २८ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता संचारबंदी लागू करण्यात आली होती, असे वृत्त ‘रेडिफ डॉट कॉम’ने त्याच दिवशी दिले आहे. बातमीत म्हटले आहे: 

   ‘‘शहरात भोसकाभोसकीच्या काही घटना घडल्यामुळे सकाळी ८ वाजल्यापासूनच अनिश्‍चितकालीन संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकारयाने सांगितले. पोलीस आयुक्त दीनदयाळ तुतेजा यांच्या म्हणण्यानुसार तटबंदीच्या शहरातील ६ पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात आली असून, जलद कृती दल आणि केंद्री औद्योगिक सुरक्षा दल यांचे जवान संवेदनशील भागात तैनात आहेत. बुधवारी रात्री जाळपोळ आणि लुटालुटीच्या काही घटना घडल्यामुळे पंचमहल जिल्ह्यातील लुनावडा शहरात पहाटे २ पासूनच संचारबंदी लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

   दरम्यान, ट्रेनवरील हल्ल्यांनंतर बुधवारी (२७ फ़ेब्रुवारी) गोधरा शहरात लागू करण्यात आलेली अनिश्‍चितकालीन संचारबंदी कोणतीही सूट न देता, गुरुवारीही (२८ फेब्रुवारी) लागू राहिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार संचारबंदीच्या काळात कोणतीही अनुचित घटना आतापर्यंत घडली नाही. पोलिसांनी सांगितले की, राज्यातील इतर भागातही रात्रभर परिस्थिती शांत आणि नियंत्रणात राहिली.’’ (पी.टी.आय. वृत्त)” 

(संदर्भ : http://www.rediff.com/news/2002/feb/28train1.htm )

 

   दंगलींच्या दुसरया दिवशी ‘दिसताक्षणी गोळ्या घाला’ असे आदेश राज्यातील ३४ ठिकाणी देण्यात आले होते. ‘रेडिफ डॉट कॉम’ने १ मार्च २००२ ला दिलेल्या बातमीत म्हटले:

   ‘‘शहरातील वाढत्या हिंसाचारामुळे चिंतित झाल्याने गुजरात सरकारने जाळपोळ आणि हिंसाचार करणारयांना रोखण्यासाठी पोलिसांना ‘दिसताक्षणी गोळ्या घाला’ असे आदेश शुक्रवारी (१ मार्च २००२) दिले. अधिकृत सूत्रांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. जाळपोळ, लुटालूट आणि हिंसाचार करणारयांना दिसताक्षणी गोळ्या घाला, असे आदेश मोदींनी पोलिसांना दिले आहेत.

   दरम्यान, लष्कराने हिंसाचारग्रस्त अहमदाबाद, दरियापूर, शहापूर, शाहीबाग आणि नरोडा भागात लोकांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यासाठी ध्वजसंचलन केले. शहरातील अखंड हिंसाचारात १११ लोकांचे बळी गेले आहेत. पोलिसांनी सांगितले की, दरियापूर, शाहपूर, शाहीबाग आणि नरोडा भागात लष्कर बाहेर पडले आहे.’’ 

(संदर्भ: http://www.rediff.com/news/2002/mar/01train4.htm )

 

   आणि ते म्हणतात, की नरेंद्र मोदींनी दंगलखोरांना हत्या करण्यासाठी ३ दिवस दिले! गुजरात दंगलींसाठी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली पाहिजे, अशीही त्यांची मागणी आहे. या लोकांनी आणि टी.व्ही. वाहिन्यांवर येऊन सत्य सांगण्यात कमी पडलेल्या भाजपा प्रवक्त्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे की, माफी नरेंद्र मोदींनी नव्हे, तर वारंवार खोटे बोलणारया माध्यमांनीच मागितली पाहिजे. या खोटारड्या माध्यमांवर ‘कलम १५३ अ’ खाली (२ गटांत द्वेषभावना भडकावणे) एकतर्फी बातम्या प्रसिद्ध करून मुस्लिमांना भडकाविल्याबद्दल आणि भाजपा, संघपरिवार तसेच मोदींची बदनामी करून, त्यांची आणि भारताची प्रतिमा मलिन केल्याबद्दल ‘कलम ५००’ अन्वे खटला भरता येऊ शकतो.

कल्पित कथा