मुस्लिम हे कत्तलखान्यापासून लपणारी गुरे असल्यासारखे होते

सत्य: अर्थात नरोडा पाटिया, गुलबर्ग सोसायटी, नरोडा ग्राम, सदरपुरा, पांडरवाडा, ओड आणि इतर काही ठिकाणी झालेल्या एकतर्फी हल्ल्यांत मुस्लिम मारले गेले. तरी सर्व दंगली एकतर्फी नव्हत्या. या आधीच्या काही प्रकरणात आपण पाहिल्याप्रमाणे मुस्लिमही हिंदूंइतकेच आक्रमक होते, किमान पहिल्या तीन दिवसांनंतर. हिंमतनगर, दनीलिमडा, सिंधी मार्केट आणि अहमदाबादमधील इतर अनेक ठिकाणी मुस्लिमांनी हिंदूंवर भीषण हल्ले चढविले. ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ यांनी म्हटल्याप्रमाणे मुस्लिमांनी अनेक ठिकाणी दंगली सुरू केल्या आणि हिंदूंना घराबाहेर काढले. १५ एप्रिल २००२ च्या ‘इंडिया टुडे’च्या अंकातही अशीच माहिती देण्यात आली आहे.

 

    एकूण ४० हजार हिंदूंना दंगलग्रस्त शिबिरांत आसरा घ्यावा लागला. मुस्लिमांनी पेटविलेल्या दंगलीत दलितांची सर्वाधिक हानी झाली. २१ मार्च २००२ ला अहमदाबादमधील रेवडी बाजारात हिंदूंची ५० दुकाने पेटविण्यात आली आणि त्यात १५ कोटींचे नुकसान झाले. ३ मार्च २००२ नंतर मुस्लिमांनी १५७ ठिकाणी दंगली सुरू केल्याची नोंद अधिकृतपणे पोलिसांनी केली आहे. त्यांच्या भागात गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आलेल्या पोलिसांना आणि लष्कराला त्यांनी वस्तीत शिरू दिले नाही. वस्तीत आलेल्या पोलिसांवर आणि लष्करावर त्यांनी दगडफेक केली. मुस्लिम वस्तीतील रहिवाशांनी दंगलखोरांना पळून जाता यावे आणि शस्त्रे लपविता यावीत, म्हणून मानवी साखळी उभी केली आणि वीजेच्या तारा कापल्या. 

 

   गुजरातमधील विविध न्यायालयांनी, ‘गोधरा’नंतरच्या अहमदाबाद आणि बडोद्यातील दंगली घडविण्यासाठी काही मुस्लिमांना दोषी ठरविले. ‘गोधरा’ नंतरच्या दंगलीत एका प्रकरणात ७ मुस्लिमांना, तर दुसरया प्रकरणात ९ मुस्लिमांना दोषी ठरविण्यात आले. याचा विस्तृत तपशील आपण पुढच्या एका प्रकरणांत बघूच. मुस्लिमांना झालेल्या शिक्षेवरून हे सिद्ध होते की काही मुसलमान तेवढेच आक्रमक होते.

कल्पित कथा