सत्य– याउलट माध्यमांनी आपल्याला ‘मुस्लिमविरोधी’ ठरवू नये, म्हणून मुस्लिम धर्मांधांना पकडतानासुद्धा पोलीस १० वेळा विचार करीत होते. पोलीस गोळीबारात मारल्या गेलेल्यांमध्ये पहिल्या ३ दिवसांत बहुसंख्य हिंदू होते (९८ पैकी ६०). ६ एप्रिल २००२ पर्यंत पोलीस गोळीबारात एकूण १२६ लोक ठार झाले, त्यापैकी ७७ हिंदू होते. १८ एप्रिल २००२ पर्यंत पोलीस गोळीबारात मुस्लिमांपेक्षा जास्त हिंदू मारले गेले. ७४ दिवसांच्या एकूण दंगलकाळात पहिल्या ३ दिवसांत हिंदू आक्रमक होते. याउलट ७४ पैकी कदाचित ७३ दिवस मुस्लिम आक्रमक होते. पहिल्या दिवशी, म्हणजे २८ फेब्रुवारी २००२ ला पोलीस गोळीबारात ठार झालेल्या १७ लोकांपैकी ११ लोक हिंदू होते. २८ फेब्रुवारीलाच अहमदाबादमधील बापूनगर आणि जमालपूर भागामध्ये मुस्लिमांनी हिंदूंवर हल्ले चढविले. दुसरया आणि तिसरया दिवशी हिंदू आणि मुस्लिम दोघेही एकमेकांवर हल्ले चढवीत होते. त्यामुळे पोलीस गोळीबारात दोन्हीकडील लोक मारले गेले. पहिल्ल्या ३ दिवशी, म्हणजे २८ फेेब्रुवारीला नरोडा पाटिया, गुलबर्ग सोसायटी, सदरपुरा, पंडरवाडा अशा ४-५ ठिकाणी मुस्लिमांच्या मोठ्या प्रमाणात हत्या झाल्या, आणि हिंसक जमावांच्या संख्येच्या तुलनेत पोलीस अगदीच कमी असल्याने गोळीबारात फार जास्त लोकांना मारू शकले नाही. १ मार्च २००२ पासून मुस्लिम त्वेषाने आक्रमण करून आले, त्यावेळी पोलीस गोळीबारात मुस्लिमही मारले गेले, कारण तेव्हा स्थिती आटोक्याबाहेर नव्हती. २५ एप्रिल २००२ पर्यंत ७७ ते ८० हिंदू पोलीस गोळीबारात मारले गेले, तर मुस्लिमांची संख्या ९३ होती. मुस्लिमांचा आकडा का वाढला, याचा खुलासा वर आलाच आहे. १८ एप्रिल २००२ पर्यंत अधिक हिंदू पोलिस गोळिबारात मेले, मुसलमान कमी.
काही ठिकाणी मुस्लिमांनी पोलीस आणि लष्करावर गोळीबार केला. वीज बंद करून, मानवी साखळी करून सशस्त्र गुन्हेगारांना वाचविले, अनेक ठिकाणी दंगली सुरू केल्या आणि तरीही पोलिसांवरच ते पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप केला. आपल्यावर ‘मुस्लिम विरोधी’ असा शिक्का मीडियात मारला जाईल, या भीतीपोटी पोलीस आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावू शकले नाहीत.
‘इंडिया टुडे’ साप्ताहिकाने आपल्या २० मे २००२ च्या अंकात हे स्पष्टपणे मान्य केले आहे की मुस्लिम धर्मांध आणि दंगलग्रस्तांवर पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही, कारण त्यांना ‘मुस्लिमविरोधी’ असा शिक्का बसण्याची भीती वाटत होती. हा वृत्तांत म्हणतो : ‘‘मुस्लिमांनी पोलिसांवर एकापाठोपाठ एक केलेल्या हल्ल्यांमुळे परस्परांचा विश्वास जास्तच उध्वस्त झाला आहे. पोलिसांना ‘मुस्लिमविरोधी’ हा शिक्का बसल्यामुळे ते आता मुस्लिम धर्मांधांना पकडण्यात काचकूच करीत आहेत.”
(संदर्भ : http://archives.digitaltoday.in/indiatoday/20020520/states2.html )
पोलिसांनी २८ एप्रिल २००२ पर्यंत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जवळपास १८ हजार हिंदूंना ताब्यात घेतले, तर दंगल माजविण्याच्या आरोपावरून १० हजार हिंदूंना अटक केली, असे जवळपास २८,००० हिंदू एकूण अटक केलेत, तर ७६५१ मुसलमानांना अटक केली (प्रतिबंधात्मक व दंगलींसाठी), असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने २८ एप्रिल २००२ ला दिले आहे. या संपूर्ण दंगलींप्रकरणी एकूण ४,२७४ केसेस नोंदविण्यात आल्यात.
१९,२०० हिंदू आणि ७,७९९ मुस्लिमांना अटक करण्यात आली. हा एकूण आकडा २६,९९९ म्हणजे २७ हजार आहे. ऑक्टोबर २००५ पर्यंत २५,२०४ लोकांना अटक झाली होती. अटकेचा अखेरचा आकडा थोडा वाढला आहे, व २०१२ साली अटकींची संख्या २६९९९ म्हणजे सुमारे २७००० होती. खटले भरून ते पूर्णत्वाला नेण्यामध्येही पोलिसांनी कार्यदक्षता दाखविली. त्यामुळे गोधरा आणि नंतरच्या दंगलींमध्ये विविध खटल्यात किमान ४८५ लोकांना दोषी ठरविण्यात आले. त्यापैकी ३७४ लोक हिंदू आणि १११ मुस्लिम होते.