सत्य – या दोन्ही दंगलींमध्ये दिवस-रात्रीचे अंतर होते. एन.डी.टी.व्ही. (या वाहिनीचे मालक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या [CPM] प्रमुख नेत्यांचे जवळचे नातेवाईक आहेत) आणि इतर खोटारडे, यांनी या दोन्ही दंगलींबाबत अनेकदा देशाची मुद्दाम दिशाभूल केली. ‘खबरों की खबर’ या एन.डी.टी.व्ही.वरील कार्यक्रमात सूत्रसंचालक विनोद दुआ यांनी मे-जून २००५ च्या कार्यक्रमात प्रेक्षकांना एक प्रश्न विचारला-
“यापैकी कोणता मुद्दा आपल्याला चिंताजनक वाटतो?
१. सचिन तेंडुलकर जखमी होणे
२. चित्रपटावरील प्रश्न
३. भाजपा आणि कॉंग्रेसवर गुजरात आणि १९८४ च्या दंगलींचा लागलेला कलंक”
हे प्रश्न खास मार्क्सवादी पद्धतीचे पर्याय देणारे आहेत. तिसरया पर्यायामध्ये सत्य गुंडाळून ठेवायचे आणि १९८४ च्या दंगली आणि गुजरातच्या २००२ च्या दंगली सारख्याच असल्याचे दाखवत कॉंग्रेसप्रमाणे भाजपाने दंगली घडविल्या, असे म्हणण्याचा प्रयत्न होता.
गुजरात दंगली आणि १९८४ च्या दंगली यामध्ये नेमके फरक कोणते आहेत, ते आपण पुढील प्रकरणात सखोल पाहूच. १९८४ च्या दंगली नवी दिल्लीबरोबरच पश्चिम बंगाल, त्रिपुरामध्येही झाल्यात, तर २००२ मध्ये गोधरामुळे गुजरातबाहेर एकही दंगल झाली नाही. (मोदींनी आपल्या मुलाखतीत, जी आपण कल्पित कथा १ मध्ये बघितली, महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात मेलेल्या लोकांचा उल्लेख केला, त्या दंगली गोधरानंतर अनेक महिन्यांनी झालेल्या वेगळ्या दंगली होत्या.) दोन्ही दंगलींच्या एकूण स्वरूपामध्ये तर फरक होताच, पण या दंगली हाताळण्याच्या सरकारच्या पद्धतीतही मोठा फरक होता. हे तपशील आपण पुढील प्रकरणात पाहूच.