गुजरात पोलिसांनी दंगलींकडे डोळेझाक केली

सत्य- परिस्थिती अत्यंत भयंकर असतानासुद्धा पोलिसांनी आपले काम चोखपणे आणि परिणामकारकरित्या बजावले. खरे तर, दंगलकाळात उपलब्ध पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी होती. अहमदाबादमधील पोलिसांची संख्या एकूण ६ हजार होती आणि त्यापैकी फक्त १५०० जवान सशस्त्र होते, तर २८ फेब्रुवारीला जमलेले जमाव प्रचंड होते, हे आपण तिसरया प्रकरणात ‘इंडिया टुडे’च्या वृत्तांतात पाहिले आहे. ‘हिंसाचाराच्या उसळलेल्या महासागरांत पोलिसांची उपस्थिती एका बिंदूसारखी होती’, हे ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे वार्तांकनही आपण पाहिले आहे. गुजरातमधील उपलब्ध सर्व पोलीस ताकद रस्त्यावर तैनात केल्यानंतरदेखील ही परिस्थिती होती. ‘२८ फेब्रुवारीला जमावाचा उद्रेक शिगेला पोचला होता (‘mob fury reached its crescendo’), ‘परिस्थिती वेगाने हाताबाहेर जात होती’ आणि ‘दंगलखोरांच्या संख्येपुढे पोलीस अगदीच अपुरे होते’ ही ‘द हिंदू’च्या बातमीतील विधानेही आपण पाहिली आहेत. ‘द टेलिग्राफ’ आणि ‘द ट्रिब्युन’ या दैनिकांनी दिलेल्या बातम्याही अशाच आहेत. १ मार्च २००२ चा हिंसाचार २८ फेेब्रुुवारीपेक्षा खूप कमी असूनही “भारतीय लष्कर व ‘दिसताक्षणी गोळ्या घाला’ हे आदेशही दंगली थांबवू शकले नाहीत”, हे ‘टाइम्स ऑफ इंडिाया’चे वृत्तही आपण पाहिले आहे. अशी परिस्थिती जर १ मार्चला असेल जेव्हा हिंसा २८ फेब्रुवारीच्या तुलनेने फार कमी होती, तर २८ फेब्रुवारीला जेव्हा लष्कर नव्हते आणि हिंसाचार पराकोटीला पोचला होता, तेव्हा अवस्था काय झाली असेल?

 

   असे असूनही पहिल्या ३ दिवसातच हिंसक जमावांना काबूत आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची ६,५०० नळकांडी फोडली, तर गोळीबाराच्या ५,४५० फैरी झाडल्या. पहिल्या ३ दिवसात गोळीबाराच्या ४ हजार फैरी झाडल्याचे आधी सांगितले जात होते, पण अधिकृत आकडेवारीनुसार हा आकडा ५४५० फैरी असा आहे, असे आता स्पष्ट झाले आहे. पहिल्या ३ दिवसांत पोलिसांच्या गोळीबारात एकूण ९८ लोक मारले गेले, त्यापैकी अर्ध्याहून अधिक हिंदू होते. एकूण ७४ दिवस चाललेल्या दंगलींपैकी ७३ दिवस लष्कर तैनात असूनही  जमावांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची १५,३६९ नळकांडी फोडली, तर गोळीबाराच्या १०,५५९ फैरी झाडल्या. या संपूर्ण काळात पोलीस गोळीबारात ठार झालेल्यांची संख्या १९९ होती. त्यापैकी १०१ लोक पहिल्या आठवड्यात मारले गेले.

 

   दंगली आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांत २०० पोलीस ठार झाले, अशी बातमी ‘एनसाक्लोपीडिया विकीपीडिया’ने विशेष सूत्रांच्या माहितीनुसार दिली आहे. हा आकडा मला अशक्य वाटतो. अधिकृत नोंदींनुसार एकूण ५५२ सुरक्षाकर्मी जखमी झाले. त्यापैकी ८३ अधिकारी होते, तर ४१९ पोलीस आणि ५० गृहरक्षक दलाचे जवान होते. या आकडेवारीत सुरक्षाकर्मींंंमधील मृतांची संख्या दिलेली नाही.

 

   दंगलींमध्ये आरोपी असलेल्या २५,४८६ लोकांपैकी गुजरात पोलिसांनी २५,२०४ लोकांना ऑक्टोबर २००५ पर्यंत अटक केली. उत्तर गुजरातमधील सांजेली गावात पोलिसांनी २,५०० मुस्लिमांना वाचविले, बडोद्याजवळील बोडोलीमध्ये ५ हजार मुस्लिम, तर विरमगाममध्ये किमान १० हजार मुस्लिम वाचविले. सर्व िमळून किमान २४ हजार मुस्लिमांना वाचविण्यात पोलिसांना यश आले. मुस्लिमांना वाचविण्याच्या या प्रयत्नांत पोलिसांना जखमा झाल्या.

कल्पित कथा

Tags: No tags

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *